कोबी आणि फ्लॉवरची भाजी खूप जणांना आवडत नाही. याचे कारण त्याचा वास. डबा उघडल्या उघडल्या कोबी आणि फ्लॉवरचा येणारा वास अनेकांच्या डोक्यात जातो. या भाजीमध्ये अनेक पोषकतत्वे असतात पण केवळ येणाऱ्या विचित्र वासामुळे खूप जण ही भाजी खाणे टाळतात. तुमच्या घरातील लहान मुलं देखील ही भाजी खाताना नाक मुरडत असतील तर आजच्या टीप्स तुमच्यासाठी फारच महत्वाच्या आहेत. आज आपण कोबी आणि फ्लॉवरमधून येणारा दर्प कसा कमी करावा हे जाणून घेणार आहोत. मग करुया सुरुवात
#Fishlover जाणून घ्या फिश फ्राय करण्याची योग्य पद्धत
असा घालवा कोबीचा वास
shutterstock
कोबी चिरल्यानंतरच एक तीव्र दर्प त्यातून येत असतो. अनेकांचा तोच वास आवडत नाही. कोबी चिरल्यानंतर त्यातून हायड्रोजन सल्फाईड गॅस निघतो आणि त्यामुळेच ती दुर्गंधी येते.
- कोबीची भाजी करताना तुम्ही त्यात एखाद ब्रेडचा तुकडा घालून ती भाजी शिजवून घ्या. त्यामुळे कोबीचा वास कमी होतो.
- कोबी चिरल्यानंतर तुम्ही ती भाजी लगेचच करणार असाल तर तुम्ही त्यामध्ये लिंबूसुद्धा पिळू शकता. लिंबाच्या रसामुळे कोबीचा वास कमी होतो.
- जर तुम्ही कोबी जास्त प्रमाणात शिजवला तरी सुद्धा त्यातून दर्प येऊ शकतो. अनेकदा जास्त शिजलेली भाजी डब्यातून नेली तर त्यातून खूपच वास येतो.
- जर तुम्हाला कोबीच्या भाजीला खमंग फोडणी देता आली तर फारच उत्तम फोडणीत तुम्ही कडीपत्ता, आलं-लसूण याचा हमखास वापर करा म्हणजे कोबीच्या भाजीचा दर्प कमी होईल.
- अनेकदा कोबी खूप वेळ शिजवल्यामुळे तिचा रंग निघून जातो. अशावेळी रंग टिकून राहावा म्हणून तुम्ही त्यात साधारण छोटा चमचा व्हाईट व्हिनेगर टाकावे. कोबीचा रंग फ्रेश दिसेल.
- अॅल्युमिनिअमच्या भांड्यात कधीही कोबीची भाजी बनवू नका. कारण अॅल्युमिनिअम आणि कोबी यांच्यामध्ये रासायनिक प्रक्रिया होते आणि भाजीचा वास अधिकच घाण येऊ लागतो.
- कोबीची भाजी नेहमी ओपन पॅनमध्ये करा म्हणजे त्याची दुर्गंधी जाण्यास मदत होईल.
सकाळच्या घाईत झटपट बनवा टेस्टी नाश्ता, जाणून घ्या रेसिपीज
फ्लॉवरच्या भाजीचा असा घालवा वास
shutterstock
काहीही केले तरी फ्लॉवरची भाजी न खाणारेही काही लोकं आहेत. त्यांना फ्लॉवरच्या वासामुळे फ्लॉवर आवडत नाही. फ्लॉवरमध्ये सल्फरचे घटक असल्यामुळे त्याला घाणेरडा वास येतो. कुसलेल्या अन्नासारखा याचा वास येतो.
- फ्लॉवरचा येणारा हा वास तुम्हाला पूर्णपणे घालवता येणार नाही. पण तुम्हाला तो कमी करता येऊ शकतो.
- फ्लॉवरची भाजी वासासोबत न आवडण्याचे कारण म्हणजे या भाजीतल्या अळ्या. अनेकांना ही भाजी साफ करायला आवडत नाही कारण यात फारच अळ्या असतात.
- फ्लॉवरचे तुरे काढून घेतल्यानंतर तुम्ही कोमट पाण्यात हे तुरे बुडवून ठेवा. जर त्यात अळ्या असतील तर ते पटकन निघून जातात. शिवाय या भाजीचा थोडा वास कमी करण्यासाठी तुम्ही त्यामध्ये चमचाभर व्हिनेगर घातले तरी चालू शकेल.
- फ्लॉवरच्या बाबतीतही अगदी तसेच आहे. फ्लॉवर जास्त शिजवला की, त्यावर रासायिक प्रक्रिया होते आणि त्याचा जास्त वास येऊ लागतो.
- फ्लॉवरची रस्सा भाजी करताना त्यात एखादा ब्रेडचा तुकडा घालावा. दर्प कमी होतो.
- फ्लॉवरची भाजी मुळमुळीत चांगली लागत नाही. तिला छान खरपूस,खमंग फोडणी दिली की, त्याची चव वाढते आणि आपोआपच वास कमी होतो.
- शक्यतो फ्लॉवरची भाजी थपथपीत करु नये तर ती सुकी करावी त्यामुळे वास कमी येतो.
आता अशा पद्धतीने कोबी आणि फ्लॉवरची भाजी करा म्हणजे तुम्ही केलेल्या भाजीला वास येणार नाही.
वाचा – Shepu Bhaji Benefits In Marathi
खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop’s मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.