ADVERTISEMENT
home / Dating
ऐश्वर्याने ‘या’ कारणांमुळे केला होता सलमानशी ब्रेकअप

ऐश्वर्याने ‘या’ कारणांमुळे केला होता सलमानशी ब्रेकअप

अनेकदा आपल्यासमोर अशी नाती असतात जी आपल्याला प्रेमापेक्षा मजबूत काहीच नाही याचा प्रत्यय देतात. तर काही रिलेशनशिप्स अशा असतात ज्या आपल्याला धडा देऊन जातात. अशीच बी-टाऊनमधली सर्वात चर्चित आणि वादग्रस्त लव्हस्टोरी होती ती ऐश्वर्या राय आणि सलमान खान यांची. त्यांच्या रिलेशनशिपमुळे अनेक फॅन्स खूश झाले होते. पण जसा काळ गेला तसं त्यांच्या रिलेशनशिपमधील मीडियातून समोर आलेल्या गोष्टी धक्कादायक होत्या. सर्वात जास्त शॉकिंग होती त्यांच्या नात्याची ड्रामॅटिक एडिंग. जी लोकं आजही विसरले नाहीत. खरंतर हे सेलिब्रिटी रिलेशनशिप होतं म्हणून त्याबाबत जगाला कळलं. पण समाजातही अशा अनेक रिलेशनशिप्स असतात. ज्यामध्ये मुली ती नाती निभावतात पण ते योग्य नसतं. त्यामुळे अशाच टॉक्सिक रिलेशनशिप्स आणि त्यापासून कसं वाचावं याबाबत जाणून घ्या. तुम्हीही वेळीच ऐश्वर्यासारखा स्टँड घ्या आणि खालील गोष्टी आढळल्यास ब्रेकअपचा निर्णय घ्या.

Instagram

  • पजेसिव्हनेसची सीमा

प्रत्येक नात्यात थोडाफार पजेसिव्हनेस हा असतोच. पण जेव्हा तो अति होतो तेव्हा धोक्याची घंटा वाजलीच म्हणून समजा. ओव्हर पजेसिव्ह नेचर असलेली व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीच्या आयुष्यातील छोट्या छोट्या गोष्टीतही लुडबूड करू लागते. जसं फोनवर कोणाशी बोलत होतीस, तो मुलगा तुझ्याशी काय बोलत होता, कुठे चालली आहेस, तुला इतका वेळ का लागला? इ. एवढंच नाहीतर अशी लोकं पार्टनरमुळे कोणालाही भेटणं टाळणं किंवा पार्टनरच्या आवडीनुसार सगळं करू लागतात. जर तुमचाही बॉयफ्रेंड असं वागत असेल तर योग्य वेळी ब्रेकअपचा निर्णय घ्या. 

ADVERTISEMENT
  • कंट्रोल फ्रीक 

प्रत्येक गोष्टीचा एक वेगळा असा पैलू असतो. जेव्हा रिलेशनशिपची गोष्ट असते तेव्हा असं नेहमी दिसून येतं की, कपल्स एकमेकांच्या आवडीनुसार स्वतःमध्ये बदल करतात. काही प्रमाणात ते नात्यासाठी योग्यही आहे. पण जर हे प्रत्येक बाबतीत होऊ लागलं तर ते चिंताजनक आहे. कारण यामधून तुमच्या पार्टनरचं कंट्रोलिंग नेचर दिसून येतं. जे काही काळासाठी चांगलं वाटेल पण नंतर गळ्यातील फास होईल. 

  • हात उचलणं 

ही अशी स्थिती आहे जी कोणत्याही परिस्थितीत सहन नाही केली पाहिजे. जर तुमचा बॉयफ्रेंड तुम्हाला फिजीकली अब्यूज करत असेल तर ते नातं लगेच तोडलं पाहिजे. एवढंच नाहीतर त्या व्यक्तीला तुमच्या आयुष्यातून हद्दपार केलं पाहिजे. असा विचार अजिबात करू नका की, रागात असं होतं किंवा प्रेमात असं चालतं. विश्वास ठेवा, जर पहिल्याच वेळी असं नाही केलं तर हे तुमचं आयुष्य उद्ध्वस्त करू शकतं. 

  • कमीपणा आणि वारंवार धमकी देणं 

तुमचा बॉयफ्रेंड तुम्हाला पुरूष म्हणून किंवा जास्त कमाई असल्याबद्दल कमीपणाने वागवतो का? असं असल्यास लगेचच वेगळं व्हा. नात्यात एकमेकांबद्दल आदर आणि सन्मान असलाच पाहिजे. तसंच स्वतःची गोष्ट मनवून घेण्यासाठी धमकी देणं किंवा स्वतःला इजा करून घेण्याची धमकी देणं हे प्रेम नाही गुन्हा आहे.

रिलेशनशिपमध्ये असताना फ्लर्ट करणं योग्य की अयोग्य

ADVERTISEMENT

अशा प्रकारच्या कोणत्याही नात्यात अडकू नका. वेळीच स्टँड घ्या आणि त्या व्यक्तीपासून दूर व्हा. गरज पडल्यास अशा नात्यातून बाहेर पडण्यासाठी दुसऱ्यांचीही मदत घ्या.

रिलेशनशिपमध्ये जोडीदाराला ‘नाही’ म्हणणंही गरजेचं आहे, कारण…

घराबाहेर न पडता काहीतरी नवीन शिकायचं आहे. तर POPxo तुम्हाला देत आहे ही संधी. #POPxoLive जॉईन करा आणि तज्ज्ञांकडून शिका काही हटके गोष्टी. तर मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo अॅप डाऊनलोड करा. आमचे POPxo अॅप डाऊनलोड करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा.

हेही वाचा –

ADVERTISEMENT

नात्यात ‘या’ चुका करत असाल तर वेळीच सावध व्हा!

या राशीची लोकं करतात लवकर ब्रेकअप

सिंगल स्टेटस असण्याचे फायदे आणि तोटे

15 Apr 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT