तुम्हाला दर महिन्यामध्ये अथवा किमान दोन महिन्यांनी एकदा तरी पार्लरची पायरी चढावीच लागत असणार आणि त्याचं कारण दुसरं तिसरं काही नसून ते कारण आहे आयब्रोज. पण काही तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, बऱ्याच महिला आपल्या आयब्रोज प्लक करताना खूप चुका करतात. सर्व मुलींना आपले आयब्रो दाट आणि सुंदर ठेवायला आवडतात. आपापले आयब्रो दाट होण्यासाठी आणि जलद वाढीसाठी काही ना काही उठाठेव चालूच असते. सुंदर लुक हवा असल्यास, तुम्हाला तुमच्या आयब्रोजचा आकार योग्य राखणं गरेजेचं आहे. जेव्हा तुमच्या आयब्रो प्लक करण्याची गोष्ट येते अथवा थ्रेडिंग करून त्याला आकार द्यायची बाब येते तेव्हा नेहमीच रिस्क असते. कधी आयब्रोज जाड राहतात तर कधी पातळ होतात. कधी एक आयब्रो जाड राहते तर दुसरी पातळ राहते. त्यामुळे तुमच्या चेहऱ्याचा पूर्ण लुक बदलतो आणि त्यामुळे तुमची चिडचिडही वाढते. मग अशा वेळी नक्की काय करायचं? अशावेळी काही गोष्टी लक्षात ठेवणं खूप गरजेचं असतं. आपण या लेखाद्वारे आयब्रोजसंदर्भात सर्व माहिती जाणून घेणार आहोत.
तीन तऱ्हेच्या आयब्रोज – Types Of Eyebrows in Marathi
युनिक आयब्रो शेपच आहे परफेक्ट – Unique Eyebrow Shape Is Perfect
चेहऱ्यानुसार कसा मिळणार परफेक्ट शेप? – Perfect Eyebrow Shape in Marathi
घरच्या घरी आयब्रो शेप बनवण्यासाठी सोप्या 8 पद्धती – Guide To Get Perfect Eyebrows At Home in Marathi
जाड आयब्रोज कशा मिळवाल? – How to Get Thick Eyebrows In Marathi
‘या’ पद्धती वापरून तुम्ही मिळवू शकता परफेक्ट आयब्रोज – Eyebrow Shaping Tips In Marathi
चेहऱ्याला परफेक्ट लुक देते आयब्रो
तुमचे आयब्रोज हे तुमच्या चेहऱ्याला सौंदर्य द्यायचं काम करतात. त्यासाठी आयब्रोजची खूपच मदत होते. असंही म्हणता येऊ शकेल की, तुमचे आयब्रोज हे तुमच्या चेहऱ्याला फ्रेम करतात. त्यासाठी तुम्हाला तुमच्या आयब्रोजचा आकार देताना विशेष काळजी घेण्याची गरज आहे. तुम्हाला जितक्या नैसर्गिक पद्धतीने आयब्रोज दाखवता येतील त्याप्रमाणेच ते दाखवायला हवेत. तुमचा चेहरा खराब दिसेल अशा पद्धतीने आयब्रोज करू नयेत.
वाचा – आयब्रोज थ्रेडींग करताना तुम्ही घेता का काळजी, वाचा टीप्स
खोटे आर्क बनवू नका
हॉलीवूडची सेलिब्रिटी आयब्रो स्पेशालिस्ट टोन्या क्रुक्सने एका फॅशन मॅगझीनमध्ये सांगितलं की, बऱ्याच महिला आपल्या आयब्रो सुंदर दाखवण्यासाठी खोटे आर्क बनवतात. असं केल्यामुळे तुमचा चेहरा खूपच खराब दिसतो. तुमच्या नैसर्गिक आयब्रोमध्ये आर्क नसल्यास, तसं करू नका. कारण तसं केल्यास, ती खूपच मोठी चूक ठरेल.
तीन तऱ्हेच्या आयब्रोज – Types Of Eyebrows In Marathi
तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार तीन तऱ्हेच्या आयब्रोज असतात. तुमच्या आयब्रोमध्ये जर शार्पनेस असून त्या वरच्या बाजूला अथवा अगदी खालच्या बाजूला असतील तर त्याला आर्क असं म्हटलं जातं. यातील कर्व्ह सॉफ्ट अथवा हलकासा वळलेला असेल तर याला आर्क म्हणतात. पण जर या आयब्रोज वरच्या बाजूला असतील आणि फारच कमी प्रमाणात असतील तर आयब्रोज स्ट्रेट असल्याचं म्हटलं जातं.
यूनिक आयब्रो शेपच आहे परफेक्ट – Unique Eyebrow Shape Is Perfect
तुमच्या चेहऱ्यासाठी तुमचा जो युनिक आयब्रो शेप आहे तोच परफेक्ट असतो. पण बरेचसे आयब्रो आर्टिस्ट यामध्ये आर्क बनवण्यासाठी जास्त प्लकिंग करतात, जे तुमच्या चेहऱ्याला बऱ्याचदा चांगलं दिसत नाही. त्यामुळे कोणत्याही प्रकारचा मेकअप करताना आपल्या चेहऱ्याला नक्की कोणता शेप योग्य दिसतो हे आपण ठरवावं. अति आर्क करण्याच्या नादात आपल्या चेहऱ्याचं सौंदर्य खराब करून घेऊ नका.
थ्रेडिंगपेक्षा जास्त चांगलं आहे वॅक्सिंग अथवा ट्विजिंग
आपल्याला आयब्रोज करायचे म्हणजे फक्त थ्रेडिंग करायचं हेच माहीत आहे. पण आता यासाठी वेगवेगळे प्रकारही आले आहेत. तुम्हाला आता घरच्या घरीही मशीन वापरून आयब्रोज करता येतात. पण खरंतर थ्रेडिंगच्या तुलनेत वॅक्सिंग अथवा ट्विजिंग करणं जास्त चांगलं आहे असं तज्ज्ञांचं मत आहे. कारण थ्रेडिंग केल्यावर आयब्रोज लवकर परत येतात. पण वॅक्सिंग अथवा ट्विजिंग पद्धत वापरल्यास, याचा परिणाम जास्त दिवस राहातो.
थ्रेडिंगमुळे कुरळे केस लवकर उगवतात
तुम्हाला आयब्रोवरील नको असलेले केसच थ्रेड करायला हवेत असं तज्ज्ञांचं सहसा म्हणणं असतं. कारण जेव्हा तुम्ही हेअर फॉलिकल्स रॅप करून थ्रेड करता तेव्हा हे पूर्ण तऱ्हेने तुटतात आणि मग जेव्हा परत येतात तेव्हा थ्रेडिंगमुळे केस कुरळे होतात. शिवाय हे केस खूपच चुकीच्या तऱ्हेने वाढतात. त्यामुळे थ्रेडिंग करताना नीट काळजी घ्यायला हवी.
चेहऱ्यानुसार कसा मिळणार परफेक्ट शेप? Perfect Eyebrow Shape In Marathi
आयब्रोजचा योग्य आकार मिळवण्यासाठी सर्वात पहिल्यांदा तुम्हाला आयब्रो पेन्सिलची मदत घ्यायला हवी असं सौंदर्य तज्ज्ञ सहसा सांगतात. त्यासाठी तुम्हाला पेन्सिलच्या सहाय्याने आयब्रोजवर तीन डॉट्स काढायचे असतात. त्यानंतर तुमच्या चेहऱ्याला सूट होणारा आकार तुम्ही तुमच्या आयब्रोजना द्या. आता या शेपच्या बाहेर नको असणारे केस प्लक करून काढून टाका. ही पद्धत खूपच सोपी आहे. पण आपल्याला खरं तर घरच्या घरी असे प्रयोग करायला भीती वाटत असते. पण ही भीती तुम्ही मनातून काढून टाका कारण आता बाजारातही आयब्रोजचे केस काढण्यासाठी विविध उपकरणं आली आहेत. ज्यामुळे तुम्हाला थ्रेडिंगप्रमाणे त्रासही होत नाही आणि तुमचे केसही काढून टाकता येतात.
वाचा – तुम्हालाही हवेत *जाड* आयब्रोज?,मग हे नक्की वाचा
घरच्या घरी आईब्रोज शेप बनवण्यासाठी 8 सोप्या पद्धती – Guide To Get Perfect Eyebrows In Marathi
तुम्हाला खरंच दर दोन महिन्यांनी अथवा एक महिन्याने पार्लरमध्ये जायला जमत नसेल आणि तुम्हाला घरच्या घरी स्वतःचे आयब्रोज शेप करणं शक्य असेल तर तुम्ही या सोप्या 8 पद्धती नक्की वापरू शकता. आम्ही तुम्हाला या पद्धतीचा कसा वापर करायचा ते इथे सांगणार आहोत.
काही वेळासाठी अशा प्रकारे सोडून द्या
तुम्हाला जर वाटत असेल की, आपल्या चेहऱ्यासाठी आयब्रोजचा चांगला आकार मिळायला हवा तर साधारण 6 ते 8 आठवडे तुम्ही आयब्रोजचा शेप देऊ नका. अर्थात तुम्ही तुमच्या आयब्रो साधारण एक ते दीड महिना तशाच वाढवा. तेव्हाच तुम्हाला तुमच्या आयब्रोजना योग्य शेप अर्थात आकार देता येईल. तुमचे आयब्रोज जेवढे वाढलेले असतील तितकाच त्याचा आकार जास्त चांगला होईल असं तज्ज्ञांचं मत आहे. त्यामुळे तुम्हाला नैसर्गिकरित्या चांगला आकार या आयब्रोजना देता येईल.
पेन्सिलने गोलाकार शेप बनवा
एक आयब्रो पेन्सिल घेऊन तुम्ही आपल्या नाकाच्या मधोमध घेऊन डोळ्यांच्या अंतापर्यंत एक – एक पॉईंट बनवा. आता एक पेन्सिने एक गोल आर्क बनवून लाईनने हे दोन्ही पॉईंट्स जोडा. आयब्रोजच्या अंतावर तुम्ही हीच लाईन आपल्या डोळ्यांच्या बाहेरच्या कॉर्नरपर्यंत आणा.
वाढलेले केस हलकेसे ट्रीम करा
पहिल्या सांगितलेल्या 2 स्टेप्स करा आणि आपल्या आयब्रोजच्या जाडीनुसार या गोष्टी करा. यानंतर जर तुम्हाला मध्ये जास्त केस दिसले तर वाढलेले हे केस हलकेसे ट्रीम करा. मधोमध जाड केस खराब दिसतील त्यामुळे ते केस कापून टाका. जर तुम्हाला डायरेक्ट कापण्यात अडचण येत असेल तर आयब्रोज ब्रशने केस विंचरून उरलेले केस तुम्ही कापू शकता.
प्लकिंग अथवा थ्रेडिंगपूर्वी हलक्या हाताने मसाज करा
आयब्रो शेप बनवण्यासाठी तुम्हाला सर्वात पहिल्यांदा प्लकिंग करायचं आहे की, वॅक्स अथवा थ्रेडिंग करायचं आहे हे निश्चित करणं आवश्यक आहे. पण प्लकिंग अथवा थ्रेडिंग करण्यापूर्वी तुम्ही तुमचं आवडतं फेशियल ऑईल आपल्या आयब्रोजना लाऊन हलक्या हाताने मसाज करा. त्यामुळे तुमच्या आयब्रोजच्या खाली असलेली त्वचा आणि हेअर फॉलिकल्स हे सॉफ्ट होतात. याचा असा फायदा होतो की, आयब्रोजचे केस तुटत नाहीत आणि केस ओढल्यास अथवा काढताना त्वचवरही त्याचा चुकीचा परिणाम होत नाही.
केसांच्या वाढीच्या दिशेनेच करा प्लकिंग
आयब्रो शेप बनवताना जर आपल्याला जास्त त्रास होऊ नये असं वाटत असेल तर हॉट वॅक्स विसरून तुम्ही ट्विजिंग अथवा प्लकिंग करा. प्लकिंगदेखील तुम्हाला करायचं असेल तर तुमच्या केसांच्या वाढीच्या दिशेनेच तुम्ही प्लकिंग करा जेणेकरून तुम्हाला त्रास होणार नाही. लक्षात ठेवा की, पद्धत कोणतीही असो, आयब्रोज बनवताना तुम्हाला तुमचा चेहरा, विशेषतः तुमचे डोळ्यांवरील त्वचा ही टाईट ठेऊन खेचणं आवश्यक आहे. हेदेखील लक्षात ठेवा की, जर तुम्हाला जर आयब्रोजचा योग्य आकार बनवयाचा असेल तर प्लकिंग असो वा थ्रेडिंग अथवा हॉट वॅक्स दिवसाच्या नैसर्गिक प्रकाशातच हे करा. त्याचा योग्य आणि चांगला परिणाम होतो.
नको असलेले केस काढून टाका
प्लकिंग अथवा थ्रेडिंग करताना सर्वात पहिले तुम्ही आयब्रो पेन्सिलने आपल्या आयब्रोजचा शेप बनवून घ्या. यामध्ये बरेचसे केस असेही असतात जे जास्त असतात आणि अगदी लहान असतात. हे केस तुम्ही न काढल्यास, तुमच्या आयब्रोजचा शेप तर बिघडतोच शिवाय तुमच्या चेहऱ्याचा लुकही बिघडतो. यानंतर तुम्ही आयब्रो शेपच्या वरील सर्व केस काढून टाका. लक्षात ठेवा की, केस काढता काढता तुम्ही मधून मधून आरशात आपला लुक योग्य आहे की, नाही हे पाहात राहा. कारण काही चुकीचं झालं तर तुमच्या चेहऱ्याचा पूर्ण लुक खराब होऊ शकतो. त्यामुळे वेळेवर आरशात पाहून स्वतःचा लुक नीट आहे की नाही हे बघा.
रॅशेसपासून त्वचा वाचवा
प्लकिंग अथवा थ्रेडिंग केल्यामुळे तुमच्या त्वचेवर रॅशेस येऊ शकतात अथवा तुमची त्वचा लाल होऊ शकते. शिवाय काही जणींना रक्ताचे छोटे छोटे स्पॉ्टसदेखील होतात. यापासून वाचण्यासाठी तुम्ही थ्रेडिंग अथवा प्लकिंग झाल्यानंतर त्यावर कोणतीही कुल जेल, पावडर अथवा बर्फाचे तुकडे लावणं योग्य आहे. यापैकी काही लावायचं नसल्यास, तुम्ही मॉईस्चराईजरदेखील लाऊ शकता.
वाचा – अप्पर लीपवरील केस काढताय, मग तुम्ही अशी घ्यायला हवी काळजी
..आणि तुम्हाला मिळेल सुंदर आकार
बऱ्याचदा तुमचे पूर्ण आयब्रोज शेप बनण्यासाठी काही केस कमी असल्यामुळे नीट शेप येत नाही. अशावेळी आयब्रो पेन्सिलचा आधार घ्यावा लागतो. पण तुमच्या आयब्रोजच्या रंगाचीच कलर पेन्सिल तुम्ही वापरा. अन्यथा दिसायला ते खूपच खराब दिसतं. तुमचा लुक बिघडूही शकतो. आयब्रो पेन्सिल लाऊन झाल्यावर तुम्ही आयब्रो जेलने आपल्या आयब्रोजना हल्कासा शायनिंग लुक द्या. यानंतर तुमच्या आयब्रोजना सुंदर आकार तर मिळेलच पण तुम्हालाही एक सुंदर लुक मिळेल.
जाड आयब्रोज कशा मिळवाल – How To Get Thick Eyebrows In Marathi
बऱ्याच महिलांच्या आयब्रोज या नैसर्गिक स्वरूपातच खूप पातळ असतात. हवं असूनही त्यांना आयब्रोजला जाडसर लुक देता येत नाही. असं असलं तरीही काही घरगुती उपायांनी तुम्ही तुमच्या आयब्रोज जाड करू शकता. खरं नाही ना वाटत? पण होय तुम्ही तुमच्या आयब्रोज घरच्या घरी काही उपाय करून जाडसर करू शकता. आम्ही तुम्हाला काही उपाय सांगतो.
कोरफड जेल
कोरफड ही त्वचेच्या प्रत्येक समस्येवरील उत्तम तोडगा आहे. आयब्रोजसाठीदेखील याची मदत होते. तुम्हाला हवं तर तुम्ही एलोवेरा जेल बाजारातून खरेदी करू शकता अथवा तुमच्या घरी जर कोरफडचं झाड असेल तर, तुम्ही त्यातून जेल काढून याचा उपयोग करू शकता. कोरफड जेल तुमच्या आयब्रोज जाड होण्यासाठी खूपच फायदेशीर आहे. हे आयब्रोजच्या केसांना पोषण देण्यासह नसलेल्या केसांचीही योग्य काळजी घेतात. थ्रेडिंग करताना तुमच्या आयब्रोजना कोणत्याही प्रकारचा धक्का बसला असेल तरीही याच्या मदतीने तुम्ही तुमच्या आयब्रोज व्यवस्थित वाढवू शकता.
कांद्याचा रस
कांद्याच रस तसं तर डोक्यावरील केसांसाठी खूपच फायदेशीर ठरतो. यामध्ये असणारं सल्फर हे केसांच्या वाढीसाठी उत्तम असतं. कांदा वाटून त्याचा रस काढा आणि हा रोज तुमच्या आयब्रोजना लावा. कांद्याचा रस हा ब्लड सर्क्युलेशन वाढवतो आणि ब्लड सर्क्युलेशन वाढल्यामुळे तुमच्या आयब्रोजही वाढतात. तुम्हाला जाड आयब्रोज हव्या असल्यास, नियमित स्वरूपात कांद्याचा रस तुम्ही तुमच्या आयब्रोजना लावा आणि त्याचा परिणाम पाहा.
नारळाचं तेल
केसांच्या विकासासाठी नारळाचं तेल उत्कृष्ट असतं हे सर्वांनाच माहीत आहे. त्यामुळे घनदाट आणि जाड आयब्रोज हव्या असल्यास, नारळाच्या तेलाचा उपयोग करा. यामुळे केवळ आयब्रोज वाढत नाहीत तर आयब्रोज शेपमध्येदेखील राहातात. तुम्हाला केवळ रोज झोपताना आपल्या आयब्रोजवर नारळाचं तेल लावायचं आहे. नारळाच्या तेलामध्ये अँटीएजिंग गुण आढळतात. त्यामुळे डोळ्यांच्या आसपासदेखील तुम्ही नारळाच्या तेलाने हलकासा मसाज करू शकता. यामुळे त्वचा मुलायम होते आणि चमकदारही होते, शिवाय सुरकुत्या पडत नाहीत.
दूध आहे अप्रतिम उपाय
आयब्रोज जाड करण्यासाठी दूध हा अप्रतिम उपाय आहे. दुधामधील प्रोटीन आणि विटामिन हे केसांंना मुळापासून पोषण देतं आणि त्यामुळे आयब्रोजची वाढ होते. आपल्या आयब्रोज जाड बनवण्यासाठी रोज झोपण्याआधी कापूस दुधात भिजवून आयब्रोजवर लावा. हा सर्वात सोपा आणि स्वस्त – मस्त उपाय आहे.
कॅस्टर ऑईल
हा घरगुती उपाय अतिशय परिणामकारक आणि जाड आयब्रोजसाठी उत्तम आहे. सर्वात जास्त हाच उपाय वापरला जातो. त्यासाठी तुम्ही हातावर कॅस्टर ऑईल घेऊन आयब्रोवर मसाज करा. त्यानंतर अर्धा तासाने तुमचा चेहरा कोमट पाण्याने फेसवॉश लाऊन धुवा. काही दिवस असं केल्यामुळे तुम्हाला तुमच्या आयब्रोजमध्ये फरक दिसू लागेल.
फोटो सौजन्य – Shutterstock, Instagram