गाजराचा स्वादिष्ट हलवा सर्वांनाच फार आवडतो. आतापर्यंत तुम्ही गाजर पुलाव, भाजी अथवा सॅलेडमधून नक्कीच खाल्लं असेल. मात्र गाजराचा रस तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे हे तुम्हाला माहीत आहे का ? नियमित गाजराचा रस पिण्याने अनेक आजारांपासून तुमचे संरक्षण होऊ शकते. कारण गाजरात पोषक आणि आरोग्यदायी गुणधर्म दडलेले आहेत.
गाजर हे एक मुबलक पोषकतत्व असलेलं कंदमुळ आहे. गाजरात भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन्स, मिनरल्स अॅंटी ऑक्सिडंट आणि बिटा केरोटिन असतात ज्यामुळे ते तुमचे आरोग्यासाठी फायदेशीर ठरतं. एवढंच नाही तर गाजराचा रस नियमित पिण्यामुळे तुमच्या केसांचे आणि त्वचेचे सौंदर्य देखील वाढतं. जर तुम्हाला तुमचे केस आणि त्वचेचे सौंदर्य खुलवायचं असेल तर गाजराचा रस जरूर प्या. यासाठीच जाणून घ्या गाजराच्या रसाचा तुमच्या त्वचा आणि केसांवर नेमका काय फायदा होतो.
गाजराचा प्या आणि वाढवा तुमच्या केसांचे आरोग्य
- गाजरामध्ये व्हिटॅमिन ए मुबलक प्रमाणात असतं. जे तुमच्या केसांसाठी फायदेशीर ठरतं.
- गाजराच्या रसाच्या नियमित सेवनामुळे तुमच्या केसांची चांगली वाढ होते. गाजरामुळे तुमचे केस लांबसडक होऊ शकतात.
- नियमित गाजर खाण्यामुळे तुमचे केस गळणंदेखील कमी होऊ शकतं. गाजरामधील पोषक घटकांमुळे केस कमकुवत होणं, केसांना फाटे फुटणं, केस कोरडे आणि निस्तेज होणं कमी होतं. ज्यामुळे तुमचे केस कमी गळतात आणि घनदाट दिसतात.
- आजकाल अनेकांना अकाली केस पांढरे होण्याची समस्या सतावत असते. मात्र गाजरातील व्हिटॅमिन्समुळे तुमच्या केसांच्या मुळांमधील रक्ताभिरसण सुधारते. ज्यामुळे केस लवकर पांढरे होत नाहीत.
- गाजरामधील व्हिटॅमीन सी मुळे केस चमकदार आणि मजबूत होतात. ज्यामुळे केसांवर नैसर्गिक चमक येते.
वाचा – गाजर खाण्यामुळे होतील हे अफलातून फायदे
गाजराच्या रसाने असे वाढवा त्वचेचे सौंदर्य
- गाजरामधील अॅंटी ऑक्सिडंट घटकामुळे तुमच्या शरीरातील रक्त शूद्ध होते. याचा परिणाम तुमच्या त्वचेवर दिसू लागतो. नियमित गाजराचा रस पिण्यास तुमच्या त्वचेवर नैसर्गिक ग्लो दिसू लागतो.
- याशिवाय नियमित एक ग्लास गाजराचा रस पिण्याने रक्त शुद्ध झाल्याने तुमच्या चेहऱ्यावरील काळे डाग, चट्टे, चेहऱ्यावरील वांग कमी होतात
- डार्क सर्कल्स अथवा डोळ्याखाली काळी वर्तुळं कमी करण्यासाठी तुम्ही दररोज गाजराचा रस पिऊ शकता.
- गाजरातील बिटा केरोटिन त्वचेसाठी पोषक असून त्यामुळे तुमची त्वचा फ्रेश आणि तजेलदार दिसू लागते.
- गाजराचा रस पिण्याने तुमची त्वचा हायड्रेट राहते. ज्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर अकाली सुरकुत्या पडत नाहीत. चेहऱ्यावर एक नैसर्गिक ओलावा आल्यामुळे त्वचा मऊ आणि मुलायम होते.
- गाजरामध्ये असलेल्या अॅंटी ऑक्सिडंट घटकांमुळे तुमच्या त्वचेचे सनबर्नपासून संरक्षण होते.
गाजराच्या रसाचे आणखी काही आरोग्यदायी फायदे
- गाजरात मुबलक प्रमाणात व्हिटॅमिन ए, बी,सी, डी आणि ई असल्यामुळे ते तुमच्या डोळ्यांच्या आरोग्यासाठीदेखील उत्तम ठरते. नियमित गाजराचा रस पिण्याने तुमची दृष्टी उत्तम राहते.
- गाजराचा रस पिण्याने तुमचे वजनदेखील नियंत्रित राहण्यास मदत होते. ज्यांना वजन कमी करायचे आहे अशा लोकांनी गाजराचा रस पिण्याची सवय अवश्य लावावी.
- गाजराच्या रसामुळे तुमच्या शरीरातील रक्तवाहिन्यांचे कार्य सुधारते. ज्यामुळे रक्तदाबाची समस्या कमी होते आणि तुमचा ह्रदयरोगापासून बचाव होतो.
- गाजराच्या रसात साखरेचे प्रमाण कमी असल्यामुळे मधुमेहींनी नियमित गाजराचा रस घेतल्यास नक्कीच फायदा होऊ शकतो.
- गाजरामध्ये असलेल्या अॅंटी ऑक्सिडंट गुणधर्मामुळे तुमची रोगप्रतिकारशक्ती वाढते. ज्यामुळे तुम्हाला कॅन्सर अथवा इतर विकार होण्याचा धोका कमी होतो. थोडक्यात निरोगी आणि सुंदर दिसण्यासाठी दररोज एक ग्लास गाजराचा रस तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. जर तुम्हाला गाजराचा रस पिण्याचा कंटाळा येत असेल. तर जेवताना गाजराचे कच्चे सॅलेड जरूर खा.
अधिक वाचा –
७ दिवसात २ ते ६ किलो वजन कमी करेल हा डाएट प्लॅन (Lose Weight In 7 Days In Marathi)
Beauty and Health Benefits of Lemon : बहुगुणी लिंबाचे सौंदर्य आणि आरोग्यदायी फायदे
पांढरे केस काळे करण्यासाठी करा हे ‘5’ सोपे आणि नैसर्गिक उपचार
फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम