घरगुती फेसपॅकचे वेगवेगळे प्रकार आम्ही तुमच्यासोबत शेअर केले आहेत. आज आम्ही तुमच्यासोबत शेअर करणार आहोत अशा फेसपॅक पावडर ज्या तुम्हाला उन्हाळ्याच्या दिवसात तयार करता येतील. जर तुम्ही नॅचरल फेसपॅकचे चाहते आहात तर हे फेसपॅक तुमच्या सौंदर्यात नैसर्गिकपद्धतीने ग्लो आणतील.
संत्रा फेसपॅक पावडर
सौंदर्य वाढवतील असे घरगुती फेसपॅक
संत्र्यातील व्हिटॅमिन c चेहऱ्यासाठी चांगले असते. त्यामुळे संत्री खाण्याचा आणि त्याचा सौंदर्य प्रसाधनांमध्ये वापर करण्याचा सल्ला दिला जातो. कारण कोणत्याही त्वचेला संत्र्याचे टोनर किंवा फेसपॅक चालू शकते.सध्या बाजारात संत्री आहेत त्यामुळे लगेच घरी संत्री आणून त्याची फेसपॅक पावडर तयार करा.
तुम्हाला किती फेसपॅक पावडर करायची आहे. त्याचा विचार करुन बाजारातून संत्री आणा.
संत्री स्वच्छ धुवून घ्या. नंतर ती फोडून त्याचा गर काढून घ्या. काढलेली सालं उन्हाळात वाळवून घ्या. (साधारण २ ते ३ दिवस ही साल कडकडीत वाळण्यासाठी लागतात)
साल चांगली कडक वाळल्यानंतर मिक्सरच्या भांड्यातून काढा. तयार पावडर एका एअर टाईट भांड्यात ठेवा.
ज्यावेळी तुम्हाला फ्रेश आणि ग्लो करणारा चेहरा हवा असेल तेव्हा संत्र्याचा फेसपॅक करुन चेहऱ्याला लावा.
नीम फेसपॅक पावडर
कडुनिंबाचे अनेक फायदे आहेत. त्यापैकी एक हा सौंदर्याशी निगडीत आहे. जर तुमच्या शरीरावर पुरळ किंवा मुरुमासारखे तत्सम काही आले असेल. तर ते घालवण्यासाठी कडुनिंबाच्या पानांचा अर्क लावला जातो. त्यामुळे तुम्हाला पुटकुळ्या, मुरुम आली असतील तर तुम्ही कडुनिंबाच्या पानांचा पॅक चेहऱ्याला लावू शकता.
कडुनिंबाची पाने स्वच्छ धुवून घ्या. आणि ही पाने उन्हात वाळवून घ्या.
वाळलेल्या पानाची पूड तयार करुन ठेवा.
तुम्हाला जेव्हा हा फेसपॅक लावायचा असेल त्यावेळी तुम्ही त्या पावडरमध्ये पाणी टाकून फेसपॅक तयार करा.
कोथिंबीर फेसपॅक
कोथिंबीर ही देखील चेहऱ्यासाठी चांगली. जर तुम्हाला प्रत्येकवेळी ताजी कोथिंबीर वाटणे शक्य नसेल तर कोथिंबीर वाळवून त्याची पावडर करुन ठेवा. आता तुम्ही म्हणाल धणे पावडर चालेल का? तर अजिबात नाही धण्याचे गुणधर्म वेगळे असतात.
स्ट्रेच मार्क्स आणि अँटी एजिंगसाठी हॉट कँडल वॅक्स
तुम्हाला कोथिंबीर स्वच्छ धुवून घ्यायची आहे.
एका पातळ फडक्यावर कोथिंबीर पसरुन ठेवायची आहे. त्यावर आणखी एक पातळ कपडा ठेवून कोथिंबीर कडक वाळवून घ्या
सुकल्यानंतर कोथिंबीर अगदी मुठभरपण होणार नाही. कोथिंबीर कडक वाळलेली असेल तर त्याची हातानेच पूड होईल.
चेहऱ्यावरील पिंपल्स गेले पण डागांचे काय?
ज्यावेळी तुम्हाला कोथिंबीर फेसपॅक तयार करायचा असेल त्यावेळी एक चमचा कोथिंबीर पावडर, लिंबाचा रस आणि मध घालून हा फेसपॅक तयार करुन तुम्हाला तुमच्या चेहऱ्याला लावायचा आहे. हा फेसपॅक संपूर्ण सुकेपर्यंत ठेवा आणि चेहरा धुवून घ्या.
पुदिना फेसपॅक
पुदिना पाचक आहे. त्याप्रमाणे तो चेहऱ्यासाठीही चांगला आहे. त्यामुळे पुदिन्याचा वापर सौंदर्यप्रसाधनांमध्येही करतात.
पुदिना आणून तो सुकवून त्याची पूड करुन घ्या
ज्यावेळी तुम्हाला फेसपॅक तयार करायचा असेल त्यावेळी तुम्हाला त्यामध्ये थोडी हळद आणि लिंबू पिळायचे आहे.
तयार फेसपॅक तुम्हाला तुमच्या चेहऱ्याला लावायचा आहे.
तुम्हाला तुमची त्वचा एकदम मुलायम झाल्यासारखी वाटेल.
*तर तुम्हाला हे फेसपॅकसाठी लागणाऱ्या अशा पावडर घरच्या घरी तयार करता येतील.
You Might Like This:
कमी वेळात चमकदार त्वचेसाठी बदामाचं तेल (Benefits Of Almond Oil In Marathi)