ADVERTISEMENT
home / Age Care
homemade face serum

चेहेऱ्याची त्वचा तरुण ठेवायची असेल तर घरीच बनवा अँटी एजिंग सीरम

एका विशिष्ट वयानंतर चेहऱ्यावर सुरकुत्या आणि फाईन लाईन्स व वृद्धत्वाच्या खुणा दिसणे ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. यापासून सुटका मिळवण्यासाठी लोक वेगवेगळ्या प्रकारच्या अँटी-एजिंग उत्पादनांचा त्वचेवर प्रयोग करू लागतात. पण तुम्हाला माहित आहे का की बाजारात उपलब्ध असलेली अनेक अँटी-एजिंग उत्पादने हानिकारक रसायनांनी बनलेली असतात, ज्यामुळे त्वचेचे खूप नुकसान होऊ शकते. हे टाळण्यासाठी, घरगुती अँटी-एजिंग फेस सीरम त्वचेवर लावल्यास कमी खर्चात चांगले फायदे मिळू शकतात. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे यामध्ये समाविष्ट असलेल्या गोष्टी प्रत्येकाच्या घरात सहज उपलब्ध असतात. अशाप्रकारे, नैसर्गिक घटकांपासून बनवलेले हे सीरम त्वचेसाठी अनेक प्रकारे फायदेशीर ठरू शकते. चला तर मग ते कसे बनवायचे ते जाणून घेऊया.

नॉर्मल स्किनसाठी फेस सीरम

साहित्य – 2 टेबलस्पून खोबरेल तेल, 3-5 थेंब व्हिटॅमिन ई तेल, 4 थेंब सॅन्डलवूड इसेन्शियल ऑइल, 3 थेंब लॅव्हेंडर इसेन्शियल ऑइल 

कृती- हे सर्व साहित्य व्यवस्थित एकत्र करून होममेड अँटी एजिंग फेस सीरम बनवा. हे सीरम नॉर्मल स्किनसाठी उत्तम आहे. 

Homemade Anti Aging Face Serum
Homemade Anti Aging Face Serum

घरगुती अँटी एजिंग सीरम कसे बनवायचे 

साहित्य- 1 कप तांदूळ, 2 कप पाणी, 2 चमचे तांदळाचे पाणी, 1 चमचा कोरफड जेल, 2 व्हिटॅमिन ई कॅप्सूल

ADVERTISEMENT

कृती- सर्वप्रथम तांदूळ धुवून घ्या. नंतर एका भांड्यात काढून घ्या व त्यात दोन कप पाणी घाला. त्यानंतर 15-20 मिनिटे हे उकळून घ्या. उकळल्यानंतर गॅस बंद करून तांदूळ गाळून त्याचे पाणी वेगळे काढा. एका भांड्यात दोन चमचे तांदळाचे पाणी, एक चमचा कोरफड जेल आणि व्हिटॅमिन ईच्या दोन कॅप्सूल मिसळा. या तीन गोष्टी नीट मिसळा आणि एकजीव पेस्ट बनवा. तुमचे होममेड फेस सीरम तयार आहे. 

फेस सीरम कसे वापरावे 

फेस सीरम रात्री झोपताना लावले तर जास्त फायदेशीर असते. त्यामुळे रात्री झोपताना सर्वप्रथम चेहरा स्वच्छ धुवून घ्या. तुम्ही मेकअप केला असेल तर तो व्यवस्थित काढा. त्यानंतर बोटांवर सीरम घेऊन चेहऱ्यावर आणि मानेवर दोन ते तीन मिनिटे मसाज करा. 30 मिनिटे राहू द्या. त्यानंतर साध्या पाण्याने चेहरा धुवा. त्यानंतर तुम्ही तुमचे नियमित मॉइश्चरायझर वापरू शकता. सर्वोत्तम परिणाम मिळविण्यासाठी आणि तुमच्या त्वचेतील बदल जाणवण्यासाठी हे सीरम किमान पंधरा दिवस नियमित वापरा. या सीरमची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे ते दोन-तीन दिवस टिकते अर्थात त्यासाठी ते फ्रीजमध्ये एअर टाइट कंटेनरमध्ये ठेवा.

Homemade Anti Aging Face Serum
Homemade Anti Aging Face Serum

सीरमचे त्वचेसाठी फायदे  

त्वचेचा टोन, पिगमेंटेशन, सुरकुत्या यांसारख्या समस्यांसाठी हे होममेड अँटी-एजिंग सीरम फायदेशीर आहे. हे सीरम त्वचा स्वच्छ करते तसेच तिची चमक वाढवते व सुरकुत्या, डाग काढून टाकण्यास आणि त्वचा टाईट करण्यास मदत करते. यात वापरलेले सर्व घटक नैसर्गिक असल्याने त्याचे कोणतेही दुष्परिणाम नाहीत. तांदळाच्या पाण्यात फ्लेव्होनॉइड्स आणि फिनोलिक संयुगे असतात जे वृद्धत्वाच्या लक्षणांसाठी जबाबदार असलेल्या फ्री रॅडिकल्समुळे होणारे  नुकसान नियंत्रित करतात. त्यामुळे हे तांदळाचे पाणी त्वचा सुरकुत्यामुक्त होण्यास मदत करते. कोरफड त्वचेतील ओलावा लॉक करण्यासाठी आणि त्वचा निरोगी ठेवण्यासाठी उपयुक्त आहे कारण त्यात दाह-विरोधी गुणधर्म आहेत. व्हिटॅमिन ई कॅप्सूल त्वचा तरुण दिसण्यासाठी, हायड्रेटेड ठेवण्यासाठी आणि फ्री रॅडिकल्सना रोखण्यात मदत करतात.

हे होममेड सीरम लावा आणि त्वचा अधिक काळ तरुण ठेवा. 

ADVERTISEMENT

Photo Credit – istockphoto

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा   MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक

05 May 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT