चेहऱ्यावर आलेल्या मुरूमांपासून सुटका मिळावी म्हणून महिला काय काय उपाय नाही करत? पण तरीही जेव्हा कोणत्या कार्यक्रमाला खास जायचे असते तेव्हा चेहऱ्यावर कुठे न कुठे तरी मुरूमं अथवा पुळ्या येतातच. महागड्या सौंदर्य उत्पादनापासून ते अगदी स्किन ट्रीटमेंटपर्यंत सर्व काही मुरूमांपासून सुटका मिळविण्यासाठी केले जाते. बऱ्याचदा कमी व्हायच्या ऐवजी ही समस्या अधिक वाढते. वास्तविक या समस्येतून सुटका मिळवायची असेल तर योग्य डाएट फॉलो करणंही गरजेचे आहे. पण तुम्हाला घरगुती उपायांनीही ही मुरूमं कमी करता येऊ शकतात. घरगुती उपाय म्हणून तुम्ही यामध्ये डाळिंबाचा समावेश करून घेऊ शकता. हे केवळ मुरूमांसाठीच नाही तर त्वचेमध्ये साचलेली घाण आणि मृत त्वचा दूर करण्यासाठीही फायदेशीर ठरते. घरच्या घरी तुम्हाला डाळिंबाचे वेगवेगळे फेसपॅक तयार करता येतात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे डाळिंबाचे दाणे आणि त्याचे साल हे दोन्ही त्वचेसाठी उत्तम ठरते. तसंच डाळींब हे फळ सहज बाजारात उपलब्ध होते. या फेसपॅकमध्ये लागणाऱ्या सर्व गोष्टी या घरातच उपलब्ध असल्याने हे अधिक खर्चिकही नाही. याच्या नियमित वापराने तुम्ही तुमच्या चेहऱ्यावरील मुरूमांचा नायनाट करून पुन्हा एकदा चमकदार त्वचा मिळवू शकता. तसंच तुम्ही MyGlamm चे वाईपआऊटही वापरू शकता.
डाळींब आणि दह्याचा मास्क
Shutturstock
मुरूमांपासून सुटका हवी असेल तर तुम्ही घरच्या घरी डाळींब आणि दह्याचा हा फेसमास्क वापरून पाहू शकता. हे तुम्हाला केवळ ताजेपणाच देणार नाही तर चेहऱ्यावरील मुरूमं आणि डागांची समस्या दूर करण्यासाठीही याचा उपयोग होतो.
कसे बनवावे
- डाळिंबाचे दाणे काढून घ्यावेत
- डाळिंबाचे दाणे आणि दही याची ब्लेंड करून पेस्ट बनवावी
- ही पेस्ट चेहऱ्याला लावा आणि साधारण अर्धा तास तसंच ठेवा
- नंतर थंड पाण्याने चेहरा धुवा
- याचा नियमित वापर केल्यास मुरूमं अजिबात चेहऱ्यावर राहणार नाहीत
डाळिंबाच्या सालांचा फेसमास्क
Shutterstock
चेहऱ्यावरील मुरूमांची समस्या दूर करण्यासाठी डाळिंबाच्या सालांचादेखील उपयोग करून घेता येतो. डाळिंबाचे सालही आपल्या त्वचेसाठी उत्तम ठरते.
कसे बनवावे
- डाळिंबाचे साल काढून घ्यावे
- एका भांड्यात पाणी घेऊन त्यात साल टाकावे आणि उकळावे
- उकळल्यावर हे पाणी गाळून घ्या आणि नंतर मिक्समधून ब्लेंड करून घ्या
- ब्लेंड झाल्यावर त्यात गुलाबपाणी मिक्स करा
- ही पेस्ट चेहऱ्याला लावा आणि साधारण 10 मिनिट्स ठेवा
- मुरूम लवकर जायला हवे असतील तर फेसमास्क लावल्यावर 2 मिनिट्ससाठी तुम्ही चेहऱ्यावर वाफही घे शकता
- काही वेळानंतर थंड पाण्याने चेहरा साफ करा
- हा प्रयोग तुम्ही आठवड्यातून दोन दिवस करू शकता
डाळींब आणि लिंबाचा फेसमास्क
Shutterstock
तेलकट चेहरा असणाऱ्यांना सर्वात जास्त मुरूमांची समस्या जाणवते. अशा परिस्थितीत डाळींब आणि लिंबाच्या रसाचा फायदा करून घेता येतो. हे केवळ मुरूमांपासून सुटका मिळवून देत नाही तर डाग, निशाण काढून टाकण्यासाठीही याचा उपयोग होतो. डाळिंबामध्ये असणारे अँटिऑक्सिडंट्स गुण हे पोअर्स ओपन करतात आणि त्वचेला स्वच्छ करतात. निरोगी त्वचा मिळविण्यासाठी याचा चांगला उपयोग करून घेता येतो.
कसे बनवावे
- लिंबाचा आणि डाळिंबाचा रस समसमान प्रमाणात घ्या
- हा रस त्वचेवर लावा आणि अर्धा तास तसंच राहू द्या
- नंतर थंड पाण्याने स्वच्छ करा
पुढे वाचा –
Pomegranate Health Benefits in Hindi
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक