ADVERTISEMENT
home / बॉलीवूड
विकी कौशल आणि कतरिनाच्या व्हॅलेन्टाईन्स डेमध्ये टायगर-३ च्या शूटिंगचा अडथळा!

विकी कौशल आणि कतरिनाच्या व्हॅलेन्टाईन्स डेमध्ये टायगर-३ च्या शूटिंगचा अडथळा!

कतरिना कैफ आणि विकी कौशल  गेल्याच वर्षी डिसेम्बर महिन्यात लग्नाच्या बंधनात अडकले. आता १४ फेब्रुवारीला येणारा व्हॅलेन्टाईन्स डे हा त्यांचा लग्नानंतरचा पहिलाच व्हॅलेन्टाईन्स डे असणार आहे. म्हणजे तो त्यांच्यासाठी खासच असणार.  या खास दिवसासाठी त्यांनी नक्कीच काहीतरी खास प्लॅनिंग केले असेल. पण आता मात्र त्यांना व्हॅलेन्टाईन्स डेचे सगळे प्लॅन्स रद्द करावे लागतील असेच दिसते. या नव्या जोडप्याला त्यांचा पहिलाच व्हॅलेन्टाईन्स डे एकमेकांबरोबर घालवता येणार नाही. कारण कतरिना १४ फेब्रुवारीला तिच्या आगामी टायगर-३ च्या शूटिंगमध्ये व्यस्त असणार आहे. खरं तर सलमान खान आणि कतरिना कैफ या वर्षी जानेवारीतच  ‘टायगर 3’ च्या शेवटच्या शेड्यूलचे शूटिंग करणार होते. पण दुर्दैवाने जानेवारी महिन्यात संपूर्ण देशात  कोविड-19 च्या केसेसमध्ये खूप वाढ झाली. त्यामुळे त्यांना दिल्लीच्या शुटिंगचे वेळापत्रक रद्द करावे लागले. आता हे शूटिंग फेब्रुवारी महिन्यात होणार असल्याने विकी व कतरीनाला त्यांचा खास दिवस मनासारखा साजरा करता येणार नाही.  

अधिक वाचा – झिम्मा’ची सिनेमागृहात पंच्याहत्तरी, दुसऱ्या भागाची चर्चा सुरू

शूटिंग केव्हा होणार?

निर्मात्यांना आता शूटिंगसाठी अजून उशीर करण्याची इच्छा नाही. त्यामुळे आता त्यांनी फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या-तिसऱ्या आठवड्यात चित्रपटाच्या शेवटच्या टप्प्याचे शूटिंग सुरू करण्याचा विचार केला आहे. हे शूटिंग दिल्लीत केले जाईल.  सलमानच्या आधीच्या ‘ एक था टायगर’ आणि ‘टायगर जिंदा है’ या दोन्हींही चित्रपटांमध्ये भरपूर ऍक्शन सीन्स होते. तसेच टायगर-३ मध्येही ऍक्शन सीन्सची रेलचेल बघायला मिळेल. चित्रपटाच्या शेवटी असणाऱ्या पाठलागाच्या थरारक दृश्याचे शूटिंग आता फेब्रुवारीत केले जाणार आहे. ह्या दृश्यासाठी  १५ दिवसांचा कालावधी लागेल असा अंदाज आहे.  

लाल किल्लाच्या परिसरात होणार शूटिंग 

टायगर -३ चे दिग्दर्शक मनीश शर्माा यांना दिल्लीच्या रस्त्यांवर चित्रपटातील काही ऍक्शन सीन चित्रित करायचे आहेत. सलमान खान, लाल किल्ला तसेच दिल्लीतील काही ऐतिहासिक ठिकाणांवरही शूटिंगही करणार आहे असा अंदाज आहे. सलमान खानचे शूटिंग म्हटल्यावर लोकांना ते बघण्याची उत्सुकता असणार आणि ते शूटिंग बघण्यासाठी गर्दी करणार हे ओघाने आलेच. परंतु  निर्मात्यांनी सांगितले आहे की त्यांच्या प्रोडक्शन युनिटकडून शुटींग शेड्युल दरम्यान सगळ्या  COVID सुरक्षा नियमांचे तंतोतंत पालन केले जाईल.  गेली दोन वर्षे या चित्रपटाचे शूटिंग सगळ्या COVID सुरक्षा नियमांचे पालन करूनच केले जात आहे.  

ADVERTISEMENT

अधिक वाचा- ‘ब्रा साईज’ वक्तव्याप्रकरणी श्वेता तिवारीविरोधात गुन्हा दाखल

व्हॅलेन्टाईन्स डेपासून सुरु होणार दिल्लीतील शूटिंग 

१४ फेब्रुवारीला शूटिंग सुरू करण्यासाठी सलमान आणि कतरिना १२ किंवा १३ फेब्रुवारीला दिल्लीला जाण्याची शक्यता आहे. तसेच दिल्लीतील १५ दिवसांच्या शेड्यूलपूर्वी, सलमान ५ फेब्रुवारीपासून चित्रपटाचे शूटिंग पुन्हा सुरू करेल असे सांगितले जात आहे. सलमान  मुंबईतील एका स्टुडिओमध्ये चित्रपटातील काही फायटिंगच्या दृश्यांचे  शूटिंग करणार असल्याची माहिती आहे. या दृश्यांमध्ये कतरिना नसल्याने ती या शूटिंगमध्ये सहभागी होणार नाही.  टायगर  चित्रपटाच्या बहुप्रतिक्षित तिसर्‍या भागामध्ये इमरान हाश्मीही दिसेल. तो या चित्रपटात खलनायकाची भूमिका रंगवणार असल्याची चर्चा आहे पण याा माहितीला अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.

याशिवाय सलमान  जॅकलिन फर्नांडिससोबत ‘किक २’ आणि पूजा हेगडेसोबत ‘कभी ईद कभी दिवाळी’ या चित्रपटांमध्ये दिसेल. तर  कतरिना  ‘फोन भूत’ हा अली अब्बासचा  सुपरहिरो चित्रपट  आणि श्रीराम राघवनचा  ‘मेरी ख्रिसमस’ करणार आहे.  

अधिक वाचा-

ADVERTISEMENT

करिना कपूरने ‘गुडन्यूज’ चित्रपटात साकारली होती ट्विंकल खन्नाची भूमिका

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा  MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक

02 Feb 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT