ADVERTISEMENT
home / बिग बॉस
राखी सावंतच्या पतीने केले पूर्वपतीवर आरोप

वादग्रस्त राखी सावंतच्या पतीने केले पूर्व पत्नीवर गंभीर आरोप

 राखी सावंत Bigg Boss च्या घरात पुन्हा धुमाकूळ घालत आहे. यावेळी ती एकटी नाही तर तिचा पतीदेखील यामध्ये सहभागी झाला आहे. राखी सावंत आधीच अनेकदा वादात असते. असे असताना तिचा पतीही वादातित प्रकरण आहे हे त्याने घरात प्रवेश केल्यापासून आता चांगलेच लक्षात आले आहे. तिचा पती पाहून अनेकांची बोटे तोंडात गेली होती. कारण ती लग्न झाल्याचा काहीतरी स्टंट करतेय असा अनेकांचा अंदाज होता. पण रितेशच्या नावाखाली जी व्यक्ती घरात आली ते पाहून खूप जणांना आश्चर्याचा धक्का बसला. कारण त्याच्या अनेक गोष्टी समोर येऊ लागल्या. पण आता राखीचा सो कॉल्ड पती रितेशनेच त्याच्या पूर्वपत्नीवर गंभीर असे आरोप केले आहेत.त्याने चक्क पत्नीने त्याला जीवे मारण्याची धमकी दिली असे सांगितले आहे.

काय म्हणाला रितेश

 बिग बॉसच्या घरात गेल्यापासून राखी आणि रितेशमध्ये अनेकदा खटके उडताना दिसले आहेत. राखीची बाजू धरत सलमाननेही त्याला चांगलेच फटकारले आहे. त्याच्या रितेश असण्याबद्दलही शंका व्यक्त केली आहे. पण ज्यावेळी रितेशला त्याच्या पत्नीने लावलेल्या गंभीर आरोपाबद्दल सांगितले त्यावेळी तो म्हणाला की, माझ्यावर लावलेले सगळे आरोप खोटे आहेत. माझी पत्नी ही दुसऱ्या माणसासोबत पळून गेली होती. नंतर ती परत माझ्याकडे आली माझ्या मुलासाठी मी तिला माफ केले. पण  ती पुन्हा पळून गेली. घटस्फोटासाठी देखील अर्ज केल्यानंतर तिच्या कुटुंबियांनी मला जीवे मारण्याची धमकी दिली. माझ्या मुलासाठी मी कायम गप्प राहिलो. पण आता मी कायदेशीर कारवाई करणार आहे. रितेशने पहिली पत्नी म्हणून समोर आलेल्या स्निग्धा प्रियावर केलेले हे आरोप खरे आहेत यात थोडी शंकाच वाटत आहे.

पत्नीने केला होता खुलासा

ज्यावेळी रितेश सिंह नावाचा व्यक्ती राखीचा पती म्हणून घरात आला. त्यावेळी त्याच्या विषयीची माहिती काढण्याचा अनेकांनी प्रयत्न केला होता.कारण अनेकांना शंका होती की रितेश यात काहीतरी खोट आहे.ज्यावेळी त्याच्या पहिल्या पत्नीसोबत त्याचे काही फोटो व्हायरल झाले त्यावेळी खूप जणांना हे कळले की, त्याचे लग्न झालेले आहे. इतकेच नाही तर त्याने पहिल्या पत्नीला खूप मारहाण केलेली आहे. केवळ पैशांसाठी त्याने पत्नीला मारले होते. या दोघांना एक लहान बाळ देखील आहे. तो कोणीही एनआरआय किंवा बिझनेसवाला नाही असे सांगत तिने त्याची आर्थिक बाजू देखील स्पष्ट केली आहे. राखी सावंतला ती ओळखत नाही. इतकेच नाही तर तिने बिग बॉसही पाहिले नव्हते. त्यामुळे तिचा पती कुठे याची तिला कोणतीही माहिती नव्हती.आपल्या माहेरी निघून गेलेल्या त्याच्या पत्नीने तो खोटारडा आहे. त्याने असे किती जणांना फसवले असेल या विषयी शंका देखील व्यक्त केली आहे. तिने राखी सावंतचे लग्नानंतरचे काही व्हिडिओ पाहिल्यानंतर तिने आपल्या घरातील कढई देखील ओळखली. तिने दिलेल्या माहितीनुसार रितेश आणि कुटुंबाला तिच्या कुटुंबियाने खूप पैसा दिला आहे. पण राखी सावंतलाही तो फसवेल अशी शंका तिने व्यक्त केली आहे. 

Bigg Boss 15: मराठी स्पर्धकांचा यावर्षी आहे पगडा, प्रेक्षकही खूष

ADVERTISEMENT

राखी सावंतचा गेम गेला

गेल्या वर्षी राखी ज्यावेळी या घरात आली त्यावेळी घरातील अनेक समीकरणं बदलली होती. सगळ्या घराला तिने इंटरटेन करुन सोडलं होतं. वाद आणि जोक्स यांनी हसू आवरेनासं केलं होतं. पण आता तिचा खेळ तिच्या नवऱ्यामुळे काही अंशी बिघडलेला दिसत आहे. त्यामुळे खूप जणांना या सीझनमध्ये तिला उगाच आणले असे देखील वाटत आहे. 

दरम्यान, राखीच्या नवऱ्याने केलेला गंभीर गुन्हा किती जणांना पटलाय आम्हाला नक्की कळवा. 

मीरा राजपूतच्या घरातून गायब झाला ख्रिसमस ट्री, पार्टीत झाला हिरमोड

24 Dec 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT