आजकालच्या धावपळीच्या आयुष्यामध्ये आपल्याकडे स्वतःकजे लक्ष द्यायला खूपच कमी वेळ असतो. त्यातही आपण आपल्या त्वचा आणि केसांची काळजी कशाही परिस्थितीत घेत असतो. पण शरीराच्या बाकी भागांवर मात्र आपलं लक्ष जात नाही. कधी लक्ष गेलंच तर आपण त्याकडे दुर्लक्ष करत असतो. शरीराचे हे भाग आपल्याशिवाय कोणालाच दिसणार नाहीत असं मनात ठरवून त्याकडे सहसा दुर्लक्ष केलं जातं. त्यापैकीच एक गोष्ट म्हणजे ‘स्ट्रेच मार्क’. स्ट्रेच मार्क्स हे सहसा तुमच्या पोट, कंबर, छाती अथवा मांड्यावर दिसतात. काही महिलांच्या बाबतीत ते हातावरही दिसतात. हे स्ट्रेच मार्क्स आपल्या शरीरावर खूपच घाणच दिसतात. जितक्या लवकर ते येतात तितक्या लवकर ते जात मात्र नाहीत. यामुळे आपल्याला बऱ्याचदा लाजिरवाणंदेखील वाटतं. त्यामुळे ज्या भागात स्ट्रेच मार्क्स असतील तो भाग आपण कपड्यांनी झाकून ठेवणंच योग्य समजतो. पण तुम्हाला माहीत आहे का? हे स्ट्रेच मार्क्स आपण नक्कीच घालवू शकतो. आता आपण आपल्याला हवे तसे कपडे घालून घराबाहेर जाऊ शकतो. इतकंच नाही तर हे उपाय आपण घरच्या घरी करू शकतो. आम्ही तुम्हाला स्ट्रेच मार्क्स घालवण्यासाठी काही घरगुती उपाय सांगणार आहोत. पण त्याआधी स्ट्रेच मार्क्स नक्की का होतात? याची नक्की कारणं काय आहे हे आपण जाणून घेऊया.
स्ट्रेच मार्क्स घालवण्यासाठी घरगुती उपाय
स्ट्रेच मार्क्स हटवण्यासाठी तेल
स्ट्रेच मार्क्स हटवण्यासाठी क्रिम
स्ट्रेच मार्क्स म्हणजे नक्की काय? (What is Stretch Marks)
जेव्हा तुमची त्वचा ताणली जाते त्या ठिकाणी त्वचेचं कोलेजन कमी होतं, त्यामुळे त्याचं जनरल प्रॉडक्शन सायकल खराब होतं आणि त्वचेला नुकसान पोहचतं. यामुळए तुमच्या त्वचेवर खालच्या बाजूला स्कार्स अर्थात निशाणी यायला लागते. सुरुवातीला हे गुलाबी अथवा लाल रंगाचे असतात आणि नंतर काही काळाने हे स्ट्रेच मार्क्स तुम्हाला चंदेरी अथवा पांढऱ्या रंगाच्या लाईनमध्ये दिसतात. तुमची त्वचा जर आपल्या क्षमतेपेक्षा जास्त खेचली गेली तर अशा प्रकारचे निशाण दिसू लागतात, ज्याला स्ट्रेच मार्क्स असं म्हटलं जातं.
हे साधारणतः पोट, कंबर, छाती, हात आणि मांड्यांवर अथवा हिप्सवर दिसतात. जास्त महिलांच्या बाबतीत हे स्ट्रेच मार्क्स गरोदरपणात होतात. पण याची अन्य कारणंही असू शकतात. वजन अचानक वाढल्यास वा अचानक कमी झाल्यास, अनुवंशिकता, हॉर्मोन रिप्लेसमेंट थेरपी हीदेखील याची अन्य कारणं आहेत. वेळेवर स्ट्रेच मार्क्सवर उपचार न घेतल्यास, यापासून सुटका मिळवणं कठीण आहे. तसं तर आता बरेच लेझर उपचारदेखील आहेत ज्याच्या मदतीने तुम्ही स्ट्रेच मार्क्स घालवण्याचा प्रयत्न करू शकता. पण त्यापेक्षा नैसर्गिकरित्या हा उपाय करणं जास्त चांगलं आहे.
स्ट्रेच मार्क्स घालवण्यासाठी घरगुती उपाय (Home Remedies for Stretch Marks In Marathi)
स्ट्रेच मार्क्ससारखी समस्या असल्यास त्याचे उपचार आपल्या घरामध्येच असतात. काही सोपे घरगुती उपाय करून आपण यापासून नक्कीच सुटका मिळवू शकतो.
कोरफडची कमाल (Aloe Vera)
कोरफड हे शरीरासाठी थंड आणि अतिशय गुणकारी आहे. तसंच त्वचेच्या समस्यांवरही हे अतिशय गुणकारी आणि फायदेशीर आहे. तुम्हाला स्ट्रेच मार्क्स असणाऱ्या जागेवर कोरफड जेल घासायची आहे आणि मग साधारण 15-30 मिनिटांनतर कोमट पाण्याने धुवा. तुम्हाला हवं असल्यास, यामध्ये तुम्ही विटामिन-E कॅप्सूलच्या तेलाचादेखील उपयोग करू शकता. हे तुम्ही स्ट्रेच मार्क्स जाईपर्यंत रोज वापरू शकता.
यम्मी कोको बटर (Coco Butter)
कोको बटर त्वचेसाठी खूपच हायड्रेटिंग आणि पोषक असतं. हे सुरकुत्यादेखील त्वचेपासून दूर ठेवतं. स्ट्रेच मार्क्सवाल्या भागावर रोज दिवसातून दोन वेळा कोको बटरने मसाज करा. 1-2 महिन्यात तुम्हाला फरक दिसून येईल.
परिणामकारक बटाटा (Potato)
बटाट्याच्या रसामध्ये विटामिन्स आणि मिनरल्स जास्त प्रमाणात असतात, जे आपल्या त्वचेच्या सेल्सची वाढ आणि त्याची काळजी घेण्याचं काम करतात. त्यामुळे स्ट्रेच मार्क्सवर बटाटा हा उत्कृष्ट उपाय आहे. त्यासाठी एक बटाट घेऊन त्याचे मोठे स्लाईस करा आणि स्ट्रेच मार्क्स असणाऱ्या ठिकाणी घासा. तो भाग पूर्ण बटाट्याच्या स्टार्चने कव्हर होईपर्यंत घासा. जेव्हा ज्युस सुकेल तेव्हा कोमट पाण्याने धुऊन टाका. स्ट्रेच मार्क्स जाईपर्यंत असं करत राहा.
वाचा – प्रेगन्सीनंतर स्ट्रेच मार्क्स घालविण्यासाठी करा हे ‘5’ घरगुती उपाय
लिंबाचा रस (Lemon Water)
लिंबाच्या रसामध्ये सायट्रिट अॅसिड आणि विटामिन सी चं प्रमाण भरपूर असतं आणि त्यामुळे त्वचेवरील डागांसाठी हा उत्कृष्ट उपाय आहे. लिंबाचा रस स्ट्रेच मार्क्स असणाऱ्या भागामध्ये सर्क्युलर मोशनमध्ये लावा. नंतर 10-15 मिनिट्स झाल्यावर गरम पाण्याने धुवा. तुम्हाला हवं असल्यास, यामध्ये तुम्ही 1-2 थेंब ग्लिसरीनदेखील घालू शकता.
अंड्याचा सफेद भाग (Egg White)
अंड्याच्या सफेद भागामध्ये प्रोटीन आणि अमीनो अॅसिड्स भरपूर प्रमाणात असतं. याची आपल्या त्वचेला गरज असते. अंड्याचा हा सफेद भाग नीट फेटून घ्या. मार्क्सवाला भाग नीट साफ करा आणि फेटलेल्या अंड्याचा जाडसर थर त्यावर लावा. त्यासाठी तुम्ही ब्रशचा वापर करू शकता. जेव्हा हे पूर्ण सुकेल तेव्हा थंड पाण्याने धुवा. त्यानंतर त्या भागावर ऑलिव्ह ऑईल अथवा मॉईस्चराईजिंग क्रिम लावा. हे रोज करा. काही आठवड्यातच तुम्हाला याचा चांगला परिणाम दिसू लागेल. एका गोष्टीची नेहमी काळजी घ्या ती म्हणजे तुमची त्वचा नेहमी मॉईस्चराईज्ड आणि हायड्रेटेड राहायला हवी.
वाचा – त्वचेची अशी घ्या बाळंतपणानंतर काळजी
पाणीच पाणी (Drink Plenty Of Water)
तुमची त्वचा हायड्रेट झाली नाही तर कोणत्याही प्रकारचा उपाय त्यावर काम करणार नाही. पाणी तुमच्या त्वचेला हायड्रेट करण्याबरोबरच डिटोक्सिफायदेखील करतं आणि तुमच्या त्वचेची गेलेली इलास्टिसिटीदेखील परत आणतं. त्यामुळे दिवसातून कमीत कमी 8-10 ग्लास पाणी नक्की प्यायला हवं.
स्ट्रेच मार्क्स हटवण्यासाठी तेल (Oils For Stretch Marks)
ऑलिव्ह ऑईल (Olive Oil)
ऑलिव्ह ऑईलमध्ये अँटीऑक्सिडंटचं प्रमाण अधिक असतं आणि याच्या मसाजमुळे शरीरातील रक्तपुरवठा अर्थात रक्तप्रवाह सुधारण्यास मदत होते. हे तेल अगदी हलकं गरम करून त्याने मसाज करावा. नियमित असं केल्याने स्ट्रेच मार्क्स कमी व्हायला लागतील.
कॅस्टर ऑईल (Castor Oil)
कॅस्टर ऑईल हे आपल्या त्वचेसाठी वरदानच आहे आणि त्यामुळे बऱ्याच त्वचेच्या समस्येसाठी याचा वापर करण्यात येतो. स्ट्रेच मार्क्सवाल्या भागावर हलक्या हाताने सर्क्युलर मोशनमध्ये हे तेल लाऊन 5-10 मिनिट्स मसाज करा. त्यानंतर ती जागा स्वच्छ कॉटनच्या कपड्याने बांधून ठेवा. मग गरम पाण्याची बाटली घेऊन कमीत कमी अर्धा तास त्या भागावर शेकत राहा. असं रोज दिवसातून एकदा करा. महिन्याभरात तुमचे स्ट्रेच मार्क्स निघून जातील.
वाचा – स्ट्रेच मार्क्स आणि एंटी एजिंग ट्रिटमेंटसाठी घ्या ‘हॉट कॅंडल वॅक्स मसाज थेरपी’
कोरफड जेल आणि बदामाचे तेल (Aloe Vera Gel & Almond Oil)
एक चमचा एलोवेरा जेल (कोरफड) मध्ये काही थेंब बदामाचे तेल घाला आणि ते नीट मिक्स करून घ्या. आता हे मिश्रण स्ट्रेच मार्क्स असणाऱ्या जागेवर लावा. लक्षात ठेवा की, या मिश्रणाची मात्रा आपल्या स्ट्रेच मार्क्सच्या हिशेबाने तुम्ही वाढवू शकता. असं रोज केल्याने एका महिन्यात तुम्हाला स्ट्रेच मार्क्सपासून सुटका मिळेल.
साखर, लिंबू आणि बदामाचे तेल (Sugar, Lemon & Almond Oil)
एका बाऊलमध्ये एक चमचा साखर, अर्ध्या लिंबाचा रस आणि काही थेंब बदामाचे तेल घालून नीट मिक्स करून घ्या. जर साखर जास्त वाटत असेल तर लिंबांचा रसदेखील वाढवा. आता हे स्ट्रेच मार्क्स असणाऱ्या जागेवर लावा आणि 5 ते 10 मिनिट्स नीट मालिश करून घ्या. त्यानंतर पाण्याने नीट स्वच्छ धुऊन साफ करा.
कोरफड जेल आणि नारळाचे तेल (Aloe Vera Gel & Coconut Oil)
कोरफडच्या पानांमधून जेल जास्त प्रमाणात काढून घ्या. आता हे एका स्टीलच्या पॅनमध्ये घाला आणि त्यामध्ये जेल पूर्ण बुडेल इतकं नारळाचं तेल घाला. आता हे गॅसवर ठेऊन शिजवा पण लक्षात ठेवा की, जेल काळी पडू देऊ नका. त्यानंतर हे एका चाळणीतून चाळून घ्या. तुमचं तेल तयार आहे. हे स्ट्रेचमार्क्सवाल्या जागेवर लावा आणि काही दिवसातच तुम्ही स्ट्रेच मार्क्सपासून सुटका मिळवू शकता.
विटामिन ई ऑईल (Vitamin-E Oil)
यासाठी तुम्ही एका बाऊमध्ये 2 विटामिन ई कॅप्सूलच्या तेलात 1/4 चमचा कॅस्टर ऑईल मिसळा. आता हे मिश्रण तुम्ही प्रभावित भागावर लावा. त्यानंतर एक ते दोन मिनिट्स मसाज करा. असं तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी अथवा सकाळी आंघोळ केल्यावर करा. हे त्वचेमध्ये नीट मिसळेपर्यंत मसाज करा आणि मग तसंच ठेऊन द्या. या उपायाचा परिणाम दीड ते दोन महिन्यांनंतर तुम्हाला दिसून येईल.
शिया बटर आणि एवोकाडो तेल (Shea Butter & Avocado Oil)
दोन लहान चमचे शिया बटर घ्या त्यामध्ये दोन लहान चमचे एवोकाडो तेल मिसळा. आता यामध्ये 10 थेंब विटामिन ई तेल मिसळा. यासाठी तुम्ही बाजारात मिळणाऱ्या विटामिन ई कॅप्सूलचा उपयोगदेखील करू शकता. आता हे मिश्रण गॅसवर तोपर्यंत गरम करा जोपर्यंत हे वितळत नाही. आता गॅस बंद करून हे क्रिम एका बाटलीत घालून थंड होऊ द्या. हे तेल तुम्ही स्ट्रेच मार्क्स असणाऱ्या भागावर दिवसातून दोन वेळा लावा. लवकरच तुम्हाला याचा परिणाम दिसू लागेल.
योग्य डाएटची आवश्यकता (Diet For Stretch Marks)
केवळ वरून उपचार केल्याने स्ट्रेच मार्क्स निघून जातील असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही नक्कीच चुकत आहात. स्ट्रेच मार्क्स घालवण्यासाठी जितकी मेहनत तुम्हाला वरून करावी लागते तेवढीच मेहनत तुम्हाला तुमच्या आहारावर अर्थात डाएटवरही करावी लागते. तुम्ही योग्य आहार घेत नसल्यास, तुमच्या शरीरावरील स्ट्रेच मार्क्स नक्कीच जाणार नाहीत. तुमच्या शरीरात न्यूट्रिएंट्स अर्थात पोषक तत्व भरपूर प्रमाणात असणं गरजेचं आहे. त्यासाठी आपल्या डाएटमध्ये खूप प्रोटीन जसं – मासे, दही, नट्स, विटामिन सी आणि प्रोटीनयुक्त जेवण जसं- दूध व डेअरी प्रॉडक्ट्स, हिरव्या भाज्या आणि विटामिन-E जसं- पालक, पपई, किवी इत्यादि गोष्टींचा नक्की समावेश करा. गरोदर असताना मिनरल्सयुक्त नट्स खात राहा. ज्या पदार्थांमध्ये जिंक जास्त प्रमाणात असेल असे पदार्थ खा. हे सर्व तुमच्या त्वचेला व्यवस्थित टोन करतात.
वाचा – भारतीयांची त्वचा आहे वेगळी म्हणून त्यांनी अशी घ्यावी काळजी
स्ट्रेच मार्क्स हटवण्यासाठी क्रिम (Stretch Marks Removal Cream)
बाजारामध्ये स्ट्रेच मार्क्स घालवण्यासाठी खूप प्रकारचे क्रिम्स उपलब्ध आहेत. पण तुमच्या जवळ वेळ कमी असेल तर तुम्ही स्ट्रेच मार्क्स घालवण्यासाठी स्ट्रेच मार्क्स रिमूवल क्रिम्सचा वापरदेखील करू शकता.
वीशी कम्पलीट अॅक्शन अँटी स्ट्रेच मार्क क्रिम (Vichy Complete Action Anti-Stretch Mark Cream)
वीशीचं प्रत्येक स्किन केअर प्रॉडक्ट लॉरिअल ब्रँड अंतर्गत बवनवलं जातं. हे त्वचेला नीट हाइड्रेटेड करतं आणि योग्य पोषण देतं. तसंच त्वचेवर येणाऱ्या स्ट्रेच मार्क्सना रोखण्यासाठी पूर्णतः सक्षम आहे. याच्या नियमित वापरामुळे स्ट्रेच मार्क्स कमी होतात आणि त्याचा सफेद रंग हळूहळू फेड होतो. ब्रँडनुसार याचे स्त्री रोग संबंधी आणि त्वचा विज्ञान नियंत्रणान्वये परीक्षण करण्यात आलं आहे. हे कोरड्या आणि तेलकट अशा दोन्ही त्वचेसाठी प्रभावी आहे.
बायोटिक कोको बटर क्रिम (Biotique Coco Butter Cream)
बायोटिकचे सर्व उत्पादन हे हर्बल आहेत. यामध्ये केमिकलचं प्रमाण योग्य असतं. बायोटिक कोको बटर क्रिमदेखील यापैकीच एक आहे. हे क्रिम महिनाभर वापरल्यावर तुम्हाला स्ट्रेच मार्क्समध्ये फरक जाणवेल. तसंच दिवस जातील तसे तुमच्या स्ट्रेच मार्क्सचा रंग कमी झालेला तुम्हाला दिसेल. कारण कोको बटर क्रिम याचबरोबर तुमची त्वचा हायड्रेटदेखील करतं.
मदर केअर इट्स युअर बॉडी स्ट्रेच मार्क क्रिम (Mother Care Body Stretch Mark Cream)
मदर केअरप्रमाणेच हे स्ट्रेच मार्क क्रिम बदाम तेल आणि शिया बटरच्या गुणांनी समृद्ध आहे. हे त्वचा अधिक तजेलदार आणि चमकदार बनवतं. या क्रिमच्या नियमित वापरामुळे त्वचेचा सैलपणा आणि गरोदरपणात होणारे स्ट्रेच मार्क्स (pregnancy stretch marks) कमी होतात. हे कोणत्याही प्रकारच्या त्वचेसाठी उपयुक्त असून संवेदनशीर त्वचेसाठीदेखील लाभदायक आहे.
बायो ऑईल (Bio Oil)
तुम्ही बऱ्याच वेळा बायो ऑईलची जाहीरात टीव्ही अथवा वृत्तपत्रात पाहिली असेल. हे ऑईल स्ट्रेच मार्क्स घालवण्यासाठी खूपच उपयुक्त आहे. याचा वापर तुम्ही गरोदरपणानंतर करू शकता. याचं वैशिष्ट्य म्हणजे बायो ऑईल त्वचेमध्ये लगेच शोषून घेतलं जातं आणि याचा डागही कपड्यांवर पडत नाही.
स्ट्रेच मार्क्ससंबंधित प्रश्न – उत्तर / FAQ’s
1. व्यायाम केल्याने स्ट्रेच मार्क्स निघून जातात का?
हो. व्यायाम केल्याने बऱ्याच अंशी स्ट्रेच मार्क्स दूर होण्यासाठी मदत होते. वास्तविक नियमित व्यायामाने तुमच्या मांसपेशी टोन्ड होतात आणि स्ट्रेच मार्क्स आपणहून निघून जातात. त्यासाठी रोज नाही तर आठवड्यातून निदान चार दिवस सिटप, योगा, स्विमिंग इत्यादी व्यायाम करणं आवश्यक आहे.
2. स्ट्रेच मार्क्स घालवण्यासाठी डाॅक्टरांकडून उपचार करून घेतले जाऊ शकतात का?
ज्या लोकांचे स्ट्रेच मार्क्स खूपच जुने आहेत ते बऱ्याचदा सर्जिकल ट्रीटमेंट सारख्या फ्रॅक्शनल ट्रीटमेंटने उपचार करून घेतात. पण याचे वाईट परिणामही भोगावे लागतात. जसं हायपर पिगमेंटेशन आणि स्कारिंग. याप्रमाणे काही अन्य उपचारही लोक करून घेतात. पण आम्ही तुम्हाला घरगुती उपाय अथवा तेल अथवा क्रिमच्या सहाय्याने हे स्ट्रेच मार्क्स कमी करण्याचा सल्ला देऊ.
3. गरोदरपणात होणारे स्ट्रेच मार्क्स कधीच जात नाहीत का?
असं अजिबात नाही. स्ट्रेच मार्क्स मुळापासून कधीच काढून टाकता येत नाही. पण त्यांना कमी करता येतं. तुम्ही थोडी मेहनत केल्यास, स्ट्रेच मार्क्स कमी करू शकता. त्यासाठी आम्ही दिलेले घरगुती उपाय नक्की वापरा, तेल अथवा क्रिम्सचा वापर करा. यामुळे गरोदरपणात आलेले स्ट्रेच मार्क्स कमी होतील.
4. स्ट्रेच मार्क्स आरोग्यासाठी नुकसानदायक आहे?
गरोदर अथवा जाडेपणाच्या कारणाने तुम्ही स्ट्रेच मार्क्सच्या समस्येने तुम्ही ग्रस्त असाल तर हे निशाण जायला हवेत असं तुम्हाला नक्की वाटेल. तर स्ट्रेच मार्क्स तुमच्या त्वचेला कधीही नुकसान पोहचवत नाहीत हे नक्की. हे फक्त दिसायला अतिशय वाईट दिसतात. त्यामुळे तुम्ही आपल्याला हवे तसे कपडे घालू शकत नाही इतकंच. स्ट्रेच मार्क्स हे चिंतेचं कारण नाही कारण याने काहीही नुकसान होत नाही.
5. जाडेपणामुळे आलेले स्ट्रेच मार्क्स तुम्ही बारीक झाल्यास निघून जातात का?
हा एक गैरसमज आहे. जाडेपणामुळे आलेले स्ट्रेच मार्क्स बारीक झाल्यास, निघून जात नाहीत तर कमी होतात. हे घालवण्यासाठी तुम्हाला प्रयत्न तर नक्कीच करावे लागणार. तुम्हाला घरगुती उपाय तरी करावे लागतील नाहीतर बाजारातून क्रिम आणून ते तरी लावावं लागेल. केवळ बारीक झाल्याने ही समस्या जाणार नाही.
फोटो सौजन्य – Shutterstock