गेल्या काही काळापासून बायोपिक चित्रपट चांगलाच गल्ला जमवत आहेत. हे पाहून आता अनेक निर्माते-दिग्दर्शक बायोपिक फॉर्म्यल्याला पसंती देत अनेक चित्रपट बनवत आहेत. त्यामुळे येत्या काळातही बायोपिक्सचा जणू पूरच येणार आहे. 2019 मध्येही अनेक मोठे बायोपिक रिलीज झाले. चला वर्ष संपताना टाकूया यंदा रिलीज झालेल्या बायोपिक्सवर एक नजर
द अँक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर
11 जानेवारी 2019 ला द अँक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर चित्रपट रिलीज झाला. या चित्रपटात अभिनेता अनुपम खेर यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची भूमिका निभावली होती. आपल्या दमदार अभिनयाने अनुपम यांनी वाहवा तर मिळवली पण हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही खास कमाल दाखवू शकला नाही.
‘मणिकर्णिका -द क्वीन ऑफ झांसी’
25 जानेवारीला ‘मणिकर्णिका -द क्वीन ऑफ झांसी’ रिलीज झाला होता. ‘मणिकर्णिका’ हा चित्रपट झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या जीवनावर आधारित होता. अभिनेत्री कंगना रणौतने या चित्रपटासाठी खूप मेहनत घेतली. या चित्रपटाबाबत अनेक वादविवादही झाले. पण चित्रपटाला प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळाला.
ठाकरे
दिग्दर्शक अभिजीत पानसेंचा हा सिनेमा ‘ठाकरे’ शिवसेनाप्रमुख आणि महाराष्ट्राच्या राजकारणात महत्त्वपूर्ण भूमिका निभावणाऱ्या बाळासाहेब ठाकरेंच्या जीवनाची गाथा होय. यामुळे हा सिनेमा हिंदीसोबतच मराठीतही प्रदर्शित करण्यात आला. चित्रपटांमध्ये बाळासाहेब ठाकरेंच्या भूमिकेत अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी आणि त्याच्या बायकोच्या भूमिकेत अभिनेत्री अमृता राव दिसली होती.
पीएम नरेंद्र मोदी
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील हा बायोपिक ज्याची चर्चाच जास्त झाली. हा चित्रपट 24 मे 2019 ला रिलीज झाला. या बायोपिकमध्ये विवेक ओबेरॉयने पीएम नरेंद्र मोदींची भूमिका केली. पण हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर काहीच कमाल दाखवू शकला नाही. ना लोकांना विवेक ऑबेरॉयचा अभिनय आवडला.
सुपर 30
बिहारमधील गणितज्ञ आनंद कुमार याच्या जीवनावर बनलेला चित्रपट ‘सुपर 30’ 12 जुलैला रिलीज झाला. चित्रपट सुपर 30 मध्ये अभिनेता ऋतिक रोशनने आनंद कुमारची भूमिका अगदी हूबेहूब साकारली. सुपर 30 मध्ये ऋतिकसोबतच टीव्ही सीरियल्समध्ये काम केलेली अभिनेत्री मृणाल ठाकुरही दिसली. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली.
सांड की आंख
भूमी पेडणेकर आणि तापसी पन्नू या दोघींनी या चित्रपटात साकारल्या भारतातील सर्वात वयस्क महिला शार्प शूटर चंद्रो तोमर आणि प्रकाशी तोमर ज्या शूटर दादी नावाने प्रसिद्ध आहेत. या चित्रपटाच्या नावावरून अनेक विवाद झाले होते. त्यानंतर चित्रपटाचं पोस्टर लाँच करण्यात आलं. रिलीजनंतरही हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमाल करू शकला नाही.
तर हे झालं 2019 बाबत पण 2020 मध्येही बायोपिकची लाट कायम राहणार असल्याचं चित्र आहे. आता पाहूया गेल्यावर्षीप्रमाणे येत्या वर्षात बायोपिकला प्रेक्षकांची पसंती मिळते की नाही.
खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop’s मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.
हेही वाचा –
YEAR ENDER : बॉलीवूडमधल्या या जोड्यांचं झालं ब्रेकअप
हाऊसफुल ‘कुमार’ आणि ‘शूटर दादी’ भूमि पेडणेकर सर्वाधिक लोकप्रिय