घरात आरसा नाही असं घर सापडणं कठीणच. काही जणांना तर वाईट सवय असते सारखं येताजाता आरश्यात बघायची. त्यामुळे ते प्रत्येक खोलीत आवर्जून आरसा लावून घेतात. पण तुम्हाला माहीत आहे का, वास्तूनुसार आरसाही घरामध्ये एक महत्त्वपूर्ण भूमिका बजावतो.
आरसा हा घरात योग्य ठिकाणी लावणं खूप महत्त्वाचं आहे. काही जणांचा कदाचित यावर विश्वास बसणार नाही. पण वास्तूनुसार या गोष्टींचा आपल्या आयुष्यावर परिणाम होत असतो. आरश्याच्याबाबतीत वैज्ञानिकरित्याही अनेक गोष्टी सिद्ध झाल्या आहेत. जर तुम्ही घरामध्ये योग्य ठिकाणी आणि योग्य दिशेला लावल्यास तुम्हाला नक्कीच फायदा मिळेल. पण जर आरसा योग्य ठिकाणी लावला नसल्यास तुम्हाला नुकसान होऊ शकतं. जाणून घ्या घरांमध्ये नक्की कुठे लावावा आरसा.
आरसा नेमका घरात कुठे लावावा
1. खोलीच्या दरवाज्याच्या मागे कधीही आरसा लावू नये, पण जर दरवाजा ईशान्य दिशेला दिशेला असेल तर आरसा लावता येतो.
2. ऑफिस किंवा घरामध्ये उत्तर-पूर्व दिशेला आरसा लावावा. असं केल्याने घरातील पैशांची आवक वाढते.
3. घरामध्ये छोट्या आणि संकुचित जागी आरसा लावावा. यामुळे तुम्हाला नक्कीच फरक पडलेला जाणवेल.
4. आरश्यांसमोर एखादी शुभ वस्तू ठेवावी. जी आरश्यातून दिसेल. असं केल्याने घरात सुखशांती कायम राहते.
5. आरसा कधीही खिडकी किंवा दरवाज्या दिशेला दिसणारा लावू नये.
6. खोलीमध्ये कधीही समोरासमोर आरसे लावू नये, कारण यामुळे घरातील सदस्यांमध्ये मतभेद निर्माण होण्याची शक्यता असते.
7. आरसा घरातील भिंतीवर खूप वर किंवा खूप खाली असा लावू नये. नाहीतर घरातील सदस्यांना शारीरिक समस्यांना सामोरं जावं लागतं.
8. आरसा नेहमी स्वच्छ असावा आणि घरामध्ये कधीही तुटलेला आरसा ठेवू नये. कारण तुटलेल्या आरश्याने घरामध्ये नकारात्मक उर्जा निर्माण होते.
बेडरूमसाठी फॉलो करा या वास्तू टीप्स
सकाळी उठल्यावर कधीही पाहू नका आरसा
आरश्याच्या घरातील स्थानासोबतच असंही म्हणतात की, सकाळी उठल्यावर कधीही आरसा पाहू नये. पण आपल्यापैकी बऱ्याच जणांना सकाळी उठल्यावर सर्वात आधी आरसा पाहण्याची सवय असते. कारण वास्तूशास्त्रानुसार याचा तुमच्यावर नकारात्मक परिणाम होतो.
- वास्तूशास्त्रानुसार व्यक्ती जेव्हा झोपून उठतो तेव्हा त्याच्या शरीरामध्ये नकारात्मक उर्जा प्रभाव असतो आणि या नकारात्मक उर्जैचा सर्वाधिक प्रभाव हा चेहऱ्यावर असतो. अशा परिस्थितीत सकाळी उठल्यावर जर तुम्ही आरसा पाहिल्यास ती नकारात्मक उर्जा पुन्हा तुमच्यात प्रवेश करते. त्यामुळे कधीही तोंड धुतल्यानंतर आरसा पाहावा.
यशस्वी आयुष्यासाठी फॉलो करा ‘या’ गुडलक वास्तू टीप्स
खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop’s मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.
हेही वाचा –