ADVERTISEMENT
home / Vastu
Vastu Tips: घरातील घड्याळाचा आकार बदलते तुमचे नशीब

Vastu Tips: घरातील घड्याळाचा आकार बदलते तुमचे नशीब

वेळ कोणाच्याही हातात नसते आणि वेळेला कोणीही थांबवू शकत नाही हे जरी खरं असलं तरीही वेळेनुसार चालणाऱ्या व्यक्तीलाच आयुष्यात उन्नती मिळते आणि घरात सुख समृद्धी येते. वेळेला आपलं गुलाम मानणाऱ्या व्यक्तींना मात्र यश मिळत नाही. पण तुम्हाला माहीत आहे का? घरात असणाऱ्या घड्याळ्याच्या आकारावरूनही तुमचे नशीब पालटते. आपण सहसा या गोष्टी विचारात घेत नाही. पण वास्तुशास्त्रानुसार घड्याळाच्या आकारानुसार तुमचे नशीब पालटते असे सांगण्यात येते. आपल्या मेहनतीसह उन्नतीचा मार्ग हा घड्याळाच्या आकारानुसार बदलतो असं सांगण्यात येते. कोणत्या आकाराचे घड्याळ कसे असते आणि कसे शुभ ठरते ते या लेखातून आपण पाहूया. 

पेंड्युलमचे घड्याळ (Pendulum Clock)

पेंड्युलमचे घड्याळ (Pendulum Clock)

पेंड्युलमचे घड्याळ (Pendulum Clock)

घराच्या भिंतीवर पेंड्युलमचे घड्याळ लावणे शुभ मानले जाते. असे घड्याळ दर एक तासाने काट्याचा आवाज करते. यामुळे तुम्हाला सदैव चेतनायुक्त राहण्याची प्रेरणा मिळते. तसंच हे घड्याळ तुम्हाला दर एक तासाने लक्ष केंद्रित करण्यास प्रवृत्त करते. तुम्हाला किती तास सरले आहेत याचा अंदाज देते. असे घड्याळ घरात सुख समृद्धी आणते असे वास्तुशास्त्रानुसार मानण्यात येते आणि तुम्हाला तुमच्या कार्यांमध्ये यश मिळवून देण्यासही याची मदत मिळते. भिंतीवर पेंड्युलमचे घड्याळ लावल्याने तुमची वेळ कायम चांगली राहते असंही मानण्यात येते. घराच्या ड्रॉईंग रूममध्ये हे घड्याळ लावणे अधिक चांगले असे सांगितले जाते. 

ADVERTISEMENT

अष्टभुजा घड्याळ (Octagonal clock)

अष्टभुजा घड्याळ (Octagonal clock)

अष्टभुजा घड्याळ (Octagonal clock)

घरामध्ये अष्टभुजा घड्याळ असेल तर घरातील लोकांमधील सामंजस्य वाढविण्यास मदत मिळते आणि घरातील भांडण आणि क्लेषांपासून मुक्तता मिळते असे वास्तुशास्त्रानुसार सांगण्यात येते. असे घड्याळ तुम्ही लिव्हिंग रूम अथवा डायनिंग एरियाजवळ लावल्यास शुभ मानले जाते. यामुळे घरात भांडणे होत नाहीत आणि घरातील सुख शांती टिकून राहण्यास मदत मिळते. यासह घरात 6 कोनी घड्याळ लावणेही शुभ मानले जाते. 

अधिक वाचा – घरात राखायची असेल सुखशांती तर जाणून घ्या उपाय (Vastu Tips For Home In Marathi)

ADVERTISEMENT

गोल आकाराचे घड्याळ (Round Clock)

गोल आकाराचे घड्याळ (Round Clock)

गोल आकाराचे घड्याळ (Round Clock)

गोल आकाराचे घड्याळ कोणत्याही रूममध्ये लावणे शुभ असते आणि या आकाराचे घड्याळ हे घरात धन संकेत घेऊन येते. गोल आकाराच्या घड्याळामुळे नोकरीमध्ये वाढ होणे आणि तुम्ही यशाच्या शिखरावर पोहचण्यास मदत मिळते असं वास्तुशास्त्रानुसार सांगण्यात येते. हे घड्याळ मुख्यत्वे स्टडी रूममध्ये लावल्यास, करिअरमध्ये यश प्राप्त होण्यास मदत मिळते आणि त्याशिवाय तुमचे अभ्यासात चांगले लक्षही लागते. 

अधिक वाचा – जाणून घ्या वास्तुशास्त्रानुसार कसं असावं स्वयंपाकघर

ADVERTISEMENT

आयताकृती घड्याळ (Oval Clock)

आयताकृती घड्याळ (Oval Clock)

आयताकृती घड्याळ (Oval Clock)

वास्तुशास्त्रानुसार आयताकृती घड्याळ हे शुभ मानले जाते. या आकाराच्या घड्याळांना साधारणतः गेस्ट रूममध्ये लावावे. यामुळे मित्र आणि नातेवाईकांमध्ये सौदार्ह आणि मैत्री टिकविण्यास मदत मिळते. तसंच कोणाशीही मतभेद असतील तर ते मिटविण्यासही मदत मिळते असे मानले जाते. 

अधिक वाचा –जाणून घ्या कसं असावं वास्तुशास्त्रानुसार देवघर (Vastu Shastra For Pooja Room In Marathi)

ADVERTISEMENT

हार्टशेप घड्याळ (Heart Shaped Clock)

हार्टशेप घड्याळ (Heart Shaped Clock)

हार्टशेप घड्याळ (Heart Shaped Clock)

घरामध्ये हृदयाच्या आकाराचे घड्याळ लावणेही अत्यंत शुभ मानले जाते. असे घड्याळ लग्न झालेल्या जोडप्यांना सहसा देण्यात येते. या जोडप्याने आपल्या बेडरूममध्ये हे घड्याळ लावावे. असे घड्याळ लावल्याने पती पत्नीमधील प्रेम वाढण्यास मदत होते आणि भांडणे होत नाहीत असे वास्तुशास्त्रानुसार सांगण्यात येते. पती आणि पत्नीमध्ये विनाकारण भांडणे आणि तणाव निर्माण होत असेल तर तुम्ही अशा स्वरूपाचे घड्याळ नक्की आपल्या बेडरूममध्ये लावावे. 

भिंतीवर घड्याळ लावण्याचे योग्य ठिकाण

वास्तुशास्त्र आणि फेंगशुईनुसार भिंंतीवर घड्याळ हे नेहमी पूर्व वा उत्तर दिशेला असावे. यामुळे धनलाभ होतो आणि त्याचप्रमाणे मनही शांत राहते. तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही पश्चिम दिशेलाही घड्याळ लाऊ शकता. पण तुम्ही चुकूनही दक्षिण दिशेल अथवा कोणत्याही दरवाज्याच्या वर घड्याळ लाऊ नका. यामुळे कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता असते. तसंच सतत अशुभ बातम्या मिळतात. दक्षिण दिशेला घड्याळ लावल्याने नकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि होणारे कामही बिघडण्याची शक्यता असते. दरवाज्यावर घड्याळ लावल्यास घरात तणावाचे वातावरण राहते आणि नकारात्मक एनर्जी सतत निर्माण होते. 

ADVERTISEMENT

 

चुकूनही वापरू नका या आकाराचे घड्याळ

घरातील सुख आणि समृद्धी जपण्यासाठी तुम्ही गोलाकार, आयताकृती, अष्टभुजा या आकाराचे घड्याळ वापरणे योग्य मानले जाते. पण तुम्ही त्रिकोणी आकाराचे घड्याळ कधीही वापरू नका. असे घड्याळ घरात लावल्याने सतत भांडणे आणि विनाकारण ताण घरात निर्माण होतो. तसंच बंद घड्याळ कधीही घरात ठेऊ नये. असे केल्याने उन्नतीचे सर्व मार्ग बंद होतात आणि संपत्तीची हानीही होते. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

13 Jul 2021
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT