उन्हाळ्याच्या दिवसात तेलकट त्वचा असणाऱ्यांचा त्रास अधिक वाढतो. त्वचा चिकट होते आणि त्यामुळे मुरूमांचा आणि पुळ्यांचा अधिक त्रास सुरू होतो. पण तुम्हाला हा त्रास कमी करायचा असेल तर आम्ही तुम्हाला काही उत्तम घरगुती फेसपॅक या लेखातून सांगणार आहोत. घरात उपलब्ध असणाऱ्या साहित्यातूनच तुम्हाला हे तयार करता येते. त्यामुळे तुम्हाला बाजारात जाऊन वेगळं सामान आणण्याची गरजही नाही. या साहित्याच्या वापरातून तयार करण्यात आलेल्या फेसपॅकने त्वचा अधिक हेल्दी होते आणि चेहरा उजळतो. उन्हाळ्यात तसा तर अधिक वापर मुलतानी मातीचा (Multani Mitti) करण्यात येतो. पण आपल्या स्वयंपाकघरातही असे काही साहित्य असते ज्याचा वापर तुम्ही फेसपॅकसाठी करून तेलकट त्वचेची समस्या सोडवू शकता.
सदाफुलीच्या फुलांचा फेसपॅक
freepik
साहित्य
- 3 चमचे कच्चे दूध
- 3-4 थेंब गुलाब पाणी
- 1 थेंब बदामाचे तेल
- 10 सदाफुलीची फुले
बनविण्याची पद्धत
- सदाफुलीची फुले नीट स्वच्छ धुवा आणि एका बाऊलमध्ये काढा. पेस्ट बनविण्यासाठी मिक्सरचा वापर न करता हाताने कुस्करा
- सर्वात पहिले यामध्ये दूध, बदाम तेल आणि गुलाबपाणी मिक्स करून क्रश करून घ्या. मग ही पेस्ट ब्रशच्या सहाय्याने आपल्या चेहऱ्याला लावा
- 15 मिनिट्स असंच राहू द्या आणि मग स्वच्छ पाण्याने चेहरा धुवा. चेहऱ्या धुतल्यावर फुलांचा गंध जात नसेल तर गुलाबपाण्याचे काही थेंब आपल्या चेहऱ्याला लावा
उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये त्वचा आणि केसांसाठी घरगुती फेसपॅक आणि हेअरमास्क
झेंडूच्या फुलांचा फेसपॅक
Freepik
साहित्य
- 2 झेंडूची फुले
- 1 चमचा दही
- अर्धा चमचा लिंबाचा रस
बनविण्याची पद्धत
- झेंडूचे फूल त्वचा आणि केस दोन्हीसाठी उपयुक्त ठरते. तेलकट त्वचेसाठी तुम्ही याचा फेसपॅक घरी तयार करून वापरू शकता
- हे अँटिएजिंगची समस्या सोडविण्यासाठी मदत करते. त्यासाठी तुम्ही 2 झेंडूची फुले घ्या आणि त्याच्या पाकळ्या काढा.
- चमच्याच्या मदतीने तुम्ही क्रश करा आणि त्याची पेस्ट बनवा
- या पेस्टमध्ये दही आणि लिंबाचा रस मिक्स करा. त्वचेवर लावा आणि 15 मिनिट्स तसंच ठेवा
- नंतर थंड पाण्याने स्वच्छ करा आणि लाईट क्रिमचा वापर करा
गुलाबाच्या फुलापासून फेसपॅक
Freepik
साहित्य
- 10-15 गुलाबाच्या पाकळ्या
- अर्धा चमचा मुलतानी माती
- 2 चमचे गुलाब पाणी
बनविण्याची पद्धत
- गुलाबाच्या पाकळ्यांची सुकी पावडर बनवून घ्या आणि ती एका टाईट कंटेनरमध्ये स्टोअर करा
- जेव्हा फेसपॅक बनवायचा आहे तेव्हा ही पावडर बाऊलमध्ये घ्या आणि त्यात मुलतानी माती व गुलाबपाणी मिक्स करून पेस्ट तयार करा
- हे पेस्ट चेहऱ्याला लावा आणि 15 मिनिट्स तसंच राहू द्या
- सुकल्यावर थंड पाण्याने स्वच्छ करा. चेहरा जर कोरडा वाटत असेल तर तुम्ही त्यावर मॉईस्चराईजर लावा
- त्वचा अधिक तेलकट असेल तर हा फेसपॅक तुमच्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे
हे तिन्ही फेसपॅक तुमच्या तेलकट त्वचेसाठी उपयुक्त आहेत. तसंच याचा कोणताही दुष्परिणाम तुमच्या चेहऱ्यावर होत नाही. तुम्हाला काहीही अलर्जी असेल तर तुम्ही याचा वापर करू नका. तसंच तुम्हाला कोणतीही शंका असेल तर कोणताही प्रयोग करताना तुम्ही पॅच टेस्ट करून घ्या.
उन्हाळ्यात ताजेतवाने राहण्यासाठी बनवा विशिष्ट फेसपॅक
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक