श्रावण महिना अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. श्रावण महिन्याच्या निमित्ताने अनेक जणांचे उपास सुरू होतील. काहीजण श्रावण महिन्यात एकाच वेळचं जेवतात. त्यामुळे उपवासाच्या रेसिपी सोबत बरेचदा उपवास केल्यावर आधार असतो तो चहा किंवा कॉफीचा. पण उपवासाच्या दिवसात चहा किंवा कॉफी पिणं योग्य की अयोग्य. चला जाणून घेऊया.
उपवासाचे नियम काय म्हणतात?
उपवासात चहा किंवा कॉफी पिणं योग्य की अयोग्य याचं उत्तर बरेचदा लोकं त्यांच्या आवडीनुसार देतात. कोणी म्हणतं चहा प्यायला तर चालतो तर कोणी म्हणतं दोन्हीचंही सेवन करू शकतो. खरंतर यामागे उपावासाच्या नियमांमध्ये कोणताही नियम घालण्यात आलेला नाही. खास अशी काही उपवास रेसिपी ही नाही. प्रत्येक जण व्यक्तीगत आवडीनुसार चहा किंवा कॉफीचं सेवन उपवासात करतात. वेदशास्त्रातही याबाबत कोणताही उल्लेख आढळत नाही.
चहा-कॉफीचं सेवन उपवासात कधी सुरू झालं?
उपवासाचे नियम हे माणसांनीच बनवले आहेत. उपवासातील फराळाची परंपरा ही गेल्या अनेक पिढ्या सुरू आहे. यामध्ये सांगण्यात आलं आहे की, काय खावं आणि काय नाही. वेगवेगळ्या ठिकाणी तिथल्या वैशिष्ट्यानुसार जसे पूजेच विधी वेगवेगळे आहेत तसेच उपवासातील फराळाचेही. काहीजण उपवासाच्या दिवसात फराळ न करता चहा किंवा कॉफीचं सेवनही करतात. आजकाल तर हर्बल टीसुद्धा उपवासाच्या दिवसात घेतली जाते. पण हे योग्य आहे का?
रिकाम्या पोटी चहा-कॉफी घेणं
खरंतर चहा-कॉफीसुद्धा उपवासाच्या दिवसात घेणं थांबवलं पाहिजे. कारण रिकाम्या पोटी चहा-कॉफीचं सेवन केल्याने फ्रि रॅडीकल्स आणि कॅन्सरसारख्या गंभीर आजारांसोबतच लवकर वृद्धत्वालाही आमंत्रण दिलं जातं. या टाळण्यासाठी उपावासाच्या दिवसात चहा-कॉफी घेणं हे टाळलंच पाहिजे. दुसरं म्हणजे यामुळे एसिडीटीची समस्याही जाणवू शकते. बऱ्याच जणांना खासकरून उपवासाच्या दिवसात एसिडीटीचा त्रास होतो. त्याच मुख्य कारण म्हणजे चहा-कॉफीचं सेवन आहे. त्यामुळे जर तुम्हाला चहाच्या तल्लफ आल्यास उपवासात साध्या चहाऐवजी हर्बल टीला पसंती द्यावी. अगदीच हर्बल टी आवडत नसल्यास चहा-कॉफी घ्या पण दुधाशिवाय.
चहा-कॉफीऐवजी घ्या ‘हे’
Shutterstock
तुम्ही चहा-कॉफीऐवजी उपवासाच्या दिवसात दूध आणि फलाहारावर भर दिल्यास तुम्हाला एसिडीटीचा त्रास नक्कीच जाणवणार नाही व तुमचा उपवासाचा दिवसही नक्कीच चांगला जाईल. तसंच तुम्ही ज्यूस, लिंबू सरबत किंवा बटाटा, साबुदाणा खीर असे पर्यायही निवडू शकता. उपवासाच्या दिवसातही भरपूर पाणी प्यायला विसरू नका. त्यामुळे पुढच्या वेळी म्हणजेच येत्या श्रावणात उपवास करा पण चहा-कॉफी नक्की टाळा. लक्षात ठेवा व्रत वैकल्य जितकी आवश्यक आहेत तितकंच महत्त्वाचं आहे तुमचं आरोग्य.
वाचा – Benefits Of Coffee In Marathi
हेही वाचा –
आषाढी एकादशीच्या उपवासाला खा हे ‘आरोग्यदायी पदार्थ’
महाशिवरात्रीनिमित्त ट्राय करा उपवासाच्या ‘या’ पौष्टिक रेसिपी