ADVERTISEMENT
home / आरोग्य
Jeshthamadh Powder Benefits In Marathi

जाणून घ्या जेष्ठमधाचे फायदे (Jeshthamadh Benefits In Marathi)

ज्येष्ठमध हे अत्यंत गुणकारी औषध असून महिलांसाठी वरदान आहे. ज्येष्ठमधाचे फायदे अनेक आहेत. तुम्ही ज्येष्ठमध पावडर वापरू शकता. ज्येष्ठमध खाण्याचे फायदे आम्ही तुम्हाला या लेखातून सांगणार आहोत. केवळ शारीरिक नाही तर ज्येष्ठमधाचे तुमच्या त्वचेसाठीही फायदे होतात. ज्येष्ठमध असो वा ज्येष्ठमध पावडर फायदे (jeshthamadh powder benefits in marathi) दोन्हीचे आहेत. आपण नक्की आपल्यासाठी याचे काय आणि कसे फायदे होतात ते बघणार आहोत. पण त्याआधी ज्येष्ठमधाच्या किती पद्धती आहेत आणि ज्येष्ठमध म्हणजे नक्की काय ते जाणून घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे. कारण बऱ्याच जणांना ज्येष्ठमध म्हणजे नक्की काय आणि त्याचा फायदा कसा करून घेता येतो याची माहिती नाही. ज्येष्ठमध (mulethi in marathi) हे हिंदीमध्ये मुलेठी या नावाने ओळखले जाते. बऱ्याच ठिकाणी याची ओळख याच नावाने आहे. बघूया मग नक्की काय आहेत जेष्ठ मधाचे फायदे. 

ज्येष्ठमध म्हणजे काय? (What Is Mulethi In Marathi)

ज्येष्ठमध - Jeshthamadh Benefits In Marathi

ज्येष्ठमध (mulethi in marathi), यष्ठीमध अथवा मुलेठी या नावाने हे औषध ओळखण्यात येते. दक्षिण युरोप आणि आशिया खंड या दोन्ही ठिकाणी ही वनस्पती आढळते. पिवळसर, लंबगोलाकार, मूळ आणि खोडापासून याच्या फांद्या निघतात. हे झाड साधारण सहा फूट उंचीचे असते. मात्र याचा उपयोग त्वचा आणि आरोग्यासाठी औषध म्हणून केला जातो. ज्येष्ठमध हे बहुगुणी औषध आहे. हे अतिशय शीत असून पित्तनाशक, विषनाशक म्हणून उपयोगाला येते. हे अतिशय गुणकारी औषध असून बलदायक आणि बुद्धीवर्धकही आहे. चवीला गोड असणाऱ्या ज्येष्ठमधामध्ये कॅल्शियम, ग्लिसारायजक अॅसिड, अँटिऑक्सिडंट्स, अँटिबायोटिक तत्व असतात. तसेच यामध्ये प्रथिनांचे प्रमाणही आहे. ज्येष्ठमध हे वात, कफ, पित्त या दोषांना शमवते आणि त्यामुळेच अनेक रोगांवर याचा रामबाण इलाज उपयोगी ठरतो.

ज्येष्ठमधाचे प्रकार (Types Of Mulethi In Marathi)

 

ज्येष्ठमध हे दोन प्रकारचे असते. स्थलज आणि जलज. 

ADVERTISEMENT

जलजाला ज्येष्ठमध – याला मधुपर्णी असेही नाव आहे. हे ज्येष्ठमध दुर्मिळ असून फारच कमी ठिकाणी सापडते.
तर दुसरा प्रकार म्हणजे स्थलज ज्येष्ठमध. हे बऱ्याच ठिकाणी सापडते. या दोन्हीचा उपयोग आपल्या आरोग्य आणि त्वचेसाठी आपल्याला करता येतो. मिसरी, अरबी, तुर्की हेदेखील प्रकार यामध्ये असतात. पण यामधील गोडी तुम्हाला वेळेनुसार कमी झालेली दिसून येते. 

त्रिफळा चूर्ण फायदे मराठीत

आरोग्यासाठी ज्येष्ठमधाचे फायदे (Jeshthamadh Health Benefits In Marathi)

आरोग्यासाठी ज्येष्ठमधाचे फायदे - Jeshthamadh Benefits In Marathi

 

ज्येष्ठमधाचे अनेक उपयोग आहेत. यापैकी सर्वात जास्त उपयोग हा आपल्या आरोग्यासाठी करता येतो. याचा नक्की कसा वापर करायचा आणि कोणत्या त्रासावर याचा उपयोग होतो ते आपण बघूया.

ADVERTISEMENT

तोंडातील अल्सर काढण्यासाठी

 

शरीरात उष्णता जास्त असेल तर बरेचदा तोंड येणे अर्थात तोंडात अल्सर होण्याचा त्रास बऱ्याच जणांना सहन करावा लागतो. त्यासाठी आपण ज्येष्ठमधाचा वापर करू शकतो. ज्येष्ठमध गाळून घ्या अथवा ज्येष्ठमधाची पावडर, त्यात गाऊचे तूप आणि तिळाचं तेल घाला आणि हे मिश्रण तोंडाला लावा अथवा नाकात घाला. यामुळे अल्सर निघून जाण्यास मदत मिळते. 

अॅसिडीटी

 

ही समस्या कोणाला झाली नाही अशी एकही व्यक्ती नसेल. यासाठी तुम्ही ज्येष्ठमध चूर्णासह मध, आवळा पावडर आणि तूप मिक्स करून मिश्रण बनवा आणि हे चाटण तुम्ही खाल्ल्यानंतर तुमची अॅसिडीटीची समस्या दूर होण्यास मदत मिळेल. 

अतिसार

 

कधीतरी हा त्रास होतोच. पण त्यावेळी घाबरून न जाता तुम्ही ज्येष्ठमधाचा उपयोग करून घेऊ शकता. त्यासाठी तुम्ही ज्येष्ठमध, जायफळ, डाळिंबाच्या सालीची पावडर, खडीसाखर याचा काढा करून प्या. यामुळे तुम्हाला लगेच फरक जाणवले. जर तुम्हाला काढा करायचा नसेल तर तुम्ही ज्येष्ठमधाच्या चूर्णाचं तुपाबरोबर चाटण करूनही खाऊ शकता. 

तुमच्या प्रायव्हेट पार्टजवळ आलेले रॅश दूर करण्यासाठी

प्रायव्हेट पार्टजवळ आलेले रॅश - Benefits Of Mulethi In Marathi

ADVERTISEMENT

 

कधीतरी अति घाम अथवा सतत चालण्याने आपल्या शरीराच्या प्रायव्हेट पार्टजवळ रॅश येतात. हा भाग अतिशय नाजूक असतो. मग अशावेळी काय करायचं. घरगुती उपाय म्हणून तुम्ही ज्येष्ठमधाचा यासाठी वापर करू शकता. ज्येष्ठमध पावडर आणि शंखभस्म या दोन्हीचे मिश्रण करून तुम्ही ती पावडर त्या जागी लावा. पण हे करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या. कारण तुमची ही जागा अतिशय संवेदनशील असते आणि त्यामुळे कोणताही उपचार त्यावर करण्याआधी तुम्हाला योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे.  

उचकी थांबवण्यासाठी

 

बरेचदा पाणी पिऊनही उचकी थांबत नाही. मग अशावेळी आपण नाक बंद करतो अथवा मध चाटतो. पण तरीही उचकी थांबत नसेल तर तुम्ही नुसता मध न खाता ज्येष्ठमधाच्या चूर्णामध्ये मध घाला आणि हे चाटण खा. तुम्हाला परिणाम लगेच दिसून येईल.

उपवासाला उपयोगी ठरतात साबुदाणे, जाणून घ्या फायदे

उलटी करताना रक्त येणे

 

कधीतरी उलटीचा त्रास होत असेल आणि उलटी करताना रक्त आले तर घाबरून जाऊ नका. कधीतरी तुम्हाला जेवणातून त्रासदायक पदार्थ पोटात गेल्याने असे होण्याची शक्यता असते. त्यावेळी तुम्ही ज्येष्ठमध पावडर आणि पांढरे चंदन हे दुधातून उगाळून त्याचे मिश्रण तयार करा आणि हे चाटण तुम्ही खाल्ल्यास तुमचा हा त्रास बंद होईल. 

ADVERTISEMENT

घशाची खवखव थांबवण्यासाठी

 

कधीकधी घशाची खवखव काही केल्या थांबत नाही अथवा घसा सतत दुखत असेल तर अशावेळी ज्येष्ठमध हा सर्वात रामबाण उपाय आहे. ज्येष्ठमधाची पावडर, तूप, गूळ आणि मध याचे चाटण तयार करून दिवसभरात दोन ते तीन वेळा अगदी थोडे थोडे चाटावे. यामुळे लगेचच दोन दिवसात तुमच्या घशाची खवखव थांबण्यास मदत मिळते. 

तापासाठी

 

ताप हा नेहमी येतो जातो. पण तुम्हाला जर डॉक्टरच्या औषधानेही गुण येत नसेल तर तुम्ही तापावर घरच्या घरी औषध म्हणून ज्येष्ठमधाचा वापर करू शकता. तापावर आयुर्वेदिक औषध हे नेहमीच गुणकारी ठरते. त्यातही ज्येष्ठमधाची पावडर, त्यात मनुका, मोहाचे फूल, वाळा, त्रिफळा हे सर्व मिक्स करून समप्रमाणात कुटून घ्या. रात्रभर गरम पाण्यात भिजवा आणि सकाळी हे पाणी प्या. यामुळे तुम्हाला त्वरीत गुण मिळेल. 

अंगावर उठणाऱ्या पित्तासाठी

 

आपल्यापैकी काही जणांनां अंगावर पित्त उठण्याचा त्रास असतो. पण त्यावर ज्येष्ठमध हा अतिशय गुणकारी उपाय आहे. त्यासाठी जास्त कष्टही घ्यावे लागत नाही. तुम्ही ज्येष्ठमध उगाळून दुधातून घेतलं तर त्याचा परिणाम लगेच तुम्हाला दिसून येईल. तुमच्या अंगावर उठलेले पित्त घालवण्यासाठी हा रामबाण इलाज आहे. 

जखम भरण्यासाठी

जखम भरण्यासाठी - Benefits Of Mulethi In Marathi

ADVERTISEMENT

 

बरेचदा शरीरावर झालेल्या जखमा पटकन बऱ्या होत नाहीत. डॉक्टरांनी दिलेले मलमही त्यावर काम करत नाही. मग अशावेळी आपण ज्येष्ठमधाचा उपयोग करून घेऊ शकतो. ज्येष्ठमधाचा काढा तयार करावा आणि ती जखम धुवावी. तसेच ज्येष्ठमध पावडरमध्ये तूप मिक्स करून जखमेवर लावल्यास, जखम बरी होण्यास मदत मिळते.

आरोग्य आणि चवीचा खजिना आहे जायफळ (Benefits Of Jaiphal In Marathi)

मानसिक बुद्धीसाठी

 

शरीरासह मनही आजारी असू शकतं. त्याचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे आपली बुद्धी कोणता विचार करतेय हे आहे. पण तुम्ही ज्येष्ठमध चूर्ण नियमित दुधाबरोबर सेवन केलं तर तुम्हाला मनःशांती मिळण्यास मदत मिळते. हे अतिशय शांत औषधी असून तुम्हाला शरीरात थंडावा निर्माण करण्यासाठी आणि आपसुकच त्यामुळे मनावरही थंडावा निर्माण करण्यासाठी उपयुक्त ठरते. 

मासिक पाळीच्या त्रासात उपयोगी

 

मासिक पाळीचा त्रास हा प्रत्येक महिलेला होत असतो. त्यासाठी आपण बरेच इलाजही करत असतो. पण त्यामध्ये तुम्ही ज्येष्ठमधाचा वापर करून पाहा. तुम्ही ज्येष्ठमध पावडर, दूध, साखर, उडदाचे पीठ, मध हे सर्व एकत्र करून त्याचे सेवन करा. यामुळे मासिक पाळीचा त्रास सहन करण्यासाठी मदत मिळते. तसंच तुमचा त्रासही कमी होतो.

ADVERTISEMENT

 

त्वचेसाठी ज्येष्ठमधाचे फायदे (Benefits Of Jeshthamadh For Skin In Marathi)

आरोग्याप्रमाणेच आपल्या त्वचेसाठी आपण ज्येष्ठमधाचा उपयोग करून घेऊ शकतो. याचा सर्वात जास्त उपयोग होतो तो आपली त्वचा अधिक चमकदार करण्यासाठी. जाणून घेऊया काय आहेत फायदे

त्वचा चमकदार करण्यासाठी

चमकदार त्वचा कोणाला नको असते? प्रत्येकालाच आपली त्वचा नेहमी चमकदार आणि ताजीतवानी दिसावी असे वाटत असते. त्यासाठी आपण ज्येष्ठमधाचा वापर करून घेऊ शकतो. यष्टीमधू आणि ज्येष्ठमधाची पावडर एकत्र करून याचा लेप आपण चेहऱ्याला लावला आणि त्याचा नियमित वापर केला तर आपल्या चेहऱ्याचा रंग उजळण्यास मदत होते. तसेच चेहरा उजळून अधिक चमकदार होतो. यामुळे त्वचा गुलाबी होते आणि मुलायमदेखील होते.

चेहऱ्यावरील मुरूमं घालवण्यासाठी

महिलांसाठी चेहऱ्यावर मुरूमं येणं ही सर्वात मोठी समस्या ठरते. त्यासाठी बरेचदा पार्लरच्या फेऱ्या माराव्या लागतात. पण आता तसं करण्याची गरज नाही. घरच्या घरीही याचे निवारण होऊ शकते. त्वचेवर मुरूमं येत असल्यास ज्येष्ठमध उगाळून त्याचा आलेला लेप हा त्याठिकाणी लावावा. यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील मुरूमं जाण्यास मदत मिळते. 

ADVERTISEMENT

डोळ्यांसाठी टॉनिक

डोळ्यांसाठी टॉनिक - Benefits Of Mulethi In Marathi

आपली दृष्टी चांगली राहावी यासाठी ज्येष्ठमधाचा वापर करता येतो. ज्येष्ठमध, त्रिफळाचूर्ण, लोहभस्म, दूध आणि गाईचे तूप सर्व एकत्र करून प्यावे. त्यामुळे दृष्टी चांगली राहाते. तसंच यामुळे तुम्हाला कोणतेही नुकसान होत नाही. ज्येष्ठमध ही औषधी वनस्पती असल्याने तुमच्या शरीराला त्याचे अधिकाधिक फायदे मिळतात. ज्येष्ठमधाच्या काढ्याने डोळे धुतल्यास डोळ्याचे विकार दूर होण्यास मदत मिळते. 

काळ्या तांदुळाचे फायदे, ठरतात आरोग्यासाठी फायदेशीर

प्रश्नोत्तरे (FAQ’s)

1. ज्येष्ठमध कसे घ्यावे? किती प्रमाणात घ्यावे?
ज्येष्ठमध तुम्ही उगाळून अथवा पावडर स्वरूपातही घेऊ शकता. मध, त्रिफळाचूर्ण अथवा अन्य गोष्टींबरोबरे हे तुम्हाला घेता येते. साधारण 3 ते 5 ग्रॅमपर्यंत तुम्ही याचा वापर करून घेऊ शकता. तसेच हे वापरताना तुम्हाला अन्य आयुर्वेदिक चूर्णांचाही उपयोग करून घेता येतो. 

ADVERTISEMENT

2. ज्येष्ठमधामुळे काही नुकसान होते का?
कोणत्याही  गोष्टीचा अतिवापर हा नुकसानदायी ठरू शकतो. तसे तर ज्येष्ठमधाने काहीही नुकसान होत नाही. पण तुम्ही त्याचा अतिवापर करणे योग्य नाही. अन्यथा यामुळे तुमच्या त्वचेवर त्याचा अयोग्य  परिणाम होण्याची शक्यता असते.  

3. ज्येष्ठमधामध्ये कोणते घटक असतात?
ज्येष्ठमधामध्ये कॅल्शियम, ग्लिसारायजक अॅसिड, अँटिऑक्सिडंट्स, अँटिबायोटिक तत्व असतात. तसेच यामध्ये प्रथिनांचे प्रमाणही आहे. 

24 Apr 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT