ADVERTISEMENT
home / आरोग्य
गरोदरपणात कोरोना व्हायरसपासून कसे सुरक्षित राहाल

गरोदरपणात कोरोना व्हायरसपासून कसे सुरक्षित राहाल

जगभरात सध्या कोरोना व्हायरसच्या भितीचं सावट पसरलं आहे. ज्यामुळे सर्व प्रसार माध्यमांवर कोरोनापासून कसं सुरक्षित राहावे याचा संदेश वेळोवेळी दिला जात आहे. सेलिब्रेटीज असो वा सर्व सामान्य जनता सर्वांनाच याबाबत विशेष काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे. ज्या व्यक्तींची रोगप्रतिकार शक्ती कमी आहे अशा लोकांना या व्हायरसपासून जास्त धोका आहे. म्हणूनच लहान मुले, वृद्ध माणसे आणि गरोदर महिलांनी या काळात स्वतःची विशेष काळजी घेणं फार गरजेचं आहे. यासाठी या काळात गरोदर महिलांनी नेमकी काय काळजी घ्यावी यासाठी ही माहिती  जरूर वाचा.  

Shutterstock

गरोदर महिलांना कोरोना व्हायरसचा का आहे धोका

गरोदरपण हा प्रत्येक महिलेसाठी एक आनंदाचा काळ असतो. मात्र असं असलं तरी या काळात तिची प्रकृती नाजूक झालेली असते. कारण या काळात तिच्या  शरीरात अनेक बदल होत असतात. म्हणूनच डॉक्टर्स आणि घरातील अनुभवी माणसं अशा महिलांना स्वतःची जास्त काळजी घेण्याचा सल्ला देतात. या काळात महिलांनी उघड्यावरचे खाद्यपदार्थ, चायनीज, तेलकट आणि अती मीठाचे पदार्थ, प्रक्रिया केलेले पदार्थ,  कच्चे अथवा अर्धवट शिजवलेले खाद्यपदार्थ मुळीच खाऊ नयेत. यासोबतच जीवनशैलीतदेखील काही बदल गरोदर महिलांनी करणं गरजेचं आहे. गरोदरपण, प्रसूती आणि बाळाचे संगोपन या काळात महिलांनी मद्यपान आणि धुम्रपानदेखील करू नये. कोरोना व्हायरस हा एक संसर्गजन्य विकार आहे. त्याचप्रमाणे  जगभरात या व्हायरसने धुमाकूळ घातला आहे. गरोदर महिलांमधील रोगप्रतिकार शक्ती या काळात कमी झालेली असल्यामुळे अशा महिलांनी संसर्गापासून स्वतःची विशेष काळजी घेण्याची गरज आहे. 

ADVERTISEMENT

Shutterstock

सुरक्षित राहण्यासाठी गरोदर महिलांनी काय काळजी घ्यावी –

गरोदर महिलांना वास्तविक नेहमीच स्वतःची काळजी घेण्याची गरज आहे. मात्र या जागतिक महामारीच्या काळात त्यांनी काही बाबतीत स्वतःची विशेष काळजी घ्यायला हवी. 

यासाठी गरोदर महिलांनी या टिप्स जरूर फॉलो कराव्या –

ADVERTISEMENT
  • शक्य असल्यास वर्क फ्रॉम होम करावे. सध्या सुरू असलेल्या महामारीच्या काळात गरोदर महिलांनी सार्वजनिक ठिकाणी जाणे टाळावे. यासाठी ऑफिसमध्ये विनंती करून वर्क फ्रॉम होम देण्याची विनंती करावी. सध्या सर्व ठिकाणी सुरक्षेसाठी कर्मचाऱ्यांना घरातून काम करण्यालाच प्राधान्य दिले जात आहे. त्यामुळे अशी सुविधा मिळाल्यास घरात ऑफिसचे बसून काम करण्याचा प्रयत्न करावा. 
  • या काळात गरोदर महिलांनी मास्क न लावता कुठेही बाहेर जाऊ नये. खरंतर या काळात मास्क लावण्याची सर्वांनाच गरज आहे. मात्र गरोदर महिलांना मास्कची सर्वात जास्त गरज आहे. कोरोना व्हायरसपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी गरोदर महिलांनी एन 95 या सर्जिकल मास्कचा वापर करावा. घराबाहेर पडण्यापूर्वीच मास्कने नाक आणि तोंड झाकून घ्यावे. हा मास्क उपलब्ध नसल्यास स्वच्छ धुतलेला आणि निर्जंतूक केलेला स्कार्फ चेहऱ्याभोवती लावण्यास काहीच हरकत नाही.
  • घराबाहेर पडल्यावर गर्दीच्या ठिकाणी जाणे शक्य असल्यास टाळावे. त्यासोबत कोणत्याही सार्वजनिक वस्तूला हात लावू नये. जर तुम्ही नकळत सार्वजनिक ठिकाणी असलेले दरवाजे, रेलिंग, लिफ्टची बटणे यांना हात लावला असेल तर त्यानंतर त्वरीत सॅनिटाईझरने हात निर्जंतूक करावे. यासाठी पर्समध्ये एखादे चांगल्या गुणवत्तेचे सॅनिटाईझर जवळ बाळगावे.
  • स्वतःला जास्तीत जास्त हायड्रेट ठेवण्याचा प्रयत्न करावा. घरात अथवा घराबाहेर असताना स्वच्छ आणि निर्जंतूक पाणी प्यावे. यासोबतच फळे अथवा फळांचा रस घ्यावा. ज्यामुळे तुम्ही दिवसभर फ्रेश आणि उत्साही राहाल.  मात्र लक्षात ठेवा फळे खाण्यापूर्वी ती स्वच्छ आणि गरम पाण्याने धुवून घ्यावीत. 
  • डॉक्टरांच्या सल्लानुसार आहार आणि औषधांबाबत असलेले सर्व नियम काटेकोरपणे पाळावेत. या काळात स्वतःची रोगप्रतिकार शक्ती चांगली राहील याची जास्तीत जास्त काळजी घ्यावी. 

फोटोसौजन्य – शटरस्टॉक

हे ही वाचा –

2020 ची सुरुवात करा POPxo च्या नव्या कोऱ्या प्लॅनर्स आणि स्टेटमेंट मेकिंग स्वेटशर्टने. जे आहेत तुमच्यासाठी एकदमच कूल! विशेष म्हणजे यावर तुम्हाला मिळणार आहे 20% ची अतिरिक्त सूट. मग वाट कसली पाहताय लगेचच शॉपिंग करण्यासाठी POPxo.com/shop ला

अधिक वाचा –

ADVERTISEMENT

गरोदरपणात का गळतात केस, जाणून घ्या कारणं

गरोदरपणी ही फळं आवर्जून खावी

गरोदरपणात चुकूनही खाऊ नका हे पदार्थ

19 Mar 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT