केळं हे एक स्वस्त आणि आरोग्यासाठी मस्त फळ आहे. दररोज केळी खाण्याचे फायदे आरोग्यावर नक्कीच चांगले होतात. केळीमध्ये पोटॅशियम, व्हिटॅमिन B6, फायबर्स, कार्बोहायड्रेट आणि व्हिटॅमिन सी असतं. केळ्याची चव गोडसर आंबट असते ज्यामुळे लहान मुलांनाही केळी खूप आवडतात. शिवाय केळं सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारं फळ आहे. केळीमध्ये पुरेसे पोषकतत्त्व असल्यामुळे तुमच्या शरीरावर त्याचे चांगले परिणाम पटकन दिसून येतात. केळीमध्ये पोटॅशिअम असल्यामुळे उपाशीपोटी एक केळं खाल्यास तुम्हाला त्वरीत एनर्जी मिळते. केळं खाण्याचा शरीरावर तर चांगला परिणाम होतोच शिवाय त्यामुळे त्वचेचंही आरोग्य सुधारतं. यासाठीच जाणून घ्या दररोज केळी खाण्याचे फायदे (Health Benefits Of Banana In Marathi) नेमके काय काय आहेत.
केळीमधील पोषक घटक – Nutrients In Banana
केळी हे जगभरातील एक लोकप्रिय फळ आहे. शिवाय त्यामध्ये भरपूर पोषक घटक असतात. यासाठीच जाणून घ्या एका मध्यम आकाराच्या केळीमध्ये किती पोषक तत्त्वं असतात.
केळीमधील पोषक घटक पुढीलप्रमाणे –
- पोटॅशिअम – ९ टक्के
- व्हिटॅमिन बी 6 – ३३ टक्के
- व्हिटॅमिन सी – ११ टक्के
- मॅग्नेशिअम – ८ टक्के
- तांबे – १० टक्के
- मॅगनिज – १४ टक्के
- कार्ब्स – २४ ग्रॅम
- फायबर्स – ३.१ ग्रॅम
- प्रोटिन्स – १.३ ग्रॅम
- फॅट्स – ०.४ ग्रॅम
- कॅलरिज – १०५ कॅलरिज
केळी खाण्याचे फायदे | Banana Benefits In Marathi
निरोगी राहण्यासाठी दररोज एक केळं खा असा सल्ला तज्ञ्ज देतात कारण केळी खाण्याचे फायदे (Banana Health Benefits In Marathi) आरोग्यावर अनेक प्रकारे होत असतात.
1. भरपूर फायबर्स असतात (High Fibre Content)
केळ्यामध्ये भरपूर फायबर्स असतात. त्यात विघटनशील आणि अविघटनशील असे दोन्ही प्रकार असतात. विघटनशील फायबर्समुळे तुमचे हळूहळू पचन होते आणि तुम्हाला बराच वेळ पोट भरलेले आहे असे वाटते. सकाळी नास्त्यामध्ये केळं खाण्याचा सल्ला दिला जातो. कारण जर सकाळी तुम्ही एक केळं खाल्लं आणि दिवसभर तुम्हाला काही खाण्याची संधी मिळाली नाही तरी तुम्हाला त्रास होत नाही.
2. ह्रदयाचे आरोग्य सुधारते (Improves Heart Health)
केळ्यामध्ये भरपूर प्रमाणात पोटॅशियम असते. त्यामुळे केळं खाण्यामुळे शरीराला पुरेसे मिनरल्स मिळतात. केळ्यातील या पोषक घटकामुळे तुमचा रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत होते. ह्रदयाचे कार्य सुरळीत सुरू राहते. जर तुम्हाला ह्रदयसमस्या असतील तर आहारात केळ्याचा वापर करा. दररोज सकाळी अथवा सायंकाळी एक केळं खाण्यामुळे तुमच्या ह्रदयाच्या कार्यावर याचा चांगला परिणाम दिसून येऊ शकतो.
3. पचनकार्य सुधारते (Improves Digestion)
आयुर्वेदात सांगितल्याप्रमाणे केळ्याची चव ही गोडसर आंबट आहे. गोडामुळे तुमचे पोट बराच काळ भरलेले राहते तर आंबट चवीमुळे तुमचे पचन चांगले होते. केळं हे एक अप्रतिम फळ आहे. कारण यामध्ये कार्बोहायड्रेट तर आहेतच शिवाय पुरेश्या प्रमाणात साखरही आहे. ज्यामुळे एक पिकलेलं केळं खाण्यामुळे तुमचं पोट बराच वेळ भरलेलं राहतं. सहाजिकच यामुळे तुम्हाला वारंवार अपथ्यकारक पदार्थ खाण्याची इच्छा होत नाही. शिवाय केळ्यामधील फायबर्समुळे तुमचे पचनकार्य सुरळीत सुरू राहते. ज्याचा परिणाम तुमच्या आरोग्यावर दिसून येतो.
4. वजन कमी होऊ शकतं (May Aid Weight Loss )
केळ्यामुळे तुमचे वजन भरपूर वाढतं अशी एक समज आहे. मात्र जर तुम्ही केळी अती प्रमाणात खाल्ली तरच तुमचे वजन वाढतं. जर तुम्ही कृश प्रकृतीचे असाल तर वजन वाढवण्यासाठी तुम्ही केळं खाण्यास काहीच हरकत नाही. शिवाय जर तुम्हाला तुमचे वजन कमी करायचे असेल तर दररोज एक केळं खाण्यासही काहीच हरकत नाही. एकतर केळं खाण्यामुळे तु्म्हाला सतत भुक लागणार नाही आणि खालेल्या अन्नाचे पचनही व्यवस्थित होईल. ज्यामुळे तुमचे वजन नियंत्रणात राहण्यास मदत होईल.
5. किडनीचे आरोग्य सुधारते (Improve Kidney Health)
केळ्यामधील पोषक तत्त्वांचा तुमच्या संपूर्ण आरोग्यावर चांगला परिणाम होतो. केळ्यातील पोटॅशिअम तुमच्या रक्तदाबावर नियंत्रण ठेवते. ज्याचा चांगला परिणाम तुमच्या किडनीच्या कार्यावर होतो. केळ्यात पोटॅशिअम हे विघटनशील असल्यामुळे तुमची किडनी अथवा मूत्रपिंड यामुळे निरोगी राहण्यास मदत होते. ज्यांना मूत्रपिंडाचे विकार आहेत त्यांच्यावर केळं खाण्याचा प्रयोग केल्यामुळे चांगला फरक जाणवल्याचे अनेक संशोधनात आढळून आलेले आहे. त्यामुळे मूत्रपिंडाचे कार्य सुरळीत सुरू राहण्यासाठी दररोज एक केळं खाणं नक्कीच फायद्याचं ठरू शकतं.
6. ताणतणाव कमी होतो (Reduces Stress)
दररोज केळं खाण्यामुळे तुम्हाला डिप्रेशन अथवा नैराश्यापासून मुक्ती मिळू शकते. आजकाल धावपळीचे जग, कामाची चिंता, नातेसंबधातील दूरावा यामुळे अनेक लोक नैराश्याच्या अधीन जाताना दिसतात. मात्र आहारात काहीसे बदल करून तुम्ही तुमच्या चिंता, काळजी नियंत्रणात ठेवू शकता. केळ्यात भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन बी 6 असतं. ज्याचा परिणाम तुमच्या आरोग्यावर होतो. तुम्हाला शांत झोप लागते आणि मन शांत, निवांत होते. त्यामुळे काही काळ तुम्हाला या चिंता आणि काळजीपासून मुक्तता मिळते.
