ADVERTISEMENT
home / Acne
उन्हाळ्यात येणाऱ्या पिंपल्स पासून सुटका मिळवण्यासाठी घरीच असं बनवा फेस जेल

उन्हाळ्यात येणाऱ्या पिंपल्स पासून सुटका मिळवण्यासाठी घरीच असं बनवा फेस जेल

उन्हाळा म्हणजे घामाच्या धारा, चिकटपणा आणि घामोळे… पण यासोबत त्वचेवर पिंपल्स येण्याचा त्रासही अनेकांना जाणवतो. उन्हाळ्यात त्वचेच्या समस्या नेहमीपेक्षा जास्त जाणवतात. कारण घामामुळे त्वचा सतत तेलकट राहते. ज्यामुळे त्वचेवर अस्वच्छता आणि चिकटपणामुळे एक्ने निर्माण होतात. त्वचेतून निघणाऱ्या अतिरिक्त तेलामुळे तुमच्या चेहऱ्यावरील एक्ने हळू हळू जास्त वाढतात. यासाठी उन्हाळ्यात त्वचेची जास्त निगा राखणं गरजेचं आहे. सतत चेहरा धुवून अथवा घरगुती उपाय करून तुम्ही त्वचेची काळजी घेऊ शकता. जर तुम्ही देखील उन्हाळ्यात अशा वारंवार एक्ने येण्यामुळे त्रासले असाल तर घरच्या घरी करा हा सोपा उपाय… या होममेड जेलमुळे तुमचा चेहरा स्वच्छ तर होतोच शिवाय हायड्रेट राहिल्यामुळे अॅक्नेचा त्रास कमी होतो.

त्वचेवर करा घरगुती जेलचा प्रयोग

त्वचेवरील तेलकटपणा आणि अतिरिक्त तेल कमी करण्यासाठी सतत चेहरा धुणे, आठवड्यातून एकदा स्क्रबचा वापर करणं गरजेचं आहे. पण त्यासोबतच गरजेचं आहे त्वचेला योग्य पोषण देणं आणि त्वचा हायड्रेट ठेवणं. यासाठी त्वचेवर एखादं चांगलं जेल नक्कीच फायदेशीर ठरू शकतं. बाजारात त्वचेची निगा राखण्यासाठी अनेक प्रकारचे जेल मिळतात. मात्र जर तुम्हाला विनाकारण खर्च टाळायचा असेल तर तुम्ही तुमच्या त्वचेसाठी योग्य असं जेल घरातच आणि तेही घरातील काही सोप्या वस्तू वापरून बनवू शकता.

होममेड जेल कसं बनवाल

होममेड फेस जेल बनवण्यासाठी तुम्हाला फार साहित्याची गरज नाही. घरात भाजीसाठी आणलेले टॉमेटोदेखील यासाठी तुम्ही वापरू शकता. कारण टॉमेटोमध्ये त्वचेला स्वच्छ, मऊ आणि चमकदार करणारे गुणधर्म असतात. तेलकट त्वचेला पिंपल्सपासून दूर ठेवण्याचा हा सोपा घरगुती उपाय आहे. यासाठी दोन चमचे टॉमेटोचा रस, दोन चमचे कोरफडाचा गर, एखाद्या चांगल्या इसेंशिअल ऑईलचे दोन थेंब एकत्र करा आणि मिक्सरमध्ये एकजीव करा. सर्व मिश्रण जेलप्रमाणे एकत्र झालं की काचेच्या बाटलीत भरून फ्रीजमध्ये ठेवून द्या. अंघोळीला जाण्याआधी चेहऱ्यावर काही मिनीटे होममेड जेल लावा आणि हलक्या हाताने मसाज करा. कोमट पाण्याने चेहरा स्वच्छ करा ज्यामुळे तुम्हाला मिळेल नितळ, मऊ, चमकदार त्वचा.


आम्ही शेअर केलेला हा घरगुती उपाय तुम्हाला कसा वाटला आणि त्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील एक्ने कमी झाल्या का हे आम्हाला कंमेट बॉक्समध्ये जरूर कळवा. 

ADVERTISEMENT

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा   MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक

20 Apr 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT