ADVERTISEMENT
home / Festive
khanachi saree look

खणाच्या साड्या आणि बरंच काही खास तुमच्यासाठी (Khanachi Saree Look In Marathi)

खण साडी सध्या खूपच ट्रेंडमध्ये आहे. सण असो लग्नसमारंभ असो वा एखादा खास कार्यक्रम खणाची साडी नेसण्याला जास्त प्राधान्य दिलं जातं. खणाच्या साडीला खरंतर खूप मोठा इतिहास आहे. महाराष्ट्र, कर्नाटक आणि दक्षिण भारतात जवळजवळ चारशे ते साडे चारशे वर्षांपासून खणाची साडी प्रचलित आहे. पूर्वीच्या काळी बायका खास खणाची साडी नेहमी नेसत असत याचे अनेक दाखले इतिहासात मिळतात. कारण भारतात फार पूर्वीपासून हातमागावर साड्या विणण्याची परंपरा आहे. खण साडी देखील हातमागावर विणली जाणारी एक खास रेशमी पोताची साडी आहे. विशेष म्हणजे आजही या साडीची लोकप्रियता मुळीच कमी झालेली नाही. उलट या साडीची मागणी बाजारात दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. त्यामुळे आता ग्राहकांच्या मागणीनुसार निरनिराळ्या पॅर्टन आणि ट्रेंडच्या खणाच्या साड्या बाजारात विक्रीसाठी उपलद्ध आहेत. ग्राहकांसाठी खास हातमागावर विणलेल्या, मशिनमेड आणि डिझाईन केलेल्या खणाच्या साड्या सहज बाजारात मिळतात. जर तुम्हाला देखील खणाच्या साडीचा लुक (khanachi saree look) करायचा असेल तर जाणून घ्या या साडीचे विविध प्रकार आणि खणाची साडी किंमत.

खणाच्या साड्या
khanachi saree look

पारंपरिक डिझाइन खण्याच्या साड्या

पारंपरिक डिझाइनच्या खण साडीमध्ये एकूण तीन प्रकारचे सूत विणले जाते. पारंपरिक खण साडी ही मुख्यतः हातमागावर विणलेली असते. त्यामुळे या तीन प्रकारच्या सूतामुळे या साडीला मनमोहक रंग आणि टेक्चर मिळते.अशा प्रकारे हातामागावर विणलेली साडी तयार करण्यासाठी खूप दिवस लागतात त्यामुळे खण साडी किंमतही वाढत जाते. म्हणूनच आजकाल रेशम आणि इतर फ्रॅब्रिकचे सूत एकत्र करून मशिनमेड खण साडी बाजारात विकली जाते. अशा साड्यांवर कुत्रिम रंग आणि सूत वापरण्यात येत असल्यामुळे या साड्या जास्त चमकदार आणि मजबूत असतात.

महाराष्ट्राचं महावस्त्र पैठणी (Everything About Maharashtrian Paithani Saree In Marathi)

खणाची साडी आणि टोप पदर 

खणाची साडी
खणाची साडी किंमत

खण अथवा इतकल साडीला टोप पदर शोभून दिसतो. ज्या साड्या हातमागावर विणल्या जातात त्यांचा पदर वेगळा विणला जातो आणि नंतर तो साडीला जोडला जातो. खणाची साडी जिला लाल, पांढऱ्या अथवा मरून रंगाचे पट्टे असतात तिला टोप पदर खण साडी असं म्हणतात. आजकाल या रंगामध्ये निरनिराळे प्रयोग केले जातात. मात्र पूर्वी लाल, मरून आणि पांढरा रंगच टोप पदराचा असायचा. अशा साड्यांना पदराला गोंडे तयार केलेले असतात. ज्यामुळे टोप पदर असलेली खण साडी अधिक शोभून दिसते.

ADVERTISEMENT

नथ पदर खणाच्या साड्या

नथ पदर खणाच्या साड्या
khanachi saree look

नथ ही महाराष्ट्रीयन लुकची खासियत आहे. त्यामुळे कोणताही महाराष्ट्रीय लुक नथीशिवाय पूर्णच होऊ शकत नाही. खणाच्या साडीला महाराष्ट्रीय परंपरा असल्यामुळे आजकाल बाजारात नथ डिझाईनच्या साड्या उपलब्ध होतात. या खण साडीच्या पदरावर अथवा संपूर्ण साडीवर नथीचे डिझाईन विणलेले अथवा प्रिंट केलेले असते. ज्यामुळे खण साडी अस्सल महाराष्ट्रीन लुकची दिसू लागते. 

सरस्वती पदर खणाच्या साड्या

सरस्वती पदर खणाच्या साड्या

खणाच्या साडीला नथ डिझाईन प्रमाणेच सरस्वतीची डिझाईनही शोभून दिसते. सरस्वतीचे प्रतिक हे हिंदू संस्कृतीमध्ये शुभ, मांगल्याचे आणि समृद्धीचे समजले जाते. म्हणूनच साडीला पारंपरिक आणि एतिहासिक लुक देण्यासाठी आजकाल खण साडीमध्ये सरस्वती पदर तयार करण्याची पद्धत आहे. खणाच्या साडीचे रंग गढद आणि पारंपरिक असतात. त्यामुळे त्यावर पांढऱ्या अथवा रंगसंगतीनुसार रेखाटलेले सरस्वतीचे चिन्ह शोभून आणि खुलून दिसते. काही साड्यांवर ग्राहकांच्या मागणीनुसार पदराप्रमाणेच संपूर्ण साडीवरही सरस्वतीचे चिन्ह रेखाटलेले दिसून येते. 

कस्टमाइज खणाची साडी

कस्टमाइज खणाची साडी
khanachi saree look

खण हे एक हातमागावर विणलेले खास फॅब्रिक आहे. मध्यंतरीच्या काळी खण साडीपेक्षा खण ब्लाऊज पीसची जास्त मागणी होते. म्हणूनच कदाचित इतकल पॅटर्नच्या या साडीला खण हे नाव असे पडले असावे. खण साडीची मागणी ग्राहकांमध्ये आता इतकी वाढली आहे की खणाच्या पारंपरिक साडीप्रमाणेच कस्टमाइज खणाची साडीही लोकप्रिय होताना दिसते. या साड्यांमध्ये खण फॅब्रिकसोबत इतर अनेक प्रकारच्या फॅब्रिकचा वापर केला जातो. योग्य रंगसंगतीचा वापर करत केलेल्या या साड्यांच्या डिझाइन्स मनमोहक आणि युनिक असतात. तुम्ही तुमच्या आवड आणि गरजेनुसार खण कस्टमाइज साडी तयार करून घेऊ शकता. तुम्हाला फॅशन डिझाइनची आवड असेल तर स्वतःसाठी स्वतःच अशी एखादी साडी तयार करू शकता.

सौभाग्यवती खणाची साडी

सौभाग्यवती खणाची साडी
सौभाग्यवती खणाची साडी

खण साडीची लोकप्रियता जस जशी वाढत जात आहे तशी या साडीची मागणी आणि ट्रेंडमध्ये बदल झालेले दिसून येतात. सध्या बाजारात खणाच्या सौभाग्यवती साडीची चलती आहे. या साड्यांमध्ये सौभाग्याचे लेणे असलेली चंद्रकोर आणि हळदकुंकवाचे चिन्ह असते. अनेक साड्यांच्या ब्लाऊजवर मागच्या दिशेने डिझाइन करण्यासाठी सौभाग्यवती असे शब्द डिझाइन केलेले असतात. ज्यामुळे सणसमारंभ अथवा पारंपरिक कार्यक्रमात या साड्या शोभून दिसतात. 

ADVERTISEMENT

खास काळ्या खणाच्या साड्या 

खास काळ्या खणाच्या साड्या
संक्रांतीसाठी खास खणाच्या साड्या

मकर सक्रांत जवळ आली काळ्या साड्यांची मागणी वाढताना दिसते. कारण मकारसक्रांतीच्या हळदीकुंकूसाठी महिला खास काळ्या रंगाच्या पारंपरिक साड्या नेसतात. त्यामुळे काळ्या रंगाच्या खणाच्या साड्याही खूप प्रचलित आहेत. काळ्या रंगाच्या खण साड्यांवर हळदीकुंकूवाला परिधान करण्यात येणारे हलव्याचे दागिने शोभून दिसतात. म्हणूनच नव्या नवरीला पहिल्या मकर सक्रांतीला खास काळ्या रंगाची खण साडी भेट दिली जाते. या साडीमुळे तुमचा पारंपरिक लुक परफेक्ट दिसतो. 

हलव्याच्या गोड दागिन्यांनी करा यंदाची संक्रांत अधिक गोड (Halwyache Dagine For Sankranti In Marathi)

खण साडी चे दागिने 

खण साडी चे दागिने
खणाच्या साड्या आणि दागिने

खणाच्या साडीप्रमाणे खणाचे ब्लाऊज आणि खणाचे ड्रेसही सध्या ट्रेंडमध्ये आहेत. मात्र सर्वात जास्त पसंती आहे ती म्हणजे खण साडीचे दागिने. आजकाल खणाचे मंगळसूत्र, नेकलेस, बांगड्या कानातले आणि पर्सही बाजारात सहज मिळतात. त्यामुळे जर तुम्हाला खणाची साडी नेसायची नसेल तर पारंपरिक लुक करण्यासाठी तुम्ही खणाचे दागिने कोणत्याही एथिनिक लुकसोबत नक्कीच वापरू शकता. सेलिब्रेटीजप्रमाणे परफेक्ट लुक करण्यासाठी तुम्ही आम्ही शेअर केलेले लुक नक्कीच ट्राय करू शकता.

साडी कशी नेसावी | How To Drape A Saree| Sadi Kashi Nesaychi In Marathi

ADVERTISEMENT

खणाच्या साडीबाबत असलेले प्रश्न – FAQ’s

1. ओरिजनल खण साडी कशी ओळखावी ?

ओरीजनल खण साडी ही तीन प्रकारच्या रेशमाच्या पोतापासून विणली जाते. त्यामुळे ती मऊ आणि तलम असते. मात्र ग्राहकांची मागणी वाढल्यामुळे आजकाल मिक्स पोत असलेल्या खण साडीदेखील बाजारात मिळतात. या साड्यांना हात लावताच त्यांचा पोत तुमच्या लक्षात येतो. टेक्चर आणि स्पर्शावरून तुम्ही ओरीजनल खण साडी ओळखू शकता.

2. खण साडी कशी आणि कुठून खरेदी करावी ?

खण साडी आजकाल ट्रेंडमध्ये असल्यामुळे तुम्हाला ऑनलाईनही खरेदी करता येते. मात्र जर तुम्हाला ओरीजनल खण साडी हवी असेल तर पांरपारिक साडी विकत मिळणाऱ्या दुकानात जाऊन तुम्ही ती खरेदी करू शकता. नाशिक, पुणे, कोल्हापूर, सांगली अशा ठिकाणी तुम्हाला ओरीजनल खण साडी नक्कीच विकत मिळेल. 

3. खण साडी किंमत अंदाजे किती असते ?

खण साडी किंमत तिच्या पोत आणि डिझाईनवरून ठरते. या साडीची किंमत हजार ते बाराशे रू. ने सुरू होते. जस जसं तुम्ही या साडीचे पॅर्टन निवडाल त्यानुसार साडीची किंमत वाढत जाते. सहाजिकच हजार ते पाच हजार पर्यंत निरनिराळ्या पॅटर्न आणि डिझाईनच्या खण साडी तुम्हाला बाजारात विकत मिळू शकतात. 

khanachi saree look
khanachi saree look

4. खणाच्या साडीसोबत कशी करावी फॅशन ?

खणाच्या साडीसोबत सध्या ऑक्सिडाइज ज्वैलरी परिधान करण्याचा ट्रेंड आहे. बाजारात विविध प्रकारचे ऑक्सिडाइज पारंपरिक दागदागिने मिळतात. जर तुम्हाला पारंपरिक लुक करायचा असेल तर तुम्ही या साडीसोबत मोत्याचे दागिने पेअर करू शकता. मकरसक्रांतीला नवीन नवरीसाठी खास हलव्याचे दागिने खण साडीवर शोभून दिसतात. मात्र ऑक्सिडाइज ज्वैलरीची फॅशन असल्यामुळे हा लुक तुम्ही नक्कीच ट्राय करा.

ADVERTISEMENT

5. खण साडी धुताना काय काळजी घ्यावी ?

खण साडीचे फॅब्रिक कसे आहे हे ओळखून तुम्ही साडी धुताना काळजी घेतली पाहिजे. जर साडी ओरीजनल रेशमाच्या पोताची असेल तर तुम्ही ती ड्राय क्लिन करणं गरजेचं आहे. पण कॉटन अथवा इतर फॅब्रिकपासून तयार केलेली असेल तर घरी सॉफ्ट लिक्विड वॉशने तुम्ही ती धुवू शकता. 

09 Dec 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT