ADVERTISEMENT
home / आरोग्य
Neem Oil Uses In Marathi

कडुलिंब तेलाचा उपयोग जाणून घ्या (Neem Oil Uses In Marathi)

कडूलिंबाचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. कडूलिंब म्हणजे निसर्गाने माणसाला दिलेले वरदानच आहे. कारण या वृक्षाच्या पानं, फुलं, फळ, खोड आणि मुळांचा वापर औषधासाठी केला जातो. विविध प्रकारच्या आरोग्य समस्यांवर कडूलिंब गुणकारी आहे. कडूलिंबाच्या तेलात देखील औषधी गुणधर्म असतात. ज्यामुळे ते एक रामबाण उपाय म्हणून वापरले जाते. कडूलिंबाचे तेल कडूलिंबाच्या बियांपासून काढले जाते.  कडूलिंबाच्या फळांचा हिरवा रंग या तेलामध्ये असल्यामुळे ते हिरव्या रंगाचे दिसते. या तेलात अनेक आयुर्वेदिक घटक असतात. ज्याचा तुमच्या आरोग्य, त्वचा आणि केसांवर चांगला फायदा होता.  

कडूलिंबाचं तेल कसे काढतात (How To Extract Neem Oil)

कडूलिंबाच्या फळांमधील बिया उकडवून, गरम करून अथवा कोल्ड प्रेस पद्धतीने हे तेल काढलं जातं. यासाठी सर्वात आधी या बियांवरील आवरण काढून टाकलं जातं. त्यानंतर या बिया मोठ्या ड्रायरमधून कोरड्या केल्या जातात. थंड रूम्समध्ये आणि कमी आर्द्रता असलेल्या जागी त्या साठवून ठेवल्या जातात. कोल्ड प्रेस अथवा लाकडी घाण्यावर तेल काढणं ही एक पारंपरिक आणि योग्य पद्धत आहे. ज्यामध्ये कोरड्या केलेल्या कडूलिंबाच्या बिया क्रश करून त्यापासून तेल काढतात. काही वेळा या उच्च तापमानावर  बिया उकडूनदेखील त्यापासून तेल काढतात. कडूलिंबाच्या तेलाला एकप्रकारचा उग्र वास असतो. 

How To Extract Neem Oil

कडूलिंबाच्या तेलाचा उपयोग कशासाठी केला जातो (Neem Oil Uses In Marathi)

प्रत्येकाच्या घरात कडूलिंबाचं तेल असायलाच हवं. कारण कडूलिंबाच्या तेलाचा वापर अनेक गोष्टींसाठी केला जातो. यासाठीच जाणून घ्या कडूलिंबाच्या तेलाचा वापर कसा आणि कधी करावा. 

ADVERTISEMENT

अॅंटिसेप्टिक औषधाप्रमाणे (Antiseptic)

प्रत्येकाच्या घरात प्रथमोपचारासाठी एखादं अॅंटिसेप्टिक औषध हे असतंच. घरात छोट्यामोठ्या जखमा, स्वयंंपाक करताना बोट कापणे, भाजणे अशा अनेक त्वचा समस्यांवर अॅंटिसेप्टिक लावणं गरजेचं असतं.ज्यामुळे त्वचेला इनफेक्शन होत नाही. जर तुमच्याकडे कडूलिंबाचं तेल असेल तर अशा वेळी तुम्ही त्याचा वापर नक्कीच करू शकता. 

घर स्वच्छ ठेवण्यासाठी (Maintain House Hygiene)

घराच्या स्वच्छतेसाठी तुम्ही कडूलिंबाचं तेल वापरू शकता. घरात डास, झुरळ, पाल असे कीटक येऊ नयेत यासाठी तुम्ही कडूलिंबाच्या तेलाचा वापर केल्यास तुम्हाला चांगला फायदा होतो. कडूलिंबाच्या तेलामुळे तुमच्या घरात जीवजंतूचा प्रार्दूभाव कमी प्रमाणात होऊ शकतो. 

डेली स्कीन केअर रूटीन (For Skin)

तुमच्या त्वचेची काळजी घेण्यासाठी तुम्ही नियमित काही गोष्टी फॉलो करता. ज्यामध्ये क्लिझिंग, मॉश्चराईझिंग, फेसपॅक अशा गोष्टींचा वापर तुम्ही करू शकता. कडूलिंबाच्या तेलाचा वापर या गोष्टींसाठी केल्यामुळे तुम्हाला नक्कीच चांगला फायदा होऊ शकतो. 

वाचा – Nilgiri Oil Benefits In Marathi

ADVERTISEMENT

डेली हेअर केअर रूटीन (For Hair)

आजकाल केसांच्या समस्यांपासून दूर राहणं हे एक मोठं आव्हानच आहे. कारण धुळ, प्रदूषण, खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी याचा परिणाम तुमच्या केसांवर होत असतो. यासाठीच जर तुम्ही केसांसाठी कडूलिंबाच्या तेलाचा वापर केला तर तुम्हाला नक्कीच चांगला फायदा होऊ शकतो. 

पेस्ट कंट्रोल (Pest Control)

पेस्ट कंट्रोल करणं ही आजकाल घरासाठी एक महत्त्वाची गोष्ट आहे. कारण घराला जीवजंतू आणि कीटकांपासून दूर ठेवण्यासाठी पेस्ट कंट्रोल करणं महत्त्वाचं आहे. कडूलिंबाच्या तेलाचा वापर तुम्ही घरात पेस्ट कंट्रोल करण्यासाठी करू शकता. कारण कडूलिंबाचं तेल हे उग्र वासाचं आणि अॅंटिसेप्टिक असतं. ज्याचा तुम्हाला कीटकांपासून दूर राहण्यासाठी चांगला फायदा होऊ शकतो.

डेंग्यूपासून बचाव करण्यासाठी (Prevent Dengue)

डेंग्यू हा एक भयंकर आजार आहे. ज्यापासून स्वतःचं रक्षण करणं ही एक गरजेची गोष्ट आहे. डेंग्यूपासून बचाव करण्यासाठी तुम्ही  कडूलिंबाच्या तेलाचा वापर करू शकता. यासाठी घराबाहेर पडताना तुम्ही पायाला आणि हाताला कडूलिंबाचं तेल लावून बाहेर जा. या तेलाच्या वासामुळे डेंग्यूचा डास तुम्हाला चावणार नाही.  

दातांची काळजी घेण्यासाठी (Dental Care)

दात किडणं, हिरड्या सुजणं अशा समस्या दूर करण्यासाठी तुम्हाला कडूलिंबाच्या तेलाचा चांगला फायदा होऊ शकतो. कडूलिंबाच्या तेलातील अॅंटिसेप्टिक तेल तुमच्या दातांना किडण्यापासून वाचवू शकतात. 

ADVERTISEMENT

घर स्वच्छ करण्यासाठी (To Keep House Clean)

घरातील लादी, किचन, फ्रीज, बाथरूम स्वच्छ करण्यासाठी तुम्ही कडूलिंबाच्या तेलाचा वापर करू शकता. कारण या गोष्टी तुम्हाला किटकांपासून  सुरक्षित करायच्या असतील तर कडूलिंबाच्या तेलाचा चांगला फायदा होऊ शकतो. 

To Keep House Clean

निम तेलाचे फायदे त्वचेसाठी (Neem Oil Benefits For Skin In Marathi)

 

त्वचेसाठी कडूलिंबाचं तेल अगदी वरदानच आहे. कारण त्यामुळे तुमच्या अनेक त्वचा समस्या कमी होतात. 

कोरड्या त्वचेसाठी (Neem Oil For Dry Skin)

 

कडूलिंबाच्या तेलामध्ये मोठ्या प्रमाणावर फॅटी अॅसिड, व्हिटॅमिन ई आणि असे अनेक पोषक घटक असतात. ज्यामुळे तुमच्या त्वचेचं योग्य पोषण होतं. तुम्ही तुमच्या कोरड्या त्वचेच्या  समस्येवर अथवा फुटलेल्या टाचांच्या भेगा कमी करण्यासाठी तुम्ही कडूलिंबाच्या तेलाचा वापर करू शकता. 

ADVERTISEMENT

सुरकुत्या कमी करण्यासाठी (Help To Get Rid Of Wrinkles)

 

कडूलिंबाच्या तेलात रोगप्रतिकारक शक्ती असते ज्यामुळे तुमची त्वचा निरोगी आणि फ्रेश राहते. कडूलिंबाच्या तेलाचा नियमित वापर केल्यामुळे त्वचेतील मऊपणा कायम राहतो आणि त्वचा मऊ मुलायम राहते. ज्यामुळे त्वचेला सुरकुत्या येत नाहीत. 

अॅक्नेचा त्रास कमी होतो (Removes Acne)

 

कडूलिंबाच्या तेलात अॅंटिसेप्टिक आणि दाह शमन करणारे घटक असतात. ज्यामुळे तुमच्या त्वचेचं धुळ आणि जीवजंतूंपासून रक्षण होतं. कडूलिंबाच्या तेलामुळे तुमच्या त्वचेचं पुरळ, मुरमांपासून संरक्षण  होतं. कडूलिंबाच्या तेलामुळे त्वचा लालसर होणं, खाज येणं अशा समस्या नक्कीच कमी होतात. 

व्रण कमी होतात (Fade Scars)

 

त्वचेवरील काळे डाग, व्रण, जखमा अथवा पुरळाच्या खुणा कमी करण्यासाठी तुम्ही कडूलिंबाच्या तेलाचा वापर करू शकता. कडूलिंबाच्या तेलामुळे जुनाट जखमांचे डाग हळूहळू कमी होतात. मात्र त्यासाठी  योग्य पद्धतीने हे तेल नियमित त्वचेवर लावायला हवं.

त्वचेला येणारी खाज कमी करण्यासाठी (Relieve Itchy Skin)

 

जर तुमच्या त्वचेला इनफेक्शन अथवा पुरळामुळे खाज येत असेल तर तुम्ही नक्कीच हैराण होता. मात्र आता काळजीचं कारण नाही कारण त्वचेला येणारी खाज कमी करण्यासाठी कडूलिंबाच्या तेलाचा वापर करू शकता. कारण कडूलिंबामध्ये दाह शमन करण्याची क्षमता असते. 

ADVERTISEMENT

सोरायसिस (Treats Psoriasis)

 

सोरायसीस हा एक भयंकर आणि वेदनादायी त्वचा रोग आहे.  ज्यामुळे तुमची त्वचा कोरडी होते शिवाय त्वचेला भयंकर खाज येते. मात्र जर तुम्ही कडूलिंबाच्या तेलाचा वापर या त्वचा समस्येवर केला तर तुम्हाला नक्कीच आराम मिळू शकतो.  

फंगल इनफेक्शन (Treat Fungal Skin Infections)

 

घाम, अती उष्णता, घट्ट कपडे घालणं, पाण्यात अती काम करणं यामुळे फंगल इनफेक्शनचा त्रास होतो. त्वचेवर बुरशीजन्य संसर्ग कमी करण्यासाठी कडुनिंबाचा वापर करा.

ब्लॅकहेड कमी करण्यासाठी (Remove Blackheads)

 

ब्लॅकहेड्स मुळे तुमच्या चेहऱ्याच्या मुळ सौंदर्यात बाधा येते. कारण तुमची त्वचा राट आणि काळसर दिसू लागते. ब्लॅकहेडस् बऱ्याचदा नाक अथवा कपाळावर येतात. मात्र जर तुम्ही नियमित कडूलिंबाच्या तेलाचा वापर केला तर तुम्ही या समस्येपासून स्वतःची सुटका करून घेऊ शकता. मात्र लक्षात ठेवा कडूलिंबाचं तेल थेट तुमच्या चेहऱ्यावर लावू नका. दोन ते तीन कडूलिंब तेल पाण्यात मिसळा आणि मगच ते तुमच्या त्वचेवर लावा.

अॅंटि-एजिंगसाठी (Anti-Aging Serum)

 

कडूलिंबाच्या तेलात फॅटि अॅसिड, व्हिटॅमिन ई, अॅंटि इनफ्लैमटरी, अॅंटि ऑक्सिडंट घटक असतात. ज्यामुळे तुमच्या त्वचेवर एक प्रकारचं सुरक्षा कवच निर्माण होतं. त्वचेचं योग्य पोषण झाल्यामुळे तुमची त्वचा चिरतरूण राहते आणि वयामुळे दिसणाऱ्या एजिंगच्या खुणा कमी दिसतात. 

ADVERTISEMENT

पिंगमेंटेशन कमी होतं (Reduces Hyper-Pigmentation)

 

कडूलिंबामुळे तुमच्या त्वचेवरील पिंगमेंटेशनदेखील कमी होऊ शकतं. या तेलामुळे तुमची त्वचा मुळापासून स्वच्छ होते. त्वचेचा पोत सुधारतो आणि तुम्ही फ्रेश आणि सुंदर दिसू लागता. कडूलिंबाच्या तेलात मॅलेनिन कमी करणारे गुणधर्म असतात. ज्यामुळे पिंगमेंटन झालेल्या ठिकाणी जमा झालेली त्वचेची रंगद्रव्ये कमी होतात. 

गजकर्ण , खरूज आणि इतर त्वचा समस्या कमी करण्यासाठी (For Other Skin Problems)

 

गजकर्ण, खरूज अथवा इतर गंभीर त्वचा समस्या झाल्या तर त्यातून सुटका मिळणं हे एक कठीण काम असतं. या समस्या कमी करण्यासाठी  तुम्ही कडूलिंबाच्या तेलचा वापर करू शकता. या त्वचा समस्यांवर तयार करण्यात येणाऱ्या औषधांसाठी कडूलिंबाचा वापर केला जातो. 

Skin Problems

कडुलिंब तेलाचे फायदे केसांसाठी (Neem Oil Benefits For Hair In Marathi)

 

कडूलिंबाचा वापर तुम्ही त्वचेप्रमाणेच केसांच्या आरोग्यासाठी आणि केसांच्या  समस्या दूर करण्यासाठी करू शकता. केवळ त्वचेसाठीच नाही तर कडूलिंबाचा तेल हे केसांसाठी फायदेशीर आहे.

ADVERTISEMENT

कोंडा कमी करण्यासाठी (Neem Oil To Get Rid Of Dandruff)

 

तुम्हाला कोंडा झालाय, केसांची त्वचा कोरडी झाली आहे मुळीच काळजी करू नका. कारण या समस्येपासून सुटका करण्यासाठी कडूलिंबाचं तेल अगदी बेस्ट आहे. या तेलातील औषधी गुणधर्मांमुळे या तेलाचा वापर अनेक अॅंटि डॅंड्रफ शॅंम्पूमध्ये केला जातो. या तेलामुळे केवळ तुमच्या केसांतील कोंडाच कमी होत नाही तर तुमच्या केसांच्या त्वचेचं आरोग्यदेखील वाढतं. 

केसांचं आरोग्य वाढतं (Promotes Hair Growth)

 

केसांची वाढ करण्यासाठी अगदी पुर्वीपासून कडूलिंबाच्या तेलाचा वापर केला जातो. शिवाय या तेलाचा कोणताच दुष्परिणाम नाही. ज्यामुळे तुम्ही याचा वापर तुमच्या केसांची काळजी घेण्यासाठी नक्कीच करू शकता. कडूलिंबामुळे तुमचे केस मजबूत होतात आणि केसांची वाढ चांगली होते. 

लिखा आणि उवा कमी करण्यासाठी (Treats Hair Lice)

 

केसांमधील लिखा आणि उवा कमी करण्यासाठी कडूलिंबाचा वापर करणं हा एक सोपा आणि सुरक्षित पर्याय आहे. आजकाल लहान मुलांना  शाळेत एकत्र राहण्यामुळे लिखा आणि उवा होण्याची शक्यता दाट असते. शिवाय लहान मुलांच्या उवा कमी करण्यासाठी प्रत्येक आईला एक सोपा आणि सुरक्षित मार्ग हवा असतो. यासाठी रात्री झोपताना मुलांच्या  केसांत कडूलिंबाचं तेल लावा आणि सकाळी त्यांचे केस धुवा. केस विंचरताना केसांमधून मरून पडलेल्या उवा कंगव्यासोबत बाहेर येतील. 

केसांचा पोत सुधारतो (Improves Hair Texture)

 

केसांना नियमित कडूलिंबाचं तेल लावल्यामुळे केसांचा पोत सुधारतो. कारण या तेलामुळे केसांच्या त्वचेचं योग्य पोषण होतं. ज्यामुळे केसांच्या समस्या आपोआप कमी होतात आणि केस मऊ, मुलायमदेखील होतात. 

ADVERTISEMENT

केसांना फाटे फुटत नाहीत (Removes Split Ends)

 

बऱ्याचदा केसांची योग्य काळजी न घेतल्यामुळे तुमच्या केसांना फाटे फुटतात. फाटे फुटलेले केस राट आणि निर्जीव दिसू लागतात. जर तुम्हाला केसांना पुन्हा पूर्वीप्रमाणे करायचं असेल तर केसांची योग्य काळजी घेणं फार गरजेचं आहे. यासाठी केसांना नियमित कडूलिंबाचे तेल लावा. तुम्ही तुमच्या शॅंम्पूमध्ये काही थेंब कडूलिंबाच्या तेलाचा वापर करू शकता. 

फ्रिजी केसांसाठी (Treats Frizzy Hair)

 

फ्रिजी आणि गुंतलेले केस असतील तर त्यांची काळजी घेणं फारच कठीण जातं. अशावेळी कडूलिंबाच्या तेलाचा वापर करून तुम्ही तुमच्या केसांची योग्य काळजी घेऊ शकता. या तेलामुळे केसांना मऊपणा येतो आणि केस चमकदार दिसतात. 

केसांच्या त्वचेचे पोषण होते (Keeps Scalp Healthy)

 

कडूलिंबाच्या तेलाचा वापर अनेक गोष्टीसाठी केला जातो. मात्र तुम्हाला हे माहीत आहे का की कडूलिंबाच्या तेलामुळे तुमच्या केसांच्या त्वचेचं योग्य पोषण होतं. कारण या तेलामध्ये तुमच्या त्वचेचं पोषण आणि इनफेक्शनपासून संरक्षण करण्याचे घटक असतात. ज्यामुळे केसांची त्वचा मऊ आणि सुरक्षित होते. 

Keeps Scalp Healthy

ADVERTISEMENT

 

कडूलिंबाच्या तेलाचा उपयोग आरोग्यासाठी (Health Benefits Of Neem Oil)

जसा कडूलिंबाचा वापर त्वचा आणि केसांच्या आरोग्यासाठी केला जातो अगदी त्याचप्रमाणे तो तुमच्या आरोग्यासाठीदेखील केला जातो. कडूलिंबाच्या तेलामुळे अनेक आरोग्य समस्या दूर होऊ शकतात. 

पोटाच्या समस्या कमी करण्यासाठी (To Reduce Stomach Problems)

कडूलिंब हे अनेक समस्यांना दूर करण्यासाठी वापरण्यात येणारं रामबाण औषध आहे. पोटाच्या समस्या दूर करण्यासाठी कडूलिंबाचं तेल हे जगभरात वापरण्यात येणारं गुणकारी औषध आहे. जेव्बा तुमच्या पोट आणि आतड्यांमधील पी एचचे संतुलन बिघडते तेव्हा पोटाच्या समस्या निर्माण होतात. अॅसिडिटी अथवा पोटात गॅस निर्माण होण ही एक प्रमुख समस्या  आहे. पण यावर कडूलिंबाचं तेल हे एक प्रभावशाली औषध ठरू शकतं. यामुळे पोटातील गॅस आणि वेदना कमी होतात. 

कर्करोगापासून बचाव करण्यासाठी (Prevent Cancer)

कडूलिंबामध्ये  रोगप्रतिकार शक्ती वाढवणारे घटक असतात. ज्यामुळे तुमचे कर्करोगापासून रक्षण होते. या रोगाच्या औषधोपचारांमध्ये कडूलिंबाच्या तेलाचा वापर केला जातो. यामुळे तुमच्या शरीरावर त्याचे एक संरक्षक कवच निर्माण होते ज्यामुळे कर्करोगाच्या पेशींची वाढ होत नाही. 

ADVERTISEMENT

रोगाचे विषाणू (Kill Virus & Bacteria)

कांजण्या, देवी सारखे रोग बरे करण्यासाठी कडूलिंब एक प्रभावशाली औषध आहे. कारण कडूलिंबाच्या तेलामुळे या रोगांचे विषाणू कमी होण्यास मदत होते. कडूलिंबातील अॅंटि बॅक्टेरिअल घटक त्या विषाणूंना मारतात.

Kill Virus & Bacteria

कडूलिंबाच्या तेलाचे दुष्पपरिणाम (Side Effects Of Neem Oil)

कडूलिंबाचे तेल हे गुणकारी असलं तरी कोणत्या समस्येवर आणि किती प्रमाणात वापरावं हे माहीत असणं गरजेचं आहे. तुमचं वय, आरोग्य आणि इतर आरोग्य समस्यांचा विचार करूनच या तेलाचा वापर करावा. विशेषतः लहान मुलं आणि गरोदर महिलांनी कडूलिंबाच्या तेलाचा वापर करताना काळजी घ्यावी. जरी कडूलिंब तेलाचे कोणतेही दुष्परिणाम होत नसले तरी त्वचेसाठी वापताना त्याची पॅच टेस्ट जरूर घ्यावी. पोटातून घेताना ते पाण्यात मिसळून मगच घ्यावे. 

कडूलिंबाच्या तेलाबाबत मनात येणारे निवडक प्रश्न (FAQ’s)

1. कडूलिंबाच्या तेलाचा वापर झाडांवरील कीड कमी करण्यासाठी केला जातो का ?

नक्कीच कडूलिंबाचे तेल तुम्ही कीटकनाशक म्हणून वापरू शकता. झाडांच्या पानांवरील रोग यामुळे कमी होतात. मात्र त्यासाठी तुमचे रोप सुर्यप्रकाशात असेल याची काळजी मात्र जरूर घ्या. 

ADVERTISEMENT

2. कडूलिंबामुळे जखमा बऱ्या कशा होतात ?

कडूलिंबामध्ये दाह कमी करणारे आणि अॅंटिसेप्टिक घटक असतात. ज्यामुळे तुमच्या जखमा भरून निघण्यास मदत होते. 

3. कडूलिंबाचे तेल कुठे विकत मिळते ?

बाजारात विविध कंपन्यांचे तेल विकत मिळतात. मात्र कडूलिंबाचे तेल तुम्हाला एखाद्या मेडिकल शॉप अथवा आयुर्वेदिक दुकानात नक्कीच मिळू शकेल. 

4. कडूलिंबाच्या तेल खरेदी करताना आणि वापरताना काय काळजी घ्यावी ?

कडूलिंबाचे तेल कोरड्या आणि थंड जागी साठवून ठेवावे. वापरण्यापूर्वी ते पाण्यात मिसळून मगच वापरावे. त्वचेसाठी वापर करताना त्यामध्ये तुम्ही नारळाचे अथवा बदामाचे तेल नक्कीच मिसळू शकता.  तेल विकत घेताना उत्पादनावरील तारिख जरूर पाहावी. 

 

ADVERTISEMENT

अधिक वाचा –

कडूलिंबाचे फायदे आणि औषधीय गुण ऐकून तुम्हीही व्हाल चकीत!

मानेजवळील त्वचा काळवंडली आहे का, मग करा हे घरगुती उपाय

सौंदर्य खुलविण्यासाठी फॉलो करा ’20’ आयुर्वेदिक ब्युटी टीप्स

ADVERTISEMENT

Neem Benefits for Skin in Hindi

09 Dec 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT