ADVERTISEMENT
home / DIY फॅशन
उर्फीचा फॅशन सेन्स

उर्फी जावेदच्या फॅशनचा नेटकऱ्यांना येऊ लागलाय वीट

 सोशल मीडिया इन्फ्लुएन्शर आणि बिग बॉस ओटीटी फेम उर्फी जावेद तिच्या फॅशनमुळे कायम चर्चेत असते. बोल्ड कपडे घालणारी उर्फी स्वत:च आपले कपडे वेगवेगळ्या पद्धतीने डिझाईन करते. अगदी प्लास्टिकपासून ते चिंधीपर्यंत तिने स्टाईल करण्यासाठी कशालाही सोडलेले नाही. त्यामुळे तिच्या फॅशनच्या चर्चा या दूरदूर पर्यंत होत असतात. पण या चर्चा सकारात्मक होताना दिसत नाही. तिचे कपडे पाहून खूप जण तिला ट्रोलच करतात. काहीच दिवसांपूर्वी उर्फी जावेदने एअरपोर्टवर नेटेट ड्रेस चांगलाच ट्रोल करण्यात आला होता. आता तिच्या काही नव्या फोटोजमुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. पाहूया तिचे वादग्रस्त फॅशन फोटोज

प्रतिक्षा संपली, Money Heist चा होणार शेवट

ब्लॅक नेटेड ड्रेस

काही दिवसांपूर्वी एअरपोर्टवर दिसली ती या नव्याच फॅशनमध्ये काळ्या रंगाचा नेटेड ड्रेस ज्यामधून सगळे काही आरपार दिसेल अशी खात्री घेतलेली होती. तिच्या टॉपच्या वरच्या भागाला अशा काही पट्ट्या लावण्यात आल्या होत्या की, फक्त स्तनाग्रे त्यामध्ये झाकलेली होती. तिचा हा बोल्ड लुक पाहून अनेकांनी तिला विचित्र कमेंट केल्या आहेत. या ड्रेसमधून सगळं दाखवायचं होतं तर ती पट्टी कशाला ठेवायची असे प्रश्न देखील अनेकांनी तिला केला आहे. हा डिझायनर ड्रेस असला तरी देखील त्याला भारतीय प्रेक्षकांनी फारशी पसंती दिलेली दिसत नाही. 

ही मराठमोळी अभिनेत्री नव्या भूमिकेसाठी तयार, लवकरच होणार आई

ADVERTISEMENT

झेब्रा प्रिंट ड्रेस

उर्फीच्या सोशल मीडियावर आणखी एक फोटो आहे तो म्हणजे झेब्रा प्रिंटच्या या ड्रेसमध्ये तिने वर ट्युब प्रकारामध्ये टॉप घातला आहे. तर खाली तिने रॅप राऊंड स्कर्ट घातला आहे. ज्याला काहीही अर्थ नाही असे दिसत आहे. तिच्या या कपड्यावरही नेटकरी चांगलेच चिडले होते. उर्फीला कपडे घालायचा कंटाळा असेल तर तिने कपडे घातले नाही तरी चालतील अशा काही कमेंट्स तिच्या फोटोवर आल्या आहेत. या कपड्यामुळे तिची तुला सनी लिओनीशी होऊ लागली आहे.

पर्पल स्लिट ड्रेस

काहीच दिवसांपूर्वी तिने एक स्लिट ड्रेस घातला होता. हा स्लिट ड्रेस स्टायलिश वाटला असता तर काही हरकत नव्हती. पण हा ड्रेस थोडा वेगळा होता. कंबरेकडे कॉलर असलेला हा ड्रेस त्यामध्ये असलेले स्लिट हे कमालीचे वेगळे असले तरी देखील ते स्टायलिश वाटते असे अजिबात नाही. तर तो फार वेगळाच दिसत आहे. त्यामुळे हा ड्रेसही चांगलाच ट्रोल झाला आहे.

काळा कैची ड्रेस

 उर्फीने एक काळा ड्रेस घातला आहे. जो अनेक ठिकाणी कैची लागलेला दिसत आहे. हा ड्रेस सगळीकडे कैची लागलेला आहे. अगदी वर पासून ते बेंबीच्या खालपर्यंत या ड्रेसला कट करण्यात आला आहे. त्यामुळे हा ड्रेसही वेगळा आणि खूपच बोल्ड दिसत आहे.

 उर्फीने एक काळा ड्रेस घातला आहे. जो अनेक ठिकाणी कैची लागलेला दिसत आहे. हा ड्रेस सगळीकडे कैची लागलेला आहे. अगदी वर पासून ते बेंबीच्या खालपर्यंत या ड्रेसला कट करण्यात आला आहे. त्यामुळे हा ड्रेसही वेगळा आणि खूपच बोल्ड दिसत आहे. 

ADVERTISEMENT

उर्फीचे ड्रेस पाहता तुम्हाला काय वाटते ते नक्की कळवा.

जया बच्चन ‘रॉकी और रानी’मध्ये साकारणार विनोदी भूमिका

02 Dec 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT