शरीरावरील अनावश्यक केस काढण्यासाठी वॅक्सिंग, शेव्हिंग, थ्रेडींग या पद्धती अवलंबल्या जातात. यातील वॅक्सिंग हा प्रकार अनेकांना सोयीस्कर वाटतो कारण तो सगळ्यात जास्त सुरक्षित आहे. आता यासाठी येणारा खर्च विचाराल तर तो साधारण 1000 रुपये वगैरे आहे. म्हणजे तुम्ही चांगल्या स्पा सलोनमध्ये गेलात तर संपूर्ण बॉडी वॅक्सचा तुम्हाला इतका खर्च येतो. पार्लरची अपॉईंटमेट, तिथे लागणारा वेळ टाळण्यासाठी अनेक जण घरच्या घरीच वॅक्स करणे पसंत करतात. पण वॅक्स घरी करणे म्हणजे एखाद्या सोहळ्यापेक्षा कमी नाही. म्हणजे तुम्हाला वॅक्स आणण्यापासून ते गरम करण्यापर्यंत सगळचं करावं लागतं. जर तुम्हाला इतका वेळ घालवायचा नसेल आणि झटपट काही करायचं असेल तर तुम्ही बाजारात मिळणाऱ्या कोल्ड वॅक्स स्ट्रिप्स तुम्ही वापरु शकता. या वापरायला सोप्या आहेत शिवाय बजेटमध्ये आहेत. त्यामुळे आज जाणून घेऊया कोल्ड वॅक्स स्ट्रिपविषयी
वॅक्स करण्यापूर्वी वॅक्सचे प्रकार तुम्हाला माहीत असायला हवे (Different Types Of Wax )
कोल्ड वॅक्स स्ट्रिप्स म्हणजे काय?
shutterstock
तुमच्या कागदाच्या वॅक्स स्ट्रिप्सप्रमाणेच या वॅक्स स्ट्रिप्स दिसतात. यात फरक इतकाच आहे. की दोन पट्ट्यांच्या मध्ये कोल्ड वॅक्स असते. त्यामुळे तुम्हाला दोन्ही पट्ट्या वेगळ्या करुन वापरता येतात. यांना वापरण्यासाठी वेगळी मेहनत घ्यावी लागत नाही. या वॅक्सच्या पट्ट्यांमध्ये तुम्हाला इतर वॅक्सप्रमाणे वेगवेगळ्या पद्धतीचे वॅक्स मिळते. ज्याचा उपयोग तुम्ही तुमच्या त्वचेच्या प्रकारानुसार निवडू शकता. कोल्ड वॅक्स स्ट्रिप्स आणि कोल्ड वॅक्स रोलऑन असे काही प्रकार तुम्हाला यामध्ये मिळतात. पण त्यातल्या त्यात तुम्हाला कोल्ड वॅक्स स्ट्रिप्स वापरणे अधिक सोपे जाते.
कोल्ड वॅक्स स्ट्रिप्सने वॅक्स करताना
shutterstock
कोल्ड वॅक्स स्ट्रिप्सचे फायदे वाचल्यानंतर जर तुम्ही याचा वापर करण्याचा विचार केला असेल तर अशा पद्धतीने करा वॅक्स
- दोन्ही हाताच्यामध्ये या कोल्ड वॅक्स स्ट्रिप्स घ्या. हाताच्या मध्यभागी या स्ट्रिप्स ठेवून चोळून घ्या.
- दोन्ही भाग वेगळे करा. तुम्हाला दोन्ही भाग वापरता येतात. एका पट्टीने तुम्ही वॅक्स करायला सुरुवात करा.
- हाताला कोणत्याही प्रकारचे मॉश्चरायझर किंवा तेल लावू नका. हात कोरडा असल्यास वॅक्स पटकन होण्यास मदत मिळते.
- केसांच्या दिशेने वॅक्स पट्टी लावून विरुद्ध दिशेला पट्टी ओढा. आणि असे करत राहा. तुम्हाला एका पट्टीमध्ये साधारण एक हात आरामात करता येतो ( इथे आली बचत)
- तुम्ही अशाच पद्धतीने हात आणि पायाचे वॅक्स करु शकता.
कोल्ड वॅक्सनंतर वाईप्स महत्वाचे
shutterstock
कोल्ड वॅक्स असल्यामुळे हे वॅक्स काढल्यानंतर तुमचा हात चिकट होतो. हा चिकटपणा तुम्हाला त्यात दिलेल्या वाईप्समुळेच काढता येतात.त्यामुळे तुम्ही अरगान ऑईल असलेल्या पट्ट्या हातावरुन फिरवा. आणि मग तुम्हाला तुमच्या वॅक्स केलेल्या भागाला थोडासा मसाज करायचा आहे.
वेगवेगळे प्रकार
कोल्ड वॅक्स हा प्रकार येऊन आता अनेक वर्ष झाली आहेत. त्यामुळे कोल्ड वॅक्स स्ट्रिप्समध्ये तुम्हाला वेगवेगळे प्रकार मिळू शकतात. यामध्ये मिळणारे गोल्ड वॅक्स, स्ट्राॅबेरी वॅक्स, चॉकलेट वॅक्स स्ट्रिप्स फार चांगले आहेत. ते तुम्ही वापरु शकता.
आता तुम्हाला बजेटमध्ये वॅक्स करणे फारच सोपे जाईल.त्यामुळे वॅक्ससाठी या कोल्ड वॅक्स स्ट्रिप्स नक्की वापरुन पाहा.
#POPxoLucky2020 ने आम्ही देत आहोत या दशकाला निरोप, प्रत्येक दिवशी असेल एक नवीन सरप्राईज, मग नक्की बघा नवीन POPxo Zodiac Collection ज्यामध्ये आहे नोटबुक्स, फोन कव्हर्स आणि मॅजिक मग्ज्स जे आहेत मजेशीर आणि अगदी 100% तुमच्यासारखे. एवढंच नाहीतर यावर आहे 20% डिस्काऊंट, मग लगेच क्लिक करा POPxo.com/shopzodiac आणि शॉप करा.