7. त्वचेसाठी उत्तम ठरते (Good For Your Skin)
एका मध्यम आकाराच्या केळ्यामधून तुम्हाला कमीत कमी १४ टक्के मॅगनिज मिळत असते. ज्यामुळे तुमची दैनंदिन मॅगनिजची गरज एक केळं खाण्याने भरून काढली जाते. मॅगनिजमुळे तुमच्या शरीराला कोजेजीनची निर्मिती करणं सोपं जातं. ज्याचा चांगला परिणाम तुमच्या त्वचेवर होतो. त्वचेचं रक्षण करण्यासाठी आणि त्वचापेशींचे फ्री रेडिकल्सपासून होणारे नुकसान वाचवण्यासाठी नियमित एक केळं प्रत्येकाने खायलाच हवं. त्यासोबतच वाचा केळ्याने वाढते तुमच्या केसांचे आणि त्वचेचं सौंदर्य
8. रक्तदाब नियंत्रित राहण्यास मदत होते (Regulate Blood Pressure Levels)
केळ्यामध्ये असलेले पोटॅशिअम तुमच्या ह्रदयासाठी आणि रक्तदाबासाठीही फायदेशीर ठरते. एका केळ्यामध्ये नऊ टक्के म्हणजे साधारण साडे तीनशे ते चारशे ग्रॅम पोटॅशिअम असते. तुमच्या दैनंदिन शारीरिक कार्यासाठी तितके पुरेसं आहे. पोटॅशियममुळे तुमच्या शरीराला ह्रदयाचे आरोग्य सांभाळणे आणि रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत होते. शिवाय केळ्यामध्ये सोडिअम अतिशय कमी असते. कमी सोडीअम आणि जास्त पोटॅशिअम यामुळे तुमचा रक्तदाब नियंत्रित राहतो.
9.दृष्टी सुधारते (Improves Vision)
केळ्यामुळे तुमच्या दृष्टीवरही चांगला परिणाम होतो. केळ्यातील व्हिटॅमिन ए मुळे तुमच्या डोळ्यांचे आरोग्य चांगले राहते. डोळ्यांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी आणि उत्तम दृष्टीसाठी शरीराला पुरेशा व्हिटॅमिन ए ची गरज असते आणि ती केळ्यामधून भागवली जाते. ज्यामुळे नियमित केळी खाण्याऱ्या लोकांना दृष्टीदोष कमी प्रमाणात होतात. जर तुम्हाला डोळ्याचे आरोग्य सुधारायचं असेल तर दररोज एक केळं खाण्याची सवय स्वतःला लावा. उत्तम दृष्टीसोबत सुंदर त्वचेसाठी केळ्यापासून बनवा फॅसपॅक आणि मिळवा सौंदर्य
10. हाडांच्या आरोग्यासाठी सहाय्यक (Support Good Bone Health)
केळ्यामध्ये खरंतर कॅल्शिअमचे प्रमाण खूपच कमी आहे. तरीही जर तुम्ही नियमित केळी खाल्ली तर तुमच्या हाडांचे आरोग्य चांगले राहू शकते. कारण केळ्यामुळे तुम्हाला इतर पदार्थांमधून मिळणारे कॅल्शिअम शोषून घेण्यास मदत होते. यासाठीच आरोग्य तज्ञ्ज तुम्हाला नियमित केळी खाण्याचा सल्ला देतात. ज्यांना मेहनतीची कामे करायची आहेत अथवा खेळांडूंसारख्या सतत अंगमेहनत करणाऱ्या लोकांनी हाडे मजबूत राहण्यासाठी केळी खायला हवीत.
11. शरीर डिटॉक्स होते (Detoxify Your Body)
केळं हे एक नैसर्गिक डिटॉक्स आहे. त्यात पेक्टिन असते. हे एक जिलेटिन सारखे फायबर असून ते शरीरातील विषद्रव्यांना चिकटते आणि मलमूत्रांसोबत ते बाहेर टाकून देते. ज्यामुळे तुमचे पोट स्वच्छ होते आणि आजारपणापासून तुमचे रक्षण होते. यासाठीच ज्यांना पोटाच्या समस्या अथवा अपचनाचा त्रास आहे त्यांनी आहारात केळ्याचा समावेश जरूर करावा. केळं खाण्यामुळे बद्धकोष्ठतेचा त्रासही कमी होतो. केळंच नाही तर केळ्याच्या सालींचाही उपयोग तुम्ही करू शकता जाणून घ्या कसा.
वाचा – जाणून घ्या वेलची केळी खाण्याचे फायदे
केळी खाण्याचे दुष्परिणाम | Side Effects Of Banana In Marathi
केळी खाण्याचे फायदे (banana benefits in marathi) अनेक असल्यामुळे दररोज एक केळं खाण्यास काहीच हरकत नाही. मात्र जर तुम्ही अती प्रमाणात केळी खाल्ली तर त्याचा तुमच्या आरोग्यावर विपरित परिणामही होऊ शकतो.
- केळी जास्त प्रमाणात खाण्यामुळे तुमचे वजन वाढू शकते.
- फक्त केळीच खाण्यामुळे अथवा ती अती प्रमाणात खाण्यामुळे तुमच्या शरीराला पुरेसे पोषण मिळत नाही.
- कच्चं केळं खाण्यामुळे तुम्हाला अपचन, बद्धकोष्ठतेचा त्रास होऊ शकतो.
- शरीराला अती प्रमाणात फायबर्स मिळाल्यास तुमची पचनशक्ती मंदावण्याची शक्यता असते.
- अती प्रमाणात केळी खाण्यामुळे तुम्हाला निद्रानाशाचा त्रास होऊ शकतो. यासाठी रात्री झोपताना कधीच केळं खाऊ नका.
- केळं गोड आहे जर ते अती प्रमाणात खाल्ले तर त्यामुळे तुमच्या दातांचे आरोग्य बिघडू शकते. शिवाय मधुमेहींसाठीही अती प्रमाणात केळं खाणं धोक्याचं ठरू शकतं.
- लक्षात ठेवा दिवसभरात फक्त एक किंवा दोन केळी खाणंच आरोग्यासाठी हितकारक आहे. त्यामुळे केळी प्रमाणातच खा आणि निरोगी राहा.
महत्त्वाची सूचना –
आजकाल वाढत्या प्रदूषणाचा फटका अनेक खाद्यपदार्थांवर झालेला दिसून येत. बऱ्याचदा केळी लवकर पिकण्यासाठी ती कृत्रिम पद्धतीने पिकवली जातात. केमिकलयुक्त पदार्थ वापरून पिकवलेली केळी तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात. यासाठी केळी घेताना ती नीट पारखून घ्या. ज्या केळ्याचा देठ हिरवा आणि फळ पिकलेलं असेल ते केळं कृत्रिम पद्धतीने पिकवलेलं असू शकतं. कारण कोणतेही फळ आधी देठापासून पिकण्यास सुरूवात होते. तेव्हा ही साधी खूण ओळखून तुम्ही कृत्रिम पद्धतीने पिकवलेली आणि नैसर्गिक पद्धतीने पिकवलेली ओळखू शकता. नैसर्गिक पद्धतीने पिकवलेली केळी प्रमाणात खा आणि निरोगी राहा.
केळी खाण्याचे फायदे याबाबत काही प्रश्न – FAQ’s
केळं कधी खावं हे तुमची शारीरिक स्थिती आणि तुमच्या आरोग्य समस्यांवर अवलंबून आहे. पण साधापणपणे जर तुम्ही सुदृढ प्रवृतीच्या असाल तर सकाळी नास्त्यामध्ये एक अथवा दोन केळी तुम्ही नक्कीच खाऊ शकता.
कोणताही खाद्यपदार्थ खाल्यावर लगेचच पाणी पिऊ नये. कारण त्यामुळे तुमची पचनशक्ती कमी होते. पाणी तुमच्या शरीरातील पाचकरस डायल्युट करते. यासाठीच केळं खाल्यावरही लगेच पाणी पिऊ नये.
जेवल्यावर आणि रात्री झोपताना केळं खाऊ नये कारण केळं पचायला जड असतं. उपाशीपोटी अथवा जेवणाच्या मधल्या वेळेत तुम्ही केळं नक्कीच खाऊ शकता.
मधुमेहींसाठी केळं हे एक सुरक्षित फळ आहे. मात्र ते त्यांनी प्रमाणात खावं. कारण केळ्यामध्ये नैसर्गिक साखर असते जर ते अती प्रमाणात खाल्लं तर मधुमेहींच्या रक्तातील साखर वाढण्याची शक्यता असते.
हे हि वाचा,