नवरात्र म्हणजे सगळीकडे रंगाची उधळण आणि आनंदी वातावरण. नवरात्रीनंतर दहाव्या दिवशी विजयादशमी साजरी केली जाते. विजयादशमी अर्थात दसऱ्याला सोनं लुटण्याची आणि सोनं वाटण्याची पद्धत आहे. ज्यामुळे दसऱ्याला सोन्याचा सण असंही म्हटलं जातं. दसऱ्याला सोने खरेदीचा शुभ मुहुर्त असतो असं म्हणतात. ज्यामुळे दसऱ्याला सोनं खरेदी मोठ्या प्रमाणावर केली जाते. खरंतर आजकालच्या सोन्याचे भाव गगनाला भिडले आहेत असं म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही. पण तरिही प्रत्येकजण आपल्या खिषाला परवडेल इतपत सोनं दसऱ्याला नक्कीच खरेदी करतो. सोनं हे लक्ष्मीचं प्रतिक असल्याने ते समृद्धीचं एक लक्षण मानलं जातं. यासाठीच सोनं खरेदी करण्यापूर्वी नेमकी काय काळजी घ्यावी हे जाणून घेणं फार गरजेचं आहे.
सोनं खरेदी करण्यापूर्वी सोन्याचा दर पाहा
सोन्याचे दर हे नेहमी बदलत असतात. ज्यामुळे जर तुम्ही सोने खरेदीचा विचार करत असाल तर त्याआधी सोन्याचा आजचा दर अवश्य जाणून घ्या. वृत्तपत्र अथवा बिझनेस न्यूज चॅनेलवर याची माहिती तुम्हाला मिळू शकते.
किती कॅरेटचे दागिने खरेदी करायचे आहेत हे आधीच ठरवा
सोन्याचे दागिने सामान्यतः 24 कॅरेट, 22 कॅरेट, 18 कॅरेटमध्ये तयार केले जातात. बऱ्याचदा सोनार तुम्हाला दागिने 24 कॅरेट म्हणजेच शुद्ध सोन्यात दागिने तयार केलेले आहेत असं सांगतात. मात्र 24 कॅरेट सोनं हे शुद्ध असतं. अशा सोन्यापासून दागिने तयार करता येत नाहीत. शुद्ध सोन्यात तयार केलेले दागिने लवकर तुटू शकतात. कारण हे सोनं फारच मऊ असतं. यासाठीच सोन्यामध्ये काही प्रमाणात इतर धातू मिसळण्यात येतात. ज्यावरून ते सोनं किती कॅरेटचं आहे हे ठरवलं जातं. प्रत्येक सोनाराकडे सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी लागणारं मशिन असतं. त्यामुळे सोनं खरेदी करण्यापूर्वी त्याची शुद्धता जरूर तपासा.
सोन्याची गुणवत्ता कशी तपासून पाहाल
खरेदी केलेले दागिने हॉलमार्कचे आहेत का हे नीट तपासून पाहा. हॉलमार्क मुळे सोन्याची शुद्धता आणि त्याची गुणवत्ता प्रमाणित होते. दागिन्यांवरील दिलेल्या हॉलमार्कवरील नंबरवरून तुम्ही त्या सोन्याची गुणवत्ता तपासून पाहू शकता. काही ठिकाणी हॉलमार्क दागिन्यांमध्येदखील फसवणूक केली जाते. सोनार स्वतःच हॉलमार्क तयार करतात. यासाठी तुम्ही विकत घेतलेल्या दागिन्यांवर भारतीय मानक ब्युरोचं त्रिकोणी चिन्ह आहे का ते अवश्य तपासा. शिवाय दागिन्यांवर हॉलमार्क चिन्हासह त्या सोन्याची शुद्धतादेखील लिहीलेली असते. तो दागिना कोणत्या वर्षी तयार केलेला आहे आणि उत्पादकाचा लोगो त्यावर असतो. अशी बेसिक माहिती पाहून तुम्ही तुम्ही खरेदी केलेल्या सोन्याची शुद्धता तपासू शकता.
सोन्याचे दागिने खरेदी करण्यापूर्वी मेकिंग चार्जस पाहा
सोनं दोन प्रकारे खरेदी केलं जातं. एक तर सोन्याचं नाणं, वळी अथवा पट्टी या स्वरूपात किंवा सोन्याचे दागिने तयार अथवा बनवून घेणं. जर तुम्ही या दसऱ्याला सोन्याचे दागिने खरेदी करणार असाल तर त्यापूर्वी त्या सोनाराचे मेकिंग चार्जेस जरूर जाणून घ्या. कारण सोनं खरेदीचं बजेट त्यामुळे नक्कीच वाढू शकतं.
दुकानदाराकडून खरेदीचे पक्के बिल घ्या
बऱ्याचदा मेकिंग चार्जेस आणि जीएसटीचा खर्च वाचवण्यासाठी ग्राहक छोट्या पेढीवरील सोनाराकडून दागिने खरेदी करतात. ज्यामुळे ग्राहकांची फसवणूक होण्याची शक्यता अधिक असते. यासाठी सोनं खरेदी केल्यावर सोनाराकडून पक्के बिल घ्या. ज्यामध्ये सोन्याचे वजन, कॅरेट, आजचा दर, मेकिंग चार्जेस, शुद्धता आणि जीएसटीची नोंद केलेली असेल.
विश्वासू आणि घराजवळील सोनाराचे दुकान निवडा
सोने खरेदीमध्ये विक्रेते मोठ्या प्रमाणावर फसवणूक करत असतात. यासाठीच सोनं नेहमी तुमच्या घराजवळील आणि विश्वासू सोनाराकडूनच विकत घ्या. छोट्या सोनाराकडून खरेदी करण्यापेक्षा मोठ्या ब्रॅंडकडून खरेदी केल्यास तुम्हाला योग्य बिल मिळू शकतं. ज्यामुळे तुमची फसवणूक होण्याची शक्यता कमी असते.
सोन्यात गुंतवणूक करताना
जर तुम्हाला भविष्यासाठी गुंतवणूक म्हणून सोनं खरेदी करायचं असेल तर काही गोष्टींचा आधीच विचार करा. लग्नकार्यासाठी बऱ्याचदा सोनं खरेदी केलं जातं. जर तुमच्या घरी एक ते दोन वर्षात मंगलकार्य घडण्याची शक्यता असेल. तर नंतर खर्च नको म्हणून आधीच सोनं खरेदी केलं जातं. अशावेळी सोनं खरेदी करताना ते नाणं अथवा वळीच्या स्वरूपात खरेदी करा. ज्यामुळे नंतर ते वितळवून तुम्ही त्यापासून दागिने तयार करू शकता. कारण दागिन्यांची डिझाईन नेहमी बदलत असते. जर तुम्हाला लग्नकार्यात ट्रेंडी दागिने हवे असतील तर सोनं नाण्यांच्या स्वरूपात घेतलं तर अधिक फायदा होऊ शकतो. कारण तयार जुने दागिने वितळवून त्यापासून पुन्हा दागिने बनवताना त्यामध्ये नुकसान अधिक होण्याची शक्यता असते.
ऑनलाईन सोनं खरेदी करताना
ऑनलाईन सोन्याची खरेदीमध्ये दोन प्रकार आहेत. गुंतवणूक म्हणून ई-गोल्ड घेणं किंवा थेट ऑनलाईन वेबसाईट्सवरून दागिने खरेदी करणं. दुसऱ्या प्रकारात जेव्हा तुम्ही दागिने खरेदी करता तेव्हा त्याचं वजन आणि इतर डिटेल्सची नोंद करा आणि डेलीव्हरीच्या वेळी त्या गोष्टी जरूर तपासून पाहा. शिवाय दागिन्यांसोबत हॉलमार्क आणि मेकिंग सर्टिफिकेट , त्याचे कॅरेट, वजन तपासून नक्की पाहा.
फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम
हे ही वाचा –
खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop’s मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.
अधिक वाचा –
नागपूरात लग्नाची शॉपिंग करताय मग ‘या’ ठिकाणांना जरूर भेट द्या
नवरात्रीमध्ये ‘या’ गोष्टी खरेदी करणं मानलं जातं शुभ
कुलाबा कॉसवेवर गेलात तर हमखास करा या वस्तूंची खरेदी