आहाराकडे दुर्लक्ष करण्यात महिला हुशार असतात. घरातील सगळ्या लोकांसाठी आवडीचा पदार्थ करता करता ते स्वत:च्या शरीराला काय आवश्यक आहे ते मात्र विसरुन जातात. अनेकदा राहिलेलं शीळं अन्न खाण्यासही त्या मागे-पुढे पाहत नाही. पण पुरुषांपेक्षा काही गोष्टींची महिलांच्या शरीराला काही गोष्टींची जास्त गरज असते. कामाच्या ओघात तुम्हीही तुमच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करत असाल तर तुमच्या आरोग्यासाठी रोज दोन अंडी खाणे गरजेचे आहे. रोज दोन अंडी खाण्याने असे अफलातून फायदे होतात जे तुमच्यासाठी जाणून घेणे फारच गरजेचे आहे.
कांद्याची पात खा आणि मिळवा अनेक आजारांपासून सुटका
नजर ठेवते चांगली
अंडी खाण्याचे फायदे
जर तुम्हाला तुमची नजर चांगली राहावी असे वाटत असेल तर तुम्ही रोज दोन अंडी खायला हवी. कोंंबडीच्या अंड्यांमध्ये lutein असते. त्याच्या सेवनामुळे तुमची नजर स्पष्ट आणि चांगली होते. त्यामुळे डोळ्यांसाठी तुम्ही अंडी खायला हवीत.
हाड ठेवते मजबूत
महिलांच्या शरीरात अनेक बदल होत असतात. पिरेड्स, प्रेग्नंसी आणि वयपरत्वे त्यांची हाडं ठिसूळ होऊ लागतात. याचे कारण असते कॅल्शिअम. कॅल्शिमच्या कमतरतेमुळे हे त्रास होऊ लागतात. त्यामुळे जर तुम्हाला पुढे जाऊन गुडघेदुखी किंवा सांधेदुखीचा त्रास नको असेल तर तुम्ही दोन अंडी खायला हवीत. अंड्यामध्ये असलेले व्हिटॅमिन D कॅल्शियम शोषून घेण्यास मदत करते. त्यामुळे हाडांना बळकटी मिळते.
डाएटमध्ये असतील असे चमचमीत पदार्थ तर जंक फूड खाण्याचा होणार नाही मोह
वजन ठेवते नियंत्रणात
Andi Khanyache Fayde
थायरॉईड, पिरेड्स, गरोदरपणा, ताणतणाव यामुळे महिलांचे वजन वाढते. जर तुम्हाला तुमचे वजन नियंत्रणात ठेवायचे असेल तर तुम्ही रोज दोन अंडी खायला हवीत. अंड्यामध्ये असलेले कोलेस्ट्रॉलचे घटक तुमच्या शरीरातील फॉस्फाईड नियंत्रणात ठेवण्यास मदत करते. या शिवाय अंड्यामध्ये असलेले ओमेगा 3 तुमचे फॅट नियंत्रणात ठेवते. तुम्ही सकाळी उठल्यानंतर जर उकडलेली अंडी खाल्ली तर तुम्हाला त्याचा फायदा अधिक होऊ शकेल. त्यामुळे महिलांनी रोज नाश्त्यामध्ये अंडी खावी.
आई होऊ इच्छिणाऱ्यांसाठी महत्वाचे
हल्ली कामाचा ताण इतका असतो की तरुणींना वंध्यत्वाचा त्रास अधिक होतो. गर्भधारणेसाठी महिलांना महत प्रयत्न करावे लागतात. तुमच्या चुकीच्या जीवनशैलीचा परिणाम तुमच्या सेक्स हार्मोनवर होत असतो. जर तुम्ही आई होऊ इच्छितात त्यांच्यासाठी अंड्याचे सेवन हे महत्वाचे असते.अंड्यामध्ये असलेले व्हिटॅमिन B9 म्हणजेच फॉलिक अॅसिड बाळाच्या मानसिक स्वास्थ्य चांगले ठेवण्यास मदत करते. तर व्हिटॅमिन B सेक्स हॉर्मोन्सची निर्मिती करते. जर तुम्ही आई बनू इच्छिणार असाल तर तुम्हाला अंड्याचे सेवन करायलाच हवे.
चिरतरुण राहण्याचे रहस्य
अंडी खाण्याचे फायदे
चिरतरुण राहण्यासाठी वरवर करुन काहीच उपयोग नाही तर तुमचा आहारही चांगला लागतो. जर तुम्ही रोज अंडी खाल्ली तर अंड्यामधील व्हिटॅमिन्स आणि प्रोटीन तुमची त्वचा तजेलदार ठेवण्यास मदत करते. तुमची त्वचा लवकर सैल पडत नाही.
*आता अंडी खाण्याचे फायदे जाणून घेतल्यानंतर दोन अंडी रोज खा. पण जर तुम्हाला उष्णतेचा त्रास असेल तर सकाळी एक आणि दुपारी एक असे अंडं खाल्ले तरी चालेल. तुम्हाला अंड्याचे आम्लेट किंवा करी आवडत असेल तरी काहीच हरकत नाही. पण तुम्ही तुमच्या आहारात अंड्याचा समावेश करा. विशेषत: महिलांनी या गोष्टीचा आजपासूनच अवलंब करा.