ADVERTISEMENT
home / लाईफस्टाईल
#जागतिक पुस्तक दिवस: उत्कृष्ट मराठी कादंबरी यादी (Best Kadambari In Marathi)

#जागतिक पुस्तक दिवस: उत्कृष्ट मराठी कादंबरी यादी (Best Kadambari In Marathi)

वाचाल तर वाचाल…हे वाक्य अगदी खरं आहे. आजच्या सोशल मीडियाच्या जगातही पुस्तकाचं महत्त्व कायम आहे. म्हणूनच दरवर्षी 23 एप्रिलला जागतिक पुस्तक दिवस (World Book Day) साजरा केला जातो. युनेस्कोतर्फे आणि भारतातही या दिवशी अनेक कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. तसंच दरवर्षी या दिवसाची एक थीमही ठरवली जाते. जागतिक पुस्तक दिवसाचा हेतू आहे लोकांमध्ये वाचनाची रूची वाढवणे. तसंच पुस्तकांच्या जगातला कॉपीराईट हा महत्त्वाचा मुद्दाही या दिवशी प्रामुख्याने जोर धरतो. आपल्याला रोमँटिक, कल्पनारम्य, छत्रपती शिवाजी महाराजांवरील पुस्तके, नॉन फिक्शन, थ्रिलर किंवा भयपट कादंबर्‍या आवडतील. याचमुळे या दिवसाला जागतिक पुस्तक आणि कॉपीराईट दिवस म्हणूनही ओळखलं जातं. याच दिवसाच्या निमित्ताने POPxoMarathi तुमच्यासाठी घेऊन आलं आहे खास मराठी कादंबरी यादी. जर तुम्ही वाचनवेडे असाल आणि चांगल्या मराठी पुस्तकांच्या (best marathi novels of all time) शोधात असाल तर ही मराठीतील दर्जेदार पुस्तक तुमच्या कलेक्शनमध्ये असलीच पाहिजेत.

मृत्यूजंय (Mrityunjaya by Shivaji Sawant)

मराठीतील प्रसिद्ध कादंबऱ्यांपैकी असलेली ही कादंबरी लिहीली आहे लेखक शिवाजी सावंत यांनी. महाभारतमधील ‘कर्ण’ या व्यक्तीरेखेवर आधारित ही मराठी कादंबरी आहे. या कादंबरीला अनेक पुरस्कारही मिळाले आहेत. ही कादंबरी मुख्यतः कर्णावर आधारित आहे. पण या कादंबरीचं वैशिष्ट्य म्हणजे यात एकाच व्यक्तीरेखेची गोष्ट नाही. तर महाभारतातील विविध व्यक्तीरेखा या पुस्तकातून आपल्या भेटीस येतात आणि त्यांचा जीवनपट उलगडतात. कादंबरीच्या शेवटही उल्लेखनीय आहे. हा शेवट जाणून घेण्यासाठी एकदा तरी ही कादंबरी वाचलीच पाहिजे.

Goodreads Rating :  4.5/5

बेस्ट रोमॅंटिक कादंबरी (Romantic Novels in Marathi)

ADVERTISEMENT

ययाती (Yayati by V. S. Khandekar)

वि.स.खांडेकराची ही प्रसिद्ध कांदबरी पौराणिक घटनांवर आधारित आहे. एका राजाच्या जीवनावर आधारित ही कथा असून ती सहज आणि साध्या पद्धतीने मांडण्यात आली आहे. या कांदबरीची भाषा श्रृंगारिक आहे. कथा छोटीशीच असली तरी ती अगदी तंतोतंत दृश्य स्वरूपात आपल्यासमोर मांडण्यात लेखकाला यश आलं आहे. या कादंबरीतील प्रमुख पात्र म्हणजे ययाती, देवयानी, शर्मिष्ठा आणि कच ही आहेत. ययाती या वि स खांडेकरांच्या कादंबरीला साहित्य अकादमी पुरस्काराने आणि जनपीठ पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे

Goodreads Rating : 4.6/5

माझी जन्मठेप (Mazi Janmathep by V.D. Savarkar)

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचं हे आत्मचरित्र असून ते सावरकरांनी अंदमानमध्ये काळ्यापाण्याची शिक्षा भोगत असताना आलेल्या अनुभवांवरील आहे. या चरित्रामध्ये सावरकरांच्या वीर रसाने ओथंबलेली अनेक रोमहर्षक पर्वे आहेत. आपल्या जीवनाची रोमांचकारी कथाच जणू माझी जन्मठेप या आत्मकथेत वीर सावरकरांनी सांगितली आहे. 

Goodreads Rating :  4.37/5

ADVERTISEMENT

श्रीमान योगी (Shriman Yogi by Ranjeet Desai)

शिवाजी टिकतो, की नाही, हा प्रश्न नाही. राज्य टिकतं, की नाही, हा सवाल आहे. राज्य राखलंत, तर असे दहा शिवाजी येतील! श्रीमान योगी ही ऐतिहासिक कादंबरी असून ती छत्रपती शिवाजी महाराजांचं जीवन आणि कार्यावर आधारित आहे. रणजीत देसाई यांनी याचं लेखन केलं असून त्यांच्या उत्कृष्ट पुस्तकांपैकी एक मानलं जातं. काळजाला हात घालणाऱ्या मराठा योद्ध्याचंवरील हे पुस्तक प्रत्येक इतिहासप्रेमीने वाचलंच पाहिजे. 

Goodreads Rating :  4.50/5

बटाट्याची चाळ (Batatyachi Chal by P. L. Deshpande)

बटाट्याची चाळ हे पुस्तक अगदी कोणीही वाचू शकतं. इतक्या सहज भाषेत ते लेखक पु ल देशपांडे यांनी लिहीलं आहे. पुलंनी लिहीलेल्या पुस्तकात 1940 च्या भारताचं वर्णन आलं आहे. ही कथा गिरगावातील बटाट्याच्या चाळीवर बेतलेली आहे. तिथे राहणारे मध्यमवर्गीय आणि इतर रहिवासी जसे संगीत शिक्षक, शाळेतील शिक्षक, क्लर्क म्हणून चाकरी करणारे. त्यांच्या स्वभाववर्णनाभोवती विनोद गुंफण्यात आले आहेत. यातील पात्र द्वारकानाथ गुप्ते, बाबा बर्वे, कोचरेकर, काशीनाथ नाडकर्णी, जनोबा रेगे, समेळ काका, कुशाभाऊ आक्शीकर आणि रघुनाना सोमण ही तुमच्या नक्कीच लक्षात राहतील. इतकी त्यांची छान व्यक्तीवर्णन पुलंनी केली आहेत. मला आजही आठवतंय दहावीची परीक्षा संपताच मी सर्वात आधी हे पुस्तक विकत घेतलं होतं.  

Goodreads Rating :  4.8/5

ADVERTISEMENT

पानिपत (Panipat by Vishwas Patil)

पानिपताचा खरा इतिहास जाणून घ्यायचा असल्यास या पुस्तकाला पर्याय नाही. या लढाईवर आलेला चित्रपट पाहण्यापेक्षा हे पुस्तक वाचल्यास जास्त चांगलं ठरेल. विश्वास पाटील यांनी लिहीलेली ही कादंबरी खरंतर सगळ्यांकडे असलंच पाहिजे. पानिपतावर झालेल्या तिसऱ्या युद्धाची कथा यात आहे. जे जानेवारी 14,1761 ला झालं होतं. मराठा सैन्य आणि अहमद शहा अब्दालीमध्ये झालेल्या या युद्धाबाबतच्या सर्व बाबी या कादंबरीत आहेत. मराठीत लिहीलेलं पुस्तक नंतर इंग्रजी भाषेतही भाषांतरित करण्यात आलं.  

Goodreads Rating :  4.35/5

दुनियादारी (Duniyadari by Suhas Shirvalkar)

मराठीतील प्रसिद्ध लेखक सुहास शिरवळकरांची ही कांदबरी खरी प्रसिद्धीस आली ती दुनियादारी हा चित्रपट आल्यावर. जी तुम्हाला तुमच्या कॉलेजच्या दुनियेत ही कांदबरी नक्कीच नेईल. जर तुम्ही तेव्हा एन्जॉय केलं नसेल तर ही कादंबरी नक्कीच वाचा. ही कादंबरी 70 च्या दशकातली असली तरी यातील कॉलेजमधील स्लँग आणि जोक्स तुम्हाला आजही अपील करतात. इतके ते छान सुहास शिरवळकरांनी पकडले आहेत. हे पुस्तक वाचायला हातात घेतल्यावर ते पूर्ण केल्याशिवाय तुम्ही खाली ठेवणारच नाही.

Goodreads Rating :  4.23/5

ADVERTISEMENT

वाचा – कुसुमाग्रज यांची माहिती किंवा परिचय

पार्टनर (Partner by V. P. Kale)

व पु काळेंची लोकप्रियता वेगळी सांगण्याची गरज नाहीच. वपुंचं अत्यंत लोकप्रिय पुस्तक म्हणजे पार्टनर. या पुस्तकावर आधारित मराठी चित्रपटही आला आहे. मध्यम वर्गातला श्री, त्याचा मित्र म्हणजेच पार्टनर आणि श्रीची बायको किरण यांच्या अवतीभवती ही कथा फिरते. सामान्य माणसाच्या आयुष्यात घडणाऱ्या घटना वपु यांनी छान रंगविल्या आहेत. मुख्य म्हणजे या पुस्तकातील संवाद अप्रतिम आहेत. मात्र या पुस्तकाचा शेवट मात्र आपल्या अंगावर येतो. या पुस्तकातील काही प्रसिद्ध वाक्य – 

– पोरगी म्हणजे झुळूक… 

– the more and more you write perosnal, it becomes more and more universal. 

ADVERTISEMENT

Goodreads Rating :  4.08/5

मुसाफिर (Musafir by Achyut Godbole)

अच्युत गोडबोले हे व्यक्तिमत्त्व म्हणजे अर्थशास्त्र, संगीत, साहित्य, राजकारण, समाजशास्त्त्र आणि आयटी यासारख्या सगळ्या क्षेत्रात मुशाफिरी केलेलं असं आहे. त्यांच्याच कारकिर्दीचा वेध त्यांनी या पुस्तकात घेतला आहे. आपल्या वाचकांसमोर त्यांनी अभ्यासपूर्ण आपली मुशाफिरी पुस्तकरूपाने मांडली आहे. अगदी बालपणची सोलापूरमधली शाळा ते आयआयटी आणि आदिवासी भागापासून ते अमेरिकावारी असे त्यांच्या आयुष्यातील विविध पैलू त्यांनी इथे मांडले आहेत. बेकारी ते चीनी व्यावसायिक अशा सर्व विचारांवर त्यांनी लिखाण केलं असून या लिखाणाला त्यांच्या बुद्धी, चिंतन आणि उर्जेची साथ मिळाली आहे. त्यामुळे हे पुस्तक जो वाचेल त्याला नक्कीच काहीतरी नवीन मिळेल यात शंका नाही. 

Goodreads Rating :  4.27/5

राधेय (Radhey by Ranjit Desai)

राधेय या कादंबरीत लेखक रणजीत देसाई यांनी एका महत्त्वाच्या प्रश्नावर भाष्य केलं आहे. तो प्रश्न म्हणजे जे योग्य आहे ते करणं याविरूद्ध जे आपलं कर्तव्य ते करणं. जे महाभारतातील कर्णाच्या भूमिकेतून मांडण्यात आलं आहे. या पुस्तकातून देसाई यांनी वाचकांपर्यत हे पोचवण्याचा प्रयत्न केला आहे की, प्रत्येकवेळी युद्ध जिंकण हा जरी हेतू असला ती आपण हरण्यासाठीही मनाची तयारी केली पाहिजे. या पुस्तकातून वाचकांना कर्णाबद्दल आणि त्याच्या परिस्थितीबद्दल शिकायला मिळतं. त्याने महाभारतात जे स्थान मिळवलं ते अविस्मरणीय आहे. कर्णाला कधीच कुटुंबाचं प्रेम मिळालं नाही. आयुष्यभर त्याची फरफट झाली. खरंतर ही कादंबरी म्हणजे कर्णाला ट्रीब्यूट आहे, जो आपल्या मित्राशी प्रामाणिक राहण्यासाठी स्वतःच्या कुटुंबाशी लढला. खरंतर या कादंबरीतून देसाई यांनी कर्म कथा सार सांगितले आहे. 

ADVERTISEMENT

Goodreads Rating :  4.17/5

शाळा (Shala by Milind Bokil)

मुकुंद जोशी वय वर्ष फक्त 14 आणि नुकताच प्रेमात पडलेला. खाजगी शिकवणीला आपल्या मित्रांसोबत जाणारा आणि शिरोडकर नावाच्या मुलीची एक झलक मिळवण्यासाठी तिचा रोज घरापर्यंत पाठलाग करणारा. पण दुखाःची बाब ही की, तिला याबद्दल काहीच माहीत नाही. कारण त्यांच्या समाजात मुलंमुली कोणीही एकमेंकाशी मोकळेपणाने बोलत नाही. त्यातही खासकरून प्रेमाबद्दल. महाराष्ट्रातल्या छोट्याश्या खेड्यातील आणीबाणीच्या काळातील ही कथा. जी लेखक मिलिंद बोकील यांनी लिहीली आहे. या कांदबरीवर चित्रपटही आला होता. पौगंडावस्थेतील प्रेमकथा बोकील यांनी उत्कृष्टपणे मांडली आहे. 

Goodreads Rating :  4.23/5

व्यक्ती आणि वल्ली (Vyakti Ani Valli by P.L.Deshpande)

व्यक्तीचित्रण करण्यात मराठीतील प्रसिद्ध लेखक पु ल देशपांडेची ख्याती आहे. व्यक्ती आणि वल्ली हे त्यांनी केलेल्या काही पात्रांच्या वर्णनाचा संग्रह आहे. ही सर्व पात्रं आयुष्यातील खऱ्या व्यक्तींवर आणि घटनांवर आधारित आहेत. वीस वर्षांचा कालावधी म्हणजे 1944 ते 1968 या काळात पुलंनी हे पुस्तक लिहीलं असून यामध्ये 20 कथा आहेत. नारायण ते गंपू अशी विविध ढंगी पात्र व्यक्ती आणि वल्लीमध्ये आपल्याला भेटतात. यातील सर्वात गाजलेलं पात्र म्हणजे सखाराम गटणे. या पुस्तकाला साहित्य अकादमी पुरस्कारही मिळाला होता.  

ADVERTISEMENT

Goodreads Rating :  4.51/5

एक होता कार्व्हर (Ek Hota Carver by Veena Gavankar)

30 वर्षांपूर्वी वीणा गवाणकर यांनी लिहीलेलं आफ्रिकन-अमेरिकन शास्त्रज्ञ आणि शेतीतज्ञ जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर आत्मचरित्र आजही मराठीतील बेस्ट सेलर्सपैकी एक आहे. एका माणसाचा आयुष्यातील सर्व अडथळ्यांना पार करून यशाच्या दिशेने केलेला प्रवास आहे. कार्व्हर यांनी बॉटनी आणि शेतीसाठी दिलेलं योगदान अमूल्य आहे. गवाणकर यांनी साध्या सोप्या आणि सरळ शब्दात कार्व्हर यांचा हा प्रवास मांडला आहे. आता हे पुस्तक ऑडिओ रूपातही उपलब्ध असून याच्या 34 वेळा आवृत्ती काढण्यात आल्या आहेत.  

Goodreads Rating :  4.20/5

श्यामची आई (Shyamchi Aai by Sane Guruji)

प्रत्येक घरात असलेच पाहिजे असे हे पुस्तक आहे. साने गुरूजींनी लिहीलेलं हे पुस्तक मराठी साहित्यातील अजरामर कलाकृती आहे. कित्येक दशकं उलटूनही हे पुस्तक आजही तितकंच परिणामकारी आहे. या पुस्तकात आईचं प्रेम आणि आईने आपल्या मुलांना दिलेलं शिकवण आहे. खासकरून श्याम म्हणजे साने गुरूजी यांच्या उत्तम माणूस म्हणून घडण्याची कथा यात आहे. या पुस्तकाची सुरूवात शाम आपल्या आश्रमातील मुलांना आईच्या आठवणी कथे स्वरूपात सांगतो अशी आहे. प्रत्येक कथेत काही ना काही शिकवण आहे. ब्रिटीश काळातील ग्रामीण महाराष्ट्र आणि गरीब परिस्थितीतील कुटुंब व त्यांच्या समस्या यात आहेत. या पुस्तकाच्या शेवटी तुमच्या डोळ्यात नकळत पाणी येते. 

ADVERTISEMENT

Goodreads Rating :  4.38/5

कोसला (Kosla by Bhalchandra Nemade)

कोसला ही अशी कादंबरी आहे जी आपल्या निर्व्याजपणे जगण्याची शिकवण देते. कोसलाचं लेखक भालचंद्र नेमाडे, ज्यांनी लिखाणाची सुरूवात या कादंबरीने केली. जीवनाचा एक नवा पैलू त्यांनी या पुस्तकातून जगासमोर मांडला. या पुस्तकाचे नंतरही भाग आले बिधर, हूल, जरीला आणि झूल. नेमाडे यांना भारतातील साहित्य विश्वातील अनेक नामवंत पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे. कोसला ही मराठीतील उत्कृष्ट कादंबरींपैकी एक आहे.  

Goodreads Rating :  4.11/5

हेही वाचा –

ADVERTISEMENT

मराठीतील हे दर्जेदार साहित्य तुम्ही आवर्जून वाचायलाच हवे

लहान मुलांना वाचनाची गोडी कशी लावाल

घरातील लायब्ररी कशी ठेवता येईल स्टायलिश आणि स्वच्छ

06 Apr 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT