भारतीय खाद्य संस्कृतीत स्वयंपाकात आल्याचा भरपूर वापर केला जातो. आल्याचा चहा सकाळी नाही घेतला तर अनेकांना फ्रेशच वाटत नाही. स्वयंपाकाप्रमाणेच सर्दी, खोकला, त्वचा विकार अशा अनेक आरोग्य समस्या दूर करण्यासाठी आलं वापरलं जातं. यासाठीच आधी जाणून घ्या आरोग्यासाठी आणि केसांसाठी आले खाण्याचे फायदे (Ginger Benefits In Marathi). पण आलं इतकं गुणकारी असलं तरी त्याचे काही दुष्परिणाम देखील आहेत. कारण कोणतीही गोष्ट अति प्रमाणात करू नये. जर तुम्ही आलं अति प्रमाणात खाल्लं तर त्याचे वाईट परिणाम तुमच्या आरोग्यावर होतात. यासाठी जाणून घ्या अति आलं खाण्यामुळे काय होऊ शकतं.
गर्भपात
गरोदर महिलांच्या आहारात आलं योग्य प्रमाणात असायला हवं. जर एखाद्या गरोदर महिलेने चुकून अथवा जाणिवपूर्वक आलं अति प्रमाणात सेवन केलं तर त्यामुळे तिला गर्भपाताला सामोरं जावं लागू शकतं. यासाठीच गरोदर महिलांनी स्वयंपाकात आल्याचा वापर करताना नेहमी सावध असायला हवं. तसंच जाणून घ्या गर्भपात होण्याची लक्षणे आणि विशेष काळजी (Miscarriage Symptoms In Marathi)
अति रक्तस्त्राव
मासिक पाळी सुरू असतानाही महिलांनी आल्याचा वापर आहारात बेतानेच करावा. कारण जर या काळात तुम्ही जास्त आलं सेवन केलं तर तुम्हाला अति रक्तस्त्राव होऊ शकतो. नुकतं आलंच नाही या काळात महिलांनी लवंग देखील कमी प्रमाणात खावी. मासिक पाळीत होणाऱ्या अंगदुखीवर आल्याचा घरगुती उपाय करणार असाल तर सावधपणे आणि योग्य प्रमाणात आलं खा.
ह्रदयाच्या समस्या वाढतात
अति प्रमाणात कोणतीही गोष्ट आरोग्याला घातक असते. आलं जर अति प्रमाणात खाल्लं तर तुमच्या ह्रदयाचा धोका वाढू शकतो. जर तुम्हाला आधीच ह्रदयाच्या समस्या असतील तर आलं स्वयंपाकात कमी करा. कारण अति आलं खाण्यामुळे तुमच्या ह्रदयाचे ठोके अनियंत्रित होऊ शकतात.
जुलाब लागणे
अति आलं खाण्यामुळे शरीरात उष्णता वाढते. कारण आलं हे उष्ण गुणधर्माचे आहे. असं झाल्यास तुम्हाला जुलाब लागण्याची शक्यता आहे. आतड्यांमध्ये उष्णतेचे प्रमाण वाढल्यामुळे शरीराच्या पचनशक्तीवर परिणाम होतो. ज्यामुळे अतिसार अथवा जुलाब होतात. म्हणूनच तुम्हाला जुलाब वर घरगुती उपाय (Julab Gharguti Upay In Marathi) माहीत असायला हवेत.
त्वचेच्या समस्या
अति प्रमाणात आलं शरीरात गेलं तर यामुळे तुम्हाला त्वचेच्या समस्या जाणवू शकतात. यामुळे बऱ्याचदा त्वचा समस्यांसोबत अंगावर पुरळ उठणे, डोळे लाल होणे, अंगाला खाज येणे, घसा खवखवणे अशी लक्षणे जाणवू शकतात. असी लक्षणे आढळली तर लगेच तज्ञ्जांचा सल्ला घ्या आणि योग्य ते उपचार करा.
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक