कडाक्याच्या थंडीत सकाळी उठण्याच्या वेळेस उबदार ब्लँकेटमधून बाहेर यावेसेच वाटत नाही. मोबाइलमध्ये लावलेला अलार्म देखील किती तरी वेळा पुढे ढकलला जातो. अलार्म बंद करून डोक्यावर पांघरूण घेऊन पुन्हा झोपणे हे आपण सर्वजण करतो. पण काही जणांना अंगावर पांघरूण घेऊनही ऊब जाणवत नाही. यांचे हात-पाय देखील प्रचंड थंड पडतात. तुमच्या बाबतीतही असं बर्याचदा घडत असेल तर शरीर तुम्हाला काहीतरी सांगू इच्छित आहे. याकडे दुर्लक्ष केल्यास गंभीर परिणामांना सामोरं जाण्याची परिस्थिती उद्भवू शकते.
(वाचा : फॅटी लिव्हरचा त्रास, तुमच्या आयुष्याचा करेल घात)
हिवाळ्यात हात आणि पायांचे तळवे अतिशय थंड पडणं म्हणजे शरीरातील ऑक्सिजनची कमतरता आणि रक्तभिसरण योग्य स्थितीत होत नसल्याची सूचना आहे. कित्येकदा अतिशय थंडी जाणवणंही असंख्य आरोग्यसंबंधी समस्यांचे मिळणारे संकेत असतात. उदाहरणार्थ अॅनिमिया, क्रोनिक फटी, मज्जातंतू दुखापत होणे, मधुमेह, हायपोथायडेरिझम आणि हायपोथर्मिया या आजारांचे संकते शरीर तुम्हाला देत असतं. तुम्हाला इतरांच्या तुलनेत अधिक थंडी वाजत असल्यास लवकरात-लवकर आपल्या डॉक्टरांकडे जाऊन तपासणी करावी.
अशीच परिस्थिती ओढावल्यास या टिप्स फॉलो करा –
1.गरम तेलानं मसाज करा
थंड पडलेल्या हाता-पायांना गरम तेलानं मसाज करा. तेलानं मसाज केल्यानं हातापायांमध्ये ऊब निर्माण होईल. तसंच रक्तप्रवाह देखील सुधारेल. महत्त्वाचे म्हणजे ऑक्सिजनचे प्रमाण टिकवून ठेवण्यास मदतही होईल.
2.सैंधव मिठानं आंघोळ करा
जास्तच थंडावा जाणवत सैंधव मीठ गरम पाण्यात मिसळा आणि त्यामध्ये जवळपास 15 मिनिटांपर्यंत हात-पाय ठेवावेत. गरम पाण्यामुळे शरीरात रक्ताभिसरण योग्य पद्धतीनं होतं. तसंच सैंधव मिठामुळे शरीरातील मॅग्नेशिअमची पातळीही वाढते, ज्यामुळे तुम्हाला नैसर्गिक उब जाणवेल.
(वाचा : सायटिका आजाराकडे करताय दुर्लक्ष; कंबर, पायांवर होतील दुष्परिणाम)
3. भरपूर प्रमाणात आर्यनचं सेवन करा
थंडीपासून स्वतःचा बचाव करण्याचा सर्वात सोपा उपाय म्हणजे भरपूर प्रमाणात आर्यन असलेल्या आहाराचं सेवन करणे. थंडीमुळे हात-पाय सुन्न होण्याची समस्या उद्भवू नये यासाठी सोयाबीन, खजूर, पालक, सफरचंद, ऑलिव्ह आणि रताळ्यांचं सेवन करावं.
4.डॉक्टरांचा सल्ला घेणेही आवश्यक
हातपाय थंड होण्याची परिस्थिती नियंत्रणात न आल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. सोबतच सतत थकवा जाणवणे, वजन जास्त वाढणं किंवा कमी होणं, ताप आल्यासारखं जाणवणं, गुडघ्यांमध्ये तीव्र वेदना होणे, हात आणि पायांचे तळवे सुजणे अशा स्थितीत डॉक्टरांकडे जाऊन शारीरिक तपासणी करणं गरजेचं आहे.
(वाचा : New Year 2020 : सुट्यांचं कॅलेंडर पाहिलं का, आताच करा फिरायचं प्लानिंग)
हे देखील वाचा
खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop’s मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.