ADVERTISEMENT
home / आयुष्य
7 Promises Of Marriage In Marathi

भारतीय परंपरेनुसार लग्नाच्या सप्तपदीचं महत्त्व (Importance Of 7 Promises Of Marriage In Marathi)

भारतीय पारंपरिक लग्न ही सात वचनं दिल्याशिवाय पूर्ण होत नाहीत. अगदी आपल्या चित्रपट, मालिकांमध्येही या सात वचनांचं महत्त्व नेहमीच उदाहरण देण्यात येतं. तसं तर लग्नाचे सगळे पूर्वपरंपरागत रितीभाती आणि लग्न विधी या लग्नाच्या आधी चार दिवस चालू होतात. प्रत्येक जातीधर्माप्रमाणे वेगवेगळ्या पद्धती असतात पण वचनं मात्र सगळ्या ठिकाणी एकच असतात आणि या वचनांना आपल्या भारतीय परंपरेमध्ये खूपच महत्त्व अगदी अनादी काळापासून देण्यात आलं आहे. पती आणि पत्नी अग्नीभोवती सात फेऱ्या मारत सात वचनं घेतात आणि सात जन्मासाठी एकमेकांचे होतात असं म्हटलं जातं. प्रत्येक वचनासह एक फेरी असे सात वचन आणि सात फेरे पूर्ण केल्यानंतर लग्न संपन्न होतं. पण आपण लग्नामध्ये फक्त मजा करायला जातो आणि लग्नाच्या शुभेच्छा देऊन मोकळे होतो. पण नक्की या फेऱ्यांचं, सप्तपदी वचन (Saptpadi Vachan In Marathi) आणि इतर रितीभातींचा काय अर्थ आहे हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

हिंदू धर्मातील लग्नाचा अर्थ

लग्नाच्या रिती

लग्नातील सप्तपदी वचन

ADVERTISEMENT

हिंदू धर्मातील लग्नाचा अर्थ (Hindu Religion Wedding In Marathi)

हिंदू धर्मातील लग्न हे केवळ दोन शरीराचं नाही तर दोन आत्मा एक होत असल्याचं म्हटलं जातं. पवित्र अग्नीसमोर सात फेरे घेत हा लग्नसोहळा पार पाडला जातो. लग्नात दिली जाणारी सात वचनं ही सात जन्मापर्यंत जोडली गेली आहेत असं म्हटलं जातं. त्यामुळेच याला पाणीग्रहण संस्कार असंही म्हटलं जातं. नवऱ्याने सर्व वचन आणि नियम मानल्यावरच पत्नी आपला हात नवऱ्याच्या हाती सोपवते असंही म्हटलं जातं. सर्व विधींनी साध्या लग्नाची योजना करा. लग्नाला विवाह असाही शब्द आहे. वि आणि वाह या दोन शब्दांना जोडून हा शब्द पूर्ण होतो. ज्याचा अर्थ विशेष जबाबदारीची जाणीव यापुढे घेणे. हे एक प्रकारचं वचन आहे, ज्यामध्ये पती आणि पत्नी एकमेकांना देतात आणि हे वचन कधीही तोडलं जाणार नाही यासाठी हे वचन एकमेकांना दिलं जातं. असं असलं तरीही काही वेळा लग्नवाढदिवस शुभेच्छा घेऊन नंतर मात्र पस्थितीनुसार लग्न मोडलीही जातात. पण तरीही लग्नाचं महत्त्व त्यामुळे कमी होत नाही.

लग्नाच्या रिती (Marathi Wedding Rituals)

Importance Of Wedding Vows In Marathi

भारतीय पद्धतीची लग्न ही विविध प्रकारची आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे विविधरंगी असतात. ज्यामुळे लग्नपत्रिकेच्या नमुन्यापासून ते खरेदीपर्यंत यामध्ये अनेक गोष्टी येतात. यामुळेच लग्नातील गमतीजमती कायमस्वरूपी मनामध्ये अधिराज्य करत असतात. प्रत्येक संस्कृतीमध्ये वेगवेगळ्या रितीभाती आहेत. कोणत्याही रितीभातीशिवाय भारतीय लग्न पूर्ण होत नाही.

लग्नापूर्वी करण्याच्या गोष्टी

मेंदी (Mehendi Ceremony)

Mehendi Ceremony

मेंदी लावणं कोणत्या मुलीला आवडत नाही? पण जेव्हा तुमचं लग्न असतं तेव्हा तुमच्या हातावरील मेंदीचा रंग हा अगदी चर्चेचा विषय असतो. नवऱ्याचं प्रेम जास्त असेल तर मेंदीचा रंग जास्त चढतो असं म्हणत नवरीला चिडवण्याचा मैत्रिणींचा उत्साह काही खासच. तर मेंदीमध्ये नवऱ्याचं नाव लिहून त्याला ते शोधून काढायला सांगणं हेदेखील खास. केवळ नवरीच नाही तर तिच्या घरातील सगळ्या महिला, तिच्या मैत्रिणी या सगळ्याच मेंदी काढायला तयार असतात. हा एक सोहळाच असतो. हल्ली तर खास मेंदीचे कार्यक्रम ठेवले जातात. ज्यामध्ये नवरीच्या हातावर मेंदी काढत असताना तिच्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईक खास तिच्यासाठी डान्स करतात. तर मेंदी काढून झाल्यावर तिचाही खास डान्स असतो. याचदिवशी काही ठिकाणी संगीताचा कार्यक्रमही ठेवण्यात येतो.

ADVERTISEMENT

तसेच मेहंदी अधिक गडद कसे करावे याबद्दल देखील वाचा

संगीत (Sangeet Ceremony)

संगीत समारोह हा बऱ्याचदा मेंदीबरोबर करण्यात येतो. तर काही ठिकाणी हा कार्यक्रम वेगळाही आखण्यात येतो. बऱ्याचदा नवरा आणि नवरीच्या घरातील नातेवाईकांना एकत्र करून हा कार्यक्रम करण्यात येतो. यामध्ये दोन्हीकडच्या लोकांची स्पर्धाही लावण्यात येते. त्यामध्ये सर्वात जास्त मजा करता येते. पूर्वी संगीताचा कार्यक्रम हा केवळ महिलांपुरता होता. पण आता याला एक वेगळाच लुक निर्माण झाला आहे. अगदी महाराष्ट्रीय लोकांमध्येही खास मेंदी आणि संगीताचा कार्यक्रम आखण्यात येतो. याची अगदी एक ते दोन आठवडे आधीपासून तयारी चालू होते आणि कोणत्या गाण्यांवर कोणत्या स्टेप्स करायच्या यासाठी खास नृत्यदिग्दर्शक बोलावण्यापासूनही याची तयारी असते.

तसेच मेहंदी कशी काढायची तेही वाचा

हळद (Haldi Ceremony)

Haldi Ceremony

लग्नाच्या आदल्या दिवशी नवरा आणि नवरी दोघांच्याही घरी हळदीचा कार्यक्रम केला जातो. हळद, पाणी आणि तेलाचं मिश्रण करून नवरा आणि नवरीला घरातील सर्व जण हळद लावतात. दोघांनाही थोरामोठ्यांचे आशीर्वाद लाभावेत म्हणून हळदीची रीत करण्यात येते असं म्हटलं जातं. शिवाय हळद लावल्याने नवरा आणि नवरी दोघांचाही चेहरा उजळतो म्हणून हा कार्यक्रम करण्यात येतो असंही म्हटलं जातं. एकदा हळद अंगाला लागली की, नवरा आणि नवरी या दोघांपैकी कोणीही घराबाहेर पडून फिरू शकत नाही. त्यानंतर सतत लग्न होईपर्यंत त्यांच्याबरोबर कोणी ना कोणीतही साथ द्यायला असतं. दोघांनाही नजर लागू नये म्हणून अशा तऱ्हेची काळजी घेण्यात येते असं नेहमी सांगण्यात येतं.

ADVERTISEMENT

वाचा – मैत्रिणीचं लग्न ठरलंय ? मग तुमच्या मनात हे विचार हमखास येणार

बांगड्या (Bangles Ceremony)

महाराष्ट्रीयन, उत्तर भारतीय, पंजाबी समुदायामध्ये बांगड्या भरण्याचा एक खास कार्यक्रम असतो. घरातील सर्व सुवासिनी महिलांना आवडतील त्या काचेच्या बांगड्या भरून घेण्याचा हा एक कार्यक्रम असतो. शिवाय हल्ली चित्रपटांमध्ये ही रीत इतकी प्रसिद्ध करण्यात आली आहे की, इतरही काही घरांमध्ये आता हा खास कार्यक्रम ठेवण्यात येतो. बऱ्याच मुलींना लग्नाच्या वेळी हा बांगड्या भरण्याचा खास कार्यक्रम खूपच आवडतो. महाराष्ट्रीयन समुदायात हिरव्या रंगाच्या बांगड्या भरल्या जातात तर पंजाबी समुदायात विशिष्ट लाल पांढरा चुडा असतो. यावर कलीरे बांधलेल्या असतात. त्यापैकी ज्या मुलीच्या डोक्यावर कलीरे पडतात त्यांचं लग्न लवकरच होणार असं म्हटलं जातं. बंगाली समुदायातही लाल पांढऱ्या काचेच्या वेगळ्या बांगड्या भरल्या जातात.

नवऱ्याचा प्रवेश (Entry Of Groom)

Entry Of Groom

नवऱ्याचा हॉलमध्ये प्रवेशही खास असतो. त्याचं स्वागत वधूपक्ष करतो अर्थात नवरीचे आईवडील त्याला आरती ओवाळून त्याचं स्वागत करतात. काही लग्नामध्ये गेटवर रिबीन बांधलेली असते आणि रिबीन कापल्यावर नवऱ्याकडून त्याच्या होणाऱ्या मेहुण्या या काही पैशांची मागणी करतात. तरत काही ठिकाणी दिव्यावरून हात फिरवून हलक्या गरम हाताचा स्पर्श नवऱ्याच्या गालाला आणि त्याच्या डोक्यावर करण्याची परंपरा आहे. तर काही ठिकाणी नवऱ्याला ओवाळून झाल्यानंतर त्याचं नाक ओढण्याचीही पद्धत आहे.

तसेच मराठी लग्नाच्या गाण्याबद्दल वाचा

ADVERTISEMENT

चप्पल लपवण्याची रित (Joota Chhipai Ceremony)

ही खरं तर उत्तर भारतीय लोकांकडून चालत आलेली रित आहे. पण हल्ली चित्रपटांमध्ये याचं प्रस्थ वाढल्यांमुळे महाराष्ट्रीयन लग्नातही बऱ्याच ठिकाणी ही पद्धत चालू झाली आहे. नवऱ्याच्या चप्पल लपवून ठेऊन नंतर नवरीच्या बहिणी त्याच्याकडून पैसे मिळवतात. पण आता नवऱ्याचे बूट चोरीला जाऊ नयेत म्हणून नवऱ्याकडील लोकही अगदी डोळ्यात तेल घालून पाहरा देतात. या दरम्यान एकमेकांकडील लोकांना जास्तीत जास्त समजून घेता यावं यामुळे ही परंपरा चालू करण्यात आली असावी असं म्हटलं जातं.

पाठवणी (Vidaai Ceremony)

Vidaai Ceremony

लग्नामधील सर्वात भावपूर्ण रीत हीच आहे. आयुष्यभर जपलेल्या आणि वाढवलेल्या मुलीला एका परक्या घरी द्यायची वेळ जवळ येते त्याला पाठवणी म्हणतात. पण यावेळी नवरी आणि तिच्या आई – वडिलांसाठी सर्वच भावनाप्रधान असतं.

गृह प्रवेश (Grihapravesh Ceremony)

नवरी आपल्या घरी येते तेव्हा सासरी तांदळाचा कलश उलटा करून तिला घरामध्ये प्रवेश करायचा असतो. मराठी लोकांमध्ये तर तिला अडवून आधी नाव घ्यायला लावण्याची एक रीत असते. नाव घेणं म्हणजे काही चारोळीमध्ये आपल्या झालेल्या नवऱ्याचं विशेष नाव घ्यायला लागतं. तांदूळ ओलांडून नवरी यासाठी प्रवेश करते कारण हे नव्या जीवनाचं प्रतीक आहे. तांदूळाच्या माध्यमातून नवरी सासरी समृद्धी आणि आनंद घेऊन येते असं म्हटलं जातं. तर नवी नवरी ही लक्ष्मीचं प्रतीक असल्यामुळेही ही रीत करण्यात येते. काही ठिकाणी तर तांदळाऐवजी आलतामध्ये हात आणि पाय बुडवून गृहप्रवेश करण्यात येतो.

वाचा – सुखी वैवाहिक जीवन हवं असेल तर फॉलो करा या सोप्या टिप्स

ADVERTISEMENT

अंगठी शोधणे (Post Wedding Ring Game)

Post Wedding Ring Game

नवविवाहित जोडी दिवसभर बरीच थकलेली असते त्यामुळे त्यांच्यासाठी हा एक मजेदार खेळ ठेवण्यात येतो. जेणेकरून त्यांचा थकवा कमी होईल आणि जर जुळवून आणलेलं लग्न असेल तर ते एकमेकांच्या अधिक जवळ येऊ शकतील. घरी एका भांड्यात दूध आणि पाणी मिक्स करून त्यात अंगठी ठेवण्यात येते. ही अंगठी दोघांनीही शोधून काढायची असते. ज्याला ती पहिल्यांदा मिळेल तो जन्मभर समोरच्या व्यक्तीवर हुकूम चालवणार असं मानलं जातं. त्यामुळे या खेळामध्ये एक वेगळी मजा असते.

लग्नातील सप्तपदी वचन (Seven Pheras Of Wedding In Marathi)

लग्नातील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सात फेरे आणि त्याबरोबर दिली जाणारी वचनं. या गोष्टीला सप्तपदी असं म्हटलं जातं. ही सप्तपदी नवरा आणि नवरीला एकमेकांबरोबर एकत्र करावी लागते. प्रत्येक फेरीनंतर दोघंही एकमेकांना वचन देतात, जे त्यांच्या आयुष्याशी निगडीत असतात. या सात वचनांचा अर्थ दोघांनी आयुष्यभर एकमेकांची साथ देणं हाच आहे. अग्नीला साक्ष ठेऊन भटजीच्या मंत्रजागरात ही वचनं दिली जातात. तसंच यावेळी ध्रुव ताऱ्यालाही साक्ष ठेवण्यात येतं. ध्रुव ताऱ्याची ज्याप्रमाणे अढळ जागा आहे, त्याचप्रमाणे एकमेकांच्या आयुष्यात अढळ जागा राहो यासाठी ध्रुव ताऱ्याची साक्ष घेण्यात येते. सप्तपदीच का? असाही प्रश्न लोकांना पडतो. त्याचं खास कारण आहे की, शरीरामध्ये सात चक्र, सात सूर, इंद्रधनुष्याचे सात रंग, ऋषी सात, धातू सात, सात द्वीप, सात परिक्रमा या सर्व गोष्टी सात असल्यामुळेच सप्तपदीला महत्त्व आहे. भटजींनी सांगितलेली वचनं नवरा आणि नवरी यावेळी पुन्हा म्हणतात. हल्ली नवरा आणि नवरी आपली स्वतःची वचनंही घेतात.

वाचा – तुमचं लग्न ठरलंय, मग नववधूने अशी करावी पूर्वतयारी

पहिले पद, पहिले वचन (First Promise)

First Promise

लग्नाच्या या सप्तपदीचा पहिला फेरा घेताना नवरा आणि नवरी देवाकडून आशीर्वाद मागतात की, त्यांच्या आयुष्यात कधीही धन अथवा खाण्यापिण्याची कमी न पडो. तसंच नवरा यावेळी कल्याण व्हावं आणि नेहमी आनंद देण्याचं वचन देतो तर त्याचवेळी नवरी येणाऱ्या जबाबदाऱ्या पूर्ण करण्याचं वचन देते. दोघेही एकमेकांना योग्य सन्मान देत आयुष्यामध्ये हव्या असलेल्या गोष्टींचं ध्येय पूर्ण करण्यासाठी एकत्र पुढे चालतील अशी प्रार्थनाही यावेळी करतात.

ADVERTISEMENT

दुसरे पद, दुसरं वचन (Second Promise)

दुसऱ्या पदाच्या वेळी युगुल मानसिक, भावनात्मक आणि आध्यात्मक या सर्व पातळ्यांवर एकता हवी असल्याचं वचन देते. एकमेकांवर कायम प्रामाणिकपणाने प्रेम करत राहण्याचं वचन या दुसऱ्या पदामध्ये दोघेही एकमेकांना देतात. दोन शरीर असूनही एक मन असल्याप्रमाणे एकमेकांच्या आयुष्यात मदत करण्याचं वचन देतात. जीवनामध्ये अनेक चढउतार येत असतात. त्या प्रत्येक चढउतारामध्ये एकमेकांची सुरक्षा करण्याचं आणि साथ देण्याचं वचन आणि सर्व काही एकत्र सहन करण्याची ताकद असण्याचं वचन या पदामध्ये दिलं जातं.

तिसरे पद, तिसरं वचन (Third Promise)

Third Promise

संसारीक जीवनामध्ये पुढे जाण्यासाठी तिसरं पाऊल पुढे टाकताना नवरा आणि नवरी देवाकडून धन आणि समृद्धीसाठी प्रार्थना करतात. अध्यात्मिक सेवा पूर्ण करण्यासाठीही आपल्या सक्षम करावं यासाठीदेखील प्रार्थना करतात. शिवाय आपल्या होणाऱ्या संततीची योग्य काळजी घेता येईल, त्यांना योग्य शिक्षण आणि त्यांच्या गरजा योग्य तऱ्हेने पूर्ण करता येतील यासाठी योग्य क्षमता देण्याची आणि त्यासाठी लक्ष ठेवण्याची प्रार्थना यावेळी हे युगुल देवाकडे करतं. तर आयुष्यभरासाठी एकमेकांसाठी शारीरिक आणि अध्यात्मिक प्रामाणिकपणा निभावण्यासाठीही देवाकडे आशीर्वाद मागतात.

चौथं पद, चौथं वचन (Fourth Promise)

भारतीय समाजात कुटुंबांमध्ये एकात्मता दिसून येते. वरीष्ठांचा सन्मान आणि कुटुंबातील सर्व सदस्यांची काळजी करणं हादेखील सामाजिक मूल्याचा एक भाग आहे. आपल्या कुटुंबातील योग्य मूल्य राखून ठेवण्यासाठी आणि कुटुंबामध्ये एकता कायम राखण्यासाठी नवरा आणि नवरी देवाकडून आशीर्वाद मागतात. कुटुंबामध्ये सगळ्यांशी चांगले संबंध प्रस्थापित व्हावेत आणि सर्वांशी मिळून मिसळून राहण्यासाठीदेखील शुभेच्छा आणि आनंद आणण्यासाठी कृतज्ञता व्यक्त करण्यात येते. तसंच नवरी कोणत्याही परिस्थितीत आपल्या नवऱ्यावर कायमस्वरूपी प्रेम करण्याचं वचन देते.

वाचा – लग्नासाठी मंडप डिझाईन्स

ADVERTISEMENT

पाचवं पद, पाचवं वचन (Fifth Promise)

नव्या जीवनाची एकत्र सुरुवात करताना, आपल्या भावी संततीसाठीही आशीर्वाद मागितला जातो. आपल्या पोटी एक छान आणि महान मूल जन्माला यावं जे आपल्या कुटुंबाचं नाव उज्ज्वल करून पुढे व्यवस्थित जबाबदारी सांभाळेल असा आशीर्वाद मागितला जातो. त्याचबरोबर होणाऱ्या मुलाचे उत्कृष्ट आई – वडील होण्याचं वचन एकमेकांना दिलं जातं. तसंच त्यांना योग्य पालन पोषण देऊन मोठं करण्याचंही वचन देण्यात येतं. यावेळी पती आपल्या पत्नीला नेहमीच मित्राचा दर्जा देण्याचं वचन देतो. तर पत्नी आपलं नातं हे नेहमी प्रेमाने बांधून ठेवण्याचं वचन देते.

Fifth Promise

सहावं पद, सहावं वचन (Sixth Promise)

प्रामाणिक आणि चांगलं आयुष्य जगण्यासाठी देवाजवळ पती आणि पत्नी प्रार्थना करतात. तसंच दोघांनाही चांगलं आरोग्य मिळावं यासाठी प्रार्थना केली जाते. आपल्या कुटुंब आणि मुलांप्रती सर्व जबाबदाऱ्या योग्य तऱ्हेने निभावण्यासाठी देवाकडे चांगल्या आरोग्याची मागणी करण्यात येते. नवरा आणि नवरी एकमेकांबरोबर एक संतुलित आणि आनंदमयी जीवन जगण्याची इच्छा यावेळी करतात.

सातवं पद, सातवं वचन (Seventh Promise)

अंतिम वचन, जे हे पवित्र गठबंधन अधिक मजबूत बनवतं. एकमेकांवर प्रेम करण्याचं, विश्वास आणि सहयोग देण्याचं वचन यावेळी देण्यात येतं. दोघेही कायम एकमेकांचे मित्र होतील अशी शपथ घेतात. कोणत्याही परिस्थितीत एकमेकांबरोबर न डगमगता उभं राहण्याचंही वचन यावेळी देण्यात येतं. तसंच आयुष्यात काहीही झालं तरीही एकमेकांबरोबर नेहमी खरं बोलायला हवं ही सत्य परिस्थितीदेखील यावेळी वचनातून समोर येते. आपल्या आयुष्यातील गोडवा आणि प्रेम कायम असंच राहो अशीही यावेळी देवाकडे प्रार्थना करण्यात येते.

प्रत्येक धर्म आणि संस्कृतीमध्ये वेगवेगळी वचनं असतात. पण त्याचा भावार्थ हा एकमेकांप्रती प्रेम, भक्ती, सन्मान आणि प्रामाणिकपणा हाच असतो. या सर्व वचनांचा एकच अर्थ असतो की, आयुष्यात एकमेकांना कायम प्रामाणिकपणे साथ द्यायची आहे. तसंच मृत्यूच्या आधी कोणीही एकमेकांपासून दूर होणार नाही असंही वचन यावेळी देण्यात येतं.

ADVERTISEMENT

फोटो सौजन्य – Instagram

You Might Like These:

वेगवेगळ्या पार्टीसाठी ठेवता येतील हे बेस्ट गेम्स (Fun Party Game Ideas In Marathi)

निरनिराळ्या समारंभांच्या पार्टीज आणि त्यासाठी परफेक्ट मेन्यू (Party Menu Ideas In Marathi)

ADVERTISEMENT
20 May 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT