अनेकांच्या घरी शनिवार-रविवारी सुट्टीच्या दिवशी इडली-डोसा असा बेत अगदी हमखास असतो. हल्ली बाजारात रेडिमेड इडली-डोशाचे बॅटर मिळत असल्यामुळे खूप जण कष्टही घेत नाही. पण आजही अनेक जण घरच्या घरी हे बॅटर तयार करतात. तांदूळ-उडीद भिजत घालून ते वाटून आंबवून हे पीठ तयार केले जाते. याला एक वेगळीच चव असते. आता परफेक्ट इडली- डोसा बनवण्याचे प्रत्येकाच्या बॅटरचे प्रमाण वेगवेगळे असते. काही जण एक मूठ उडिद आणि दोन मूठ तांदूळ असा अंदाज घेतात. काही जण चवीसाठी त्यामध्ये काही मेथीचे दाणे घालतात. काही जण पदार्थ फुलावा यासाठी सोडासुद्धा घालतात. तुम्ही असे वेगवेगळे प्रयोग करताना तुमच्या इडली- डोशाचे बॅटर बिनसले आहे का? जर तुमचे उत्तर हो असेल तर मग तुमच्याकडून काही चुका होत आहेत हे नक्की. इडली-डोशाचे पीठ परफेक्ट होण्यासाठी नक्की फॉलो करा या टिप्स
अशा पद्धतीने तयारी केलीत तर तुमची बिर्याणी नेहमीच होईल बेस्ट
असे तयार होते बॅटर
- इडली आणि डोसा यांच्या बॅटरमध्ये बराच फरक असतो. इडलीच्या बॅटरमध्ये तुम्हाला तांदूळ अधिक घालायचे असतात आणि उडीद अगदी नावाला.(बायडिंग एजंट म्हणून) घातले जाते.
- इडलीसाठी बॅटर बनवताना दोन वाट्या तांदूळ (भाकरीसाठी वापरला जाणारा, उकडा किंवा अनपॉलिश कोणताही तांदूळ) आणि एक वाटी उडीद डाळ एकत्र भिजत घातली तरी चालेल.
- तांदूळ आणि उडीद चांगले भिजणे गरजेचे असते. जर ते चांगले भिजले तर ते सरसरीत वाटता येतात. साधारण 8 तास ते भिजायला लागतात. तांदूळ भिजल्यानंतरही तुम्हाला ते सरसरीत वाटून पुन्हा 8 तास ठेवायचे असतात.
- बॅटर वाटताना तुम्हाला त्यामध्ये मीठ घालण्याची गरज नसते. म्हणजे साधारण दोन दिवस आधी तुम्हाला तयारी करावी लागते. ( याचाच कंटाळा करुन अनेक जण बॅटर बनवण्याचा कंटाळा करतात.)
- पीठ फुगून आले हे तुम्हाला कळू शकते. कारण पीठ दुप्पटीने वर येतं. तुम्हाला पीठावर बुडबुडे आलेले सुद्धा दिसतात. जर असे झाले असेल तर तुमचे पीठ तयार झाले असे समजा.
- अनेक जण पीठाची चव अधिक वाढवण्यासाठी त्यामध्ये पोहे किंवा मेथीचे दाणे सुद्धा टाकतात.
ताजे मटार साठवून ठेवण्यासाठी फॉलो करा या स्टेप-बाय-स्टेप टिप्स
बॅटर बनवताना टाळा या चुका
- पीठ आंबण्याची प्रक्रिया ही सर्वस्वी हवामानावर अवलंबून आहे. उन्हाळ्यात पीठ लवकर येते. तर हिवाळ्यात पीठ यायला थोडा उशीर लागतो. त्यामुळे तुम्ही घाई करु नका.
- उडीद अधिक घातल्यामुळे तुमची रेसिपी बिघडण्याची शक्यता असते याचे कारण असे की, उडीद पदार्थ चिवट करते.
- डोसा आणि इडली यांचे बॅटर वेगळे असणे फारच गरजेचे असते. इडली या चिवट असून चालत नाही. त्या हलक्या हव्यात नाहीतर त्या गिळताना फारच चिवट लागतात. त्यामुळे इडलीचे पीठ भिजवताना तांदूळ दोन वाटी असेल तर अर्धी वाटी उडीद घाला. तरच बॅटर छान होईल. तर डोसाचे बॅटर घालताना तुम्हाला दोन वाटी तांदूळला एक वाटी उडीद असे प्रमाण ठेवावे लागते.
- अनेक जण मेथी दाण्याचा वापर करतात. मेथी दाण्यामुळे चव वाढते ही गोष्ट खरी असली तरी त्याच्या अधिक वापरामुळे तुमचे बॅटर कडू होऊ शकते. त्यामुळे जरा जपून ज्यावेळी तुम्ही तांदूळ भिजत घालत असाल त्याचवेळी तुम्हाला काही मेथी दाणे भिजत घालायचे आहेत.
- बॅटर मिक्सरमध्ये वाटताना तुम्हाला पाणी ही जपून घालायचे असते म्हणजे नुसतेच कोरडे वाटून घ्या नंतर आवश्यकतेनुसार पाणी घाला. जर तुमचे पीठ फारच पातळ झाले तर त्याचे डोसे आणि इडली दोन्हीही होऊ शकणार नाही.
- आपल्या घरी वापरला जाणारा रोजचा तांदूळही तुम्हाला या रेसिपीसाठी चालू शकतो. फक्त या रेसिपीसाठी तुम्ही कोणताही फॅन्सी तांदूळ वापरु नका.
- काही जणांच्या इडली या फारच कडक होतात. याचे कारण तुम्ही त्या इडल्या फार वेळ शिजवत असाल असेही असू शकते. साधारण 10 मिनिटं हे इडली शिजण्यासाठी पुरेसे असतात. त्याहून अधिक तुम्ही इडली शिजवली तर त्याचा त्रास तुम्हाला होऊ शकतो. वेगळ्या इडली रेसिपीज करताना ही गोष्ट लक्षात घ्या.
- एकदा बॅटरचा उपयोग करुन झाला की, ते फ्रीजमध्ये ठेवा म्हणजे पीठ आंबणार नाही. खूप जण बॅटर बाहेरच ठेऊन देतात त्यामुळे ते लवकर आंबते.
- जितक्या पीठाचा वापर करणार आहात तितकेच पीठ तुम्ही काढून घ्या. सगळ्या बॅटरमध्ये हात घालू नका.
जर तुमचे बॅटर तुम्हाला जास्त आबंट झाले असेल वाटत असेल तर त्यात नारळाचे दूध घाला.
आता अशापद्धतीने तुम्ही इडली- डोशाचे बॅटर तयार करा.
वाचा – कट बटाटा वडा (Kat Batata Vada Recipe In Marathi)
#POPxoLucky2020 ने आम्ही देत आहोत या दशकाला निरोप, प्रत्येक दिवशी असेल एक नवीन सरप्राईज, मग नक्की बघा नवीन POPxo Zodiac Collection ज्यामध्ये आहे नोटबुक्स, फोन कव्हर्स आणि मॅजिक मग्ज्स जे आहेत मजेशीर आणि अगदी 100% तुमच्यासारखे. एवढंच नाहीतर यावर आहे 20% डिस्काऊंट, मग लगेच क्लिक करा POPxo.com/shopzodiac आणि शॉप करा. या लिंकवर क्लिक करा https://www.popxo.com/shop/zodiac-collection/