ADVERTISEMENT
home / DIY सौंदर्य
हाताचा कोपरा आणि गुडघ्याच्या त्वचेची कशी घ्याल काळजी

हाताचा कोपरा आणि गुडघ्याच्या त्वचेची कशी घ्याल काळजी

आपल्या त्वचेची काळजी घेण्याची खूपच गरज असते. नाहीतर वयाच्या आधीच चेहऱ्यावर सुरकुत्या येणे आणि त्वचा खराब होणे या समस्यांना सामोरे जावे लागते. तुम्ही नियमित स्किन केअर रूटीन करायलाच हवे. त्याशिवाय रोज 8-10 ग्लास पाणीही प्यायला हवे. आपण बरेचदा आपल्या चेहऱ्याची काळजी घेतो. मात्र आपल्या हाताचे कोपरे आणि गुडघ्यांकडे मात्र दुर्लक्ष करतो. त्यामुळे बरेच जणांचे हाताचे कोपरे हे काळे दिसून येतात. पण हाताचा कोपरा, गुडघा हे तुमच्याच शरीराचा भाग असल्यामुळे त्याचीही तितकीच काळजी घेणे गरजेचे आहे. याच्या आजूबाजूच्या त्वचेवर काळे डाग तयार होतात आणि ही त्वचा कोरडी होते. तसंच यामुळे पॅच निर्माण होतात आणि ते दिसायला अत्यंत वाईट दिसतं. त्यामुळे हाताचा कोपरा आणि गुडघ्याच्या त्वचेची कशी काळजी घ्यायची ते आम्ही तुम्हाला या लेखातून सांगणार आहोत. 

व्यवस्थित स्वच्छ करा (Clean your body)

व्यवस्थित स्वच्छ करा (Clean your body)

Shutterstock

तुम्ही आंघोळ करताना तुमचे हात पायदेखील स्वच्छ करतच असणार हे आम्हाला माहीत आहे. पण तुम्हाला हातापायांची थोडी जास्त काळजी घ्यायची गरज आहे. आपल्या हाताचा कोपरा, गुडघा आणि पोटऱ्या यांच्यावर साबण अथवा बॉडी वॉश लावा आणि मग लुफ्फाचा उपयोग करून तुम्ही स्क्रब करा. त्यामुळे तुमच्या त्वचेवरील डेड स्किन हळूहळून निघून जाते. तुमचे शरीर डिटॉक्सिफाय करण्यासाठी तुम्ही साबणापेक्षा बॉडीवॉशचा वापर केलात तर अधिक चांगले. विशेषतः ज्या बॉडी वॉशमध्ये टी ट्री ऑईलचा वापर असेल त्याचा तुम्ही उपयोग करा. यामुळे त्वचा अधिक ताजीतवानी राहण्यास मदत मिळते. 

ADVERTISEMENT

त्वचा करा मॉईस्चराईज (Moisturize your skin)

त्वचा करा मॉईस्चराईज (Moisturize your skin)

Shutterstock

तुमच्या गुडघे आणि कोपऱ्यांवर कडकपणा येण्याचे आणि त्वचा फाटण्याचे मुख्य कारण म्हणजे यामध्ये मुलायमपणा नसणे. यामुळे हायपरपिगमेंटेशनची समस्या निर्माण होते. त्यामुळे त्वचेच्या या भागावर बॉडी लोशन अथवा मॉईस्चराईजरचा उपयोग करणे गरजेचे आहे. यामध्ये विटामिन सी, लाईट वेड फॉर्म्युला हायल्युरॉनिक अॅसिड, विटामिन ई चे प्रमाण असते. जे तुमच्या त्वचेला उष्णता आणि कोरडेपणापासून वाचवते. तसंच तुमच्या त्वचेला नरमपणा देऊन त्यातील काळेपणा काढण्यास उपयोगी ठरते. 

आठवड्यातून एकदा त्वचा करा एक्सफोलिएट (Exfoliate the skin)

तुमच्या हाताचा कोपरा, गुडघा हे नियमित स्वरूपात तुम्ही एक्सफोलिएट करायला हवे. जेणेकरून त्यातील मुलायमपणा टिकून राहील. त्वचा एक्सफोलिएट केल्यामुळे डेड स्किन सेल्सपासून सुटका मिळते. डेड स्किन एकत्र झाली तर पिगमेंटेशन आणि कोरडेपणाचे कारण ठरते. त्यामुळे किमान आठवड्यातून एकदा तरी एक्सफोलिएट करण्याची गरज आहे. यासाठी तुम्ही एखादा चांगल्या कंपनीचा स्क्रब वापरावा. ज्यामध्ये कोरफड जेलचा वापर करण्यात आलेला असेल. यामुळे काळेपणा दूर होण्यास मदत मिळते. तसंच त्वचा अधिक तजेलदार आणि मॉईस्चराईज राहते. 

ADVERTISEMENT

सनस्क्रिन लावायला विसरू नका

उन्हाळा असो वा पावसाळा. कोणत्याही ऋतूमध्ये सनस्क्रिन लावायला तुम्ही विसरू नका. आपण सहसा हाताचा कोपरा, गुडघा याठिकाणी सनस्क्रिन लावायला विसरून जातो. त्यामुळे या भागा सनबर्न आणि टॅनिंगसारख्या समस्या उद्भवतात. लक्षात ठेवा की, तुम्ही तुमच्या शरीराच्या या भागालादेखील सूर्याच्या किरणांपासून वाचविण्याची गरज आहे. अन्यथा हायपरपिगमेंटेशनची समस्या निर्माण होते. त्यामुळे त्वचा चिकट होणार नाही अशा चांगल्या सनस्क्रिनचा तुम्ही वापर करून घ्या. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

19 Jul 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT