ADVERTISEMENT
home / DIY लाईफ हॅक्स
How Good Is Air Fryer

एयर फ्रायरमध्ये बनवलेले पदार्थ खरंच हेल्दी असतात का, जाणून घ्या सत्य 

हल्ली बरेच आरोग्याविषयी जागरूक असणारे लोक एयर फ्रायर घेत आहेत. पण ते वापरणे खरंच तुमच्या आरोग्यासाठी योग्य आहे का? खरंच त्यामध्ये पदार्थ चांगले कुरकुरीत तळले जातात का, तसेच पदार्थांच्या चवीत काही बदल होतो का किंवा खरंच त्यामध्ये हेल्दी स्नॅक्स बनतात का असे अनेक प्रश्न आपल्याला पडतात. जाणून घेऊया एयर फ्रायर कसे काम करते आणि त्याचे खरंच आरोग्यासाठी फायदे आहेत का!

एयर फ्रायर म्हणजे काय 

एयर फ्रायर हे एका प्रकारचे काउंटर टॉप कन्व्हेक्शन ओव्हनच आहे. ज्यामध्ये अन्न शिजवण्यासाठी गरम हवेचा वापर केला जातो. या प्रक्रियेत तेलाचा वापर नगण्य आहे. एअर फ्रायरमध्ये फ्रायर-स्टाईल बास्केट असते जिथे अन्न ठेवले जाते आणि जेव्हा तुम्ही ते चालू करता तेव्हा गरम हवा अन्नाभोवती सोडली जाते. यात गरम करण्याची यंत्रणा आहे, पंखा आहे आणि गरम हवेच्या झोतामुळे अन्न कुरकुरीत बनते आणि त्याची चव डीप फ्राय केलेल्या पदार्थाप्रमाणेच असते. परंतु या प्रक्रियेत तेलाचा वापर अजिबात होत नाही म्हणून हे अलीकडे खूप लोकप्रिय झाले आहे. भाज्या भाजण्यासाठी, मांस शिजवण्यासाठी, बेक करण्यासाठी आणि तत्सम अनेक कामांसाठी याचा वापर केला जाऊ शकतो.

How Good Is Air Fryer
How Good Is Air Fryer

एयर फ्रायरमध्ये शिजवलेले अन्न हेल्दी असते 

एयर फ्रायरमध्ये अन्न तेलाशिवाय शिजवलेले असते, म्हणून ते आरोग्यासाठी चांगले असते आणि त्यात कमी चरबी असते. ओव्हन फ्रायिंगपेक्षा त्याचे परिणाम चांगले आहेत कारण एअर फ्रायिंगमुळे धूर होत नाही आणि फ्रायरमध्ये अन्न शिजवले जात असताना स्वयंपाकघरातील तापमान एकसमान राखले जाते. एअर फ्रायरमध्ये शिजवलेल्या अन्नामध्ये कॅलरीज आणि चरबी कमी असल्याने, जे लोक वजन कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांना ते मदत करते. तसेच अन्न शॅलो फ्राय किंवा डीप फ्राय करण्यापेक्षा ते एयर फ्रायरमध्ये शिजवले तर ते आपले कोलेस्टेरॉल आणि इतर पॅरामीटर्स व्यवस्थापित करण्यात मदत करते. यात तेलाशिवाय शिजवलेले अन्न असते म्हणून ते लिपिड प्रोफाइल निरोगी राखण्यास आणि नियंत्रित करण्यास मदत करते.

अनेक हानिकारक संयुगांपासून बचाव 

How Good Is Air Fryer
How Good Is Air Fryer

तेलात पदार्थ तळल्यामुळे ऍक्रिलामाइड ((Acrylamide ) सारखी धोकादायक संयुगे देखील तयार होतात, जे कर्बोदकांपासून बनलेले एक संयुग आहे. एका अभ्यासानुसार, ऍक्रिलामाइड हे संभाव्य कार्सिनोजेन आहे आणि त्यामुळे कर्करोग होऊ शकतो. तसेच तज्ज्ञ असा दावा करतात की पारंपारिक डीप-फ्रायिंगच्या तुलनेत एअर-फ्रायिंगमध्ये ऍक्रिलामाइडचे उत्पादन 90% पर्यंत कमी होते. तेल पुन्हा पुन्हा गरम करून त्यात पदार्थ तळल्यास अल्डिहाइड्स, हेटरोसायक्लिक अमाइन आणि पॉलीसायक्लिक ऍरोमॅटिक हायड्रोकार्बन्स देखील तयार होतात. ही आपल्या आरोग्यासाठी घातक ठरणारी रसायने आहेत. म्हणूनच पदार्थ तेलात तळण्यापेक्षा तो एयर फ्रायरमध्ये शिजवल्यास त्यात हे हानिकारक घटक तयार होत नाहीत. एयर फ्रायरमध्ये विविध प्रकारचे अन्न शिजवले जाऊ शकते. तळलेले पदार्थ खाण्याच्या भीतीने आपण अनेक पारंपारिक आणि नवीन पाककृती करून खाऊ शकत नाही. परंतु एयर फ्रायरमध्ये असे अनेक पदार्थ शिजवणे सोपे तर होतेच आणि ते हेल्दी आणि रुचकर देखील होतात. त्यामुळे जर तुम्हाला तुमच्या आवडत्या गोष्टी डीप फ्राय न करता कुरकुरीत हव्या असतील तर तुम्ही बिनधास्त एयर फ्रायरचा उपयोग करू शकता. 

ADVERTISEMENT

तर आता तुमच्या मनातील शंका मिटली असेलच की एयर फ्रायरमध्ये खरंच पदार्थ हेल्दी पद्धतीने बनवता येऊ शकतात. त्यामुळे ते घेणे म्हणजे पैसे वाया घालवणे असे नव्हे. त्याचा खरंच उपयोग केला जाऊ शकतो. बाजारात अनेक प्रकारचे एयर फ्रायर्स उपलब्ध आहेत, जे तुम्ही तुमच्या आवडीनुसार आणि बजेटनुसार खरेदी करू शकता.

Photo Credit- istock

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा   MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक

25 Jul 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT