बिकिनी आणि पँटी या दोन्ही वस्तू महिलांच्या आवडत्या वस्तू आहेत. पण जेव्हा तुम्ही अंडरवेअरची शॉपिंग करायला जाता तेव्हा लाजेमुळे अथवा काही कारणांनी विचार न करता खरेदी करता का? कधीकधी चांगली डिझाईन अथवा कपडा बघून पँटी विकत घेता का? असं असेल तर हा लेख खास तुमच्यासाठी आहे. कारण आता जे मिळेल ते खरेदी केलं याचा जमाना गेला आहे. आजकाल बाजारामध्ये बऱ्याच प्रकारच्या पँटीज आपल्याला बघायला मिळतात. तुम्ही तुमच्या आऊटफिट्सप्रमाणे जशा ब्रा निवडता त्याचप्रमाणे तुम्हाला पँटीही निवडाव्या लागतात. पण काही जणींना याबाबत काहीच कल्पना नसते. अर्थात बाजारात इतके पर्याय उपलब्ध असल्यामुळे निवडणंदेखील तितकंच कठीण असतं. पण आम्ही तुमच्यासाठी एक बेसिक स्टाईल गाईड कोणती पँटी निवडावी यासाठी घेऊन आलो आहोत. तुम्हाला यामुळे नक्कीच पँटी निवडायला मदत होईल.
1. ब्रीफ्स
Shutterstock
हा क्लासिक आणि सर्वात जुना पँटी टाईप आहे. कदाचित यासाठीच या पँटीची ‘ग्रॅनी पँटी’ अशीही ओळख आहे. ही पँटी तुमच्या हिप्सला पूर्ण कव्हरेज देते आणि याचा वेस्टबँड हा कंबरेपर्यंत अथवा तुमच्या बेंबीच्या खालपर्यंत असतो. ही जास्त स्टायलिश नसते पण सर्वात जास्त आरामदायक पँटी आहे. आजकाल यामध्ये दोन स्टाईल्स दिसून येतात :-
I) फ्रेंच अथवा हाय कट ब्रीफ्स – तुम्हाला ब्रीफचं कव्हरेज आवडतं पण तुमच्या मांडीवर लागणारं इलॅस्टिक तुम्हाला आवडत नसेल तर त्यासाठी ही स्टाईल आहे. या ब्रीफ स्टाईलमध्ये साईड कट खूप हाय असतो (हाय कट लेग होल) आणि त्यामुळेच हिप्सचं कव्हरेज थोडं कमी असतं. क्लासिक ब्रीफच्या तुलनेत ही स्टाईल थोडी जास्त सेक्सी असते.
II) कंट्रोल ब्रीफ्स – ही ब्रीफ कंबरेच्या थोडी वरपर्यंत असते जी तुम्हाला सपोर्ट देण्यासह तुमची कंबर थोडी बारीक दाखवण्यासाठी मदतही करते. अर्थातच ही पँटी एखाद्या शेपवेअरप्रमाणे काम करते असंही तुम्ही म्हणू शकता.
कोणत्या कपड्यांसह घालावी :-
हाय वेस्ट जीन्स अथवा ट्राऊझर, इंडियन वेअर, ड्रेस अथवा मासिक पाळीच्या दिवसात हा पँटी टाईप उत्तम आहे. लो वेस्ट आऊटफिटसह ही पँटी कधीही घालू नका.
POPxo Recommends: Zivame Mid Rise Tummy Tucker Panty (Pack Of 2) – Blue Aqua Sky Rs. 599
2. हिपस्टर
Shutterstock
हा पँटी टाईप क्लासिक ब्रीफचा आरामदायी आणि आधुनिक अवतार आहे. ही पँटी ब्रीफप्रमाणेच असते. पण याची वेस्टबँड कंबरेपेक्षा साधारण 2 इंच खाली अर्थात हिप्सवर असते. याचं साईड सेक्शन लो कट असतं. त्यामुळे हे ब्रीफप्रमाणेच फुल कव्हरेज देतं. याचं नाव हिपस्टर अथवा हिप हगर यासाठी आहे कारण ही पँटी एकप्रकारे हिप्सना मिठी मारते अर्थात हग करते.
कोणत्या कपड्यांसह घालावी :-
ही पँटी टाईप हिप्सना पूर्ण तऱ्हेने कव्हर करते. पण लो सेट वेस्टबँडमुळे ही तुम्ही लो राईज जीन्स अथवा पँट्स, इंडियन वेअर, स्कर्ट या कपड्यांसह घालू शकता.
POPxo Recommends: Penny Plus Ultra Soft Floral Lace Front Printed Hipster Brief Rs.325
3. बिकिनी
Shutterstock
बिकिनीची वेस्टबँड कंबरेपेक्षा साधारण तीन इंच खाली हिप्सवर राहतो. तसंच याचं साईड सेक्शन हे खूपच पातळ अर्थात नॅरो असतं. अर्थात हाय कट लेग होल या पँटीला असतं. त्यामुळे याचं कव्हरेज हे ब्रीफच्या तुलनेत खूप कमी असतं. स्ट्रिंग बिकिनीच्या साईड सेक्शनमध्ये कपडा नसतो आणि वेस्टबँड स्ट्रिंग अर्थात दोरीसारखं मटेरियल तुम्हाला दिसतं.
कोणत्या कपड्यांसह घालावी :-
ही पँटी कमी कव्हरेज देते त्यामुळे कपड्यांच्या खाली दिसून येत नाही आणि या कारणामुळे तुम्ही सर्वच कपड्यांवर तुम्ही ही पँटी घालू शकता.
POPxo Recommends: Penny Plus Ultra Soft Solid Black Low Rise Bikini Brief Rs.285
4. तंगास
Shutterstock
हा पँटी टाईप हिप्सला मीडियम कव्हरेज देतं आणि साईड सेक्शन खूपच पातळ असल्यामुळे हाय कट लेग होल असतं.
कोणत्या कपड्यांसह घालावी :-
तुम्ही ही पँटी लो-राइज जीन्स अथवा पँट्स, इंडियन वेअर, स्कर्टबरोबर तुम्ही घालू शकता
POPxo Recommends: Penny Plus Ultra Soft Petal Print Low Rise Bikini Brief-Blue Rs.285
5. थाँग्स
Shutterstock
याची वेस्टबँड कंबरेपेक्षा साधारण 3 इंच खाली असते. याचं साईड सेक्शन हिप बोनवर अथवा त्याच्या वर असते अर्थात यालादेखील हाय कट लेग होल असतं. हा पँटी टाईप V-शेप कपड्यामध्ये असतं जे हिप्सपर्यंत पोहचता पोहचता याची पातळ पट्टी बदलली जाते आणि हिप्सना कव्हरेज मिळत नाही. त्यामुळे या पँटीलाईनमधून कोणत्याही प्रकारची समस्या होत नाही.
कोणत्या कपड्यांसह घालावी :-
यामध्ये कोणत्याही प्रकारचं कव्हरेज नसतं आणि पँटीलाईनमध्ये कोणतीही अडचण येत नाही आणि यासाठी तुम्ही फिटेड स्कर्ट अथवा ड्रेस अथवा फॉर्मल ट्राऊझर अथवा इंडियन वेअरमध्ये घालणं चांगला पर्याय आहे.
POPxo Recommends: Shyle White Animal Paw Print Thong Rs.299
6. G-स्ट्रिंग
Shutterstock
ही सर्वात हॉट आणि सेक्सी पँटी टाइप्स आहे. थाँग्जप्रमाणेच यामध्येही हिप्सचं कोणतंही कव्हरेज नसतं. याचं फ्रंट कव्हरेजदेखील कमी असतं. यामध्ये मागच्या बाजूने अर्थात हिप्सच्या बाजूने एक स्ट्रिंग असते जी सरळ वेस्टबँड स्ट्रिंगशी जोडली जाते. अथवा लहानशा त्रिकोणी आकाराच्या फॅब्रिकबरोबर हे जोडलं जातं.
कोणत्या कपड्यांसह घालावी :-
कपड्यांच्या खाली परफेक्ट लुक देण्यासाठी थाँग, बॉयशॉर्ट्स व्यवस्थित असतात आणि त्यासाठी याची गरज सहसा भासत नाही. पण खास हॉट डेट अथवा हनीमूनासाठी ही परफेक्ट आहे. लक्षात राहू द्या की, पँटीचा आकार हा तुमच्या योग्य आकाराचा असावा.
POPxo Recommends: Shyle Neon Coral with Black Cotton Rich G-String Rs.299
7. बॉयशॉर्ट्स
Shutterstock
ही अतिशय सुपर क्यूट पँटी टाईप आहे. ही स्टाईल पुरुषांच्या बॉक्सर शॉर्ट्सपासून प्रभावित असून शॉर्ट्सप्रमाणे दिसते. ही हिपस्टरसारखी असते पण दोन्हीमध्ये फरक असा आहे की, याचं लेग होल खूप लो असतं अर्थात साईड सेक्शन क्रोचपासून खाली येतं. हे खूपच फंक्शनल, आरामदायक आणि सेक्सी असून तुम्ही कुठेही आणि कधीही घालता येते.
कोणत्या कपड्यांसह घालावी :-
थाँगप्रमाणे ही पँटीदेखील तुम्ही फिट कपड्यांखाली आरामात घालू शकता कारण ही पँटीलाईन घालण्यात कोणतीही समस्या नाही. ही सर्व आऊटफिट्सवर तुम्हाला आरामदायी ठरते. तुमच्या पँटीचा आकार थोडा लांब असेल तर ती पायजमा आणि लाऊंजवेअर म्हणूनही तुम्ही घालू शकता. प्रत्येक मुलीजवळ किमान एक बॉयशॉर्ट तरी असायलाच हवी.
POPxo Recommends: Lavos Bamboo Cotton High Rise Full Coverage Layering shorts – Purple Rs.189
8. मॅटर्निटी पँटी
Shutterstock
आजकाल गरोदर असणाऱ्या बायकांसाठी खास पँटीज असतात ज्या तुम्हाला सपोर्ट देण्याबरोबरच या पँटी स्ट्रेचेबलदेखील असतात आणि या तुमच्या वाढत्या पोटासह अडजस्ट होतात. त्यामुळे दर महिन्याला तुम्हाला पँटी बदलण्याची गरज भासत नाही. ही पँटी अतिशय हायजिनिक असून अँटीमायक्रोबियल विशेषतांसह या पँटी उपलब्ध आहेत.
कोणत्या कपड्यांसह घालावी :-
अर्थातच तुमच्या गरोदरपणात ही पँटी अतिशय आरामदायक आणि परफेक्ट आहे.
POPxo Recommends: Cotton Maternity High-Waist Hipster Panty Rs. 249
हेदेखील वाचा –
प्रत्येक मुलीला माहीत असायलाच हवेत ‘हे’ 10 Bra Rules!
कम्फर्टेबल आणि सेक्सी 5 ब्रा, प्रत्येक महिलेकडे असायलाच हव्या
म्हणून महिलांनी नियमित वापरायला हवे ‘पँटीलायनर’