हळद ही खरं तर अँटिसेप्टिक म्हणून जास्त ओळखण्यात येते. हळदीचे अनेक फायदे आहेत. पण कच्च्या हळदीचे फायदे तुम्हाला माहीत आहेत का? कच्च्या हळदीचा चहा पिऊन तुम्हाला तुमची कमी झालेली प्रतिकारशक्ती वाढवण्यास उपयोग होतो. कसा ते आम्ही तुम्हाला या लेखातून सांगणार आहोत. तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे. त्यासाठी तुमच्या शरीरातील प्रतिकारशक्ती चांगली असणं आवश्यक आहे. कारण प्रतिकारशक्ती योग्य असेल तरच तुम्ही निरोगी राहू शकाल. विशेषतः थंडीच्या दिवसात आजारी पडण्याचं प्रमाण वाढतं. अशावेळी तुम्ही कच्च्या हळदीचा चहा पिऊन नक्कीच तुमची प्रतिकारशक्ती वाढवू शकता. इतकंच नाही तुम्हाला हृदयरोग, मधुमेह, कोलेस्ट्रॉल यासारखे आजार असतील तर त्यावरही हा कच्च्या हळदीचा चहा गुणकारी आहे. कच्च्या हळदीमध्ये करक्युमिन आणि अँटी-इन्फ्लेमेटरी गुण आढळतात. त्यामुळे ज्या व्यक्तींची प्रतिकारशक्ती कमी आहे ती वाढवण्यास मदत होते. थंडीच्या दिवसात अगदी आवर्जून कच्च्या हळदीचा चहा प्यायला हवा.
कच्च्या हळदीच्या चहाचे आरोग्याला होणारे फायदे –
हळद ही गुणकारी मानली जाते. त्यामुळे त्याचा आरोग्याला फायदाच होतो. थंडीच्या दिवसात जास्त आजारी पडण्याचं प्रमाण वाढतं अशावेळी हळदीच्या चहाने आरोग्याला फायदे होतात. पाहूया काय आहेत फायदे –
1. सूज कमी करण्यासाठी परिणामकारक
Shutterstock
कच्ची हळद ही कोणत्याही प्रकारची शरीरावर सूज आली असल्यास, कमी करण्यासाठी परिणामकारक आहे. तुम्ही जर कच्ची हळद, आलं आणि तुळशीचा एकत्र चहा करून प्यायलात तर तुमच्या शरीरावर आलेली सूज, गाठ अथवा त्रास तसंच वॉटर रिटेन्शची समस्यादेखील दूर होण्यास मदत होते. हळदीमध्ये असणाऱ्या करक्युमिनमुळे होणारा त्रास आणि सूज दोन्ही पटकन कमी होतात.
2. प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत
तुमची प्रतिकारशक्ती कमी असेल अथवा ऑटोइम्युनमध्ये तुम्हाला त्रास होत असेल तर तुमच्यासाठी कच्च्या हळदीच्या चहासारखं दुसरं औषध नाही. यामुले तुमच्या शरीरातील प्रतिकारशक्ती वाढते आणि तुमच्या शरीराला अधिक मजबूत करण्यासाठी याचा उपयोग होतो. केवळ साधे आजारच नाही तर तुम्हाला असणारे गंभीर आजारदेखील या कच्च्या हळदीच्या चहामुळे दूर राहण्यास मदत होते.
Black Tea मुळे आरोग्य राहतं फिट, सौंदर्यासाठीही होतो उपयोग
3. हृदयरोगापासून राहता दूर
Shutterstock
कच्च्या हळदीच्या चहाने तुम्हाला हृदयरोगापासून स्वतःला दूर ठेवता येतं. हळदीच्या चहामध्ये असणारे अँटिऑक्सिडंट्स हृदय निरोगी ठेवण्यासाठी आणि कोलेस्ट्रॉलच्या समस्येपासून दूर राहण्यासाठी मदत करतात. तसंच ब्लड सर्क्युलेशन वाढल्याने हृदयावर जास्त जोर पडत नाही आणि त्रास होत नाही.
वजन कमी करण्याबरोबरच इतर गोष्टीतही फायदेशीर आहे हर्बल टी
4. मधुमेहग्रस्त व्यक्तींसाठीही ठरतो फायदेशीर
मधुमेह असणाऱ्या व्यक्तींना कच्च्या हळदीच्या चहाचं सेवन नियमित करायला हवं. यामुळे रक्तातील साखरेचं प्रमाण नियंत्रणात राहतं आणि इन्शुलिनचं प्रमाण शरीरात वाढून मधुमेही व्यक्तींना त्रास होत नाही. त्यामुळे नियमित याचं सेवन केल्यास मधुमेही व्यक्तींना फायदा मिळतो.
तुम्ही जर चहाचे चाहते असाल तर लक्षात ठेवा काही गोष्टी
5. वजन कमी करण्यासाठी उपयुक्त
तुम्ही अनेक उपाय करूनही वजन कमी करू शकत नसाल तर तुम्ही कच्ची हळद, आलं आणि पुदिन्याचा चहा नक्की करून प्या. यामुळे शरीरातील मेटाबॉलिजम वाढतं आणि त्यामुळे तुमचं वजन कमी होण्यास मदत मिळते. दिवसातून कमीत कमी तीन वेळा तरी हा चहा तुम्ही करून प्यायला हवा. सकाळ, दुपार आणि संध्याकाळी हा चहा तुम्ही करून प्यायलात तर तुमचं वजन नक्कीच कमी होईल.
हळदीच्या अतीसेवनामुळे वाढू शकतो Miscarriage चा धोका
कसा बनवाल कच्च्या हळदीचा चहा
Shutterstock
एक कप चहा बनवण्यासाठी तुम्ही एक मोठा चमचा कच्ची हळद किसून घ्या. तसंच एक चमचा आलं किसून घ्या. आता यामध्ये पुदिना अथवा तुळशीची काही पानं मिक्स करा. उकळलेल्या पाण्यात हे सर्व टाकून तुम्ही ते पाणी किमान पाच मिनिट्स तरी गॅसवर उकळवा. त्यानंतर पाणी गाळून घ्या. तुम्हाला हवं तर स्वादासाठी यामध्ये लिंबाचा रस पिळून घ्या. तुमचा कच्चा हळदीचा चहा तयार आणि हा गरमागरमच प्या.
#POPxoLucky2020 ने आम्ही देत आहोत या दशकाला निरोप, प्रत्येक दिवशी असेल एक नवीन सरप्राईज, मग नक्की बघा नवीन POPxo Zodiac Collection ज्यामध्ये आहे नोटबुक्स, फोन कव्हर्स आणि मॅजिक मग्ज्स जे आहेत मजेशीर आणि अगदी 100% तुमच्यासारखे. एवढंच नाहीतर यावर आहे 20% डिस्काऊंट, मग लगेच क्लिक करा POPxo.com/shopzodiac आणि शॉप करा.