ADVERTISEMENT
home / आरोग्य
प्रेगन्सी टेस्टबाबत या गोष्टी प्रत्येकीला माहीत असायलाच हव्या

प्रेगन्सी टेस्टबाबत या गोष्टी प्रत्येकीला माहीत असायलाच हव्या

आई होणं हे अनेक महिलांचं स्वप्न असतं. गरोदरपण आणि डिलिव्हरी ही एक कठीण पण तरिही हवीहवीशी वाटणारी प्रकिया असते. पूर्वीच्या काळी घरातील वडिलधाऱ्या महिला याबाबत मार्गदर्शन करत असत. त्यांचा अंदाज नेहमी अचूक असायचा. त्यानंतर यासाठी वैद्य अथवा डॉक्टरांकडे जाऊन तपासणी केली जायची. आजकाल मात्र प्रेगन्सी टेस्टने तुम्ही  तुम्ही गरोदर आहात का नाही हे पटकन आणि घरच्या घरी चेक करू शकता. मात्र त्यासाठी नेमक्या कोणत्या टेस्ट करायच्या आणि त्या कधी करायच्या हे प्रत्येकीला माहीत असायला हवं. 

प्रेगन्सी टेस्टबाबत या गोष्टी जरूर जाणून घ्या –

लग्नानंतर एका ठराविक काळानंतर प्रत्येकीला आई व्हावं असं वाटत असतं. मात्र त्यासाठी या काही गोष्टी तुम्हाला आधीपासूनच माहीत असतील तर पुढे काळजी करण्याची गरज वाटणार नाही.

मासिक पाळी चुकल्यानंतर एक आठवड्याने टेस्ट करा

लग्नानंतर एक काळ असा येतो जेव्हा प्रत्येक स्त्री त्या गोड क्षणाची वाट पाहू लागते. अशा वेळी मासिक पाळी चुकल्यावर कमीत कमी एक आठवडाभर वाट पहा. मात्र बऱ्याचजणी  लगेच टेस्ट करतात. ज्यामुळे त्यांना अचूक रिझल्ट मिळत नाही. वास्तविक गरोदर महिलेच्या युरिनमध्ये HCG हॉर्मोन आढळतं. ज्यामुळे युरिन टेस्टमुळे ती गरोदर आहे हे समजू शकतं. मात्र हे हॉर्मोन तेव्हाच आढळतं जेव्हा गर्भधारणा व्यवस्थित झालेली असते. यासाठीच या काळाची वाट पाहण्यासाठी एक आठवड्याचा कालावधी द्या.

ADVERTISEMENT

shutterstock

सकाळी युरिन टेस्ट करा

प्रेगन्सी टेस्ट करताना सर्वात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा की सकाळीच युरिन टेस्ट करा. कारण सकाळी युरिनमध्ये HCG चं प्रमाण सर्वाधिक असतं. संध्याकाळी कदाचित तुम्हाला चुकीचा रिझल्ट मिळू शकतो.

प्रेगन्सी टेस्ट किट योग्य पद्धतीने हाताळा

प्रेगन्सी टेस्ट करण्यापूर्वी ती कशी करायची यासाठी त्या किटवर दिलेली माहिती नीट वाचा. शिवाय तुम्ही या कंटेनरमध्ये युरिन सॅंपल घेणार आहात ते स्वच्छ आणि निजंतूक असायसा हवं. असं न केल्यास तुम्हाला चुकीचा निर्णय मिळण्याची दाट शक्यता असते.

युरिन टेस्ट अचूक परिणाम देईलच असे नाही

याचा अर्थ असा की प्रत्येकवेळी तुम्हाला युरिन टेस्ट अचूक रिझल्ट दाखवेल असं नाही. कधी कधी पॉझिटिव्ह असून निगेटिव्ह आणि निगेटिव्ह असून पॉझिटिव्ह निर्णय मिळू शकतो. यासाठी निराश होऊ नका जर तुम्ही गरोदर आहात असं तुम्हाला वाटत असेल तर खात्री करण्यासाठी ब्लड टेस्टदेखील करा. 

ADVERTISEMENT

किटची एक्सपायरी डेट तपासा

प्रेगन्सी किटवर त्याची एक्सपायरी डेट दिलेली असते. तपासणी करण्यापूर्वी तुमच्या किटवरील डेट जरूर तपासा. कारण याचा परिणाम तुमच्या प्रेगन्सी टेस्टवर होऊ शकतो. 

फोटोसौजन्य – शटरस्टॉक

हे ही वाचा –

खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop’s मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.

ADVERTISEMENT

अधिक वाचा –

प्रेगन्सीदरम्यान Gynaecologist ची निवड करताना

प्रेगन्सीनंतर पुन्हा सुडौल दिसण्यासाठी करा ‘हे’ उपाय (How To Lose Weight After Pregnancy In Marathi)

प्रेगन्सी स्ट्रेच मार्क्सपासून ते चेहऱ्यावरील सुरकुत्या दूर करण्यापर्यंत उपयुक्त आहे बायो ऑईल

ADVERTISEMENT
17 Oct 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT