ADVERTISEMENT
home / Fitness
या पदार्थांच्या सेवनामुळेही होऊ शकतो अॅसिडिटीचा त्रास

या पदार्थांच्या सेवनामुळेही होऊ शकतो अॅसिडिटीचा त्रास

खाण्याच्या चुकीच्या वेळा. खाण्याच्या पद्धती आणि लाईफस्टाईल याचा परिणाम आपल्या पचनशक्तीवर होतो आणि आपल्याला ‘अॅसिडिटी’चा त्रास होतो. तुम्ही जर नीट निरीक्षण केले असेल तर तुम्हाला अॅसिडिटिचा इतर कारणांसहीत काही खास पदार्थांच्या सेवनानंतर जास्त होतो असे जाणवेल. दिवसभरात आपण बऱ्याच गोष्टींचे सेवन करतो. या खाद्यपदार्थांमध्ये या काही खाद्यपदार्थांचा समावेश असेल तर तुम्हाला हमखास अॅसिडीटीचा त्रास होऊ शकतो (काहींचा अनुभव हा वेगळा देखील असू शकतो. अॅसिडिटीच्या कारणांचा विचार करता हे पदार्थ अॅसिडिटी चाळवण्यासाठी कारणीभूत असतात)

पोह्यांचे सेवन

पोह्यांचे सेवन

Instagram

नाश्त्याला मस्त चमचमीत कांदे पोहे असतील तर दिवस अगदी मस्त जातो. पण काहींच्या बाबतीत असे ठरत नाही. काहींना हेच कांदे पोहे त्रासदायक ठरतात. खूप भूक लागली की, ऑफिसच्या खाली जाऊन एक प्लेट कांदे पोहे खाण्याची अनेकांना सवयच लागलेली असते. पण कांदे पोहे खाल्ल्यानंतर अनेकांना अॅसिडिटीचा त्रास होतो. पोहे खाल्ल्यानंतर सतत ढेकर येणे, डोकं दुखणे आणि मळमळल्यासारखे वाटणे असे काही त्रास होऊ लागतात. जर तुम्ही उपाशी पोटी दररोज पोह्यांचे सेवन करत असाल तर तुम्हाला हा त्रास अगदी हमखास जाणवणारच 

ADVERTISEMENT

तेलकट पदार्थ

बटाट्याचे वेफर्स

Instagram

अॅसिडीटी आणि इतर अनेक पोटांच्या विकारांसाठी तेलकट पदार्थ कारणीभूत असतात.  वडापाव, भजीपाव, समोसा, वेफर्स असे तळलेले पदार्थ खाण्याची इच्छा झाली की आपण वेळ काळ काही पाळत नाही. ज्यावेळी वेळ मिळेल त्यावेळी आपण त्या पदार्थांचे सेवन करतो. पण अनेकदा उपाशीपोटी किंवा भूकेला हे खाद्यपदार्थ खाल्ले की, ते हमखास बाधतात. अनेकांना नाहक अॅसिडिटीचा त्रास होऊ लागतो. मुळात असे पदार्थ समोर आले की, ते जास्त खायला नको याचे भान आपल्याला राहात नाही. त्यामुळेच हा त्रास आपल्याला होऊ लागतो. 

अॅसिडीटीचा होतोय त्रास मग तुम्ही करा हे घरगुती उपाय (Home Remedies For Acidity In Marathi)

ADVERTISEMENT

आंबट पदार्थ

सांबारसारखे आबंट पदार्थ

Instagram

उपाशीपोटी आंबट पदार्थ खाणेही खूप जणांना बाधते तर काही जणांना आंबट पदार्थांच्या सेवनामुळे अॅसिडिटी बरी होते असाही अनुभव आहे. शरीरप्रवृत्तीनुसार हा त्रास वेगळा असू शकतो. पण काहींना मात्र आंबट पदार्थ खाल्ले की, अॅसिडिटी झालीच म्हणून समजा असा अनुभव येतो. त्यामुळे आंबट पदार्थांचे सेवन अगदी जपून करावे.

शेंगदाणे, काजू

शेंगदाणे

ADVERTISEMENT

Instagram

 रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी काजू खाण्याचा ड्रायफ्रुट्स खा असे सांगितले जाते. त्यातल्या त्यात काजू हा सगळ्या ड्रायफुट्सचा राजा. महाग आणि चविष्ट. जर ते रोज खाणे परवडत नसेल तर शेंगदाणे खाण्याचा सल्ला दिला जातो. पण या दोन्ही गोष्टी शरीरासाठी कितीही चांगल्या असल्या तरी त्यामुळे अॅसिडिटीचा त्रास होऊ शकतो. उपाशीपोटी तुम्ही या दोन्ही गोष्टी कधीच खाऊ नका. 

सकाळचा नाश्ता न केल्यास होऊ शकतात हे साईड इफेक्ट्स

कच्चा टोमॅटो

कच्चा टोमॅटो

ADVERTISEMENT

Instagram

आंबट पदार्थांमध्ये टोमॅटो याचाही समावेश होऊ शकतो. काहींना कच्च्या टोमॅटोच्या अगदी जराशाही सेवनाने अॅसिडिटीचा त्रास होतो. कच्चा टोमॅटो बरेचदा सॅण्डवीच किंवा अन्य खाद्यपदार्थांमध्ये असतो. नेमकी खूप भूक लागल्यानंतर किंवा उपाशी पोटी तुम्ही कच्चा टोमॅटो खाल्ला की, तुम्हाला त्रास होऊ लागतो. 

तुम्हाला जर अॅसिडिटीचा त्रास असेल तर तुम्ही या पदार्थांचे सेवन उपाशीपोटी अजिबात करु नका. 

 

ADVERTISEMENT

 

04 Aug 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT