27 मार्च 2020 चं राशीफळ, कर्क राशीसाठी दिवस धनलाभाचा

27 मार्च 2020 चं राशीफळ, कर्क राशीसाठी दिवस धनलाभाचा

मेष - कर्ज घेणे आज टाळा

आज कोणतेही कर्ज मुळीच घेऊ नका. वाहन खर्च वाढण्याची शक्यता आहे. रखडलेली कामे पूर्ण होणार आहेत. धार्मिक कार्यातील खर्च वाढणार आहे. रागावर नियंत्रण ठेवा. लहानसहान आजारपणे त्रासदायक ठरतील. 


कुंभ -  कौटुंबिक सहकार्य मिळेल

आज तुमच्या कुटुंबाच्या मदतीमुळे तुम्ही लक्ष्य साध्य करणार आहात. मंगल कार्याची योजना आखाल. सामाजिक प्रतिष्ठा आणि भेटवस्तू मिळणार आहेत. व्यवसायात लाभ मिळण्याची शक्यता आहे. वादविवाद मिटण्याची शक्यता आहे.


मीन-  विद्यार्थ्यांना मेहनतीचे फळ मिळेल

आज राजकारणात तुम्हाला विशेष लाभ मिळेल. विद्यार्थ्यांना मेहनतीचे फळ मिळेल. कामाच्या ठिकाणी उन्नती आणि धनलाभ होईल. नियोजित कामे पूर्ण होतील. समस्या  दूर होण्याची शक्यता आहे. मित्रांसोबत प्रवासाला जाण्याची योजना आखाल. 


वृषभ - जुनाट आजार बरे होतील

आज तुमचे मन शांत आणि निवांत असेल. जुन्या आजारपणातून सुटका होणार आहे. हेल्द रिपोर्ट चांगले येणार आहेत. आत्मविश्वास वाढेल. सामाजिक मानसन्मान वाढण्याची शक्यता आहे. नवीन लोकांशी ओळखी फायदेशीर ठरतील. 


मिथुन - नात्यात कटूपणा येण्याची शक्यता

आज मनात शंका आल्यामुळे नात्यातील कटूपणा वाढणार आहे. कामाच्या ठिकाणी वाद होण्याची शक्यता आहे. वादविवादापासून दूर राहा. वाहन चालवताना सावध राहा. रचनात्मक कार्यात वाढ होईल. देणी घेणी सांभाळून करा. 


कर्क - धनसंपत्तीबाबत शुभसंकेत 

आज तुम्हाला धनसंपत्ती मिळणार आहे. सुखसाधनांमध्ये वाढ होणार आहे. घरातील वृद्ध लोकांची काळजी घ्या. जोडीदाराशी तणाव वाढण्याची शक्यता आहे. मित्रांच्या सोबत व्यवसायानिमित्त प्रवासाला जाल. रचनात्मक कार्यातील रस वाढणार आहे.


सिंह - जोडीदाराची तब्येत सांभाळा

जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्या. प्रवास अथवा कोणतेही नवीन काम सुरू करू नका. कामाच्या ठिकाणी एखाद्या सुखद बातमीने मन प्रसन्न होईल. नात्यातील कटूपणा कमी होईल. बिघडलेली कामे पुन्हा मित्रांच्या मदतीने पूर्ववत होतील. 


कन्या - नवीन संबंध निर्माण होतील

आज नात्यातील कटूपणा कमी होणार आहे. नवीन संबंध पुन्हा निर्माण होतील. नातेवाईकांच्या मदतीने व्यवसायातील समस्या मिटणार आहे. कामाच्या ठिकाणी अधिकाऱ्याची साथ मिळेल. सामाजिक मानसन्मान आणि भेटवस्तू मिळतील. 


तूळ - कामे रद्द होण्याची शक्यता

आज तुमची व्यावसायिक कामे रद्द होण्याची शक्यता आहे. महत्त्वाची कामे वेळेत पूर्ण करा. वादविवाद करणे टाळलेलेच बरे असेल. कौटुंबिक साथ चांगली मिळेल. रखडलेले पैसे परत मिळतील. प्रवासाला जाणे टाळा.


वृश्चिक -  नवीन संपत्ती खरेदी करण्याचा योग

आज एखादी नवीन संपत्ती खरेदी करण्याची चांगला योग आहे. घराच्या सजावटीवर खर्च होण्याची शक्यता आहे. धार्मिक आणि सामाजिक कार्यात प्रतिष्ठा मिळेल. रचनात्मक कार्यात प्रगती होण्याची शक्यता आहे. परदेशी जाण्याचा योग आहे. 


धनु - शैक्षणिक अडचणी येण्याची शक्यता

आज तुमच्या शिक्षणात अडचणी येण्याची शक्यता आहे. आत्मविश्वास कमी होईल. कामाच्या ठिकाणी समस्या निर्माण होऊ शकतात. राजकारणातील सहकार्य वाढणार आहे. प्रेमात अपमान होण्याची शक्यता आहे. 


मकर - आरोग्य बिघडण्याची शक्यता 

आज कामाच्या दगदगीमुळे आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे. आहाराबाबत सावध राहा. जुन्या मित्रांची भेट होईल. उत्पन्नाचे साधन वाढेल. इतरांच्या ससहकार्यांने यश मिळेल. विरोधक नमणार आहेत. 

हे ही वाचा -

2020 ची सुरुवात करा POPxo च्या नव्या कोऱ्या प्लॅनर्स आणि स्टेटमेंट मेकिंग स्वेटशर्टने. जे आहेत तुमच्यासाठी एकदमच कूल! विशेष म्हणजे यावर तुम्हाला मिळणार आहे 20% ची अतिरिक्त सूट. मग वाट कसली पाहताय लगेचच शॉपिंग करण्यासाठी POPxo.com/shop ला भेट द्या.

अधिक वाचा -

राशीनुसार जाणून घ्या तुमच्या जोडीदाराचा स्वभाव

राशीनुसार जाणून घ्या, कशी मिळेल मनाला शांती

राशीनुसार जाणून घ्या कोणता नंबर आहे तुमच्यासाठी भाग्यशाली