टक्कल पडणे ही अती प्रमाणात डोक्यावरचे केस गळण्यामुळे निर्माण झालेली एक आरोग्य समस्या आहे. ज्याला इंग्रजी भाषेत Baldness आणि वैद्यकीय भाषेत Androgenetic Alopecia असं म्हटलं जातं. केसांचे अती नुकसान झाल्यामुळे डोक्यावरील स्काल्प दिसणं याला टक्कल पडणं असं म्हणतात. बऱ्याचदा पुरूष आणि महिला दोघांनाही या समस्येला तोंड द्यावं लागू शकतं. पुरूषांपेक्षा याचं प्रमाण महिलांमध्ये कमी प्रमाणात आढळून येत असलं तरी टक्कल पडणे हे दोघांसाठीही त्रासदायक नक्कीच असतं. महिलांमध्ये टक्कल (Female Baldness) पडण्याची कारणं पुरूषांपेक्षा वेगळी असू शकतात. पन्नास टक्के महिलांना आजकाल अती प्रमाणात केस गळण्यामुळे टक्कल पडण्याची समस्या आढळून येते. यासाठीच जाणून घ्या महिलांना टक्कल पडणे उपाय आणि कारणे.
महिलांना टक्कल पडण्याची कारणे (Causes Of Female Baldness In Marathi)
महिलांना टक्कल पडण्याची कारणे अनेक असू शकतात. यासाठी महिलांच्या आयुष्यात येणाऱ्या विविध टप्प्यांपासून एखादा गंभीर आजार असं काहीही कारणीभूत असू शकतं.
आनुवंशिकता (Heredity)
केस गळण्याने टक्कल पडण्याची कारणे अनेक असली तरी यामागे आनुवंशिकता हे एक महत्त्वाचे कारण असू शकते. जर तुमच्या आई, बहीण, मावशी अथवा आजीला केस गळण्यामुळे टक्कल पडले असेल तर तुम्हालादेखील असे टक्कल पडू शकते. कारण तुमच्या आईवडिलांकडून मिळणाऱ्या जीन्समध्ये यामागचे कारण दडलेले आहे. या कारणामुळे बऱ्याचदा मध्यम वयातील अथवा वृद्धापकाळात महिलांना केस गळून टक्कल दिसू लागते.
स्वयंप्रतिरोधक रोग (Autoimmune Disease)
टक्कल पडणे अथवा वैद्यकीय भाषेत प्रचलित असलेली Androgenetic Alopecia आरोग्य समस्या ही एक ऑटो इम्युन म्हणजेच स्वयंप्रतिरोधक रोग आहे. प्रतिकार शक्ती कमी झाल्यामुळे तुमच्या हेअर फॉलिकल्सचे नुकसान होऊन केस गळू लागतात.
हॉर्मोनल बदल (Hormonal Changes)
महिलांमध्ये अचानक होणाऱ्या हॉर्मोनल बदलांमुळे अथवा एखाद्या आरोग्य समस्येमुळे केस गळून त्यांना अचानक टक्कल पडू शकते. बाळंतपण, मॅनोपॉज अशा शारीरिक अवस्था अथवा थायरॉईड ग्रंथीचे असंतुलन, पीसीओडी अथवा अशा अनेक आरोग्य समस्यांमुळे महिलांचे केस अती प्रमाणात गळू लागलात आणि त्यांना टक्कल पडते. हार्मोनल बदलांमुळे गर्भधारणेमुळे केस गळतात.
औषधे आणि सप्लीमेंट्स (Medications And Supplements)
एखाद्या विशिष्ठ आजारावर औषधे घेतल्यामुळेही तुमचे केस अती प्रमाणात गळू शकतात. कर्करोग, आर्थ्रायटीस, डिप्रेशन, ह्रदयरोग, पोटाच्या समस्या, रक्तदाब अशा समस्येवर देण्यात येणाऱ्या काही औषधांचा हा साईड इफेक्ट असू शकतो. बऱ्याचदा वजन कमी करण्यासाठी अथवा वाढवण्यासाठी घेण्यात येणाऱ्या सप्लीमेंटमुळेही केस अती प्रमाणात गळू लागतात.
डोक्याकडील भागावर रेडिएशन थेरेपी देणे (Radiation Therapy To The Scalp)
कर्करोगाच्या आजारात उपचार देण्यासाठी रेडिएशन थेरेपीचा उपयोग केला जातो. मात्र जर डोक्याला रेडिएशन थेरपी दिली तर यामध्ये केस मोठ्या प्रमाणावर गळतात. यासाठी कर्करोगावर उपचार सुरू असताना रुग्णाला टक्कल पडते.
अती ताण अथवा मानसिक धक्का (Stress Or Mental Shock)
आजकालची जीवनशैली दिवसेंदिवस अती ताणतणावाची झाली आहे. कामाचा अथा नातेसंबधांचा अती ताण यामुळेही केस मोठया प्रमाणावर गळू शकतात. त्याचप्रमाणे एखादा मानसिक धक्काही याला कारणीभूत ठरू शकतो.
हेअरस्टाईल आणि हेअर ट्रिटमेंट (Hairstyles And Hair Treatments)
फॅशनेबल आणि स्टायलिश दिसण्यासाठी सध्या निरनिराळ्या हेअर स्टाईल आणि हेअर ट्रिटमेंट करणं हा जीवनशैलीचा एक भागच झाला आहे. मात्र अशा अती प्रमाणात केलेल्या हेअर स्टाईल आणि ट्रिटमेंटमुळे तुमचे केस गळू शकतात. कारण यासाठी निरनिराळ्या हानिकारक केमिकल्सचा केसांवर वापर केला जातो ज्यामुळे केसांचे नुकसान होते. केस गळती टाळण्यासाठी आपण सल्फेट फ्री शैम्पू वापरावे.
महिलांना टक्कल पडण्यावर उपाय (Home Remedies For Female Baldness In Marathi)
केस गळणे अथवा टक्कल पडणे यावर काही घरगुती उपचार करता येतात. कारण आपल्या घरात अशा अनेक गोष्टी असतात ज्यामुळे तुमच्या केसांचे आरोग्य सुधारू शकते.
योग्य प्रमाणात लोहयुक्त आणि प्रोटिन्सयुक्त आहार (Adequate Iron And Protein Rich Diet)
तुम्ही जे खाता त्याचा परिणाम तुमच्या त्वचा आणि केसांवरही होत असतो. केसांच्या योग्य वाढीसाठी तुमच्या शरीराला प्रोटिन्सयुक्त आणि लोहयुक्त आहाराची गरज असते. केस गळणाऱ्या लोकांना ज्यातून लोह आणि प्रोटिन्स मिळतील असे पदार्थ खाण्याचा सल्ला दिला जातो. अंडी, मासे, सुकामेवा, सुपरसीड्समधून तुम्हाला प्रोटिन्स मिळते तर पालक, भोपळ्याच्या बिया. हिरव्या पालेभाज्यांमधून तुम्हाला लोह मिळत असते.
एरंडेल तेलाचा मसाज (Castor Oil Massage)
एरंडेल तेल अथवा कॅस्टर ऑईलने केसांना मसाज केल्यामुळे केस गळणे थांबून नवे केलृस उगवण्यास चालना मिळते. यासाठी नियमित तुमच्या स्काल्पवर एरंडेल तेलाने मसाज करा. एरंडेल तेल चिकट असून त्यामध्ये भरपूर प्रमाणात अॅंटि इनफ्लेमटरी आणि अॅंटि फंगल घटक असतात. ज्यांमुळे तुमच्या केसांची मुळे मजबूत होतात आणि केस गळणे कमी होते आणि केस नैसर्गिकरित्या कर्ल करतात. दोन ते तीन आठवड्यात तुम्हाला याचा चांगला परिणाम दिसून येईल.
कसा कराल वापर –
दोन ते तीन चमचे एरंडेल तेल घ्या. ते कोमट करा आणि केसांवर त्याचा हलक्या हाताने मसाज करा. रात्रभर केसांमध्ये तेल ठेवा आणि सकाळी केस धुवून टाका. आठवड्यातून कमीत कमी दोन ते तीन वेळा हा मसाज घ्या.
नारळाच्या तेलाचा मसाज (Coconut Oil Massage)
केसांच्या कोणत्याही समस्येवर नारळाचे तेल हे रामबाण उपाय ठरू शकते. कारण यामुळे तुमच्या केसांचे योग्य पोण होते आणि केस वाढण्यास चालना मिळते. स्काल्प हायड्रेट राहण्यासाठी आणि केसांच्या आरोग्यासाठी आठड्यातून दोन ते तीन वेळा केसांना नारळाच्या तेलाने मसाज करणं गरजेचं आहे.
कसा कराल वापर –
दोन ते तीन चमचे शुद्ध नारळाचे तेल घ्या. ते कोमट करून हलक्या हाताने केसांवर मसाज करा. चार ते पाच तासांनी केस धुवून टाका. तुम्ही हे तेल केसांवर रात्रभर ठेवून सकाळी केस धुवू शकता.
अॅपल सायडर व्हिनेगर (Apple Cider Vinegar)
केसांमधील त्वचेचा पीएच बॅलन्स राखण्यासाठी केसांना नियमित अॅपल सायडर व्हिनेगर लावणं फायद्याचं ठरू शकतं. यातील अॅंटिमायक्रोबल घटक तुमच्या केसांना मजबूत करतात. त्वचेला खाज येणं अथवा कोंड्याच्या समस्याही यामुळे कमी होतात. त्यामुळे जर तुमचे या समस्यांमुळे केस गळत असतील तर केसांवर हा उपाय जरूर करा.
कसा कराल वापर –
एक कप पाण्यामध्ये दोन ते तीन चमचे अॅपल सायडर व्हिनेगर मिसळा आणि कॉटन पॅडने हे पाणी केसांच्या मुळांना लावा. दोन ते तीन मिटीने केसांना मसाज द्या आणि वीस मिनीटांनी केस थंड पाण्याने धुवा.
कोरफड (Aloe Vera)
कोरफडामुळे केसांच्या त्वचेचा दाह कमी होतो आणि कोंडाही निघून जातो. आजकाल केस गळण्याचे मुख्य कारण कोंडा आणि त्वचेची समस्या हे असू शकते. यासाठीच तुमच्या केसांना कोरफडाचा गर लावा ज्यामुळे तुमच्या केसांचे नुकसान थांबून ते वाढू लागतील.
कसा कराल वापर –
कोरफडाचा गर काढून घ्या. केसांच्या मुळांना हा गर लावा आणि वीस मिनीटांनी केस स्वच्छ धुवा. केस धुण्याआधी नियमित तुम्ही केसांना कोरफड लावू शकता.
कांद्याचा रस (Onion Juice)
आल्याचा रस टक्कल पडण्याच्या समस्येवर खूपच परिणामकारक ठरू शकतो. कारण यामुळे तुमचे केस पुन्हा नव्याने उगवू लागतील. यातील अॅंटि बॅक्टेरिअल घटकांमुळे तुमच्या केसांमध्ये कोंडाही होणार नाही. कांद्याचा रस आणि मध लावून तुम्ही तुमचे गमावलेले केस पुन्हा मिळवू शकता.
कसा कराल वापर –
एक मध्यम कांद्याचा रस आणि काही थेंब मध व्यवस्थित एकत्र करा. कॉटन पॅडने हे मिश्रण केसांच्या मुळांना लावा. वीस ते पंचवीस मिनीटांनी केस थंड पाण्याने धुवून टाका. त्यानंतर केसांना शॅम्पू करा कारण कांद्याचा वास फार उग्र असतो.
आल्याचा रस (Ginger Juice)
आल्याचे आरोग्यावर होणारे विविध परिणाम तुम्हाला माहीत आहेतच. मात्र आल्याचा रस तुमच्या केसांसाठीदेखील परिणामकारक आहे हे तुम्हाला माही आहे का? आल्यामध्ये असे पोषक घटक असतात ज्यामुळे तुमच्या केसांच्या वाढीला योग्य चालना मिळते.
कसा कराल वापर –
एक ते दोन इंच आल्याचा रस काढा त्यात दोन चमचे ऑलिव्ह ऑईल अथवा जोजोबा ऑईल मिसळा. या रसाने केसांना मसाज करा आणि तीस मिनीटांनी केस धुवून टाका.
मेथी (Methi)
मेथी जशी आरोग्यासाठी उत्तम आहे तशीच ती तुमच्या केसांच्या वाढीसाठीही गुणकारी आहे. कारण यामुळे तुमच्या केसांच्या अनेक आरोग्य समस्या कमी होतात आणि केसांची वाढ चांगली होते.
कसा कराल वापर –
रात्रभर दोन ते तीन चमचे मेथी पाण्यात भिजत ठेवा. सकाळी ती वाटून त्याची पेस्ट करा. दही आणि मेथीची पेस्ट एकत्र करून केसांना लावा. वीस मिनीटांनी केस स्वच्छ धुवा.
अंडे (Egg)
केसांच्या वाढीसाठी अंडे हा एक उत्तम घटक ठरू शकतो. कारण यामध्ये प्रोटिन्स असतात ज्यामुळे हेअर फॉलिकल्सचा चालना मिळते आणि केसांची योग्य वाढ होते. जर तुम्हाला मजबूत, चमकदार आणि सुंदर केस हवे असतील नियमित अंड्याचा वापर केसांसाठी करा.
कसा कराल वापर –
एक अंडे घ्या. त्यातील पिवळा भाग बाजूला काढून पांढरा भाग केसांच्या मुळांना लावा. वीस मिनीटांनी केस स्वच्छ धुवा. केसांना अंड्याचा वास येऊ नये यासाठी केसांना शॅम्पू अवश्य करा.
लिंबू (Lemon)
केसांच्या आरोग्यासाठी तुम्ही केसांना लिंबाचा रस अथवा लाईम ऑईल लावू शकता. लिंबामुळे केसांची स्वच्छता राखण्यास मदत होते ज्यामुळे केसांचे आरोग्य सुधारते. केसांची वाढ चांगली होण्यासाठी लिंबाचा वापर करण्यास मुळीच विसरू नका
कसा कराल वापर –
एका लिंबाचा रस आणि मध एकत्र करा. कॉटन पॅडने हा रस केसांना लावा. पंधरा मिनीटांनी केस स्वच्छ धुवा. ज्यामुळे केसांना मऊपणा मिळेल आणि ते स्वच्छ होतील.
टक्कल पडल्यास करा हे वैद्यकीय उपचार (Treatment For Female Baldness In Marathi)
जर घरगुती उपचार करून केस पुन्हा आले नाहीत तर तुम्हाला यावर वैद्यकीय उपचार घेण्याची गरज आहे.
मिनोक्सिडिल (Minoxidil)
मिनोक्सिडिल हे औषध टक्कल पडलेल्या रूग्णांना टक्कल पडलेल्या भागावर लावण्यासाठी हमखास दिले जाते. पुरूष आणि महिला दोघांनाही हे औषध वापरता येते. हे औषध दररोज त्वचेवर लावण्यामुळे काही दिवसांमध्ये केस हळू हळू लहान केस त्वचेवर उगवू लागतात. यासोबत यामुळे त्यांचे बाकीचे केस गळणे थांबवता येते. या उपचारांचा परिणाम दिसून येण्यासाठी कमीत कमी सहा महिने ते एक वर्षाचा कालावधी लागू शकतो. शिवाय याचा योग्य परिणाम सर्वांवर दिसून येईल याची खात्री देता येत नाही. या उपचारांमुळे त्वचा कोरडी होणे, लाल पुरळ उठणे, खाज येणे असे काही दुष्परिणामही भोगावे लागू शकतात. कधी कधी औषध बंद केल्यानंतर पुन्हा केस गळणे सुरू होऊ शकते.
इतर तोंडावाटे घेण्यासारखी औषधे (Oral Medication)
केस गळण्याऱ्या लोकांना अथवा टक्कल पडलेल्या लोकांना काही औषधे तोंडावाटे घेण्यासाठी दिली जातात. या औषधांमुळे तुमच्या शरीरातील अतिरिक्त पाणी बाहेर टाकले जाते. या औषधामुळे तुमच्या अॅड्रोंजीन या हॉर्मोन्सची निर्मिती बंद केली जाते. कारण तुमच्या केस गळण्यामागे हे हॉर्मोन्स कारणीभूत ठरत असते. या हॉर्मोन्सची निर्मिती बंद झाल्यामुळे केस पुन्हा येण्यास सुरूवात होते. मात्र यामुळे तुम्हाला तोंड कोरडे पडणे, मळमळ आणि चक्क अशा समस्यांना तोंड द्यावे लागू शकते.
हेअर ट्रान्सप्लांट (Hair Transplant)
टक्कल पडलेल्या लोकांसाठी हेअर ट्रान्सप्लांट अथवा केस प्रत्यारोपण हे उपचार सध्या प्रचलित होत आहेत. यासाठी विविध टेकनिक्सचा वापर केला जातो. वास्तविक केस गळण्यामुळे ज्या भागावर टक्कल पडले आहे त्या जागी त्या व्यक्तीच्या शरीरावरील दुसऱ्या भागाचे केस ट्रान्सप्लांट केले जातात. या प्रक्रियेसाठी बरेच तास खर्च करावे लागतात. कधी कधी जागेपणी अथवा उपचार केल्या जाणाऱ्या भागाला भूल देऊन हे उपचार करावे लागतात. तज्ञ्ज डॉक्टरांच्या मदतीनेच हे उपचार केले जातात व ते फार खर्चिक असतात.
लेझर ट्रिटमेंट (Laser Treatment)
लेझर ट्रिटमेंट हा केस पुन्हा उगवण्यासाठी फायदेशीर वैद्यकीय उपचार आहे. यासाठी लेझर उपकरणांचा वापर केला जातो. या साधनांच्या मदतीने लेझर लाईटचा वापर करून तुमच्या त्वचेवर केस पुन्हा उगवण्यासाठी चालना दिली जाते. ही देखील एक महागडी उपचार पद्धती आहे.
महिलांना टक्कल पडण्याबाबत मनात असलेले निवडक प्रश्न – FAQ’s
जीवनशैलीत योग्य बदल, संतुलित आहार आणि केसांची योग्य काळजी घेऊन तुम्ही केस गळणे थांबवू शकता. अती प्रमाणात केस गळत असतील तर तुम्हाला या गोष्टींची काळजी घ्यायलाच हवी.
होय, जर तुम्ही तुमच्या या समस्येवर घेत असलेले उपचार बंद केले तर कधी कधी तुम्हाला पुन्हा केस गळण्याच्या समस्येला सामोरं जावं लागू शकतं. यासाठी जीवनशैलीत योग्य बदल करा आणि केसांचे आरोग्य राखा.
केस नेहमीपेक्षा जास्त प्रमाणात गळत असल्यास, केस गळण्यामुळे टक्कल पडले असल्यास आणि घरगुती उपचारांचा कोणताही फायदा न झाल्यास तुम्हाला डॉक्टरांच्या सल्ल्याची गरज आहे हे ओळखा.