प्रत्येक स्त्री ला आपले केस लांबसडक, चमकदार आणि घनदाट असावेत असं वाटत असतं. त्यासाठी बऱ्याचदा तज्ज्ञांची मदत घेऊन सल्ला घेतला जातो आणि अगदी महाग उत्पादनांचा (hair products) वापरही किला जातो. इतकंच नाही तर पार्लरमध्ये हजारो रुपये खर्च करून हेअर स्पा आणि हेअर केअर (hair care) अशा अनके ट्रीटमेंट्सदेखील करण्यात येतात. पण तुम्हाला माहीत आहे का, चांगल्या केसांसाठी उपाय हा तुम्हाला तुमच्या नियमित वापरात आणि स्वयंपाकघरातच मिळणार आहे. वास्तविक असे बरेच घरगुती उपाय आहेत, ज्यापैकी एक आहे तो म्हणजे दही. दह्याचा वापर करून तुम्ही तुमची त्वचा आणि केसांची काळजी चांगली घेऊ शकता. तुम्हाला याची कल्पनाही नसेल की, दही कशाप्रकारे तुमच्या केसांसाठी चांगला पर्याय ठरतो. या लेखाद्वारे दही (curd) तुमच्या केसांसाठी कसे गुणकारी आहे ते जाणून घ्या.
केसांना दही लावण्याचे योग्य प्रकार
अशाप्रकारेदेखील करू शकता दह्याचा वापर
दह्याने केस कसे वाढतात (Curd For Hair Growth)
दही (Curd) एक असं फूड प्रॉडक्ट (Food Product) आहे जे तुमच्या घरामध्ये अगदी सहजपणे प्राप्त होतं. दह्यामध्ये विटामिन आणि फॅटी अॅसिडची मात्रा जास्त प्रमाणात असते. यामुळे तुमच्या केसांसाठी अतिशय गुणकारी दही समजलं जातं. शिवाय दह्याला कॅल्शियम आणि प्रोटीनचादेखील चांगला सोर्स असं म्हटलं जातं. त्यामुळेच त्वचा आणि केसांसाठी हे खूपच लाभदायक आहे. दह्यामध्ये लॅक्टिक अॅसिड, फॉस्फोरस, आयर्न, विटामिन ए, विटामिन बी 1, विटामिन बी 2, विटामिन बी 5 आणि विटामिन सी सारख्या अनेक खनिज तत्त्वांची भर असते. हे सर्व विटामिन्स तुमच्या शरीराच्या निरोगीपणासाठी अतिशय फायदेशीर असतात.
केसांमध्ये शँपू आणि कंडिशनरचा (conditioner) अत्यधिक वापर करण्यापेक्षा केसांना दही अथवा त्यापासून तयार करण्यात आलेले हेअर पॅक्स (Hair Pack) लावले तर तुमचे केस नक्कीच लांब, घनदाट, मुलायम आणि चमकदार होतील.
वाचा – #DIY: झटपट केस वाढवायचेत तर जाणून घ्या घरगुती उपाय
केसांसाठी दह्याचे फायदे (Benefits Of Curd For Hair)
आजकलच्या व्यस्त लाइफस्टाइल आणि वाढत्या प्रदूषणामध्ये आपली त्वचा आणि केसांची खास काळजी घेणं खरं तर कठीणच आहे. तुमच्या केसांमध्ये कोणत्याही प्रकारची समस्या असेल तर त्यासाठी कोणतंही केमिकल उत्पादन वापरण्याऐवजी तुम्ही घरगुती उपयांकडे जास्त लक्ष द्या. जाणून घ्या दह्याचे नक्की काय फायदे आहेत –
1. दह्यामध्ये अँटीफंगल गुण असतात, जे केसांधील कोंडा (dandruff) काढून टाकतात आणि केस अतिशय साफ आणि सुंदर ठेवतात. त्यासाठी तुम्ही दह्यामध्ये काही थेंब लिंबाचा रस घाला. ही पेस्ट तुम्ही तुमच्या केसांच्या स्कॅल्पवर लावा आणि काही वेळ ठेऊन द्या. आठवड्यातून दोन वेळा तुम्ही हा उपाय केल्यास, तुमच्या केसांमधील कोंडा निघून जाईल.
2. दह्याचा वापर केल्यामुळे केसांची गळती थांबते. तुमचे केस जर गळत असतील तर दह्यामध्ये काही कडिपत्त्याची पानं घाला. ही पेस्ट तुम्ही तुमच्या केसांवर लावल्यास, तुमची केसगळती तर थांबेलच. पण तुमचे केस काळेदेखील होतील.
3. दही केसांना लावल्यास, केस थंड राहतात आणि केसांमध्ये ओलावा राहतो अर्थात केसांना दही चांगलं मॉईस्चराईज करतं.
4. केसांची वाढ कमी झाली असल्यास, दह्यामध्ये नारळाचं तेल आणि जास्वंदीच्या फुलांची काही पानं मिसळून घ्या. हे केसांना लावल्यास, तुमचे केस नक्की वाढायला लागतील.
वाचा – पांढरे केस काळे करण्यासाठी हे आहेत सोपे घरगुती उपाय
5. दह्याला केसांसाठी नैसर्गिक कंडिशनर मानलं जातं. याचा कोणताही साईड इफेक्ट शरीरावर होत नाही. नुसतं दही तुमच्या केसांना अर्धा तास लावून ठेवा आणि मग पाण्याने धुऊन टाका. काही दिवसांमध्येच तुम्हाला केसांवरील चांगला परिणाम दिसायला लागेल.
6. केसांना मुलायम बनवण्यासाठी दह्यामध्ये मध घालून मास्क करून घ्या. हा मास्क साधारण 15- 20 मिनटांपर्यंत केसांना लावा आणि मग केस धुऊन घ्या.
7. केसांना मऊसर आणि चमकदार बनवण्यासाठी दह्यामध्ये मेयोनीज घालून घ्या. हे पॅक केसांना अगदी मुळापर्यंत लावा आणि अर्ध्या तासानंतर केस धुवा.
8. बऱ्याचदा महिलांना फाटे फुटलेल्या केसांच्या समस्येला सामोरं जावं लागतं. आठवड्यातून दोन वेळा केसांना दही लावल्यास, ही समस्या बहुतांश प्रमाणात निघून जाते.
9. दह्यामध्ये काळ्या मिरीची पावडर घालून लावल्यास, कोंड्याची समस्या दूर होते आणि केस साफ, मुलायम, काळे आणि घनदाट होतात.
10. केसांच्या कंडिशनिंगसाठी तुम्ही जर दही वापरत असाल तर मेंदीमध्ये दह्याबरोबर थोडं व्हिनेगर आणि चहाची पूड असलेलं पाणी घालून केसांना लावा. एक तासानंतर केस धुवा.
केसांना दही लावण्याचे योग्य प्रकार (Ways To Apply Curd On Hair)
1. मेथी आणि दही (Fenugreek and Yogurt)
मेथीचे आरोग्यदायी फायदे अनेक आहेत. मेथी केसगळती आणि केसांना तुटण्यापासून वाचवते. एक मूठ मेथी रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा आणि सकाळी त्याची पेस्ट करून दह्यामध्ये मिसळा. हा पॅक अर्धा तासासाठी केसांना लावून ठेवा आणि मग केस गरम पाण्याने धुवा. साधारणतः आठड्यातून दोन वेळा हा प्रयोग करता येऊ शकतो.
2. लिंबू आणि दही (Lemon and Yogurt)
लिंबामध्ये अँटीबॅक्टेरियल गुण असतात. लिंबू आणि दह्याचे मिश्रण हे केसांसाठी अतिशय फायदेशीर असतं. त्यासाठी तुम्हाला एका वाटीत चार चमचे दही, दोन चमचे लिंबाचा रस आणि एक चमचा मध घ्यायचाय. त्यानंतर हे मिश्रण तुम्ही 20 मिनिटांपर्यंत केसांना लाऊन ठेवा. त्यानंतर कोमट पाण्याने केस धुवा. आठवड्यातून एकदाच हे मिश्रण केसांना लावावं.
वाचा – त्वचा, केस आणि बऱ्याच रोगांवर गुणकारी मोहरीच्या बिया
3. मध आणि दही (Honey and Yogurt)
दही केसांचं अतिरिक्त तेल नियंत्रणात आणतो. अर्धा कप दह्यामध्ये एक चमचा मध आणि एक चमचा सफरचंदाचा रस मिसळून अर्धा तासासाठी मुरू द्या. त्यानंतर ही पेस्ट केसांना अगदी मुळापासून लावा. अर्धा तास लाऊन ठेवल्यावर माईल्ड शॅंपूने तुम्ही तुमचे केस धुवा. केसांची वाढ करण्यासाठी हा उपाय साधारणतः आठवड्यातून दोनवेळा वापरा.
4. अंडी आणि दही (Egg and Yogurt)
प्रोटीनयुक्त अंडी ही केसांना आणि डोक्यालाही पोषण देतात. दोन चमचे दह्यामध्ये एक अंड मिसळून घ्या. ही पेस्ट संपूर्ण केसांना लावा. साधारणतः हे मिश्रण 20- 30 मिनिटांमध्ये सुकेल त्यानंतर थंड पाण्याने शँपू लाऊन आंघोळ करा.
5. ऑलिव्ह ऑईल आणि दही (Olive Oil and Curd)
केसांना चांगलं ठेवण्यासाठी आणि तुटण्यापासून वाचवण्यासाठी ऑलिव्ह ऑईल अतिशय फायदेशीर असतं. दोन कप पाण्यामध्ये एक चमचा लिंबाचा रस घालून शँपूबरोबर केस धुऊन घ्या. त्यानंतर एक कप दह्यामध्ये एक चमचा ऑलिव्ह ऑईल मिसळा आणि हे मिश्रण 20 मिनिटं लाऊन ठेवा. नंतर लिंबू पाण्यासह थंड वा गरम पाण्याने केस धुवा. आठवड्यातून तुम्ही हा उपाय केल्यास, तुम्हाला नक्कीच याचा चांगला परिणाम दिसून येईल.
6. कोरफड आणि दही (Aloe Vera and Curd)
कोरफडमध्ये अमिनो अॅसिड आणि प्रोटीनची मात्रा जास्त प्रमाणात असते. 2 चमचे दह्यामध्ये 3 चमचे कोरफड जेल, 2 चमचे ऑलिव्ह ऑईल आणि एक चमचा मध घालून मिश्रण करून घ्या. हे मिश्रण साधारण केसांवर 15 मिनिटं लाऊन केसांना मालिश करा. अर्धा तासात हे मिश्रण सुकेल आणि मग केस शँपू लाऊन धुऊन टाका. केसांच्या वाढीसाठी आठवड्यातून दोन वेळा हा उपाय करा.
वाचा – केसांच्या वाढीसाठी अंड्याचा हेअर मास्क
7. केळं आणि दही (Banana and Curd)
केळं आणि दह्याचं मिश्रण डोक्याला हायड्रेटेड ठेवतं आणि केसांच्या पोषणासाठीदेखील हे लाभदायक आहे. एक चमचा दह्यामध्ये पिकलेलं अर्ध केळं घाला, त्यात 3 चमचे मध आणि 1 चमचा लिंबाचा रस मिसळा. हे मिश्रण केसांच्या मुळांपासून लाऊन साधारण अर्धा तास ठेवा आणि मग शँपूने केस धुवा. केसांच्या मजबूतीसाठी हे मिश्रण आठवड्यातून दोन वेळा तुम्ही लाऊ शकता.
वाचा – केसांची काळजी घेण्यासाठीचे उपाय (Hair Care Tips)
अशाप्रकारेदेखील करू शकता दह्याचा वापर (Curd For Other Hair Problems)
1. तुमचे केस खूपच कोरडे आणि निस्तेज झाले असतील तर दही, अंडी आणि बदामाच्या तेलाचं मिश्रण नक्की यावर उपयुक्त आहे. या तीन वस्तू मिसळून केसांना लावल्यास, तुमचे केस मऊ आणि मजबूत होतील. अर्धा तास हे मिश्रण लाऊन शँपूने केस धुऊन घ्या. यामुळे कोंड्याच्या समस्येपासूनदेखील तुम्हाला सुटका मिळू शकते.
2. बऱ्याच जणींना आपल्या कुरळ्या केसांची काळजी घेण्यात खूपच समस्या निर्माण होत असतात. तुम्हालासुद्धा असं होत असेल तर दही, कोरफड आणि नारळाच्या तेलाचं मिश्रण 15 मिनिटं केसांना लाऊन ठेवा. या पेस्टमुळे केस मऊ होतील आणि त्यामधील गुंता काढणं अतिशय सोपं होऊन जाईल.
3. आठवड्यातून एक दिवस आंबट दह्याने तुमच्या केसांना मालिश केल्यास, कोंड्याची समस्या दूर होते.
4. दोन मोठे चमचे दह्यात पाणी, एक कप मेंदी, एक चमचा कॉफी पावडर, एक मोठा चमचा सुक्या आवळ्याची पावडर आणि 1 चमचा कत्था पावडर मिसळून एक तासासाठी ठेऊन द्या. मग एक तासानंतर तुमच्या केसांना अगदी मुळापासून हे मिश्रण लावा. सुकल्यानंतर थंड पाण्याने हेअरवॉश करा. आठवड्यातून एकदा याचा वापर केल्यास, केस सुंदर आणि चमकदार होतात.
5. केसांच्या सौंदर्यासाठी आठ चमचे मुल्तानी मिट्टी घ्या. त्यामध्ये चार चमचे दही आणि चार चमचे लिंबाचा रस घालून केसांना लावा. अर्ध्या तासात केस धुवा. आठवड्यातून एकदा याचा वापर केल्यास, तुमचे केस घट्ट, काळे आणि मुलायम होतील.
6. दह्यामध्ये सैंधव मीठ घालून एक तासासाठी केसांना मुळांपासून लाऊन ठेवा. त्यानंतर थंड पाण्याने केस धुवा. केसांना चमकदार आणि मऊ बनवण्यासाठी हा उपाय अतिशय सोपा आहे.
7. केसांमधील कोंडा दूर करण्यासाठी आणि केसांची चमक वाढवण्यासाठी दह्यामध्ये बेसन घालून केसांना मुळापासून लावा आणि एक तासाने धुऊन टाका.
8. चार चमचे मुल्तानी मिट्टीमध्ये एक वाटी दही, चार चमचे त्रिफळा पावडर, चार चमचे शिकाकाई पावडर आणि अर्धा चमचा लिंबाचा रस मिसळून रात्रभर ठेऊन द्या. हे मिश्रण सकाळी तुमच्या केसांना एक तासांसाठी लावा आणि मग थंड पाण्याने तुमचे केस धुवा. आठवड्यातून एकदा असं केल्यास, केसगळती थांबेल आणि केस सुंदर आणि चांगले होतील.
तुम्हाला कदाचित या गोष्टी आवडतील:
घनदाट केसांसाठी तांदूळाचे पाणी
Home Remedies To Grow Hair Faster In Marathi
What Causes White Hair & Home Remedies To Get Rid Of It In Marathi
Important Factors To Influence Hair Growth & Home Remedies In Marathi