पडद्यावर वेगवेगळ्या भूमिका साकारणे हे प्रत्येक कलाकाराचे स्वप्न असते. पण असे करताना एखाद्या कलाकाराने ग्रे शेडची भूमिका निभावली म्हणजेच व्हिलन साकारला की, त्याची प्रतिमा ही कायमस्वरुपी व्हिलची होऊन जाते. पण असे काही कलाकार आहेत त्यांनी त्यांची इमेज बदलून व्हिलनची भूमिका चित्रपटात अगदी यशस्वीपणे निभावली आहे. इतकेच काय लोकांनाही त्यांनी साकारलेली भूमिका आवडली आहे. आज आपण अशाच काही अभिनेत्री पाहणार आहोत ज्यांनी हिरोईनचा रोल सोडून चक्क व्हिलन साकारला.
शकुंतला देवी नंतर आता ‘शेरनी’ व्हायचं आहे विद्या बालनला, लवकरच सुरू होणार शूटिंग
काजोल
अभिनेत्री काजोलला आपण आतापर्यंत अनेक वेगवेगळ्या भूमिकांमध्ये पाहिले आहे. काजोलने प्रत्येक चित्रपटात प्रमुख अभिनेत्रीची भूमिका साकारली आहे. अशी हिरोईन जी खूप सुंदर आणि चांगली आहे. पण 1997 साली आलेल्या ‘गुप्त’ या चित्रपटात तिने ग्रे शेड असलेली भूमिका साकारली होती. या चित्रपटात तिचा अंत हा पोलिसांच्या गोळीने होतो. यामध्ये काजोलने इशा नावाची भूमिका तिने साकारली होती. तिने अनेक खून या चित्रपटात केले असे दाखवण्यात आले होते. काजोलच्या अभिनयाची ही बाजून अनेकांना आवडली. पण त्यानंतर काजोलने कधीही कोणत्याही चित्रपटात व्हिलनची भूमिका साकारली नाही.
तबू
अभिनेत्री तबूने तिच्या उमेदीच्या काळात कायमच गोड अशा कौटुंबिक मुलीची भूमिका साकारली. पण तबू ग्रे शेड असलेल्या भूमिकांमध्ये उठून दिसू शकते हे ‘अंधाधुन’ या चित्रपटात कळू शकले. आयुषमान खुराना, राधिका आपटे स्टारर या चित्रपटाची संपूर्ण संकल्पना वेगळी होती. या चित्रपटात आपल्या पतीचा खून करणारी तबू कशाप्रकारे आयुषमानला शेवटपर्यंत पोलिसांत जाण्यापासून कशी रोखते हे दाखवण्यात आले आहे. व्हिलनसाठी आवश्यक असलेली चपळता, मग्रुरी तिने स्क्रिनवर फारच छान पद्धतीने वठवले.
मुझसे शादी करोगे’फेम अभिनेत्रीचा अपघात, फोटो व्हायरल
कंगना रणौत
कंगना रणौतने ही आतापर्यंत सोशिक, प्रेमळ अशा भूमिका साकारल्या आहेत. सिनेमाचा प्लॉट कितीही वेगळा असला तरी देखील तिची भूमिका ही मुख्य हिरोईन अशीच असते. पण ‘क्रिश ३ ’मध्ये तिचे एक वेगळे रुप पाहायला मिळाले. तिने या चित्रपटात चक्क एका व्हिलनची भूमिका साकारली होती. हॉलिवूडच्या अभिनेत्रींना टक्कर देईल असा तिचा लुक या चित्रपटात दाखवण्यात आला होता. तोही अनेकांच्या पसंतीला उतरला.
बॉलिवूडच्या या अभिनेत्रींची ओळख आहे त्यांची उंची
विद्या बालन
विद्या बालनने ‘डर्टी पिक्चर’ सारखा बोल्ड चित्रपट केला असला तरी त्यामध्ये तिची भूमिका ग्रे शेडकडे झुकणारी नव्हती. पण तिने ‘इश्किया’ या चित्रपटात साकारलेली ग्रे शेडची भूमिका आजही कित्येकांच्या लक्षात आहे. विद्या बालनने नेहमीच तिच्या चित्रपटातील भूमिकांना न्याय दिला आहे. तिची ही भूमिकाही अनेकांना आवडली होती.
प्रियांका चोप्रा
मिस वर्ल्ड असलेली प्रियांका चोप्रा दिसायला अत्यंत सुंदर, हुशार पण तरी देखील तिने एक चॅलेंज म्हणून व्हिलनची भूमिका अनेकदा स्विकारली आहे. करीअरच्या सुरुवातीलाच प्रियांका चोप्राने एक चित्रपट केला होत तो म्हणजे ‘ऐतराज’ या चित्रपटातील तिचा अभिनय आजही अनेकांच्या लक्षात आहे. अक्षय कुमारला फसवू पाहणारी बॉस (प्रियांका चोप्रा) आणि तिच्या विरुद्ध लढा देणारी करीना कपूर असा या चित्रपटाचा प्लॉट होता. चित्रपटातील प्रियांकाचा हॉट अंदाज अनेकांना आवडला. त्यानंतर तिने ‘सात खून माफ’ या चित्रपटातही खूनीची भूमिका साकारली.
फिल्मी करीअरमध्ये काहीतरी वेगळे आपल्या नावी असायला हवे. म्हणून या अभिनेत्रींनी चॅलेंज म्हणून व्हिलनची भूमिका साकारली आणि ती चांगलीच प्रसिद्ध केली.