‘आओ सुनाऊ तुम्हें अंडे का फंडा’ हे गाणं तर आपण ऐकलं आहे आणि याची मजाही घेतली आहे. मात्र केसांच्या वाढीसाठी घरगुती उपाय मधील एक उपाय म्हणजे अंडी आहेत. तुम्हाला केसांची उत्तम वाढ आण पोषण हवे असेल तर तुम्ही नियमित अंड्याचा हेअर मास्क वापरायला हवा. अंडे खाण्याने प्रोटीन मिळते हे तर सर्वांनाच माहीत आहे. पण अंड्यामुळे केसांची उत्तम वाढ होते आणि केसांना उत्तम पोषण मिळते हेदेखील तितकेच खरे आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे अंडे हे अगदी सहजरित्या उपलब्ध होते. त्याशिवाय याचे अनेक फायदे आहेत. केवळ केसगळती थांबवण्यासाठी नाही तर केसांची वाढ होण्यासाठी याचा उत्तम फायदा होतो. या लेखामध्ये आम्ही अंड्याचा हेअर मास्क कसा बनवायचा आणि तो कसा वापरायचा, त्याच्याबरोबर तुम्ही कोणत्या गोष्टी मिक्स करू शकता. तसेच कोरडे केस, तेलकट केस आणि कॉम्बिनेशन स्वरूपाचे केस असतील तर अंड्याचा कसा उपयोग करून घ्यायचा याबद्दल सांगणार आहोत.
केसांच्या वाढीसाठी अंड्याचा हेअर मास्क कसा वापरावा (Egg Hair Mask For Hair Growth)
Shutterstock
केसांची वाढ होण्यासाठी नक्की काय करायला हवे आणि कोणत्या केसांसाठी कशाप्रकारे अंड्याचा हेअर मास्क वापरायला हवा याची सविस्तर माहिती आम्ही आपल्याला देत आहोत. पाहूया मग सर्वात आधी कोणत्या केसांसाठी कशाप्रकारे वापरावा अंड्याचा हेअर मास्क –
कॉम्बिनेशन केसांकरिता (Egg Mask For Combination Hair)
Shutterstock
साहित्य
- एक पूर्ण अंडे (केस लांब असतील तर तुम्ही दोन अंड्याचा वापर करा)
- 1 चमचा ऑलिव्ह ऑईल
बनवण्याची आणि वापरण्याची पद्धत
- एक बाऊलमध्ये अंडे आणि ऑलिव्ह ऑईल मिक्स करून नीट फेटून घ्या
- आता हे मिश्रण केसांवर लावा. लक्षात ठेवा की हे मिश्रण तुमच्या केसांना व्यवस्थित लागले पाहिजे
- हे तुम्ही 20 मिनिट्स लाऊन तसेच ठेवा
- त्यानंतर हे तुम्ही थंड पाण्यानेच धुवा. गरम पाण्याचा वापर अजिबात करू नका. कारण असं केल्यास, अंड्याचा वास केसात तसाच राहील
- त्यानंतर केसांना शँपू लावा आणि कंडिशनर लाऊन स्वच्छ करा
किती वेळा लावावे? – आठवड्यातून तुम्ही हे एक किंवा दोन वेळा करू शकता.
कसे ठरते फायदेशीर?
हा हेअर मास्क तुमच्या केसांना चांगले कंडिशन करण्यासाठी फायदेशीर ठरतो तसेच तुमच्या स्काल्पमधील तेल संतुलित ठेवण्यासाठीही याचा फायदा होतो. यामुळे तुमच्या केसांचे मुळापासून चांगले पोषण होते. केसांचे टेक्स्चर सुधारण्यासाठीही याची मदत होते. तसेच केसांची वाढ चांगली होते. तुम्ही ऑलिव्ह ऑईलचा वापर पर्यायी करू शकता. पण अंड्यात तेल घातल्याने केस अधिक मुलायम होता. तसंच व्यवस्थित कंडिशनिंग चांगले होते.
कोरड्या केसांकरिता (Egg Mask For Dry Hair)
Shutterstock
साहित्य
- दोन अंड्याचा पिवळा भाग
- 1 चमचा ऑलिव्ह ऑईल
बनवण्याची आणि वापरण्याची पद्धत
- एक बाऊलमध्ये अंड्याचा पिवळा भाग आणि ऑलिव्ह ऑईल नीट मिक्स करून फेटून घ्या
- आता हे मिश्रण तुमच्या पूर्ण केसांना नीट लावा
- हे मिश्रण केसांवर सुकेपर्यंत तसंच राहू द्या
- मिश्रण सुकल्यानंतर थंड पाण्याने शँंपू आणि कंडिशनर लाऊन केस धुवा
किती वेळा लावावे? – आठवड्यातून तुम्ही हे एक किंवा दोन वेळा करू शकता.
कसे ठरते फायदेशीर?
ऑलिव्ह ऑईल आणि अंड्याच्या पिवळ्या भागाचे हे मिश्रण केसांसाठी योग्य कंडिशनर म्हणून वापरता येते. हे तुमच्या केसांना मुलायम आणि चमकदार बनवण्यासाठी उपयुक्त ठरते. तसंच स्काल्प आणि केसांना योग्य पोषण देण्यासाठी याचा उपयोग होतो. तसंच केस वाढण्यासाठीही याची मदत होते. कोरड्या केसांना तेलाची गरज असते. त्यासाठी हे मिश्रण अत्यंत उपयोगी ठरतं.
तेलकट केसांसाठी (Egg Mask For Oily Hair)
Shutterstock
साहित्य
- दोन अंड्याचा सफेद भाग
- 1 चमचा ऑलिव्ह ऑईल
बनवण्याची आणि वापरण्याची पद्धत
- एक बाऊलमध्ये अंड्याचा सफेद भाग आणि ऑलिव्ह ऑईल घालून फेटून घ्या आणि याचे व्यवस्थित मिश्रण बनवा
- आता हे मिश्रण केसांना लावा आणि किमान अर्धा तास तसंच ठेवा
- सुकल्यानंतर केसांना शँपू आणि कंडिशनर लावा आणि परिणाम पाहा
किती वेळा लावावे? – आठवड्यातून तुम्ही हे एक किंवा दोन वेळा करू शकता.
कसे ठरते फायदेशीर?
हे मिश्रण केसातील तेल नियंत्रित करण्यासाठी मदत करते आणि केसांचे टेक्स्चर अधिक सुधारण्यासाठीही याचा फायदा मिळतो. तसंच केस घनदाट बनवण्यासाठी या हेअर मास्कचा उपयोग होतो. यामध्ये असणारे ऑलिव्ह तेल हे केसांना चांगले कंडिशनिंग मिळावे यासाठी वापरले जाते.
अंड्याचे हेअर मास्क (Egg Hair Masks)
अंड्याचे विविध हेअर मास्क वापरता येतात. त्यामुळे ते कसे वापरायचे आणि त्याचा वापर कसा करायचा हे आपण यातून पाहणार आहोत. अंड्याबरोबर आपण वेगवेगळ्या पदार्थांचा वापर करून केसांचे पोषण चांगले होण्यासाठी फायदे करून घेऊ शकतो.
1. अंडे आणि कोरफड (Egg and Aloe Vera)
Shutterstock
साहित्य
- दोन अंड्याचा सफेद भाग
- 2 चमचे कोरफड जेल
बनवण्याची आणि वापरण्याची पद्धत
- एका भांड्यात वरील सर्व साहित्य मिक्स करा
- हे मिश्रण आपल्या केसांना लावा. लक्षात ठेवा की, हे मिश्रण तुम्ही सर्व केसांना व्यवस्थित लावाल
- हे साधारण एक तास तसेच ठेवा आणि सुकू द्या
- त्यानंतर थंड पाण्याने केस शँपू आणि कंडिशनरसह धुवा
किती वेळा लावावे? – आठवड्यातून तुम्ही हे एक किंवा दोन वेळा करू शकता.
कसे ठरते फायदेशीर?
कोरफड जेलमध्ये अमिनो अॅसिड, ग्लुकोमॅनन्स, स्टेरोल्स, लिपीड आणि विटामिन्स हे सगळे घटक असतात. हे पोषक तत्व आपल्या केसांना आणि स्काल्पला योग्य पोषण देते. कोरफड जेलमधील अँटीइन्फ्लेमेटरी, अँटिसेप्टिक आणि मॉईस्चराईजिंग गुण स्काल्पला निरोगी राखतात. यामुळे केस अधिक निरोगी राहतात आणि लवकर वाढण्यास मदत मिळते.
केसांना मजबूती देण्यासाठी वापरा हे हेअर ऑईल्स
2. अंडे आणि मेंदी (Egg And Mehndi)
Shutterstock
साहित्य
- 2 चमचे मेथी दाणे
- 1 कप मेंदी पावडर
- 1 अंड्याचा पिवळा भाग
बनवण्याची आणि वापरण्याची पद्धत
- एका भांड्यात रात्रभर मेथी दाणे भिजत घाला
- सकाळी मेंदी पावडरमध्ये थोडे पाणी मिक्स करा. (तुम्हाला मेंदीचा रंग गडद हवा असेल तर मेंदी दोन तास आधी पाण्यात भिजवून ठेवा)
- आता मेथी दाणे वाटून घ्या आणि त्यात मेंदी पावडर आणि अंड्याचा पिवळा भाग मिक्स करून नीट फेटून घ्या
- हे मिश्रण केसांना आणि स्काल्पवर लावा आणि एक तासासाठी तसंच ठेवा
- त्यानंतर केसांना हल्का शँपू लावा आणि थंड पाण्याने केस धुवा आणि नंतर पुन्हा कंडिशनर लाऊन केस धुवा
किती वेळा लावावे? – आठवड्यातून तुम्ही हे एक वेळा करू शकता.
कसे ठरते फायदेशीर?
मेंदी थंड असते आणि यामध्ये केसांना आणि स्काल्पला थंडावा देणारे गुण आढळतात. यामध्ये अँटीमायक्रोबियल गुण असतात जे स्काल्प निरोगी राखण्यास मदत करतात. हा हेअर मास्क केसांमधील तेल नियंत्रित करतो आणि केसांमध्ये अधिक चमक आणण्यास उपयोगी ठरतो. तसंच यामुळे कोंडा आणि केसगळती रोखण्यासही मदत होते आणि केसांना योग्य पोषण मिळते.
3. अंडे आणि नारळाचे तेल (Egg And Coconut Oil)
Shutterstock
साहित्य
- एक पूर्ण अंडे
- एक चमचा नारळाचे तेल
बनवण्याची आणि वापरण्याची पद्धत
- एका भांड्यात अंडे आणि नारळाचे तेल घेऊन नीट फेटा आणि त्याचे मिश्रण तयार करा
- हे मिश्रण आपल्या पूर्ण केसांवर लावा आणि 20 मिनिट्स तर सुकू द्या
- त्यानंतर थंड पाण्याने शँपू आणि कंडिशनर लाऊन केस स्वच्छ धुवा
किती वेळा लावावे? – आठवड्यातून तुम्ही हे एक किंवा दोन वेळा करू शकता.
कसे ठरते फायदेशीर?
नारळ तेलामध्ये भरपूर प्रमाणात फॅटी अॅसिड आढळते, जे केसांना कंडिशन करते आणि केसांना तुटण्यापासून आणि कोरडे होण्यापासून वाचवते. यामध्ये अँटीबॅक्टेरियल गुणही आढळतात. जे तुमच्या स्काल्पला अधिक निरोगी बनवण्यासाठी उपयुक्त ठरते. तसंच यातील विटामिन हे मुळापासून पोषण देऊन केसांना अधिक मजबूत करतात.
4. अंडे आणि केळे (Egg And Banana)
Shutterstock
साहित्य
- एक केळे
- एक पूर्ण अंडे
- एक चमचा ऑलिव्ह ऑईल
बनवण्याची आणि वापरण्याची पद्धत
- एका भांड्यात सर्वात पहिले एक केळे नीट मॅश करून घ्या. यामध्ये अजिबात गुठळी ठेऊ नका. हवं तर मिक्सरमधून वाटून घ्या
- आता यात एक पूर्ण अंडे आणि ऑलिव्ह ऑईल मिक्स करा आणि व्यवस्थित मिश्रण तयार करून घ्या
- हा हेअर मास्क तुम्ही केसांना लावा आणि साधारण अर्धा तास तसाच राहू द्या
- त्यानंतर केस थंड पाण्याने धुवा आणि शँपू, कंडिशनरचा वापर करा
किती वेळा लावावे? – आठवड्यातून तुम्ही हे एक किंवा दोन वेळा करू शकता.
कसे ठरते फायदेशीर?
तुमचे केस जर कोरडे आणि निस्तेज झाले असतील तर तुम्ही हा हेअर मास्क वापरा. केळ्यामध्ये पोटॅशियम आणि विटामिन बी चे प्रमाण असते आणि यामध्ये मॉईस्चराईजिंगचे गुणही आढळतात. पोटॅशियम केसांना मजबूत बनवते आणि हेअर मास्कमधील विटामिन बी स्काल्प आणि निस्तेज केसांना अधिक पोषण देतात. तसंच केसांना अधिक घनदाट बनवतात.
कढीपत्त्याचा हेअर मास्क तयार करून मिळवा सुंदर केस
5. अंडे आणि अव्हॅकॅडो (Egg And Avocado)
Shutterstock
साहित्य
- अर्धे शिजलेले अव्हॅकॅडो
- एक अंड्याचा पिवळा भाग
बनवण्याची आणि वापरण्याची पद्धत
- अव्हॅकॅडो नीट मॅश करून घ्या. यामध्ये गुठळ्या राहू देऊ नका
- आता यामध्ये अंड्याचा पिवळा भाग मिक्स करून नीट फेटून घ्या
- हे मिश्रण केसांना नीट लावा आणि 20 मिनिट्स केस सुकू द्या
- त्यानंतर केस थंड पाण्याने शँपू आणि कंडिशनर लाऊन धुवा
किती वेळा लावावे? – आठवड्यातून तुम्ही हे एक किंवा दोन वेळा करू शकता.
कसे ठरते फायदेशीर?
अव्हॅकॅडो हा अँटिऑक्सिडंटचा मुख्य स्रोत आहे. यामध्ये विटामिन ए, ई, डी, बी6, अमिनो अॅसिड्स आणि मिनरल्स हे सर्व गुण असतात. हे पोषक तत्व तुमच्या स्काल्प आणि केसांना पोषण देतात आणि त्यांना वाढण्यासाठी उपयुक्त ठरतात. तसंच यामुळे केस तुटणे बंद होते आणि हा हेअर मास्क वापरल्याने कोरडे आणि फाटे फुटलेले केसही चांगले होतात.
6. अंडे आणि एरंडाचे तेल (Egg And Castor Oil)
Shutterstock
साहित्य
- 1 – 2 अंडे
- एक चमचा एरंडाचे तेल
बनवण्याची आणि वापरण्याची पद्धत
- एका भांड्यात अंडे आणि एरंडाचे तेल मिक्स करून फेटून घ्या. अंड्याचा पिवळा आणि पांढरा भाग नीट एकत्रित होतोय की नाही हे पाहून घ्या
- आता हा तयार हेअर मास्क केसांना लावा
- अर्धा तास केसांवर तसंच सुकू द्या
- त्यानंतर केस थंड पाण्याने शँपू आणि कंडिशनर लाऊन धुवा
किती वेळा लावावे? – आठवड्यातून तुम्ही हे एक किंवा दोन वेळा करू शकता.
कसे ठरते फायदेशीर?
एरंडाच्या तेलामध्ये जास्त प्रमाणात प्रोटीन असते जे तुमच्या केसांसाठी उपयुक्त ठरते. यामध्ये रिसिनोलिक अॅसिडही असतं, जे केसांचा विकास करण्यासाठी अधिक फायदेशीर ठरते. तसंच केसांची गळती होण्यापासून हे थांबवते. हे केसांना घनदा करण्यासाठी सर्वात चांगल्या उपायापैकी एक ठरते.
7. अंडे आणि आवळ्याची पावडर (Egg And Amla Powder)
Shutterstock
साहित्य
- 2 अंडे
- अर्धा कप आवळा पावडर
बनवण्याची आणि वापरण्याची पद्धत
- एका भांड्यात अंडे आणि आवळ्याची पावडर घ्या आणि मिक्स करा
- आता हे फेटलेले मिश्रण तुम्ही संपूर्ण केसांना लावा
- एक तास तसंच ठेवा
- त्यानंतर केस थंड पाण्याने शँपू आणि कंडिशनर लाऊन धुवा
किती वेळा लावावे? – आठवड्यातून तुम्ही हे एक वेळा करू शकता.
कसे ठरते फायदेशीर?
आवळा हे तुमचे ब्लड सर्क्युलेशन वाढवण्यास फायदेशीर ठरते. यामुळे हेअर फॉलिकल्सना संपूर्ण प्रमाणात पोषण मिळते. तसंच तुमचे केस अधिक मजबूत होतात आणि केसगळतीही थांबते. यामध्ये जास्त प्रमाणात अँटिऑक्सिंडंट्स असतात जे तुम्हाला नुकसान होण्यापासून वाचवतात.
8. अंडे आणि दही (Egg And Yogurt)
Shutterstock
साहित्य
- एका अंड्याचा पिवळा भाग
- एक कप दही
बनवण्याची आणि वापरण्याची पद्धत
- अंडे आणि दही एकत्र करून व्यवस्थित फेटून घ्या आणि एक चांगले मिश्रण तयार करून घ्या
- आता संपूर्ण केसांना हा हेअर मास्क लावा
- अर्धा तास तसेच ठेवा
- त्यानंतर केस थंड पाण्याने शँपू आणि कंडिशनर लाऊन धुवा
किती वेळा लावावे? – आठवड्यातून तुम्ही हे एक किंवा दोन वेळा करू शकता.
कसे ठरते फायदेशीर?
दह्यामध्ये प्रोटीन, विटामिन्स आणि मिनरल्स असतात जे आपल्या केसांना आणि स्काल्पसाठी आवश्यक असतात. दह्याबरोबर मिक्स करण्यात आलेला पिवळा भाग हा केसांना अधिक चांगले कंडिशन करतो. तसंच केसांना अधिक मजबूत करण्यासाठी याचा उपयोग होतो.
9. अंडे आणि मेथी दाणे (Egg And Fenugreek Seeds)
Shutterstock
साहित्य
- एक पूर्ण अंडे
- 2 चमचे मेथी दाणे
बनवण्याची आणि वापरण्याची पद्धत
- मेथी दाणे रात्रभर पाण्यात भिजवा
- सकाळी याची पेस्ट बनवा आणि त्यामध्ये अंडे मिक्स करून फेटून घ्या
- ही पेस्ट केसांना लावा आणि एक तास तसेच राहू द्या
- त्यानंतर केस थंड पाण्याने शँपू आणि कंडिशनर लाऊन धुवा
किती वेळा लावावे? – आठवड्यातून तुम्ही हे एक किंवा दोन वेळा करू शकता.
कसे ठरते फायदेशीर?
स्काल्प निरोगी राखण्यासाठी मेथी दाण्यांचा फायदा होतो. यामध्ये प्रोटीनचे प्रमाण अधिक असते. जे तुमची केसगळती रोखण्यासाठी मदत करतात आणि यातील विटामिन सी केसांना वाढण्यासाठी मदत करते. तसंच कोंडा आणि पांढऱ्या केसांसाठीही हे उपयुक्त ठरते.
10. अंडे आणि कांदा (Egg And Onion)
Shutterstock
साहित्य
- दोन अंडी
- 1 चमचा कांद्याचा रस
बनवण्याची आणि वापरण्याची पद्धत
- एका भांड्यात अंडी आणि कांद्याचा रस घालून नीट फेटून घ्या
- हा हेअर मास्क संपूर्ण केसांना लावा
- अर्धा तास केसांवर हे मिश्रण तसंच राहू द्या
- त्यानंतर केस थंड पाण्याने शँपू आणि कंडिशनर लाऊन धुवा
किती वेळा लावावे? – आठवड्यातून तुम्ही हे एक वेळा करू शकता.
कसे ठरते फायदेशीर?
कांद्याच्या रसामध्ये सल्फर असते जे स्काल्पसाठी फायदेशीर ठरते. तसेच नवे केस येण्यासाठीही याचा चांगला उपयोग होतो. सल्फर हे कोलेजनचे उत्पादन वाढवण्यास मदत करते. हा हेअर मास्क रक्तप्रवाह वाढण्यासही मदत करतो आणि तुमच्या फॉलिकल्सना चांगले पोषण मिळवून देतो.
केसगळती रोखण्यासाठी वापरा घरगुती 5 सोपे हेअर मास्क
प्रश्नोत्तरे (FAQs)
1. केसांवर अंड्याचा वापर करणे योग्य आहे का?
अंड्यामुळे केसांना चांगले पोषण मिळते. मुळात यातील प्रोटीन केसांना अधिक मजबूत आणि चमकदार करण्यासाठी उपयुक्त ठरतात. मात्र याचा अतिवापर करू नये. आठवड्यातून एकदा याचा वापर करावा.
2. केसांच्या वाढीसाठी अंड्यांच्या हेअर मास्कचा उपयोग होतो का?
हो केसांच्या वाढीसाठी अंड्याच्या हेअर मास्कचा उपयोग होतो. हेअर मास्क रक्तप्रवाह वाढण्यासही मदत करतो आणि तुमच्या फॉलिकल्सना चांगले पोषण मिळवून देतो.
3. अंड्यांच्या हेअर मास्कचा सर्वात चांगला फायदा कोणता?
तुमच्या केसांचे मुळापासून चांगले पोषण होते. केसांचे टेक्स्चर सुधारण्यासाठीही याची मदत होते. तसेच केसांची वाढ चांगली होते. अंडे हे केसांसाठी उत्तम कंडिशनर म्हणून वापरता येते.