ADVERTISEMENT
home / DIY सौंदर्य
परमनंट आयलॅश एक्स्टेन्शन मिळवा लांब पापण्या

परमनंट आयलॅश एक्स्टेन्शन मिळवा लांब पापण्या

लांबसडक आणि काळ्याभोर पापण्या डोळ्यांचे सौंदर्य खुलवतात. आता काही जणांना लांब आणि घनदाट पापण्या या जन्मजात असतात. तर काहींना मात्र अशा पापण्या मिळवण्यासाठी बराच खटाटोप करावा लागतो. पण विज्ञानाने जशी क्रांती केली आहे. तशीच मेकअप विश्वानेही क्रांती केली आहे. सुंदर दिसण्यासाठी आता काही अशा सोयी आणि ट्रिटमेंट उपलब्ध झाल्या आहेत की, त्यामुळे आपण सगळेच सहज सुंदर दिसू शकतो. जर तुम्ही डोळ्यांचे सौंदर्य खुलवण्याचा विचार करत असाल तर परमनंट आयलॅश एक्स्टेन्शन म्हणजे काय हे तुम्हाला माहीत हवे. याहून थोड्या वेगळ्या पद्धतीची ही आयलॅश ट्रिटमेंट असते.  चला तर जाणून घेऊया या विषयी.. करुया सुरुवात

कृत्रिम आयलॅशेस लावण्यापूर्वी तुम्हाला माहीत असायला हव्या या गोष्टी

आयलॅश एक्स्टेन्शन म्हणजे काय?

आयलॅश एक्स्टेन्शन

Instagram

ADVERTISEMENT

मेकअप अधिक खुलवण्यासाठी पापण्यांना एक्सटेन्शन लावल्या जातात. या पापण्या वेगवेगळ्या आकारांमध्ये आणि रंगात मिळतात. एखादा प्रोफेशनल मेकअप करायला गेल्यानंतर डोळ्यांना या आयलॅश अगदी हमखास लावल्या जातात. मेकअप काढताना या आयलॅश निघून जातात.  या आयलॅश कितीही चांगल्या दिसत असल्या तरी त्या रोज लावणे अनेकांना फारच जीवावर येते. कारण ते लावण्यासाठी तुम्हाला सतत ग्लुचा उपयोग करावा लागतो. त्यावरच इलाज म्हणून परमनंट आयलॅश एक्स्टेन्शन हा प्रकार सध्या अनेक जण करताना दिसत आहेत.यामध्येही तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीचे आयलॅश मिळतात. 

5 दिवसात तुमच्याही पापण्या होतील लांब, करा हे उपाय

कसे लावले जातात परमनंट आयलॅश एक्स्टेन्शन

कसे लावले जातात परमनंट आयलॅश एक्स्टेन्शन

Instagra

ADVERTISEMENT
  • सगळ्यात आधी तुमच्या डोळ्यांवरील सगळे मेकअप प्रोडक्ट काढून तुमचे डोळे स्वच्छ केले जातात 
  • तुम्हाला किती लांब आणि कोणत्या पद्धतीचे आयलॅश हवेत याची निवड करण्यास सांगितली जाते. आयलॅशच्या एका पापणीपासून ते अगदी तुम्हाला हव्या असलेल्या घनदाट पापणीपर्यंत याचे वेगवेगळे दर असतात. 
  • तुम्ही पापण्या निवडल्यानंतर तुमच्या डोळ्यांखाली आणि डोळ्यांवर एक विशिष्ट प्रोटेक्शन कव्हर लावले जाते. 
  • डोळ्यांसाठी असलेल्या ग्लुचा उपयोग करुन तुमचे आयलॅश मागे केले जातात आणि त्यांच्या मुळापासून हे एक्स्टेन्शचे केस लावले जातात. 
  • हे अगदी बारीक काम असल्यामुळे अगदी एक-एक आयलॅश या लावल्या जातात. त्यामुळे याला बरेचदा वेळही लागू शकतो. 
  • तुम्ही जितक्या घनदाट आयलॅशची निवड कराल तुम्हाला अगदी तशाच त्या करुन मिळतात. 
  • या आयलॅश लावल्यानंतर तुम्हाला ते निघण्याची तशी भीती नसते. कारण त्या महिनाभर तरी  टिकतात. महिन्याभराने तुम्हाला टचअप करुन घ्यावे लागते. कारण त्यानंतर तुमच्या आयलॅश या थोड्या थोड्या निघायला सुरुवात होते. 
  • आयलॅश लावल्यानंतर तुम्ही त्यावर मस्कारा लावू शकता आणि कोणत्याही पद्धतीने मेकअप करु शकता. 
  • मुंबई आणि अशा काही बड्या शहरांमध्ये आता आयलॅश एक्स्टेन्शन हे करुन मिळते. साधारण 5  हजार असा याचा खर्च असतो.या केल्यानंतर तुम्हाला साधारण महिनाभर तरी पाहावे लागत नाही. 

आता काही खास प्रसंगासाठी तुम्हाला आयलॅश हव्या असतील तर तुम्ही हा आयलॅश एक्स्टेन्शनचा पर्याय निवडू शकता आणि सुंदर दिसू शकता. 

कृत्रिम आयलॅशेस लावताय, मग आधी जाणून ही माहिती

09 Sep 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT