ADVERTISEMENT
home / DIY लाईफ हॅक्स
How to store wet and fresh ginger in rainy season in Marathi

पावसामुळे आलं लवकर खराब होत असेल तर या टिप्स करा फॉलो 

मुसळधार पावसात आल्याचा चहा पिण्याची मजा काही वेगळीच आहे. चहाच काय पावसात अनेक पदार्थांमध्ये अगदी सर्दी खोकल्याच्या काढ्यातही आल्याचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो. आल्यामधील औषधी गुणधर्म तुम्हाला आजारपणापासून दूर ठेवतात. पण पावसात आलं खराब होण्याची शक्यता जास्त असते. ओलं आलं फ्रीजमध्ये ठेवता येत नाही. आलं पावसात भिजल्यामुळे सडतं आणि खराब होतं. बऱ्याचदा अशा आल्यावर बुरशी जमा होते. यासाठीच पावसाच्या दिवसांमध्ये आलं टिकवणं कठीण काम असतं. जाणून घ्या पावसात आलं जास्तीत जास्त दिवस कसं टिकवावं. यासोबतच वाचा आरोग्यदायी टिप्स मराठी | Health Tips In Marathi, सोप्या आणि उपयुक्त किचन टिप्स मराठी | Kitchen Tips In Marathi आणि आले खाण्याचे फायदे आरोग्यासाठी आणि केसांसाठी (Ginger Benefits In Marathi)

पावसात आलं कसं टिकवावं जास्त दिवस

पावसात आल्याचा वापर मोठ्या प्रमाणावर होत असल्यामुळे ते टिकवणं गरजेचं असतं. सुकलेलं आलं जास्त दिवस टिकू शकतं. मात्र जर आलं पावसात भिजलं तर मात्र ते टिकवताना तुमची पंचाईत होण्याची शक्यता असते. यासाठी फॉलो करा या टिप्स

  • सर्वात आधी आलं बाजारातून आणल्यावर नळाखाली धुवून स्वच्छ करा. ज्यामुळे त्याला लागलेला चिखल अथवा माती निघून जाईल.
  • आलं फॅनखाली अथवा वाऱ्यावर सुकवून तुम्ही काही दिवस टिकवू शकता.
  • पेपरवर ठेवून उन्हात ठेवल्यास आलं सुकून जास्त काळ टिकू शकतं
  • पण आलं खूप भिजलं असेल आणि बाहेर धो धो पाऊस असेल तर ते सुकवण्यापेक्षा त्याची सालं काढून तुकडे करा आणि फ्रिजमध्ये ठेवा. 
  • आल्याची मिक्सरमध्ये पेस्ट करून तुम्ही आलं फ्रीजमध्ये काही दिवस टिकवून ठेवू शकता.
  • आल्याची पेस्ट हवाबंद डब्बा अथवा झिप लॉक बॅगमध्ये डीप फ्रीजरमध्ये ठेवली तर आलं आणखी जास्त दिवस टिकेल.
  • आल्याची पेस्ट डीप फ्रीजरमध्ये ठेवताना छोट्या छोट्या बॅग अथवा डब्बे तयार करा, ज्यामुळे तुम्हाला हवी तेवढीच पेस्ट वापरता येईल आणि बाकीची पेस्ट खराब होणार नाही.
  • उन्हाळ्यात आलं सुकवून त्याची पावडर करून ती देखील तुम्ही पावसाळ्यात चहा अथवा स्वयंपाकात वापरू शकता. 
  • भिजलेल्या आल्याची चव कमी होते त्यामुळे आलं सुकवून वापरणं जास्त फायदेशीर ठरतं.

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

17 Jun 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT