लॉकडाऊनमुळे देशातील सगळ्याच गोष्टी ठप्प आहेत. मनोरंजन विश्वालाही खीळ बसली आहे. अनेक चित्रपटांचे आणि मालिकांचे शुटींग रखडले आहेत. इतकेच नाही तर जे चित्रपट मार्च ते एप्रिलच्या काळात रिलीज होणार होते. तेही या कालावधीत होऊ शकलेले नाहीत. पण आता आलिया भटच्या एका चित्रपटावर मोठे संकंट आले आहे. संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘गंगुबाई काठियावाडी’ या चित्रपटावर हे संकंट फिरतयं. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या चित्रपटाचा सेट तोडण्यात येणार आहे. संजय लीला भन्साळी यांनीच हा सेट तोडण्याच्या सूचना देण्यात आल्याचे देखील कळत आहे.
मराठमोळ्या ‘राधाकृष्ण’ सुमेध मुदगरलकरचा डान्स पाहून तुम्हीही व्हाल अवाक
का दिल्या सेट तोडण्याच्या सूचना
गंगुबाई काठियावाडीचा सेट मुंबईमध्ये उभारण्यात करण्यात आला होता. 1960 सालातील कामाठीपुराची प्रतिकृती या ठिकाणी उभारण्यात आली होती. या चित्रपटातील आलिया भटचा लुकही रिलीज करण्यात आला होता. या चित्रपटाचे शुटींगही सुरु झाले होते. पण लॉकडाऊननंतर या चित्रपटाचे शुटींग जे बंद पडले ते पुन्हा सुरुच झाले नाही.आता या सेटचा खर्च आणि त्याची देखभाल करणे निर्मात्यांनाही फार कठीण जात आहे. ज्या पैशांमध्ये चित्रपटाचे शुटींग पूर्ण होईल पण आता याचा देखभालीचा खर्च परवडत नसल्यामुळेच हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता लॉकडाऊन संपेपर्यंत या चित्रपटाचा सेट पुन्हा उभारला जाईल असे वाटत नाही.
कर्करोगग्रस्त रुग्णांना केस दान करण्यासाठी या अभिनेत्रीने केले टक्कल
रिअल लाईफ स्टोरी रीलवर
हल्लीचा काळ हा रिअललाईफ स्टोरी पडद्यावर दाखवण्याचा आहे. म्हणजेच हल्लीचा काळ हा बायोपिकचा आहे. गंगुबाई काठियावाडी ही स्टोरीसुद्धा खरीखुरी आहे. आतापर्यंत अनेकांनी गुगल करुन ही व्यक्ती कोण आहे ते शोधून काढले असेल. पण ज्यांना माहीत नसेल त्यांना ही माहिती द्यायला आवडेल की, मुंबई की माफिया क्वीन्स या पुस्तकात गंगुबाई काठियावाडीचा उल्लेख आहे. गंगुबाई काठियावाडी हिला अगदी लहान वयात वैश्याकामासाठी कामाठीपुरामध्ये आणले होते. या कामाठीपुरामध्ये अनेक गुंड यायचे. त्यावेळी करीम लालाची अनेक माणसे या कामाठीपुरात येत असतं. गंगुबाई काठियावाडीवर करीम लालाच्या एका माणसाने बलात्कार केला. आपल्यावर झालेला अन्याय सांगून न्याय मिळवण्यासाठी गंगुबाईने थेट करीम लालाला गाठले. त्याला झालेला सगळा प्रकार सांगितला. करीम लालाला राखी बांधून आपला भाऊ बनवले आणि आपली रक्षा करण्यास सांगितले. करीम लालाने त्यानंतर कामाठीपुराची सगळी सुत्र गंगुबाईकडे देऊन टाकली. त्यानंतर येथील कोणत्याही मुलीवर तिच्या मर्जीशिवाय शरीरसंबध करण्याची परवानगी नव्हती. गंगुंबाई यांनी वैश्यांच्या मुलांसाठीही खूप केले.
खर्च करणे झाले आहे कठीण
गंगुबाई काठियावाडीच नाही तर अनेक शुटींग्सना याचा फटका बसला आहे.मालिकांची काहीच कमाई नसल्यामुळे काही मालिका या बंद करण्याचा निर्णयही प्रोडक्शन हाऊसकडून घेण्यात आला आहे. आता याचा फटका चित्रपटांनाही बसू लागला आहे. त्यामुळे पुढील काळात मनोरंजनसृष्टीलाही याचा मोठा फटका बसणार आहे.
त्यामुळे लॉकडाऊनमुळेच गंगुबाई काठियावाडी या चित्रपटाचा सेट तोडण्यात आला आहे.