ADVERTISEMENT
home / DIY लाईफ हॅक्स
How to sharpen knife with coffee mug in marathi

चाकूची धार कमी झाली असेल तर घरच्या घरी करा हा उपाय

स्वयंपाक घरात चाकूचा वापर सतत होत असतो. भाज्या, फळं आणि इतर अनेक गोष्टी कापण्यासाठी, चिरण्यासाठी चाकू वापरला जातो. बऱ्याचदा चाकूचा अति वापर झाल्यामुळे ते बोथट होतात. कधी कधी घरातील एकाही चाकूला नीट धार नसल्याचं तुमच्या लक्षात येतं. असे बोथट चाकू काही कामाचे नसतात. अशा वेळी केवळ चाकूला धार नाही म्हणून तुमच्या स्वयंपाकातील कामाचा खोळंबा होऊ शकतो. कारण भाजी अथवा इतर गोष्टी नीट कापल्या अथवा चिरल्या नाहीत तर पदार्थ चांगला होत नाही. म्हणूनच चाकूला वेळच्या वेळी धार काढायला हवी. चाकूची धार काढण्यासाठी काही लोक ते धार काढणाऱ्या लोकांकडे नेतात. ही एक वेळ काढू प्रोसेस आहे. काही जणांकडे धार काढण्याचा दगड अथवा साहित्य घरीच असते. पण जर तुमच्याकडे ते नसेल अथवा यासाठी तुमच्याकडे पुरेसा वेळ नसेल तर तुम्ही घरातील साध्या कॉफी मगने तुमचे चाकू धारदार करू शकता. जाणून घ्या हा सोपा उपाय… यासोबतच वाचा सोप्या आणि उपयुक्त किचन टिप्स मराठी | Kitchen Tips In Marathi, आयुष्य अधिक सुखकर करणाऱ्या क्लिनिंग हॅक्स (Best Cleaning Hacks In Marathi), Palak Recipes In Marathi | पौष्टीक आणि चविष्ट पालक भाजी रेसिपीज,

कॉफी मगने चाकूला कशी काढावी धार

घरात चाकूला धार काढण्याचे साहित्य असो वा नसो तुमच्या घरी कॉफी मग नक्कीच असतो. या कॉफी मगच्या मदतीने तुम्ही चाकूला छान धार काढू शकता. तुम्ही कधी लक्ष दिलं नसेल पण कॉफीचा तळभाग हा खडबडीत असतो. ज्याचा वापर तुम्ही शार्प स्टेन प्रमाणे करू शकता. थोडक्यात जरी तुमच्याकडे धार काढण्याचे साहित्य नसलं तरी तुम्ही कॉफी मगचा यासाठी वापर करून तुमचं काम करू शकता. यासाठी वेळ काढून चाकू धार काढण्यासाठी नेण्यासाठी मुळीच गरज नाही.

चाकूला धार काढण्यासाठी कॉफी मगचा असा करा वापर

कॉफी मग उलटा करून टेबलावर ठेवा. त्यानंतर चाकू त्यावर घासून तुम्ही त्याला धार काढू शकता. मात्र असं करताना लक्षात ठेवा की तुमचा चाकू खडबडीत दात असलेला नसेल याची काळजी घ्या आणि कपवर जोर काढू नका. धार काढण्याच्या दगडावर तुम्ही चाकू धार काढण्यासाठी जसा घासता, तसाच तुम्हाला तो उलट्या कॉफी मगवर घासायचा आहे. पाच ते दहा मिनिटांमध्ये तुम्ही तुमचा चाकू या पद्धतीने कापण्या, चिरण्यासाठी तयार करू शकता. धार काढून झाल्यावर चाकू कोमट पाण्याने स्वच्छ करा. त्यानंतर तुम्ही एखादी भाजी अथवा फळ चिरून चाकूची धार चेक करू शकता. 

कधी वेळ वाचवण्यासाठी अथवा अडी अडचणीला तुम्ही हा उपाय करून नक्कीच तुमचा चाकू धारदार करू शकता. 
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

ADVERTISEMENT
23 Jun 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT