ADVERTISEMENT
home / DIY सौंदर्य
tulsi-water-for-glowing-skin-and-shiny-face-in-marathi

तुळशीच्या पाण्याने चेहऱ्यावर आणा नैसर्गिक चमक, पाहा वापरून

आपलं कितीही वय झालं असलं तरीही प्रत्येक महिलेला आपण तरूण दिसावं असंच वाटतं. बाजारात अशी अनेक उत्पादने आहेत, जी अँटिएजिंग असण्याचा दावा करतात. पण काही नैसर्गिक गोष्टींचा वापर यासाठी अधिक प्रमाणात करता येऊ शकतो हे तुम्हाला माहीत आहे का? या नैसर्गिक गोष्टींचा वापर करून तुम्ही त्वचेला अधिक फायदा मिळवून देऊ शकता. ही नैसर्गिक गोष्ट म्हणजे तुळस. तुळशीचा त्वचेसाठी उपयोग अत्यंत फायद्याचा ठरतो. तुळस ही एक अत्यंत औषधीय वनस्पती आहे. तुळशीच्या पानाचा तुम्ही त्वचेवर अधिक चांगला उपयोग करून घेऊ शकता. तुळशीच्या पाण्यामुळेही त्वचा अधिक चमकदार होऊ शकते. तुळशीच्या पाण्याचा वापर करून त्वचेला खूपच चांगले फायदा मिळतात, ज्याच्याबाबत आपण जाणून घेऊया. 

कसे बनवाल तुळशीचे पाणी (How to Make Tulsi Water)

साहित्य 

  • 1 मूठ तुळशीची पाने 
  • 1 कप पाणी 
  • 1 मोठा चमचा गुलाबपाणी 
  • 1 लहान चमचा लिंबाचा रस 

बनविण्याची पद्धत 

  • 1 कप पाण्या तुळशीची ताजी पाने रात्रभर भिजवून ठेवा 
  • दुसऱ्या दिवशी हे पाणी गाळून घ्या. तुळशीची पाने फेकू नका, याचा जेवणात तुम्ही उपयोग करून घ्या
  • गाळलेले तुळशीचे पाणी घ्या. त्यामध्ये लिंबाचा रस, गुलाबपाणी मिक्स करून घ्या 
  • आता हे मिश्रण एका स्प्रे बाटलीत भरा आणि दिवसातून चेहऱ्यावर याचा 2-3 वेळा उपयोग करून घ्या
  • तुम्ही नियमित या पाण्याच उपयोग केला, तर तुमचा चेहरा अधिक ताजातवाना दिसेल आणि कायम फ्रेश राहील 

त्वचेसाठी तुळशीच्या पाण्याचे फायदे (Benefits of Tulsi Water For Skin)

  • तुळशीच्या या खास पाण्यामुळे त्वचा अधिक चमकदार होते. इतकंच नाही तर या तुळशीच्या पाण्यामुळे चेहरा अधिक स्वच्छ होतो आणि पोर्समधील साचलेली घाण निघण्यास मदत मिळते. तुमचा चेहरा अधिक स्वच्छ होण्यास मदत मिळते 
  • तुळशीमध्ये आढळणारे अँटिऑक्सिडंट्स या पाण्यात उतरतात. जे तुम्हाला सूर्याच्या किरणांपासून वाचविण्यासाठी फायदेशीर ठरतात. जर तुम्हाला स्किन टॅनिंग अथवा कोणतीही अलर्जी असेल तर या पाण्याचा प्रयोग करून तुम्ही ती अलर्जी दूर करू शकता
  • तुळस ही अँटिबॅक्टेरियल असते, जी त्वचेला इन्फेक्शन होण्यापासून वाचवते. तुळशीच्या पाण्याचा वापर केल्याने तुमच्या चेहऱ्यावरील मुरूमांची समस्याही निघून जाण्यास मदत मिळते
  • तुमच्या त्वचेला सूज आल्यास, तुळशीचे पाणी नक्कीच वापरायला हवे. तुळशीत असणारे अँटीइन्फ्लेमेटरी तत्व हे सूज कमी करण्यास मदत करते
  •  तुळशीचे हे खास पाणी तुम्हाला एजिंगच्या समस्येपासून दूर राखण्यासही मदत करते. वास्तविक त्वचा म्हातारी तर होणारच. पण तुळशीच्या पाण्यामुळे तुमच्या त्वचेमध्ये अधिक चांगली कसावट निर्माण होते आणि पोर्सचा आकार कमी होतो

तुळशीच्या पाण्याचा वापर कधी करू नये 

तुळशीचे पाणी नक्कीच तुमच्या त्वचेवर चांगले ठरते. पण तुळशीच्या पानाची पेस्ट कधीही तुम्ही डायरेक्ट चेहऱ्याला लाऊ नका. तुळशीच्या पानांना कीड लागते. त्यामुळे तुळशीचा वापर करण्यापूर्वी नेहमी पाण्याने स्वच्छ धुऊन घ्या. त्यानंतर तुळशीचे पाणी तुम्ही तयार करा. 

ADVERTISEMENT

नोट – तुमची त्वचा संवेदनशील असेल तर तुम्ही तुळशीच्या पाण्याचा चेहऱ्यावर वापर करण्यापूर्वी त्वचेच्या तज्ज्ञांशी बोलून घ्या. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

13 Jul 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT