ADVERTISEMENT
home / Weight Loss
Vajan Kami Karnyache Upay

वजन कमी करण्याचे उपाय जाणून घ्या | Weight Loss Tips In Marathi

सध्याच्या धावपळीच्या आयुष्यात स्वतःसाठी वेळ काढणं खरं तर फारच कठीण होऊन बसलं आहे मात्र अशक्य नक्कीच नाही. कारण शरीरापेक्षा महत्त्वाचं काहीच नाही. शरीरावर थोडीफार चरबी नक्कीच वाईट दिसत नाही. मात्र ही चरबी वाढायला लागली की, तुम्हाला स्वतःला कळतं की, हे आता हाताबाहेर जात आहे. मात्र याचा अर्थ असा नाही की, तुम्ही प्रयत्न करू शकत नाही. जराही आत्मविश्वास कमी पडू देऊ नका. कारण तुम्हाला हवी असलेली फिगर पुन्हा परत मिळवण्यासाठी हाच आत्मविश्वास कामी येतो. आम्ही तुम्हाला वेट लॉस (Weight Loss) करायचा असेल अथवा वजन कमी करण्याचे उपाय (weight loss tips marathi) नक्की काय करायला हवं याबाबत आम्ही या लेखातून सांगणार आहोत. जाणून घेऊया वजन कमी करण्याचे उपाय (weight loss tips in marathi).

लवकर वजन कमी करण्यासाठी घरगुती उपाय (Weight Loss Tips At Home In Marathi)

लवकर वजन कमी करण्यासाठी घरगुती उपाय (weight loss tips in marathi) नक्की काय आहेत हे आपण या लेखातून जाणून घेऊया. 

पाणी (Water) 

vajan kami karnyasathi upay
Drinking Water

वजन कमी करण्यासाठी उपाय सांगा असं जर कोणी विचारत असेल तर वजन कमी करण्यासाठी उपाय करताना तुम्ही पाण्याचा सर्वात पहिला उपयोग करून घेऊ शकता. पाणी पिणे अधिक फायदेशीर ठरते. पाण्याचे सेवन हे शरीराला हायड्रेट करण्यासाठी अधिक फायदेशीर ठरते, ज्यामुळे वजन कमी करण्यास मदत होते. याचे मुख्य कारण असे आहे की, पाणी तुमची भूक कमी करण्यास अधिक मदत करते. त्यामुळे खाण्याची इच्छा कमी होते आणि वजन कमी करण्यासाठी मदत होते. 

मध आणि लिंबू (Honey and Lime)

vajan kami karnyasathi upay
honey and lime for weight loss

वजन कमी करणे उपाय (vajan kami karne upay marathi) करताना तुम्हाला मध आणि लिंबाचा वापर करता येतो. लवकरात लवकर वजन कमी करायचे असेल (fast weight loss tips in marathi) तर तुम्हाला याचा नक्की फायदा होतो. वास्तविक लिंबामध्ये असलेले विटामिन सी आणि मधातील अँटिऑक्सिडंटहे वजन कमी करण्यासाठी प्रभावी ठरते. तुम्ही रोज सकाळी उपाशीपोटी मध आणि लिंबूपाणी प्यायलात तर तुम्हाला लवकरच याचा परिणाम दिसून येतो. लिंबू आणि मधाचे मिश्रण हे केवळ वजन कमी करण्यासाठीच नाही तर वजन संतुलित राखण्यासाठीही याचा उपयोग होतो. 

ADVERTISEMENT

कंबरेसाठी उत्तम व्यायाम

ग्रीन टी (Green Tea)

vajan kami karnyasathi upay
vajan kami karnyasathi upay – green tea

वजन कमी करण्यासाठी ग्रीन टी चे सेवनदेखील फायदेशीर ठरते. जलद वजन कमी करायचे असेल तर तुम्हाला काही सवयी आवश्यक आहेत. ग्रीन टी वजन कमी करण्यासह वजन नियंत्रित करण्यासाठीही फायदेशीर ठरते. वास्तविक ग्रीन टी मध्ये कॅटेचिन आणि कॅफेन असल्याने वजन कमी करण्यासाठी आणि वाढत्या वजनावर रोख लावण्यासाठी याचा उपयोग होतो. वजन कमी करण्यासाठी ग्रीन टी हा सोपा आणि परिणामकारक उपाय आहे. तसंच महिलांना वजन कमी करण्यासाठी उपायांमध्ये (vajan kami karnyasathi upay) याचा समावेश करून घेता येतो. 

वाचा – उंची वाढवण्यासाठी घरगुती उपाय

टॉमटो (Tomato)

weight loss tips in marathi
weight loss tips in marathi

वजन कमी करण्यासाठी तुम्हाला टॉमेटोचा उपयोग करता येऊ शकता. वास्तविक टॉमेटोमध्ये कमी प्रमाणात कॅलरी आणि सोडियमचे प्रमाण असते. तसंच यामध्ये पाण्याचे प्रमाण अधिक असते. तसंच मूत्रवर्धक प्रभावही यामध्ये जास्त असतो. टॉमेटोमधील याच पोषक तत्व आणि गुणांमुळे वजन कमी करण्यासाठी आणि वजन वाढण्याच्या जोखीम कमी करण्यासाठी हे उपयोगी ठरतं. 

ADVERTISEMENT

काकडी (Cucumber)

weight loss in marathi
weight loss in marathi

वजन कमी करण्यासाठी उपाय (weight loss in marathi) करताना तुम्हाला काकडीचा उपयोग करता येतो. वास्तविक कमी कॅलरीयुक्त पदार्थामध्ये याचा समावेश करता येतो. कारण यामध्ये पाणी जास्त प्रमाणात असते. हेच कारण आहे की, पॅलिओ डाएटचा आधार घेत तुम्ही काकडीचा वापर करा. तुम्ही डाएटमध्ये काकडी खाण्याला जास्त प्राधान्य दिलं तर वजन कमी करण्यासाठी याचा फायदा होतो. काकडी खाल्ल्यामुळे पोट भरलेले राहते आणि जास्त जेवण जात नाही. 

कारलं (Bitter Gourd)

वजन कमी करण्याचे उपाय
वजन कमी करण्याचे उपाय

वजन कमी करण्यासाठी तुम्ही आहारातमध्ये कारल्याचा समावेश करू शकता. एका अभ्यासात सिद्ध झाल्यानुसार, कारल्यामध्ये अँटिओबेसिटी गुण अधिक प्रमाणात आढळतात. जे वजन कमी करण्यासाठी आणि जाडी वाढण्यावर रोख लावण्यासाठी उपयोगी ठरतात. तसंच याचे सेवन करण्यामुळे लिपिड मेटाबॉलिज्म वाढण्यास मदत होते. तसंच वजन कमी करण्यास याचा उपयोग होतो. त्यामुळे घरगुती उपायाचा तुम्ही विचार करत असाल तर कारल्याचा नक्की उपयोग करा. 

वजन कमी करण्यासाठी आयुर्वेदिक औषधे (Ayurvedic Weight Loss Tips In Marathi)

वजन कमी करण्यासाठी आयुर्वेदिक औषधेदेखील उपयोगी पडतात. जर वजन घटवण्यासाठी तुम्ही अथक प्रयत्न करत असाल मात्र काहीच फरक पडत नसेल तर तुम्ही बाजारामध्ये वजन कमी करण्यासाठी मिळणाऱ्या काही औषधांचा उपयोग करू शकता. मात्र त्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. तुम्हाला आयुर्वेदिक औषध घ्यायचं असल्यास, तुम्ही पतंजलिच्या वेड लॉस मेडिसिनचा वापर करू शकता. हे पूर्णतः आयुर्वेदिक आणि देशी औषध आहे. इथे आम्ही तुम्हाला पतंजलिच्या काही वेट लॉस उत्पादनांबद्दल अर्थात औषधांबद्दल सांगणार आहोत, यामुळे तुम्हाला वजन कमी करण्यात मदत मिळेल. काही दिवस याचा वापर केल्यानंतर शरीरामध्ये तुम्हाला बदल दिसतील. तुमच्या जवळच्या पतंजलि दुकानामधून हे औषध तुम्हाला मिळू शकेल.

दिव्य मेदोहर वटी ( बारीक होण्यासाठी औषध )

दिव्य मेदोहर वटी घेतल्यानंतर तुमच्या शरीरातील चरबी हळूहळू कमी होऊ लागते. पतंजलिचे हे आयुर्वेदिक औषध चरबी कमी करण्यासाठी फायदेशीर आहे. या औषधामध्ये मुख्यत्वे त्रिफला आणि गुग्गल असते, ज्यामुळे पचनक्रिया चांगली राहते आणि पचनक्रिया सुधारते. केवळ हेच नाही तर हार्मोन्स संतुलित ठेवण्यासाठीदेखील याची मदत होते. मेहोहर वटी एक हर्बल मेडिसिन आहे ज्यामुळे वजन कमी करण्याव्यतिरिक्त शरीराला ऊर्जादेखील मिळते. गरोदर महिलांनी डिलिव्हरीनंतर हे औषध घेतल्यास त्यांना फायद्याचे ठरू शकते.

ADVERTISEMENT

दिव्य मेदोहर वटी औषधाचे सेवन कसे करावे –

वजन कमी करण्यासाठी पतंजलिचं हे औषध तुम्ही जेवण जेवल्यानंतर किंवा जेवण खाण्याच्या आधी घ्यावं. जेवायच्या आधी औषध घ्यायचं असल्यास, कमीत कमी अर्धा तास आधी घ्यावं आणि जेवण जेवल्यानंतर घ्यायचं असल्यास, कमीत कमी 1 तासानंतर हे औषध घ्यावं. गरम पाण्याबरोबर हे औषध घेतल्यास, याचा जास्त चांगला परिणाम होतो.

दिव्य मेदोहर वटी औषधाची किंमत – 80 रुपये

याशिवाय वजन कमी करण्यासाठी पतंजलिची अजूनही काही उत्पादने आहेत –

– आवळा ज्यूस

– गुग्गुल

ADVERTISEMENT

त्रिफला चूर्ण

– दिव्य गोधन अर्क

– दिव्य पेय हर्बल टी

– अलोवेरा ज्युस

ADVERTISEMENT

वजन कमी करण्यासाठी डाएट चार्ट (Weight Loss Diet Chart In Marathi)

Weight loss diet chart

सर्वात पहिल्यांदा लक्षात ठेवा की, सकाळचा नाश्ता पोटभर करावा. दुपारी त्याच्या अर्ध आणि रात्री तर कमी जेवावं. वजन कमी करण्यासाठी उपाय (vajan kami karnyasathi gharguti upay) म्हणून सकाळ, दुपार आणि रात्रीचं जेवण कसं असावं हे जाणून घेऊया –

सकाळचा ब्रेकफास्ट –

सकाळी उठल्यावर 1 ग्लास गरम पाणी

6 वाजता – मेथीच्या दाण्याचे पाणी

7 वा 8 वाजता – मोड आलेले मूग, चणे किंवा सलाड/दलिया/ओट्स + लस्सी/ताक/ज्युस + फळ

ADVERTISEMENT

दुपारचं जेवण –

12 ते 2 दरम्यान – 1 वाटी आमटी + 1 पातळ पोळी + हिरवी भाजी + काकडी आणि टॉमेटो सलाड

रात्रीचं जेवण –

7 वाजता –  एक ग्लास लिंबू पाणी (मीठ आणि साखरेशिवाय)

8 वा 9 वाजता  – 1 प्रोटीन वा ड्रायफ्रूट्सचा लाडू किंवा मीठ वा साखरेशिवाय एक वाटी दही

सूचना – डाएटदरम्यान तुमच्या शरीरातील पाणी अजिबात कमी होऊ देऊ नका. त्यासाठी तुम्ही तुमचं शरीर नेहमी हायड्रेट ठेवणं गरजेचं आहे. तुम्ही जितकं पाणी पिणार तितकंच तुमच्या शरीरातील मेटाबॉलिजम जास्त होणार. मात्र याचा अर्थ असा नाही की, अति पाणी प्यावं. आपल्या शरीरातील वजनाप्रमाणे 10 ने भागल्यास त्यातून 2 वजा केल्यास, जितकी संख्या येते तितकं लीटर पाणी पोटात जाणं आवश्यक आहे. उहाहरण द्यायचं झालं तर समजा, तुमचं वजन 70 किलो आहे आणि त्याला 10 ने भागल्यास, 7 येणार त्यामधून 2 वजा केल्यास, 5 संख्या येते. त्यामुळे तुम्ही रोज 5 लीटर पाणी प्यायला हवं. सकाळी उठल्यानंतर कोमट पाणी प्यायल्यामुळे चरबी कमी होते.

ADVERTISEMENT

वजन कमी करण्याचे उपाय आणि पद्धती (Different Ways Of Weight Loss Tips In Marathi)

weight loss
weight loss homemade remedies

वजन कमी करण्यासाठी तुम्ही कितीही प्रयत्न केले तरीही ते तेव्हाच कमी होईल जेव्हा तुमचं नियमित रूटीन ठीक असेल. त्यामुळे तुमची इच्छा असल्यास, तुम्ही तुमचं वजन नैसर्गिकरित्यादेखील सहज आणि वेगाने कमी करू शकता. त्यासाठी या उपायांना तुमच्या दैनंदिन जीवनाचा भाग करून घेण्याची गरज आहे. या टीप्स रोज फॉलो केल्यास, तुमचे वजन घटण्यासाठी वेळ लागणार नाही. जाणून घेऊया काय आहेत वजन कमी करण्याचे उपाय (vajan kami karnyache upay) –

1. जेवण्यापूर्वी सूप प्या

2. हेल्दी ब्रेकफास्ट करा

3. थोड्याथोड्या वेळाने खात राहा

ADVERTISEMENT

4. जेवणात मिरचीचा उपयोग करा

5. रात्री ग्रीन टी प्या

6. उदास न राहता हसत राहा

7. साखरेपासून लांब राहा

ADVERTISEMENT

8. निळ्या रंगाच्या प्लेटमधून जेवण खा

9. उजेडात नाही तर अंधारात झोपा

10. झोप पूर्ण होऊ द्या

11. रात्री जेवल्यानंतर अर्धा तास चाला

ADVERTISEMENT

12. दिवसभर हलका व्यायाम करणं आवश्यक आहे

वजन कमी करण्यासाठी योग (Weight Loss Tips In Marathi By Doing Yoga)

yoga
वजन कमी करण्यासाठी योग (Weight Loss Tips In Marathi By Doing Yoga)

वजन कमी करण्यासाठी तुम्ही वेगवेगळे योग आसन (Yoga Asanas) करू शकता. वजन कमी करण्यासाठी नक्की कोणते आसन तुम्ही करावे याची माहिती घ्या – 

द्विचक्रिय आसन (Dwichakriya Asana)

जाडेपणा कमी करण्यासाठी अर्थात हिप्स आणि पोटावरील चरबी कमी करण्यासाठी हा सर्वात सोपा उपाय आहे. नियमित स्वरुपात तुम्ही 5-10 मिनिट्स हे आसन केल्यास, पोट आणि हिप्सवरील चरबी कमी होण्यास मदत मिळते. याशिवाय तुम्हाला तुमच्या मांडीवरील चरबी कमी करता येते आणि पोटाच्या समस्येवरील हा रामबाण उपाय आहे. 

उत्तपादासन (Uttapadasana)

हे आसन नियमित केल्याने तुम्हाला पोटाची आणि हिप्सच्या चरबीसह मांडीची चरबी कमी करण्यासही फायदा मिळतो. तसंच पाठीचा त्रास असेल तर तुम्ही हा योगप्रकार नक्की करावा. बद्धकोष्ठ, अॅसिडिटीसारख्या पोटाच्या समस्यांमधूनही यामुळे सुटका मिळते. उत्तपादासन करणे अत्यंत सोपे आहे.

ADVERTISEMENT

नौकासन (Naukasana)

पोटासह हिप्सची चरबी कमी करण्यासाठी उत्तम योगासन

रोज काही मिनिट्स नौकासन केल्याने पोटाच्या आसपास असणारी आणि हिप्सजवळ साचलेली अनावश्यक चरबी घटविण्यासाठी फायदा मिळतो.  तसंच नौकासन तुमच्या पोट आणि हिप्सना लवचिक बनवते. हाडं मजबूत करून तुमच्या पचनक्रियेमध्ये सुधारणा होते.  तसंच मांसपेशीही मजबूत होतात.

वज्रासन (Vajrasan)

Yoga For Weight Loss In Marathi

‘वज्रासन’ या शब्दाची फोड केली तर ‘वज्र + आसन’ असा होतो. वज्र म्हणजे इंद्राचे अस्त्र शिवाय याचा अर्थ जननेंद्रीय असाही केला जातो. या आसनाचा परिणाम ओटीपोटावर व जननेंद्रीयावर होतो म्हणून हे आसन फार फायद्याचे असते. ध्यानधारणा करण्यासाठीही या आसनाचा उपयोग केला जातो. तसंच तुमच्या पोटावर अति चरबी असेल तर ती कमी होण्यासाठीही याचा फायदा मिळतो. तुम्ही हे आसन नियमित केल्यास, वजन कमी करण्यासाठी याचा फायदा मिळतो. 

त्रिकोणासन 

त्रिकोणासनामुळेही तुमचे वजन कमी होण्यास मदत मिळते. पोटाची चरबी कमी होण्यासाठी याचा उपयोग होतो. आपला लठ्ठपणा कमी होऊन पोटातील चरबी कमी होते. या आसनामुळे पोटावर ताण येतो आणि चरबी कमी होण्यास मदत मिळते. सतत काम करून पाठीचे दुखणे असेल तर त्यासाठीही तुम्ही नियमित त्रिकोणासन करू शकता.

घरी करण्यात येणारे व्यायाम (Weight Loss Exercise In Marathi)

आजकाल तर घरी व्यायाम करणंदेखील सोपं झालं आहे. तुम्ही गुगलवर Exercise to lose weight at home video सर्च केल्यास, अनेक व्हिडिओ दिसतील ज्यांच्या मदतीने तुम्ही रोज घरच्या घरी वजन कमी करण्यासाठी व्यायाम करू शकता. विश्वास ठेवा बऱ्याच लोकांनी हे व्हिडिओ पाहून आपलं वजन कमी केलं आहे. आम्ही तुम्हाला वजन कमी करण्याच्या काही सोप्या पद्धती सांगणार आहोत, ज्या तुम्ही रोज फॉलो करू शकता –

ADVERTISEMENT

– जंप स्क्वेट एक्सरसाइज (Jump Squat Exercise)

– लेग लिफ्ट एक्सरसाइज (Leg Lift Exercise)

– दोरीउडी (Skipping)

– पुश – अप एक्सरसाइज (Push Up Exercise)

ADVERTISEMENT

– उठाबशा 

– डान्स (Dance)

– झुम्बा (Zumba) 

एरोबिक्स (Aerobics) 

ADVERTISEMENT

वजन घटविण्यासाठी नेहमी विचारण्यात येणारे प्रश्न आणि त्यांची उत्तरं (FAQ’s)

1. वजन कमी करण्यासाठी सर्वात जलद उपाय काय आहे?

वजन कमी करण्यासाठी तुम्ही सर्वात पहिले योग्य दिनचर्या आणि आहारावर लक्ष द्या. त्यासाठी योग्य आहार आणि व्यायामदेखील गरजेचा आहे. कोणत्याही शॉर्टकट अथवा इतर गोष्टींमुळे वजन कमी करता येत नाही. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी घरगुती उपाय आणि व्यायाम, आहार उत्तमरित्या सांभाळणे गरजेचे आहे. 

2. लिंबू पाण्याने चरबी कमी होते का? 

लिंबू पाण्याने तुमच्या शरीरातील चरबी कमी करण्यास मदत मिळते. वजन कमी करण्यासह मदत मिळते. याचे सेवन हे डिटॉक्स ड्रिंकप्रमाणे काम करते आणि वजन कमी करण्यास मदत मिळते. 

ADVERTISEMENT

3. वजन कमी करण्यासाठी कोणता व्यायाम योग्य आहे?

वजन कमी करण्यासाठी धावणे, जॉगिंग आणि पोहणे हे योग्य व्यायाम समजण्यात येतात. नियमित तुम्ही या व्यायामाचा आधार घेणे गरजेचे आहे. 

4. भात खाल्ल्याने वजन वाढते का?

खूप लोकांच्या म्हणण्यानुसार, भात खाल्ल्याने वजन वाढतं मात्र असं काही नाही. भात खाल्ल्याने ना वजन वाढत ना सोडल्याने वजन कमी होत. १ वाटी भातामध्ये २ पोळ्यांमध्ये असणारी कॅलरीपेक्षा कमी कॅलरी असते. भातमध्ये जास्त कार्बोहायड्रेट्स असतात, ज्यामुळे आपल्या शरीराला ऊर्जा मिळते.

ADVERTISEMENT

5. पीसीओडी (PCOD) अथवा पीसीओएस (PCOS) असल्यास, महिलांचं वजन वेगाने वाढते का?

पॉलीसिस्टिक ओवरी सिंड्रोम अर्थात पीसीओएस ही महिलांना होणारी समस्या आहे, जी फक्त फर्टिलिटीच कमी नाही करत तर, चेहऱ्यावर केस, पुळ्या, तणाव आणि वजन हे सर्वच वाढवते. संशोधनात ही गोष्ट समोर आली आहे की, आपलं वजन कमी करून या सगळ्यापासून महिला सुटका मिळवू शकतात. पीएसओएससह वजन कमी करायचं असल्यास, नियमित व्यायाम करणं गरजेचं आहे.

15 Dec 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT