आजकाल अनेकांना तरूणपणीच केस पांढरे होण्याची समस्या जाणवते. थोडेच केस पांढरे असतील आणि ते काळे करण्यासाठी कृत्रिम डाय अथवा हेअर कलरचा वापर केला तर हळूहळू सगळेच केस पांढरे होतात असा अनेकांचा अनुभव आहे. यासाठी केस कमी प्रमाणात पांढरे असतील तेव्हाच नैसर्गिक उपाय केसांवर करायला हवेत. ज्यामुळे केस काळे तर होतात शिवाय त्यांचे जास्त नुकसानही होत नाही. मेंदीप्रमाणाच आवळ्यानेही तुम्ही घरगुती हेअर डाय बनवू शकता. आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी, बी, लोह, फॉफ्सरस, कॅरोटीन असतं. ज्यामुळे तुमचे केस नैसर्गिक पद्धतीने काळे होतात. शिवाय केसांचे आरोग्यही सुधारते.यासाठी ही माहिती अवश्य वाचा
Shutterstock
आवळ्यापासून कसा कराल घरगुती हेअर डाय –
आवळ्याचा वापर करून तुम्ही निरनिराळ्या पद्धतीने केसांसाठी नैसर्गिक डाय तयार करू शकता.
- मेंदीप्रमाणेच आवळा पावडरही लोखंडाच्या कढईमध्येच भिजवा ज्यामुळे त्यापासून डाय तयार होईल. यासाठी आवळा पावडर पाण्याच्या मदतीने हळू हळू जाडसर पेस्ट होईपर्यंत या कढईत भिजवा. आणि रात्रभर ठेवा. सकाळी यापासून डाय तयार होईल. हा डाय केसांना लावा आणि अर्ध्या तासाने केस धुवून टाका. आवळा पावडर ही केसांसाठी अप्रतिम ठरते. आवळा पावडर चे फायदे अनेक आहेत.
- आवळ्याच्या फोडी सुकवा आणि तव्यावर काळसर होईपर्यंत भाजून घ्या. थंड झाल्यावर त्या मिक्सरमध्ये वाटून घ्या. ही पावडर तुम्ही तुमचे केस डाय करण्यासाठी वापरू शकता. तुम्ही मेंदीमध्ये देखील ही पावडर मिसळू शकता. ज्यामुळे तुमच्या केसांना काळा रंग मिळेल.
- केसांना काळं करण्यासाठी आवळा तुम्ही आणखी एका पद्धतीने वापरू शकता. यासाठी ताज्या आणि कोवळ्या आवळ्यांचा रस काढा. आवळ्याचा रस, नारळाचे तेल अथवा बदामाचे तेल समप्रमाणात घ्या. त्यात थोडा लिंबाचा रस मिसळा आणि मिश्रण एकजीव करा. हे मिश्रण तुम्ही कॉटन पॅडच्या मदतीने केसांच्या मुळांना लावू शकता. त्यानंतर हलक्या हाताने केसांना मसाज द्या. वीस ते तीस मिनीटे ते केसांमध्ये चांगलं मुरू द्या. त्यानंतर साध्या पाण्याने केस धुवा. आठवड्यातून दोन ते तीन वेळा हा प्रयोग केल्यास तुमचे केस काळे होतील.
आवळ्याचं लोणचं (Amla Pickle Recipe Maharashtrian Style)
Shutterstock
आवळ्यामुळे का होतात केस काळे –
आवळ्यातील पोषक घटकांमुळे केस त्वरीत काळे तर होतातच. शिवाय ते मजबूत आणि घनदाटही होतात. आवळ्यामध्ये फायटो न्युट्रियंट्स, व्हिटॅमिन आणि खनिज पदार्थ असतात. आवळ्यामुळे रक्ताभिसरण सुधारते आणि केसांना योग्य प्रमाणात ऑक्सिजन मिळते. ज्यामुळे तुमच्या केसांचे आरोग्य सुधारते. आवळ्यामधील या गुणकारी घटकांमुळे तुमच्या केसांच्या वाढीला चालना मिळते. आवळ्यामध्ये कोलीजन असते ज्यामुळे केसांवरील जुन्या पेशी निघून जातात आणि नवीन पेशींची निर्मिती होते. यासाठी आहारामध्ये आवळ्याचा समावेश करा. आवळयापासून तयार करण्यात आलेली लोणची, मोरावळे आणि विविध प्रकार खा. आवळ्याचा चवनप्राश खाण्याने तुमची रोग प्रतिकार शक्तीदेखील वाढते. केस काळे करण्यासाठी आम्ही शेअर केलेले नैसर्गिक डाय तर अवश्य वापरा. मात्र केस कायम काळे राहावेत यासाठी केसांना आवळ्यापासून तयार केलेलं तेल लावा. ज्यामुळे तुमचे केस काळेभोर आणि मजबूत होतील.
फोटोसौजन्य – शटरस्टॉक
अधिक वाचा –
मजबूत चमकदार केसांसाठी वापरा आवळा, रीठा आणि शिकाकाई (How To Use Amla, Reetha And Shikakai For Hair)
आवळ्याचे असे सेवन करुन मिळवा सुंदर केस आणि चमकदार त्वचा