अनेकदा चेहऱ्याचा रंग आणि पायाचा रंग यामध्ये बराच फरक असतो. दिवसभर तुम्ही ज्या पायांवर चालता ते पाय किती काही सहन करत असतात. तुम्ही कितीही पाय झाकण्याचा प्रयत्न केला तरी तुमच्या पायांना उन लागतेच. पाय एकदा टॅन झाले की, त्याचे टॅनिंग जाता जात नाही. अशावेळी तुम्ही पार्लरमध्ये जाऊन कितीही पेडिक्युअर केले तरी हे टॅनिंग लगेच जात नाही. तुमच्या पायांनाही असे हट्टी टॅन झाले असेल आणि ते जाता जात नसेल तर तुम्ही अगदी सहज घरच्या घरी Whitening pedicure करु शकता. हे करण्यासाठी तुम्हाला थो़डासा वेळ आणि घरातीलच काही वस्तूंची गरज असते. करुया सुरुवात घरच्या घरी करता येईल अशा Whitening pedicureचा
पायांचे सौंदर्य वाढविणारे पेडिक्युअरचे हे प्रकार तुम्हाला माहीत हवे
हे साहित्य करा एकत्र
shutterstock
सगळ्यात आधी तुम्हाला काही गोष्टींची गरज लागणार आहे ते म्हणजे एक टब, काही लिंबांचा रस, बेकिंग सोडा, शॅम्पू, स्क्रबर, बेसन, कॉफी, साखर, टोमॅटो, तांदुळाचे पीठ, बटाट्याचा रस, मध, मॉश्चरायझर क्रिम
मुलायम आणि कोमल पायांसाठी झटपट घरगुती उपाय (Foot Care Tips In Marathi)
आता सुरुवात करुया Whitening pedicureला
shutterstock
- एका भांड्यात कोमट पाणी घेऊन यामध्ये लिंबाचा रस, शँम्पू आणि बेकिंग सोडा घाला. या पाण्यामध्ये तुम्हाला तुमचे पाय छान 10 मिनिटं तरी बुडवायचे आहेत.
- पायांना चोळण्यासाठी तुमच्याकडे लुफा असेल फारच छान. याचा वापर करुन तुम्हाल छान फेस काढून घ्यायचा आहे. जो लिंबू तुम्ही पाण्यात पिळला आहे. त्याची साल तुम्हाला तुमच्या पायला चोळायची आहे. बेकिंग सोडा तुमच्या नखांमध्ये साचलेली घाण काढण्यास मदत करते. तर लिंबाच्य़ा सालीतील ब्लिटिंग एजंट तुमच्या त्वचेचा रंग उजळवण्यास मदत करतात.
- आता वेळ आहे पायांना स्क्रब करण्याची एका भांड्यात कॉफी पावडर, बेसन, साखर घेऊन एकत्र करा. टोमॅटोची स्लाईस घेऊन तयार स्क्रबमध्ये बुडवून तुम्ही तुमच्या पायांना स्क्रब करा. स्क्रबमध्ये वापरलेले सगळे घटक तुमचे टॅन काढण्यासाठी मदत करतात. त्यामुळे तुम्ही छान स्क्रब करुन घ्या.
- थंड पाण्याने पाय स्वच्छ धुवून घ्या. आता वेळ आहे पायांना पॅक लावण्याची आता त्यासाठीही तुम्हाला एका बाऊलमध्ये नैसर्गिक पॅक तयार करुन घ्यायचा आहे. एका भांड्यात तुम्हाला किसलेल्या बटाट्याचा रस, तांदुळाचे पीठ, मध घ्यायचे आहे आणि तो मास्क पायांना लावून किमान 20 मिनिटं तरी ठेवायचा आहे.
- पायांना लावलेले मास्क काढून तुम्हाला पायाला छान मॉश्चरायझर लावायचे आहे.
या Whitening pedicure साठी वापरलेले सगळे घटक नैसर्गिक असल्यामुळे तुम्हाला कोणत्याही प्रकारे त्रास होत नाही. पण जर तुम्हाला यातील काही घटकांचा त्रास होत असेल तर तुम्ही यातील काही गोष्टी टाळल्या तरी चालतील.
आता तुमचेही पाय टॅन झाले असतील तर महिन्यातून किमान 3 वेळा तरी हे ऑरगॅनिक पेडिक्युअर करा आणि पायांचे टॅन घालवा.
#POPxoLucky2020 ने आम्ही देत आहोत या दशकाला निरोप, प्रत्येक दिवशी असेल एक नवीन सरप्राईज, मग नक्की बघा नवीन POPxo Zodiac Collection ज्यामध्ये आहे नोटबुक्स, फोन कव्हर्स आणि मॅजिक मग्ज्स जे आहेत मजेशीर आणि अगदी 100% तुमच्यासारखे. एवढंच नाहीतर यावर आहे 20% डिस्काऊंट, मग लगेच क्लिक करा POPxo.com/shopzodiac आणि शॉप करा. या लिंकवर क्लिक करा https://www.popxo.com/shop/zodiac-collection/