ADVERTISEMENT
home / DIY सौंदर्य
Skin Care Post Wedding

लग्नानंतर नव्या नवरीने करू नये त्वचेकडे दुर्लक्ष,अशी घ्यावी काळजी 

प्रत्येक मुलीची इच्छा असते कि आपण लग्नाच्या दिवशी सर्वात सुंदर दिसावे.  सुंदर दिसण्याची सुरुवात निरोगी व चमकदार त्वचेपासून होते. त्वचा निरोगी व नितळ असावी यासाठी मुली लग्नाच्या कित्येक महिने आधीपासून तयारी करणे व काळजी घेण्यास सुरुवात करतात. अनेक पार्लरमध्ये यासाठी पॅकेज देखील असते. ज्यामध्ये फेशियलपासून मसाजपर्यंत सगळ्या गोष्टी केल्या जातात. पण ही चमक लग्नानंतरही दीर्घकाळ टिकावी असे वाटत असेल तर लग्नानंतर काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे.  खरं तर लग्नानंतर नववधूच्या चेहऱ्यावर नैसर्गिकरीत्याच एक छान तेज आलेले असते. पण ही चमक कायम राहण्यासाठी काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे. चला तर मग जाणून घेऊया लग्नानंतरही त्वचेची काळजी कशी घ्यावी. 

मेकअपला द्या थोडा ब्रेक 

प्रत्येक मुलगी लग्नाच्या विधींसाठी मनापासून तयार होते. लग्नाच्या कार्यक्रमांसाठी छान दिसायचे म्हटले तर त्यावेळी चेहऱ्यावर भरपूर मेकअप उत्पादने लावावी लागतात. तेव्हाच परफेक्ट ब्राइडल लुक मिळतो. त्यामुळे त्यावेळी त्वचा मोकळा श्वास घेऊ शकत नाही. त्यामुळे लग्नानंतर काही दिवस तरी हेवी मेकअपला थोडी सुट्टी द्या. चेहेऱ्यावर कमीत कमी मेकअप उत्पादने वापरावी लागतील याची काळजी घ्या जेणेकरून त्वचेची नैसर्गिक चमक दिसू शकेल.

Post Wedding Skin Care
Post Wedding Skin Care

जर तुम्हाला एखाद्या कार्यक्रमासाठी तयार व्हायचे असेल तर चेहऱ्यावर मॉइश्चरायझर आणि डोळ्यात काजळ आणि मॅचिंग असलेली लिपस्टिक इतका लाईट मेकअप करा. या लूकमध्ये तुमचे नैसर्गिक सौंदर्य अधिक खुलून दिसेल व त्वचेलाही त्रास होणार नाही.जर तुम्हाला मेकअप करायचाच असेल तर, शक्य तितका कमीत कमी करा., तुमचा फाउंडेशन मॉइश्चरायझरमध्ये मिसळा आणि ते तुमच्या चेहऱ्यावर व मानेवर लावा. त्वचा गुळगुळीत व नितळ दिसण्यासाठी कॉम्पॅक्ट लावा. 

पुरेशी झोप घ्या 

Post Wedding Skin Care
Post Wedding Skin Care

लग्नाच्या तयारीत भरपूर टेन्शन आणि धावपळ असते. अशावेळी पुरेशी झोप मिळत नाही. लग्न हा आयुष्यातील खूप मोठा निर्णय असल्याने व त्यानंतर आयुष्यात बदल घडणार असल्याने प्रत्येक मुलगी लग्नाच्या आधी मानसिकदृष्ट्या खूप तणावाखाली असते. याचा झोपेवर परिणाम होतो. म्हणूनच लग्नानंतर पुरेशी झोप घ्या. यामुळे चेहऱ्याला आणि डोळ्यांच्या आजूबाजूला एक फ्रेश लुक येईल आणि तुमचा चेहरा फ्रेश दिसेल.दिवसातून किमान आठ तास झोप घेण्याची खात्री करा. पुरेशी झोप तुमच्या शरीराला उर्जा पुनर्संचयित करण्यात मदत करेल आणि मेकअपच्या सर्व हानिकारक प्रभावांपासून तुमची त्वचा बरी होण्यास मदत करेल.

ADVERTISEMENT

त्वचेची स्वच्छता महत्वाची आहे

Post Wedding Skin Care
Post Wedding Skin Care

त्वचा स्वच्छ करण्यासाठी कठोर रसायने असलेली साबणे वापरू नका तर माईल्ड क्लीन्झरचा वापर करा. त्वचेच्या मृत पेशींपासून मुक्त होण्यासाठी चांगल्या स्क्रबने त्वचा स्क्रब करा. यासाठी तुम्ही घरगुती नैसर्गिक कॉफी स्क्रब वापरू शकता. घरगुती कॉफी स्क्रब मध्ये हानिकारक रसायने नसतात आणि ते त्वचेतील सर्व विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत करते. स्क्रबिंगनंतर त्वचा ओलसर आणि हायड्रेटेड ठेवण्यासाठी त्यात बदामाच्या तेलाचे काही थेंब घाला. तुम्ही नवीन वधू म्हणून घरात असाल किंवा बाहेर जात असाल तरी रोज चेहऱ्यावर सनस्क्रीनचा चांगला थर लावा जेणेकरून त्वचा टॅन होणार नाही.  

लग्नानंतर आहाराची पूर्ण काळजी घ्या

Post Wedding Skin Care
Post Wedding Skin Care

 लग्नाच्या आधी व्यवस्थित डाएटकडे लक्ष देत होतात तसेच लग्नानंतरही पौष्टिक आहार घ्या. लग्नाच्या कार्यक्रमांत  तेलकट-मसालेदार पदार्थ खाल्ले जातात. यामुळे चेहऱ्यावर मुरूम वगैरे येतात. त्यामुळे लग्नानंतर कोणत्याही प्रकारचे मुरुम टाळण्यासाठी आहारात ताज्या भाज्या, सिझनल फळे आणि ज्यूसचा नक्कीच समावेश करा. यासोबतच भरपूर पाणी, नारळपाणी आणि द्रव पदार्थांचा आहारात समावेश करा. शरीर डिटॉक्स करण्यासाठी डिटॉक्स वॉटर, ग्रीन टी इत्यादी प्या. यामुळे चेहऱ्यावर नैसर्गिक चमक कायम राहील.

अशा प्रकारे नववधूंनी लग्नानंतरही त्वचेची काळजी घ्यावी. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा   MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक

ADVERTISEMENT
04 Jul 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT